इंजिनियरिंग चाळीशी

Submitted by र।हुल on 28 August, 2017 - 14:41

इंजिनियरिंग चाळीशी

पहिल्या दिवशी छान जरा आवरून गेलो
गेल्यावर तिथं थोडा जरा बावरून गेलो ॥२॥
नजरेनं शोधतो आपलं भेटेल का कोणी
जिवाभावाचं सोबती बनेल का कोणी ॥४॥

सगळेच आम्ही एका वाटेवरले प्रवासी
ध्यानात आलं न् थोडा झालो साहसी ॥६॥
हळहळू आम्ही कट्ट्यावर रूळत गेलो
'जिटी' मारणं चलाखीनं जरा शिकत गेलो ॥८॥

नावं आमुच्या विषयांचे ते येई अंगावर
एम्मथ्री समजणं मुश्किल होई जिवावर ॥१०॥
न समजता काही सरळ रट्ट्यावर आलो
एका एका नाईटीत हो इंजिनियर झालो ॥१२॥

भागीदारीत लढली सबमिशनची लढाई
चाळीशीच्या तयारीला धावली हि चतुराई ॥१४॥
सिनियरांची तालीम उद्याचे सिनीयर झालो
जिवाभावाची संगत धाडसानं 'अमृत' प्यालो ॥१६॥

ओरलच्या नादानं थोडंसं फेकायला शिकलो
फेकल्यानं तोंडावर जरा आपटायला लागलो ॥१८॥
इंग्रजी कामापुरतं बरं जमवायला शिकलो
हलकं हलकं कधीमधी बोलायला लागलो ॥२०॥

रेफरेन्स बुकांनी छाती आमुची दडपून जाई
आधार बनले टेक्मेक्स निराली ठोकळे जादुई ॥२२॥
पेपर लिहीण्यास गोलमटोल भाषा ही शिकलो
पानं रंगविण्यासाठी 'महान' संशोधक झालो ॥२४॥

रिझल्टच्या दिवशी धाकधूक मनांत वाटे
आलंच अपयश तर पिण्याचा ठराव घाटे ॥२६॥
दिसता चाळीशी धन्य! भरून मनांत पावलो
बाप्पा तपासणारा त्याला दुवा देते झालो ॥२८॥

आता आम्ही 'जोड्या' जमवायला लागलो
आयुष्याचे जोडीदार निवडायला लागलो ॥३०॥
पुढे चालून आम्ही 'हे' असले निगरगट्ट झालो
दुनियादारीत बाहेरच्या आम्ही बादशाह ठरलो ॥३२॥

शेवटच्या वर्षी उत्सुकता,प्रोजेक्टची धमाल
जुळवाजुळवी करून काही केली हो कमाल ॥३४॥
कैंपस इंट्रूसाठी आम्ही तयारीला लागलो
टायची नॉट कशीबशी बांधायला शिकलो ॥३६॥

अखेरच्या दिवशी निरोप घेताना भावूक झालो
एकदुसर्याला घट्टबिट्ट मिठ्या मारून रडलो ॥३८॥
चार वर्षांचा तो भलामोठा, लांब प्रवास एक संपला
सोनेरी क्षणांचा, हळव्या सहवासचा ठेवाच फक्त उरला ॥४०॥

Dedicated to All my Engineer Friends.

―₹!हुल /Aug17

[Thnx Akshay न् Katta]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान Happy

छान

<<<चार वर्षांचा तो भलामोठा, लांब प्रवास एक संपला
सोनेरी क्षणांचा, हळव्या सहवासचा ठेवाच फक्त उरला>>>>

जपून ठेवा हा ठेवा, चार वर्षे म्हणजे काही फार लांब नाही. पुढे कमीत कमी चाळीस पन्नास वर्षांचा आणखी कठीण प्रवास आहे. नि त्यानंतरहि. तेंव्हा हा ठेवा उपयोगी येईल.

छान Happy

च्रप्स, मेघा, सायु, अक्षय,विनिताजी, अनंतजी, पंडितजी, टवणे सर, नंद्या४३,मंगेश प्रतिसादाबद्दल मनापासून आभार Happy

जपून ठेवा हा ठेवा, चार वर्षे म्हणजे काही फार लांब नाही. पुढे कमीत कमी चाळीस पन्नास वर्षांचा आणखी कठीण प्रवास आहे. नि त्यानंतरहि. तेंव्हा हा ठेवा उपयोगी येईल. >>>
@नंद्या४३, हो नक्कीच उपयोगी येईल.खुप धन्यवाद! Happy