अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा―B2 वनस्पती तेल―र।हुल

Submitted by र।हुल on 27 August, 2017 - 14:16

जुन्या हजार-पाचशेच्या नोटा घेतल्या जातील. त्वरा करा.

बुद्धी बल वर्धक खाद्यतेल

मायबोलीकरांच्या लहानग्यांसाठी आम्ही घेऊन आलोय,

"बुद्धी बल वर्धक वनस्पती तेल."
अर्थात्
B2 Vegetable Oil.

आपल्या दररोजच्या स्वयंपाकासाठी वापरा आमचं, सायंटिफिक रिसर्च करून आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून बनवलेलं खास B2 खाद्यतेल आणि घडवा आपल्या पाल्याचा शारीरिक आणि बौद्धिक असा सर्वांगीण विकास.

नका करू किंमतीचा विचार,
B2 तेलातच बनवा आपला आचार

Features―
●High Nutritional Values with no Artificial Preservatives.
●Pure Veg
●Cholesterol Free
●Certified by Food Security & Safety Authority of Inda.
fssai no.-**************

●वापरकर्त्यांचे प्रतिसाद●

मेघा म्हणतात,
आमचा राहुल अभ्यासात अगदीच साधारण होता. माझ्या सचिनकाकांनी KATTA च्या B2 खाद्यतेलाची माहिती दिल्यानंतर मी ते नियमितपणे स्वयंपाकात वापरू लागले आणि थोड्याच दिवसांत आमचा राहुल चांगला लिहू, वाचू आणि बोलू लागला. Thank You Katta for B2 Oil.

अक्षय म्हणतात,
आमची सायु खुपच माठी होती पण B2 Oil स्वयंपाकात वापरायला लागल्यानंतर तिच्या बुद्ध्यांकात कमालीची वाढ झाली. B2 खाद्यतेल निर्मात्यांचे आम्ही शतश: आभारी आहोत.
_______________________________
●Manufactured & Mrktd By
K.A.T.T.A. Oil INDUSTRIES,
62982, Gulmohar Industrial Estate, Virangulanagar- 57185 [MaayBoli State].
Contact- 00 00 00 00 00
E-mail―sales@kattaind.com

Web―wwww.kattaoil.com

_______________________________
B2 ऑइलची कमाल, करी जिवनात धमाल!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी Happy

Biggrin