कविकल्पना - ३ - मृगजळ

Submitted by संयोजक on 27 August, 2017 - 23:30

कविकल्पना - ३ - मृगजळ
तर यंदाच्या गणेशोत्सवात बुद्धीच्या देवाला नमन करून मनातल्या ह्या कविला बाहेर पडू द्या.
संकल्पना अतिशय सोपी आहे. हा खेळ आहे, स्पर्धा नाही. बंधने काहीच नाहीत.
आम्ही आपल्याला कवितांसाठी काही शीर्षके देत आहोत. तुम्ही त्यावर आधारित कविता करायच्या आहेत. कवितेला फॉर्मचे बंधन नाही - मुक्त छंदापासून गझलेपर्यंत काहीही चालेल. एका आयडीने एका किंवा अनेक शीर्षकांवर किती कविता करायच्या ह्याला कसलेही बंधन नाही. शीर्षक कवितेमधे आलेच पाहिजे असा आग्रह नाही. शीर्षक रुढार्थानेच वापरायला हवे असे बंधन नाही.
थोडक्यात काय तर 'होऊ दे खर्च'
तिसरे शीर्षक :
"मृगजळ!"

Group content visibility: 
Use group defaults

वा

सकाळी आईने हसत हसत उठवलं
अंघोळ झाल्यावर बहिणीने गोडाचा शिरा दिला
बाबांनीही न चिडचिड करता पॉकेट मनी दिली
दादाने गाडीची किल्ली न मागता दिली
तीही कालची भांडण विसरून स्वागताला गेटवर उभारलेली
मटेरिअल्सच लेक्चर कॅन्सल झालेलं
मायबोलीकरांनीसुद्धा कवितेला भरभरून दाद दिलेली
एवढ्या गोष्टी मनासारख्या कश्या घडू शकतात
माझा काशावरच विश्वास बसत न्हवता
म्हणून काढला स्वतःला चिमटा
आणि अंगावर पाणी पडलं रात्र सरली
तशी ती माझ्या कडून वेळ हि हिरावली,
होत सार एक मृगजळ, एक स्वप्न ते
पुन्हा तो दिवस नव्याने सुरू झालेला...

प्रत्येकवेळी त्यांनीच, त्यांनीच घ्यायची माघार
पायदळी तुडवला जातो नेहमी त्यांचाच संसार
सरकार देते तुटपुंजि मदत आणि सहानुभुतिचि झालर
सुखाची स्वप्ने पाहणे त्यांनी म्हणजे मृगजळ

तो दिसत राहतो, देत राहतो हाळी
वाटेत पसरतो काट्यांच्याही ओळी
तो नसो खरा, पण ओढ खरोखर असते
ती असते तोवर जगणे सुंदर असते!

न ठरावी तुझी आस ही, मृगजळ फसवे

तुझ्या भावरंगांत मी चिंब हा भिजलो
तुझ्या सोबतीनं पहा रे मी कधी वाढलो
तुला शोधण्यास कंगाल फकिरही झालो
न ठरावी तुझी आस ही, मृगजळ फसवे
तुझ्यासाठी रे, तुझ्या हाताने मी घडावे

कुणा आवडला रे तो सोपा भक्तियोग
कुणी बनला महान, आचरूनी कर्मयोग
कुणासाठी शास्त्रविचार बनला ज्ञानयोग
कुणी धरीला,सख्या कृष्णा तुझा हव्यास
मी संन्यस्त झालो, सोबतीला हा वनवास

न ठरावी तुझी आस ही, मृगजळ फसवे

अपुर्ण.

―₹!हुल /२९.८.१७

(घरदार सोडून इश्वराच्या शोधार्थ संन्यास घेणार्यांची मनोवस्था मांडण्याचा माझा एक अल्पसा प्रयत्न! जमला नाही जमला, माहीत नाही Happy )

मस्त !!!

आपापल्या मनात एक मृगजळ घेउन फिरतोच की आपण सारे
कुणाची भागते तहान; तर कुणाच्या नशिबी फक्त खारे वारे!
Submitted by स्वरुप on 28 August, 2017 - 20:57
>>>>> मस्त

रानात कोसळे झाड
साक्षी कोणी नाही
परि त्याचा नाद
दूर दूर निनादत राही

शुष्क् तापल्या वाळूवर
आग ओकती किरणे
वाळवंटी मृग नुरे कोणी
मृगजळ खुणावत राही

आधी स्वप्नं खुणावतात
नंतर उमेद टाच मारते
मग गरजा दुणावतात
पुढे येते जबाबदारीची झूल

कुठे जातोय, का जातोय
कसे जातोय, कळेस्तोवर
पायांना पडते गतीची भूल

ऐकून सारं माहीत असतं
अनुभवूनही झालेलं असतं
विवेकाला चकवून, चुकवून
वारा पित जायचंच असतं

त्राण सरताना, भान येताना
रेतीच्या रणात कोसळताना
मृगजळ, मात्र निमित्त, असतं

* * * * * * * * * * *

हवेहवेसे नितांत काही
संपे कधी न प्रवास हा
तप्त रणी बळ देत राही
जरी ओलावा, आभास हा

Submitted by कारवी on 30 August, 2017 - 20:52>>> अप्रतिम Happy ग्रेट आहात तुम्ही