अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर - कविन

Submitted by कविन on 26 August, 2017 - 13:41

खुषखबर ! खुषखबर !! खुषखबर !!!

१८ व्या गणेशोत्सवानिमित्त मायबोलीकरांसाठी घेऊन आलो आहोत एक अनोखा चमत्कार, ज्याला मिळालेय मान्यता जगभरात... त्याला घेऊन आलोय आम्ही आपल्या दारात

अटक मटक चवळी चटक
उंची नाही वाढत तर
झाडाला लटक,
असं चिडवून घ्यायचे अलियाचे दिवस संपल आणि गेलियाचेही संपले.

तुमचेही संपतील जर वापराल "ताडमाड पावडर फॉर्म्युला"

विश्वास बसत नाही? मग हे पहा आणि स्वतःच खात्री करुन घ्या !

भारतातली अलिया - आमची स्टार ग्राहक

आमचं उत्पादन घ्यायच्या आधीची
1_4.jpg2_0.jpg

आणि उत्पादन वापरल्या नंतरची आलिया

3.jpg4_0.jpg आनंदी आणि समाधानी ग्राहक आमची स्टार अलिया

आमची दुसरी स्टार ग्राहक पॅरिसची गेलिया

CollageMaker_20170826_213754953.jpg

स्वतःच्या डोळ्यांनी फरक बघा आणि मगच विश्वास ठेवा!

बच्चनची उंची आमचं उत्पादन गाठतं
पण आम्ही नुसतेच बोल बच्चन नाही
जगभर विकतो आम्ही एका क्लिकवरच
जरी आमची कुठेही शाखा नाही!

तेव्हा त्वरा करा! खास सवलतीच्या दरात हि पावडर तुम्हाला इथेच मिळेल, गणेशोत्सव संपेपर्यंत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी

बच्चनची उंची आमचं उत्पादन गाठतं
पण आम्ही नुसतेच बोल बच्चन नाही >>> ये हुवी ना बात , जोरात कम्पीटिशन

धन्यवाद मंडळी ! Happy

जाई , हो आमची जाहीरात "आलिया गेलिया हाती धाडी निरोप" आहे ना ! Lol