कोण आहे हा संत बाबा राम रहीम?
याला यौन शोषणच्या आरोपाखाली तो गुन्हा सिद्ध होत कोर्टाने शिक्षा सुनावली आणि देशातील पाच राज्ये पेटली. बसेस ट्रेन जाळल्या जात आहेत, मिडीयाच्या वॅनलाही नाही सोडले, एक पॉवर स्टेशनही उडवले, आतापर्यंत तब्बल 30 जण यात मेले तर शेकडो जखमी झालेत. हरयाणा सरकारने 15 हजार सशस्त्र सैनिकांची तुकडी हे दंगे रोखायला कामाला लावली. 200 च्या वर ट्रेन्स रद्द झाल्यात. कामकाज कर्फ्यू लागल्यासारखे ठप्प झालेय. काय आहे हा प्रकार नक्की. लोकं वेडी आहेत का आपल्याकडची? ज्याच्यावर एवढा घाणेरडा आरोप कोर्टात सिद्ध झालाय त्याच्याच पाया पडायची अक्कल कुठे गहाण ठेवून येतात ही लोकं?
आणि हे मुक्ताफळ ऐकून तर मी धन्य झालो !
साक्षी महाराज ने कहा है, 'अगर किसी व्यक्ति पर यौन उत्पीड़न का आरोप है लेकिन उसके साथ करोड़ों लोग खड़े हैं, तो उन करोड़ों लोगों की आवाज क्यों नहीं सुनी जा रही है?"
सविस्तर ईथे वाचा....
http://m.dailyhunt.in/news/india/hindi/the+quint+hindi-epaper-hquint/liv...
तळटीप - धागा चालू घडामोडीमध्ये काढला आहे. बाबा खरेच पूज्यनीय संत असतील तर धार्मिक विभागात हलवायला तयार आहे.
आसाराम बाबत कुठली पोस्ट?
आसाराम बाबत कुठली पोस्ट?
आसारामबाबत मलाच फारसे माहीत नाही. मी मुळात कुठला धर्म मानत नाही. बाबा बुवा मानने तर दूरची गोष्ट. जर या संदर्भाने माझी अशी काही पोस्ट असेल तर मलाच उत्सुकता लागली आहे. कारण बरेचदा पोस्ट मागे काही वेगळे संदर्भ आणि लपलेले उपरोध सुद्धा असतात. पोस्ट असल्यास आणि शोधल्यास नक्की क्लिअर करेन.
सल्लू जेलमध्ये गेला होता
सल्लू जेलमध्ये गेला होता तेव्हा आसाराम त्याच्या बाजूच्या जेलमध्ये होता. तो सल्लूला बोलला गद्दा लेलो सलमान. हे न्यूज मध्ये आलं होतं. सलमान पण टारगेट होता त्याचा.
बलात्कार आणि हत्येप्रकरणी
बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग पुन्हा एकदा पॅरोल वर ( यावेळी ४० दिवसांचा ) बाहेर आला आहे. २० वर्षांची शिक्षा मिळाली आहे पण २०१७ पासून आता पर्यंत १४ वेळा तुरुंगातून (कधी पॅरोल मिळतो तर कधी फर्लो ) बाहेर आला आहे.
https://indianexpress.com/article/cities/chandigarh/dera-sacha-sauda-chi...
Pages