बाबू- ज्युनिअर मास्टरशेफ ( मुसली टोमॅटो बाउल) - गार्गी

Submitted by बाबू on 26 August, 2017 - 10:39

आयडी - बाबू
पाल्य - गार्गी
वय - ६ वर्षे ( इयत्ता - पहिली)

साहित्य -

१. चार टोमॅटो
२. अर्धी वाटी मुसली
३. अर्धी वाटी कॉर्न
४. अर्धी वाटी डाळिंब दाणे
५. तेल १ चमचा, तिखट, मीठ , मेतकूट, हळद

--------------------------------------------------

१. मुसलीमध्ये एक चमचा तेल, मीठ, तिखट, मेतकूट घालून मिसळून बाजूला ठेवावे

२. कॉर्न मीठ व चिमूटभर हळद घालून शिजवून घ्यावे.

३. डाळिंबाचे दाणे अर्धी वाटी घ्यावेत.

४. एका मोठ्या बाउलमध्ये मुसली, कॉर्न आणि डाळिंबाचे दाणे एकत्र करावेत.

५. टोमॅटो अर्धे कापून त्यातील गर काढून त्याचे बाउल तयार करावेत.

६. एकेका बाउलमध्ये वरील मिश्रण भरावे.

-------------------------------------------------------

पालकांची मदत - डाळिंबाचे साल काढून देणे, कॉर्न शिजवून देणे.

1.jpg4.jpg3.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुसली म्हणजे ओट्स , कुरमुरे, फ्लेक्स, ड्राय फ्रूट्स यांचे मिश्रण असते.

Muesli सर्च करा. सफोला, पतंजली इ इ अनेक कंपन्यांचे मिळते. घरीही तयार करु शकता.

https://en.wikipedia.org/wiki/Muesli

शाब्बास गार्गी... मस्त केलंयस.....कणसाच्या पानांमध्ये सजवलेय सुन्दर.. कल्पना भारी...

पण हे "मायबोली गणेशोत्सव २०१७ " मधिल "लहान मुलांचे उपक्रम" मध्ये दिसत नाहिये!!

Mast

हेल्दी आणि मस्त रेसिपी!

एकूणात माबोची जेनेक्स्ट एकदमच स्मार्ट आणि क्रिएटिव आहे! Happy