जोडीदार निवडताना बायका कशावर भाळतात?? सौंदर्यावर कि पैशांवर?????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 27 August, 2017 - 10:39

विवाहसंस्थेचा विचार केल्यास अनेक गोष्टी अनाकलनीय आहेत.यातील मला नेहमी आश्चर्य वाटत आले आहे ते स्त्रीयांच्या जोडीदार निवडण्याच्या चॉईसचे.एक पुरुष म्हणून मी हे नक्की सांगू शकतो की जोडीदार निवडताना पुरुष नेहमी स्त्रीचे सौंदर्यच बघतात.मग ते शाररीक असेल वा संपुर्ण व्यक्तिमत्व .स्त्रीची सांपतिक स्थीती काय आहे,तिला पगार कीती याचा फारसा विचार पुरुष करत नाहीत.श्रीमंत बापाची मुलगी पटवने वगैरे फक्त चित्रपटात असते.काही अपवाद असतील पण अपवादानेच नियम सिद्ध होतो.
काही दिवसांपुर्वी मी एका कार्यक्रमाला गेलो होतो.समाजातील अनेक प्रतिष्ठीत तिथे सहपत्निक आले होते.माझ्यासारखा सामाजिक भान असलेल्या माणसाला अशी संधी समाजमनाच्या अभ्यासाची असते.मला सोशल फोबिया असल्याने मी अशा ठीकाणी एका कोपर्यात बसणे पसंत करतो.तर,कार्यक्रमात अनेक स्त्रीया आपल्या नवरोबांबरोबर आल्या होत्या.खोटं बोलत नाही, अशावेळी पुरुष स्त्रीयांना न्याहाळत असतात तसा मीही न्याहाळत होतो.एक अत्यंत रेखीव ,आरसपाणी सौंदर्य असलेली स्त्री काही स्त्रीयांबरोबर गप्पा मारत उभी होती.पाहताच त्या बाला(?)कलेजा खल्लास झाला टाईपची.देखणेपणाची साक्षात ब्रॅण्ड ॲम्बॅसीटर.अर्थात लग्न झाले होते तिचे कारण सौभाग्याची सगळी आभुषणे होती.
मी विचार करत होतो की कोण असेल तो भाग्यवान पुरुष ज्याला अशी पत्नी मिळावी.या प्रश्नाचे उत्तर मिळायला फारसा वेळ लागला नाही.एक काळा,बेढब ,ढेरपोट्या तरुण हातात एका चिमुकल्याला घेऊन तिच्याजवळ आल्यावर तिने बारक्याला कडेवर घेतले व ते दोघे जरा बाजुला जाउन बोलू लागले.तो तिचा नवरा असल्याची खात्री पटली.जोडा अगदीच विजोड होता.ती रंभा तर तो जांबुवंत होता.एकमेकांना शोभेल असे काहीच न्हवते दोघांमध्ये.
कार्यक्रम संपल्यावर मी पार्किंगमध्ये गाडी काढत असताना मला एक सफेद रंगाची अतिशय पॉश महागडी कार जवळूण जाताना दिसली.मघाचेच जोडपे कारमध्ये होते.विजोड जोड्याचं कारण कळलं .......पैसा!!!!!!
किमान विस बावीस लाखाची ती कार होती.घरी येताना वाटेत मित्र भेटले.त्यांना हा किस्सा सांगितल्यावर त्यांनी एकच उत्तर दिले.की म्हणे बायका पैसेवाला पुरुष जोडीदार म्हणून निवडतात.काही प्रमाणात आर्थिक सुबत्ता म्हणून मान्य केले तरी फक्त पैसेवाला आहे म्हणून कावळ्याच्या तोंडात पुरी हा प्रकार फारसा रुचत नाही.निदान काहीतरी व्यक्तीमत्वात साम्य असायला हवं असं वाटतं
कॉलेजमध्येही जो श्रीमंत त्याला जास्त मैत्रीणी हे गणित होते ते आठवले.आमच्यासारखे मध्यमवर्गीय फक्त अश्या मुलींशी मैत्री करण्याचे स्वप्नच बघु शकायचे.अश्या अमिरजादे असलेल्या मुलांच्या बाईकवर मागे बसलेल्या ललना बघितल्या की आम्ही फक्त काळेठिक्कर पडायचेच बाकी असायचो.
असो ,मला या धाग्यवर स्त्री पुरुष दोघांकडून इन्साईट्स हवेत.माझे वैयक्तीक मत स्त्रीया जोडीदार निवडताना सौदर्यापेक्षा पैशाला जास्त महत्व देताना दिसतात.आपले काय मत आहे?????

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय निषेधार्ह विचार, लिखाण आणि भाषा.

कर्तुत्व आणि चांगले विचार नावाची गोष्टं असते, जी स्त्रियांना पुरुषाच्या रंग रुपा पलिकडे जाऊन बघता येते. सडक्या विचारातून आलेल्या आणि कायम असेच विषय असलेल्या असंख्य धाग्यातून तुमच्याकडे हे दोन्ही virtue. किती प्रमाणात असावेत हे वेळोवेळी दिसलेच आहे. ह्या पेक्षा निषेधार्ह धागे आपण काढत राहणार ह्याची खात्री आहे.

कावळ्याच्या तोंडात पुरी पेक्षा कोल्ह्याला द्राक्ष आंबट असे वाचले.

तुम्ही देखणे आणि गरीब असून तुम्हाला सुंदर मुलगी पटत नाही तर सुंदर मुली पैश्यावाल्या मुलांना पटतात असा समजा. जर पैसे आहे आणि दिसायला साधारण असून मुली पटत नाही तर मुली देखण्या मुलांना पटतात असा समाज करून घ्या.

माझी प्रामाणिक मते -

1) पैसा कमवायला काहीतरी कर्तुत्व लागतेच. त्यामुळे कर्तुत्ववान पुरुषावर भाळते असे बोलू शकतो.

2) जर पैसेवाला मनुष्य हलकट असेल आणि बायकांना तुच्छ लेखणारा असेल तर अश्या पुरुषाशी लग्न करून त्या बाईचा छळच. तिला काय फायदा. याचा अर्थ ती किमान सुस्वभावी व्यक्ती असावीच. कदाचित फारच चांगल्या लाखात एक स्वभावाचीही असू शकते.

3) तो प्रेमविवाह नसून अरेंज मेरेज असू शकतो. म्हणजे एखाद्या पुरुष बापानेच आपल्या मुलीला पैश्यासाठी कोणाच्या तरी गळ्यात जबरदस्ती बांधले असावे. मुलीवरच अन्याय झाला असावा.

4) नारळ बाहेरून कसा निघेल हे सांगता येत नाही. तसे अरेंज मॅरेजमध्ये कोणता पुरुष लग्नानंतर कसा निघेल हे सांगता येत नाही. तर निदान जे या घडीला प्रत्यक्षात समोर दिसतेय तो पैसा एक खात्रीशीर जमेची बाजू पकडून पैसेवाल्याशी लग्न करायला हरकत नसावी. शेवटी पैसा गरज म्हणून सर्वांनाच हवा असतो.

5) ऑनलाईन प्रेमप्रकरणात दिसणे न बघता चॅटींगवर आणि मग फोनवर केमिस्ट्री जुळून पुढे प्रेमप्रकरणात रुपांतर झालेल्या कित्येक जोड्या पाहिल्या आहेत.

6) याऊपर खरेच निव्वळ आणि निव्वळ पैश्याच्या हव्यासापोटी लग्न करणारया मुलीही या जगात असणारच. कारण जगात सर्व प्रकारची लोकं असतात Happy

मी माझ्या बुद्धी आणि अनुभवाने पटकन सुचेल तशी ही लिस्ट/पोस्ट लिहिली आहे. ईतरांनी वाढवायला घेतली तर आणखी वाढतच जाईल. कारण तुम्ही आम्ही बघतो ते जग तेच आणि तेवढेच नसते Happy

हुप्पाहुय्या यांना अनुमोदन.
मध्यंतरी सिंथेटिक जिनियस यांनी त्यांच्याकडे रिकामटेकडा वेळ भरपूर असून काहीतरी उद्योग हवा आहे अशा स्वरुपाचा धागा काढला होता. भारतातील मायबोलीकर त्यांना नोकरी बिकरी देतील का? काहीतरी उद्योग मिळाल्यास ते बिझी होतील आणि असले फुटकळ धागे इथे दिसणं बंद होईल.
बाकी सातार्‍यातलं शेतकरी जीवन एकदमच हॅपनिंग दिसतंय.

ज्या स्टेटस मध्ये पुढची किमान 45 किंवा 50 वर्षं डेडिकेटेड लॉयल्टी ने काढायचीत तिथे फायनान्शियल/सोशल/ह्युमन बिहेवीयर वाईज अपग्रेड शोधणे/अपेक्षा करणे ही सहज प्रवृत्ती आहे.
प्रत्येकाच्या अपग्रेड च्या व्याख्या निराळ्या.काहींसाठी उमदा मुलगा अपग्रेड, काहींसाठी सुस्वभावी हौशी सासर, काहींसाठी शिकलेला गरीब कष्टाळू अंबिशियास लंबी रेस का घोडा, काहींसाठी स्टिंकिंग रिच बॅकग्राउंड.
आपल्याला काय हवं काय नको याचा नीट विचार आधीच करून ठेवलेला असला म्हणजे झालं.

सिंजी... सौन्दर्यावर भाळून लग्न केली असती स्त्रियांनी, 70% पुरुष अविवाहित असते...

अररेंज मारेज मध्ये पैसा, कर्तृत्व यालाच माप दिले जाते... लुक्स ला कमी वेतेज असते..

जोडीदार कोण असावा, तो निवडण्याचे मुलीन्चे निकष काय असायला हवे हे ठरवण्याचा प्रत्येक मुलीला हक्क आहे. तो तुम्हाला मान्य असेल तर अशा प्रश्नाचे उत्तरे मिळतील.

सौन्दर्य हे बघणार्‍याच्या नजरेत असायला हवे... प्रत्येकाच्या सौन्दर्याच्या (शारिरीक, मानसिक, वैचारिक, आध्यातिम्क) व्याख्या निराळ्या आहेत.

बाकी सातार्यातलं शेतकरी जीवन एकदमच हॅपनिंग दिसतंय.
Submitted by सायो on 27 August, 2017 - 12:03
>>>
तर! काय कमी समजला का आमच्या सातार्याला???
कृष्णेचं पाणी आहे आणि तिच्याच खोर्यातील जमीन.

जोडीदार कोण असावा, तो निवडण्याचे मुलीन्चे निकष काय असायला हवे हे ठरवण्याचा प्रत्येक मुलीला हक्क आहे. तो तुम्हाला मान्य असेल तर अशा प्रश्नाचे उत्तरे मिळतील.
सौन्दर्य हे बघणार्‍याच्या नजरेत असायला हवे... प्रत्येकाच्या सौन्दर्याच्या (शारिरीक, मानसिक, वैचारिक, आध्यातिम्क) व्याख्या निराळ्या आहेत.>.
+१११११

मी या बाबतीत सिंजी बरोबर काही अंशी सहमत आहे. प्रत्येक मुलीची आवड वेगळी असते , असे क्षणभर मान्य केले तरी शारीरिक आकर्षण हा निकष लग्नावेळी मुलींकडून लावला जातोच.

यात चुकीचं काहीच नाही, नैसर्गिक सौंदर्य आणि healthy जेनेटिक code यांचं फार जवळचं नातं आहे (संदर्भ - https://en.m.wikipedia.org/wiki/Physical_attractiveness). जितकी चांगली गुणसूत्रे, तितकी चांगली मुलं, साधं समीकरण आहे; म्हणून निसर्गानेच सुंदर शरीराबद्दल आकर्षण निर्माण व्हावे, अशी योजना केलीय.

आता कल्पना करा, दोन तरणी मुले जी कर्तृत्वात, वयात, वागणुकीत सारखीच आहेत; पण फक्त त्यातला एक रूपाने उजवा आहे. अशा वेळी मुलगी कुणाची निवड करेल? अर्थात रूपवान मुलाची. निसर्गदत्त असले तरी सौंदर्य अवगुण थोडीच ठरतं?

आता ज्या रूपवान मुलीने तुलनेनं बराच कमी रूपवान वर निवडला तर तिला वर निवडीचं स्वातंत्र्य वा पुरेसे चांगले पर्याय (इथे रूप , पैसे या बाबतीत) मिळाले नाहीत, असं मानायला बरीच जागा राहते (विशेषतः जबरदस्तीच्या लग्नात मी अशा जोड्या जुळताना कित्येकदा पाहिल्यात).

मग रूप नसेल तर पैसा , मानमरातब हे निकष आहेतच; त्यानुसार वराची निवड करतात. अर्थात अपवाद आहेत, पण फार थोडे.

सौन्दर्यावर भाळून लग्न केली असती स्त्रियांनी, 70% पुरुष अविवाहित असते...
>>>>>>>
म्हणजे जगातली 70 टक्के मुले सौंदर्यात तळाला असलेल्या मुलीच्याही खाली आहेत का? Happy

तसेही मुलांचे आणि मुलांचे गुणोत्तर पाहता हजारात पन्नास साठ पोरे बिनलग्नाची राहत असतीलच.
मला कधीकधी प्रश्न पडतो पूर्वीच्या काळी जेव्हा एका राजाच्या अनेक राण्या असायच्या तेव्हा किती पुरुष अविवाहीत राहत असतील? स्वता चार चार लग्न करून बसलेला राजा अश्या प्रजेसाठी काय करायचा?
प्रश्न अवाण्तर असेल तर वेगळा धागा काढू शकतो.

अरेच्चा , धाग्याच्या नावावरून ऋन्मेषचा धागा असेल असे वाटले होते
>>>>
या धाग्याच्या गटात बसणारे कोणते धागे मी काढले याची लिस्ट मिळेल का ज्यावरून आपल्याला हे वाटले Happy

आजुन एका धाग्याला स्कोप आहे जर असे प्रश्न पडत असतील तरः"पुरुष मुलीचे सौन्दर्य पाहुन लग्न करतात की मुलीच्या वडीलांचे सामाजीक स्थान बघुन की गुण बघुन"

बाकी चालुच दे...

पैसे की लुक्स ते जाऊद्या,
मागे कोणीतरी धागा काढलेला ना? आकर्षण निर्माण करण्यासाठी फेमेरोन्स , अंगगन्ध मुख्य भूमिका बजावतो?

{{{मला कधीकधी प्रश्न पडतो पूर्वीच्या काळी जेव्हा एका राजाच्या अनेक राण्या असायच्या तेव्हा किती पुरुष अविवाहीत राहत असतील? स्वता चार चार लग्न करून बसलेला राजा अश्या प्रजेसाठी काय करायचा?
प्रश्न अवाण्तर असेल तर वेगळा धागा काढू शकतो.
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 28 August, 2017 - 00:02 }}}

नक्की काढा. लगेच सविस्तर उत्तर देतो कारण मला खात्रीशीर माहिती आहे. इथे देत नाही कारण खरंच अवांतर होईल.

{{{ एक पुरुष म्हणून मी हे नक्की सांगू शकतो की जोडीदार निवडताना पुरुष नेहमी स्त्रीचे सौंदर्यच बघतात.मग ते शाररीक असेल वा संपुर्ण व्यक्तिमत्व }}}

सगळ्या पुरुषांच्या वतीने तुम्ही हे विधान कसं काय करु शकता? बायको सुगरण असणं हा निकष लावणारेही अनेक पुरुष आहेत. पुरुषाला खुश करण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो हे वाचलं नाहीत का? कित्येक बायका ऑफिसातले चांगले सहकारी पटविण्याकरिता त्यांच्याकरिता डब्यात रोज चविष्ट पदार्थ घेऊन येतात (विशेषतः सरकारी कार्यालयात).

कित्येक बायका ऑफिसातले चांगले सहकारी पटविण्याकरिता त्यांच्याकरिता डब्यात रोज चविष्ट पदार्थ घेऊन येतात (विशेषतः सरकारी कार्यालयात).>>>> हे तर फारच जनराईल्जड विधान झाल.

Pages