‘अभिषेक, घरी जातो आहेस ना?’
समीरने खांद्यावर हात ठेवला तेव्हा अभिषेक दचकला. त्याने आजूबाजूला पाहिलं तर जवळपास अर्ध ऑफिस रिकामं झालं होतं. उरलेलं जायच्या तयारीत दिसत होतं. गेली दहाएक मिनिटं आपण समोरच्या स्क्रीनकडे नुसतं बघत होतो हे आता कुठे त्याच्या लक्षात आलं.
‘हो रे, निघतोच आहे. एव्हढं प्रेझेन्टेशन कम्प्लीट करायचंय. तेव्हढं करतो आणि निघतो बघ'
‘नक्की?’ समीरने विचारलं. त्याच्या स्वरात काळजी होती.
‘अरे नक्की यार. निघ तू. मनीषा वाट बघत असेल घरी'. अभिषेक बळेबळे हसून म्हणाला.
समीर गेल्यावर त्याने वॉशरुम मध्ये जाऊन तोंडावर गार पाण्याचा एक हबका मारला. मशीनमधून कॉफी घेतली आणि पुन्हा कम्प्युटरसमोर येऊन बसला. समोर प्रेझेन्टेशन आ वासून ओपन होतं. आत्तापर्यंत फक्त एकच स्लाईड बनवून झाली होती. पण काळजी ती नव्हती. काळजी ही होती की आज घरी जायचं की नाही. अर्थात ती आता नेहमीचीच काळजी झाली होती म्हणा. पण म्हणून दर दिवशी ती नव्याने वाटायची नाही असं नाही. उलट दर दिवशी त्याला स्वत:चाच खूप राग यायला लागला होता आता. काहीतरी करायला हवं होतं. पण काय?
त्याने पुन्हा एकदा काम सुरु करायचा यथाशक्ती प्रयत्न केला. पण नाही. डोक्यात पुन्हा तेच तेच विचार यायला लागले. त्याच रस्त्यावरून विचारांची गाडी रोज जायची....एखादं नवं ठिकाण लागेल ह्या अपेक्षेने. पण पोचायची मात्र त्याच ठिकाणी. आज तो रस्ता कायमचा बंद करायचा का? ऑफिसच्या टेरेसवर तो बर्याचदा गेला होता. अगदी आयडियल जागा होती ती उडी टाकायला. फक्त धैर्य गोळा करायला हवं. एखादा क्षण वेदना होईल कदाचित पण मग नंतर सगळं शांत. हमखास मरण येणार हे नक्की. पण मग ऑफिसच्या लोकांच्या मागे चौकशीचं नसतं लचांड लागेल त्याचं काय? तसे त्याच्या ऑफिसमधले लोक चांगले होते. गेले काही महिने तर सगळेच त्याला सांभाळून घेत होते. अगदी किरकिरा वाटणारा नलावडेसुध्दा. आपल्यामुळे त्यांना त्रास होणं चांगलं नाही. ते काही नाही...आपल्याला जीव द्यायचाच असेल तर इथून दूर कुठेतरी जाऊन द्यायचा. आणि नीट लिहून ठेवायचं की माझ्या मृत्युला कोणाला जबाबदार धरण्यात येऊ नये. अर्थात ते खोटं बोलणं होईल म्हणा. एक व्यक्ती त्याच्या आत्महत्येला जबाबदार असेलच. पण ते पत्रात लिहिण्यात काही अर्थ नसणार. उगाच लोक काय काय बोलायचे. अर्थात आपण मेल्यावर ते काही बोलले तरी काय फरक पडतो म्हणा.
विचारांच्या ह्या उलटसुलट चक्राने त्याला एकदम घुसमटल्यासारखं होऊ लागलं. बाहेर, गर्दीत, धक्के खात, वाहनांच्या हॉर्न्सचा, लोकांच्या बोलण्याचा आवाज ऐकायला हवा असं वाटायला लागलं. आपला आतला आवाज ऐकायचा नसेल तर हा जालीम उपाय आहे. त्याने सगळं आवरलं. बाहेर रिसेप्शनरूममध्ये काशीराम बसला होता.
‘निघालात साहेब?’ त्याने विचारलं. अर्थात तो आपण निघायचीच वाट बघत असणार हे त्याला माहित होतं. पण म्हटलं ना की ऑफिसमधले सगळे सांभाळून घेत होते.
‘हो रे. उशीर झाला नाही का?’ काशीरामने हसला.
‘गुड नाईट साहेब'
‘गुड नाईट रे'
तो ऑफिसमधून बाहेर पडला. आता कुठे जायचं? लगेच स्टेशन गाठावं असं वाटत नव्हतं. कुठे घाई आहे आपल्याला? मरायची घाई आहे. घरी जायची मात्र नाही. त्याला हसू आलं. काय सालं लाईफ झालंय.
ऑफिसजवळ एक मोठं मॉल. कितीदा तरी गेलाय तो तिथे गेल्या काही महिन्यात. आता सिक्युरिटीचे लोक पण ओळखायला लागले असतील. पण एकदा आत गेलं की वेळ कसा जायचा कळायचं देखील नाही. कुठे नको असलेले कपडे बघ. कुठे पुस्तकं चाळ. होम डेकॉरच्या दुकानातून फिर. भूक नसायची तरी वेळ घालवायला काही खायचं. मग पाय बोलायला लागले की स्टेशनचा रस्ता धरायचा. असं किती दिवस चालणार?
चालता चालता एकदम त्याचे पाय थबकले. समोर एक जोडपं होतं. एकच आईसक्रीम दोघं मिळून खात होते. त्याला एकदम मीनलची आठवण झाली. तिला चॉकलेट फ्लेवर कसला आवडायचा. आणि आपल्याला अजिबात नाही. पण तिच्यासाठी आपण चॉकलेट आईसक्रीमसुध्दा खायचो. कुठे असेल आता मीनल? आपलं लग्न झाल्यावर कधी भेटलीच नाही ती. सहाजिकच आहे म्हणा. तिच्या नवर्याला आवडत असेल का चॉकलेट फ्लेवर? नसेल तरी तिच्यासाठी खात असेल का तो? आपलं तिच्याशी लग्न झालं असतं तर आपण खाल्ला असता का?
‘लग्न'! अभिषेक दचकला. थांबलाच एकदम. घरी चित्रा वाट बघत असेल ना? नाही, नको तो विषय आता. निदान घराच्या दरवाज्यापर्यंत जाईपर्यंत तरी नको. मग तो विचार टाळतो म्हटलं तरी नाही टाळता येणार.
दहा वाजायला आले. आता मॉलमध्ये वेळ काढणं अशक्य होतं. फिरून फिरून त्याचे पाय दुखायला लागले होते. नेहमीप्रमाणेच. आणि थोडा थकवाही जाणवत होता. नेहमीप्रमाणेच. कसातरी पाय ओढत तो बाहेर आला. स्टेशनवर गर्दी नव्हती. एक काळ असा होता कि गर्दी नाही म्हणून त्याला आनंद झाला असता. आता भोवती सदोदित गर्दी असावी असं वाटतं.
लोकल आली. फर्स्टक्लासच्या डब्यात शिरून बसल्यावर त्याला बरं वाटलं. पण क्षणभरच. प्रवास संपला की आपल्याला घरी जायचं आहे हे आठवलं ना. २-३ महिन्यांपूर्वी त्याने न उतरता ट्रेनने दोन्ही टोकाच्या स्टेशनचा प्रवास केला होता. एकदा. दोनदा. अनेकदा. पण शेवटी काय घरीच जायला लागतं. हॉटेलवर राहून पाहिलं. तिथेही परिस्थितीत फरक पडला नव्हताच. जे घरी तेच दारी. आणि हॉटेलमध्ये किती दिवस राहणार? एक महिना? दोन महिने? मग शेवटी काय घरी जायला लागतंच. परिस्थितीतून सुटका नाही हे लक्षात आलं तरी परिस्थिती स्वीकारणं जड जातंच की माणसाला.
त्याने डोळे मिटून घेतले. कोणाजवळ मन मोकळं करायचीसुध्दा सोय नाही. समीरला सांगावं असा विचार कितीदा तरी केला होता त्याने. पण त्याची काय प्रतिक्रिया होईल कोणास ठाऊक असं वाटलं त्याला. आई-बाबाना त्यांचे प्रॉब्लेम्स खूप आहेत. आपलं हे व्याह्याचं घोडं त्यांच्या दारात बांधायचा त्याला धीर होत नव्हता. गुंता सुटण्याऐवजी दिवसागणिक वाढतच चालला होता.
घराचं स्टेशन जवळ आल्यावर त्याला सवयीने जाग आली. तेव्हढ्याश्या डुलकीने सुध्दा त्याला एकदम ताजंतवानं झाल्यासारखं वाटलं. पण हे सगळं घरी जाईतोच टिकणार आहे हेही त्याला माहित होतं.
सोसायटीच्या आवारात आज कोणी नव्हतं. पण तो लिफ्टसाठी उभा असताना लेलेकाका बाहेरून आले.
‘काय अभिषेक कसा आहेस?’ त्यांनी विचारलं.
‘बरा आहे काका. तुम्ही कसे आहात? आणि काकू?’
‘बरे आहोत की दोघे'
लिफ्ट आली. दोघे आत शिरले. लेल्यांना काहीतरी विचारायचं होतं असं वाटलं खरं त्याला. पण कदाचित तो त्याचा भास असेल. कारण त्याला स्वत:ला बर्याचदा वाटलं होतं की ह्यांना आणि काकुंना तरी एकदा सगळं सांगावं. ते त्याला आणि चित्राला ओळखत होते की गेल्या ३-४ वर्षांपासून. पण मग परत विचार केला की उगाच सगळ्या सोसायटीभर झालं तर? तसा लेलेकाकांवर त्याचा विश्वास होता. पण तरी.........
हा 'पण तरी' आपल्याला एक दिवस नक्की महागात लागणार आहे. लेल्यांचं घर दुसर्या मजल्यावर. ‘गुड नाईट' म्हणून ते गेले.
‘साब, टेन्थ फ्लोर आ गया' लिफ्टमन म्हणाला तसा अभिषेक पुन्हा तंद्रीतून बाहेर आला. आजकाल आपलं असं नेहमी होतंय.
त्याने लिफ्टबाहेर पाउल टाकलं. उजवीकडे वळल्यावर १०४ ची पाटी दिसली. चित्रा आणि अभिषेक सरपोतदार. तो दाराबाहेर उभा राहिला. आत जायची इच्छा अजिबात होत नव्हती. पण जाणं भाग होतं. घरात जाणं भाग होतं.
त्याने दरवाजा उघडला.
आत अंधार होता. नेहमीसारखाच.
त्याने लाईट लावला नाही. नेहमीसारखाच.
त्याने बूटही काढले नाहीत. नेहमीसारखेच.
तो दिवाणखान्यात आला. नेहमीसारखाच.
‘आलास अभि? कधीची वाट पहात होते. दमला असशील ना?' चित्राने विचारलं. नेहमीसारखंच.
ती सोफ्यावर बसलेली असणार. नेहमीसारखीच.
त्याने काहीच उत्तर दिलं नाही. बोलण्यासारखं होतंच काय?
'जेवलास ना?’
तो गप्पच. बेडरूममध्ये जाऊन त्याने धाडकन दरवाजा लावून घेतला. ती मागून आली नाही की तिने दरवाजा वाजवला नाही. तिची लक्षमणरेषा ती ओलांडणार नव्हती कधीच.
‘गुड नाईट अभिषेक' एव्हढंच म्हणाली. नेहमीसारखीच.
अभिषेकने दोन्ही कानांवर हातांचे तळवे घट्ट दाबून धरले. हे सगळं सहनशक्तीपलीकडलं होतं.
काय म्हणाली होती ती? ६ महिन्यांपूर्वी ह्याच बेडरूममध्ये. ह्याच बेडवर. काय म्हणाली होती?
ल्युकेमियाने तिला कायमचं घेऊन जायच्या क्षणभर आधी ....आपले झरणारे डोळे तिच्या कृश झालेल्या हातांनी पुसत, उसनं हसू ओठांवर आणत थरथरत्या स्वरांत काय म्हणाली होती?
धर्मे च अर्थे च कामे च मोक्षे च.......
.............नातिचरामि
मस्तेय
मस्तेय
छान आहे कथा...
छान आहे कथा...
पण वाचून डोळ्यात पाणी आले. एवढी मोठी ट्रॅजेडी. बायको मरूनही तिचे भूत सोबत करतेय. खरेच एखाद्याला वेड लागेल अश्याने. पण आत्महत्या करून कदाचित तो आणखी आगीतून फुफाट्यात पडू शकतो..
@स्वप्ना_राज,
@स्वप्ना_राज,
लेलेंबरोबर झालेला संवाद आणि कथे मधे आलेले hints मुळे थोडीSS प्रेडिक्टेबल झालि. पण अगोदर सांगीतल्यानुसार, कथा,मला आवडली!!
आवडली.
आवडली.
घरी त्रास देणार कोणीतरी असणार अस वाटल होत. लेले काकांनी प्रत्येक भेटीत बायको बद्दल विचारलच पाहिजे अस काही नाही त्यामुळे त्याचे काही वाटले नाही.
पण तो बायकोच्या भासाला ईतक का घाबरतो? त्यामुळे त्यांच्या ह्या अतुट प्रेमाची प्रेमकहाणी होण्या एवजी हॉरर स्टोरी होउन गेली आहे.
Karan tee aahe. Bhas nahit.
Karan tee aahe. Bhas nahit.
(Actually,
Its open for interpretation and I really like that its just suggestive and open for readers..)
Swapna, tee neet bolate tevha prashnachinha aal, pan ka the kalal nahi.
कथा आवडली.तो घरी गेल्यावर काय
कथा आवडली.तो घरी गेल्यावर काय होतय ह्याची उत्सुकता होतीच शेवटपर्यंत.
Karan tee aahe. Bhas nahit. <
Karan tee aahe. Bhas nahit. <<< हे कस? कथेत एक वाक्य आहे की > "ल्युकेमियाने तिला कायमचं घेऊन जायच्या क्षणभर आधी ... "
Karan tee aahe. Bhas nahit. <
Karan tee aahe. Bhas nahit. <<< हे कस? भुत बनून राहते ती
पण तो इतका का घाबरतो ते लक्षात नाही येत
आपली माणसे आपली कितीही लाडकी
आपली माणसे आपली कितीही लाडकी असली तरी ती भूत बनून आली तर कोणीही घाबरेल ... कंडिशनिंग तसेच झालेय आपले.
छान आहे कथा!!
छान आहे कथा!!
नातिचरामि चा अर्थ बाबू म्हणत आहेत तसा असेल तर नाव आणि शेवट किंचित बदलायला हवा आहे का? सजेशन आहे. आवडत नसेल तर क्षमस्व!!
कथा छान लिहिलीय. आवडली .
कथा छान लिहिलीय. आवडली .
पण
धर्मे च अर्थे च कामे च मोक्षे च.......
.............नातिचरामि
याने घोळ वाढतोय... याचा "खरा" अर्थ स्पष्ट केलात तर बरं होईल. उत्सुकता वाढलीय.
मला गुगल वर हे सापडलं ... ..........
मर्यादाकरण
दिशा और प्रेरणा
कन्यादान-गोदान के बाद कन्यादाता वर से सत् पुरुषों और देव शक्तियों की साक्षी में मर्यादा की विनम्र अपील करता है। वर उसे स्वीकार करता है। कन्या का उत्तरदायित्व वर को सौंपा गया है। ऋषियों द्वारा निधार्रित अनुशासन विशेष लक्ष्य के लिए हैं। अधिकार पाकर उस मयार्दा को भुलकर मनमाना आचरण न किया जाए। धर्म, अर्थ और काम की दिशा में ऋषि प्रणीत मयार्दा का उल्लंघन अधिकार के नशे में न किया जाए। यह निवेदन किया जाता है, जिसे वर प्रसन्नतापूवर्क स्वीकार करता है।
क्रिया और भावना
कन्यादान करने वाले अपने हाथ में जल, पुष्प, अक्षत लें। भावना करें कि वर को मयार्दा सौंप रहे हैं। वर मयार्दा स्वीकार करें, उसके पालन के लिए देव शक्तियों के सहयोग की कामना करे।
ॐ गौरीं कन्यामिमां पूज्य! यथाशक्तिविभूषिताम्। गोत्राय शमर्णे तुभ्यं, दत्तां देव समाश्रय॥ धमर्स्याचरणं सम्यक्, क्रियतामनया सह। धमेर् चाथेर् च कामे च, यत्त्वं नातिचरेविर्भो॥ वर कहें- नातिचरामि।
{{ वरील अर्थ लक्षात घेता... वर म्हणजे नवरा तिला सोडून कुठेही जाऊ शकत नाही... असं वचन घेतलं गेलाय.. म्हणजे बायकोची(आत्मा * भूत) धास्तीच... }}
>>तो हॉटेल मध्ये वगैरे
>>तो हॉटेल मध्ये वगैरे राहिलाय लिहिलेय, जिथे हा त्रास होत नाहीय. मग घर बंद करून सरळ शहरच सोडायचा उपाय एकदा करून पहावा त्याने.
नाही साधना, मी हे लिहिलंय बघ 'हॉटेलवर राहून पाहिलं. तिथेही परिस्थितीत फरक पडला नव्हताच. जे घरी तेच दारी. ' म्हणजे तिथेही ती त्याच्यासोबत आहेच.
>>लेलेंबरोबर झालेला संवाद आणि कथे मधे आलेले hints मुळे थोडीSS प्रेडिक्टेबल झालि.
ओक्के. धन्यवाद
>>पण तो बायकोच्या भासाला ईतक का घाबरतो?
गेलेल्या व्यक्तीचा आत्मा खरंच असला किंवा त्याचा भास जरी झाला तरी माणूस घाबरणारच. दुसरं असं की भास होत असेल तर आत्मा खरंच आहे की आपल्यात काही मानसिक दोष आहे ह्यानेही माणूस अस्वस्थ होऊ शकतो.
>>(Actually, Its open for interpretation and I really like that its just suggestive and open for readers..)
येस्स. मला हेच अभिप्रेत होतं. लोकांना काय काय वाटतं ते वाचायला खूप मस्त वाटतं.
>>Swapna, tee neet bolate tevha prashnachinha aal, pan ka the kalal nahi.
मला हा प्रश्न कळला नाही. सॉरी ग. परत लिहिशील का?
>>आपली माणसे आपली कितीही लाडकी असली तरी ती भूत बनून आली तर कोणीही घाबरेल ... कंडिशनिंग तसेच झालेय आपले.
अगदी अगदी साधना
>>नातिचरामि चा अर्थ बाबू
>>नातिचरामि चा अर्थ बाबू म्हणत आहेत तसा असेल तर नाव आणि शेवट किंचित बदलायला हवा आहे का? सजेशन आहे. आवडत नसेल तर क्षमस्व!!
हो, ते म्हणताहेत तो अर्थ बरोबर आहे. मी माहितीतल्या संस्कृत जाणणार्यांना विचारलं. खरं तर आधीच विचारायला हवं होतं. असो. आता हे सगळं बदलण्यात अर्थ नाही. 'क्षमस्व' कश्यासाठी?
>>याचा "खरा" अर्थ स्पष्ट केलात तर बरं होईल. उत्सुकता वाढलीय.
"नातिचरामि म्हणजे अतीचरण करणार नाही. म्हणजे ध अ का मो सगळे प्रमाणात करीन" हा बाबू ह्यांनी दिलेला अर्थ बरोबर आहे. नेटवर काही साईटसवर चुकीचा अर्थ दिलाय आणि दुर्देवाने मी त्याच साईटस पाहिल्या.
स्वप्ना,
स्वप्ना,
काल मी नातिचरामिचा चुकीची फोड दिलीय.तुझे बरोबर आहे.न +अतिचरणच हवे.
बाकी नातिचरामिचा गुगलवर पाहिलेला अर्थ
"Dharmecha, Arthecha, Kamecha, Mokshecha.. Naati Charaami!!"
"Righteously, financially, by desire, or spiritually, I will not walk away from her!!"
तसेच माझ्या ओळखीच्या संस्कृतच्या जाणकारांनी पण वरीलप्रमाणेच अर्थ सांगितला.
म्हणजे तुझ्या कथानायकाला त्याची बायको वरच्या शपथेची दहशत घालतेय.
http://www.loksatta.com/daily
http://www.loksatta.com/daily/20090225/mv05.htm
इथे नातिचरामि म्हणजे उल्लंघन करणार नाही , असा अर्थ दिला आहे.
नातिचरामि हे प्रथम पुरुषी एकवचनी रूप आहे. मूळ धातू कोणता ? हे समजल्यास अर्थ आणखी स्पष्ट होइल.
लहानपणी पाटी असायची , त्याला मध्ये बोर्ड व चार बाजूला चौकट असायची .. समजा मधला बोर्ड काढला , आता फक्त चार बाजूंची फ्रेम आहे , चार टोकाना खिळे आहेत .. चार बाजू कशाही हलू शकतात.
त्यातला एक कॉर्नर जर ओढला तर पूर्ण चौरसच distort होतो ... एक कोन म्हणजे एक धर्म , तो नको इतका ओढला , तर बाकीचे तीन कोनही ॲफेक्ट होतात . म्हणून प्रत्येक कोन मर्यादेत ठेवेन , उल्लंघन करणार नाही .
हे वचन फक्त नवरा देतो की दोघेही देतात , कल्पना नाही.
https://en.m.wikipedia.org
https://en.m.wikipedia.org/wiki/Marriage_vows
ख्रिस्तावांच्या मॅरेज वॉ मध्ये ... Until death अशी मर्यादा आहे .. म्हणजे कुणीतरी मेले की दुसरा प्रॉमिसमधून मुक्त होतो का ?
कुबूल है , कुबूल है , कुबूल है ... हे समजायला जास्त सोपे वाटते.
धर्म, अर्थ आणि काम फक्त
धर्म, अर्थ आणि काम फक्त बायकोबरोबरच, करायचे वचन.
या कथेची एखादी सॉलिड १५ मिनीट
या कथेची एखादी सॉलिड १५ मिनीट वाली शॉर्ट फिल्म बनेल.
शेवटी नातिचरामि चा बॅकग्राउन्ड एको आणि हॉरर संगीत.
नातीचरामि च्या मूळ अर्थाबद्दल मतभेद असुदेत, पण त्याने कथेला सॉलिड जोर आलाय!!
म्हणून बायकोवर एवढंपण प्रेम
म्हणून बायकोवर एवढंपण प्रेम करू नये ...
आवडलं कथानक. छान जमलयं.
आवडलं कथानक.
छान जमलयं.
मला आवडली कथा. वाचताना
मला आवडली कथा. वाचताना उत्सुकता वाढत जाते.. हेच तर स्वप्ना चे कौशल्य आहे.
कहानी में ट्विस्ट जमलाय..
हाइंड साईट मध्ये नेहेमीचीच
हाइंड साईट मध्ये नेहेमीचीच कथा वाटते आहे, पण तुम्ही मांडणी मस्त केली आहे >>> + १
मस्त जमली आहे.
अवांतर :
अवांतर :
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांत धर्म-अर्थ-काम यांत पत्नीसह असेन. कोणत्याही प्रकारचं अतिचरण करणर नाही (यात अधर्म, अर्थविषयक फसवणूक किंवा संबंधामध्ये तिच्या मनाविरुद्ध वागणार नाही) असं अभिप्रेत असतं. पत्नीचं मन न मोडता सगळ्या बाबतींत सदाचरणाने वागेन हेही.
मोक्ष हा मात्र जन्मलेल्या व्यक्तीच्या संपूर्ण वैयक्तिक साधनेवर (किंवा जे प्रयत्न किंवा जे काही असेल त्यावरच) अवलंबून असतो, त्यात जन्मदात्यांपासून सहचरापर्यंत कोणाचाही वाटा नसतो. म्हणून नातिचरामी च्या प्रतिज्ञेवर तीन(च) तोंडी सह्या करतात लग्नाच्या वेळी, चार नाही!
कथा छान!
मस्तच कथा!!!! सस्पेन्स
मस्तच कथा!!!! सस्पेन्स जमलायं !
छान जमलीये.....
छान जमलीये.....
कथा आवडली
कथा आवडली
Pages