जोडीदार निवडताना बायका कशावर भाळतात?? सौंदर्यावर कि पैशांवर?????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 27 August, 2017 - 10:39

विवाहसंस्थेचा विचार केल्यास अनेक गोष्टी अनाकलनीय आहेत.यातील मला नेहमी आश्चर्य वाटत आले आहे ते स्त्रीयांच्या जोडीदार निवडण्याच्या चॉईसचे.एक पुरुष म्हणून मी हे नक्की सांगू शकतो की जोडीदार निवडताना पुरुष नेहमी स्त्रीचे सौंदर्यच बघतात.मग ते शाररीक असेल वा संपुर्ण व्यक्तिमत्व .स्त्रीची सांपतिक स्थीती काय आहे,तिला पगार कीती याचा फारसा विचार पुरुष करत नाहीत.श्रीमंत बापाची मुलगी पटवने वगैरे फक्त चित्रपटात असते.काही अपवाद असतील पण अपवादानेच नियम सिद्ध होतो.
काही दिवसांपुर्वी मी एका कार्यक्रमाला गेलो होतो.समाजातील अनेक प्रतिष्ठीत तिथे सहपत्निक आले होते.माझ्यासारखा सामाजिक भान असलेल्या माणसाला अशी संधी समाजमनाच्या अभ्यासाची असते.मला सोशल फोबिया असल्याने मी अशा ठीकाणी एका कोपर्यात बसणे पसंत करतो.तर,कार्यक्रमात अनेक स्त्रीया आपल्या नवरोबांबरोबर आल्या होत्या.खोटं बोलत नाही, अशावेळी पुरुष स्त्रीयांना न्याहाळत असतात तसा मीही न्याहाळत होतो.एक अत्यंत रेखीव ,आरसपाणी सौंदर्य असलेली स्त्री काही स्त्रीयांबरोबर गप्पा मारत उभी होती.पाहताच त्या बाला(?)कलेजा खल्लास झाला टाईपची.देखणेपणाची साक्षात ब्रॅण्ड ॲम्बॅसीटर.अर्थात लग्न झाले होते तिचे कारण सौभाग्याची सगळी आभुषणे होती.
मी विचार करत होतो की कोण असेल तो भाग्यवान पुरुष ज्याला अशी पत्नी मिळावी.या प्रश्नाचे उत्तर मिळायला फारसा वेळ लागला नाही.एक काळा,बेढब ,ढेरपोट्या तरुण हातात एका चिमुकल्याला घेऊन तिच्याजवळ आल्यावर तिने बारक्याला कडेवर घेतले व ते दोघे जरा बाजुला जाउन बोलू लागले.तो तिचा नवरा असल्याची खात्री पटली.जोडा अगदीच विजोड होता.ती रंभा तर तो जांबुवंत होता.एकमेकांना शोभेल असे काहीच न्हवते दोघांमध्ये.
कार्यक्रम संपल्यावर मी पार्किंगमध्ये गाडी काढत असताना मला एक सफेद रंगाची अतिशय पॉश महागडी कार जवळूण जाताना दिसली.मघाचेच जोडपे कारमध्ये होते.विजोड जोड्याचं कारण कळलं .......पैसा!!!!!!
किमान विस बावीस लाखाची ती कार होती.घरी येताना वाटेत मित्र भेटले.त्यांना हा किस्सा सांगितल्यावर त्यांनी एकच उत्तर दिले.की म्हणे बायका पैसेवाला पुरुष जोडीदार म्हणून निवडतात.काही प्रमाणात आर्थिक सुबत्ता म्हणून मान्य केले तरी फक्त पैसेवाला आहे म्हणून कावळ्याच्या तोंडात पुरी हा प्रकार फारसा रुचत नाही.निदान काहीतरी व्यक्तीमत्वात साम्य असायला हवं असं वाटतं
कॉलेजमध्येही जो श्रीमंत त्याला जास्त मैत्रीणी हे गणित होते ते आठवले.आमच्यासारखे मध्यमवर्गीय फक्त अश्या मुलींशी मैत्री करण्याचे स्वप्नच बघु शकायचे.अश्या अमिरजादे असलेल्या मुलांच्या बाईकवर मागे बसलेल्या ललना बघितल्या की आम्ही फक्त काळेठिक्कर पडायचेच बाकी असायचो.
असो ,मला या धाग्यवर स्त्री पुरुष दोघांकडून इन्साईट्स हवेत.माझे वैयक्तीक मत स्त्रीया जोडीदार निवडताना सौदर्यापेक्षा पैशाला जास्त महत्व देताना दिसतात.आपले काय मत आहे?????

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंग्रजीत एक आंबट्शौकीन म्हण आहे "Words are to women, what boobs are to men!" या वाक्यात एक मोठी फिलॉसॉफी आहे. कॉलेजात श्रीमंत पोराच्या मागे धावणा-या पोरी जरूर असतात. पण कॉलेजातली सगळ्यात सुंदर पोरगी पटवून नेणारा एक भुक्कड पोरगा असतो हे ही जवळपास सगळ्याच कॉलेजातलं वास्तव असतं. पुरुषाला जसं स्त्रीचं सौंदर्य आवडतं अगदी तसच स्त्री/मुलींना शब्दाची जादू आवडते. शब्दांच्या जादूने स्त्रीवर मोहिनी टाकणारे पुरुष बघा, मग लक्षात येईल की स्त्रीची टेस्ट ही त्या मानाने पुरुषांपेक्षा रसीक, संवेदनशील व उजवी असते. जेंव्हा व्यवहार नसतो तेंव्हा स्त्रीची निवड अत्यंत दर्जेदार असते. व्यवहाररहित नातं जोडण्याची जेंव्हा संधी मिळते तेंव्हा अधिकांश स्त्रिया कला/साहित्य/तत्वज्ञान किंवा रसीकतेची किनार असलेल्या नात्याला प्राधान्य देताना दिसतात.

पण लग्न मात्र एक व्यवहार आहे. त्यामुळे नवरा निवडताना हा व्यवहार फसणार नाही किंवा कमीत कमी जोखीम बघून लग्न नावाचा व्यवहार केला जातो. आर्थिक सुबत्ता असलेला नवरा निवडणे ही गोष्ट व्यवहारिपणाला धरुनच आहे.

यातली दुसरी बाजी अशी की, काळाकुळा दिसणारा वा ढेरपोट्या पुरुष हा स्वभावाने चांगला, खूप प्रेम करणारा, बायकोची काळजी घेणारा, नातीगोती जपणारा, बायकोला स्पेस देणारा वगैरे असू शकतो. हे असलं की तसही रूप फारसं मॅटर करत नाही.

इस्त्रिया पैशे बघत असतिलहि
बाप्ये आइवडिलांच्या आडुन स्त्रिचे पैशेही बघतत आनि सऊन्दर्यही कशाला रदुन राहिले उगिच?

Pages