रेवतीची गेल्या वर्षीच्या गणपतीपासुनच वेगवेगळ्या आकाराचे उकडीचे मोदक करायाला सुरुवात झाली होती. यावर्षी बाप्पाला चिरणे वापरुन केलेले स्टार फिश, सर्कल, आयत असे नवीन आकारातले मोदक खायला मिळाले.
आज तर सकाळपासुन "मी तुला मदत करणार" असा घोशा सुरु होता, इतके कि आन्घोळ झाल्याशिवाय मदतीला घेणार नाही सांगितल्यावर रोजची अर्ध्या तासाची आंघोळ आज १० मिनिटात आवरली.
तोपर्यंत कणिक सारखी करुन पुरण वाटाण्यापर्यंत गाडी आली होती, मग आईच्या हाताला थोडा हात लावला पोळ्या करायला सुरुवात केल्यापासुन मी उंडा करते, मी पोळी लाटते सुरु होते. शेवटची पोळी तिला करायला द्यायची - या प्रॉमिसवर मांडवली झाली आणि त्यातुन हे झाले -
कशी झाली आहे मी केलेली पुरणपोळी ?
टीप - यात पुरणयन्त्रातुन पुरण वाटणे आणि प्रत्यक्ष पोळी लाटणे हे रेवतीने केले आहे, बाकी उंडा भरुन देणे आणि पोळी भाजणे हे मी केले.
मस्तच की रेवती!! ही पोळी
मस्तच की रेवती!! ही पोळी नक्कीच इतर पोळ्यांपेक्षा जास्त गोड झाली असणार, अगदी तुझ्यासारखी!!
सगळ्यांना कौतुकाबद्द्ल
सगळ्यांना कौतुकाबद्द्ल धन्यवाद !
नक्की बाबांनी खाल्ली असणार. लाडक्या लेकीच्या हातच्या पोळ्यांचे पैले गिर्हाईक, अन कौतुककर्ते बाबाच असतात. हो ना? भरपूर शाबासकी मिळाली असणारे. >>> सगळ्यांनी पोळी शेअर करायची असे लेकीने आधीच सांगुन ठेवल्यामुळे बाबाच्या वाटणीला फक्त एक घासच आला
मला फोटो दिसत नाही.
मला फोटो दिसत नाही.
मस्तच ! शाब्बास रेवती!
मस्तच ! शाब्बास रेवती!
जबरदस्तच
जबरदस्तच
मस्तच ! शाब्बास रेवती!
मस्तच ! शाब्बास रेवती!
मस्त ! शाब्बास रेवती!- _/\_
मस्त ! शाब्बास रेवती!- _/\_
ग्रेट , शाब्बास रेवती.
ग्रेट , शाब्बास रेवती.
मस्तच की रेवती!! ही पोळी
मस्तच की रेवती!! ही पोळी नक्कीच इतर पोळ्यांपेक्षा जास्त गोड झाली असणार, अगदी तुझ्यासारखी!!>>+१
या वयात पुरणपोळी.. मी तर
या वयात पुरणपोळी.. मी तर बालमजूरीची केस टाकायला धागा उघडला
(No subject)
अभिनंदन रेवती
अभिनंदन रेवती
Pages