कोण आहे हा पाखंडी बाबा राम रहीम?

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 August, 2017 - 11:25

कोण आहे हा संत बाबा राम रहीम?
याला यौन शोषणच्या आरोपाखाली तो गुन्हा सिद्ध होत कोर्टाने शिक्षा सुनावली आणि देशातील पाच राज्ये पेटली. बसेस ट्रेन जाळल्या जात आहेत, मिडीयाच्या वॅनलाही नाही सोडले, एक पॉवर स्टेशनही उडवले, आतापर्यंत तब्बल 30 जण यात मेले तर शेकडो जखमी झालेत. हरयाणा सरकारने 15 हजार सशस्त्र सैनिकांची तुकडी हे दंगे रोखायला कामाला लावली. 200 च्या वर ट्रेन्स रद्द झाल्यात. कामकाज कर्फ्यू लागल्यासारखे ठप्प झालेय. काय आहे हा प्रकार नक्की. लोकं वेडी आहेत का आपल्याकडची? ज्याच्यावर एवढा घाणेरडा आरोप कोर्टात सिद्ध झालाय त्याच्याच पाया पडायची अक्कल कुठे गहाण ठेवून येतात ही लोकं?
आणि हे मुक्ताफळ ऐकून तर मी धन्य झालो !
साक्षी महाराज ने कहा है, 'अगर किसी व्यक्ति पर यौन उत्पीड़न का आरोप है लेकिन उसके साथ करोड़ों लोग खड़े हैं, तो उन करोड़ों लोगों की आवाज क्यों नहीं सुनी जा रही है?"

सविस्तर ईथे वाचा....
http://m.dailyhunt.in/news/india/hindi/the+quint+hindi-epaper-hquint/liv...

तळटीप - धागा चालू घडामोडीमध्ये काढला आहे. बाबा खरेच पूज्यनीय संत असतील तर धार्मिक विभागात हलवायला तयार आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सनव या स्त्री आहेत हे तुम्हाला कोणी सांगितले? प्रोफाईल खर्‍या असतात हे तुम्ही कधीपासून मानू लागले...?

सनव यांचा एकच अजेंडा
कसे ही करून भाजपाला बाजूला घेऊन कॉंग्रेसला फोकस करावे याचा आटापिटा बर्याच वेळेपासून चालू आहे.

वरून ऑर्डर आली वाटते

स्वामीजी,
त्या कोण आहेत हे मला माहित नाही,
पण त्यांच्या प्रोफाइल मध्ये त्या स्त्री असल्याचा उल्लेख असल्याने मी तरी दुसऱ्या कुठल्याही स्त्री बरोबर ज्या मर्यादा सांभाळतो, त्या मर्यादेतच बोलेन.

सिम्बा , मी रहीमचं कुठेही समर्थन केलेलं नाही.
२००२ मध्ये बलात्कार केस सुरु झालंयांनंतरच काँग्रेसचे लोक रहिमकडे सपोर्टसाठी गेले व त्यानेही २०१४ पर्यंत काँग्रेसलाच स्पोर्ट केला. आणि आज इथे काँग्रेस समर्थक असं दाखवताय्त की काँग्रेस व रहीम जणू काही कधी संबंधच नव्हता. This makes me sick. तुमच्या पक्षाचे टॉप लिडर्स त्याच्याकडे जात होते, तो सपोर्ट देत होता तेव्हा बलात्कार प्रकरण आड आलं नाही, आज अचानक तुम्हाला महिलांवर अन्याय झाल्याची आठवण झाली काय! कालपासून सोशल मीडियावर भाजप समर्थक राम रहिमला व त्याच्या गुंडांना विरोध करत आहेत, भाजपला प्रश्न विचारत आहेत पण एकाही काँग्रेस समर्थकाने आपला पक्ष २०१४ पर्यंत या माणसासोबत का होता हे विचारलं नाही की निषेध केला नाही, उलट हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न चालू आहे. This makes me sick!
भाजप सरकारच्या काळात निदान केसचा निकाल लागला व होपफुली हा गुन्हेगार जेलमध्ये जाईल.

भाजप सरकारच्या काळात निदान केसचा निकाल लागला व होपफुली हा गुन्हेगार जेलमध्ये जाईल.

<<
सहमत !

२००२ ते २०१४ अशी तब्बल बारा वर्षे सत्ता हातात असूनही कॉंग्रेज सरकारला ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावता आला नाही, उलट निवडणुका जिंकायला ह्या बाबाचे साहय्य पुढे देखिल मिळत राहील ह्या आशेवर कॉंग्रेजने हे बलात्कार प्रकरण तसेच ताटकाळत ठेवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॉंग्रेजी काळात पिंजर्‍यातील तोता असणार्‍या सीबीआयला मोदी सरकारने फ्रिहँड दिल्यावर कॉंग्रेजीकाळात प्रलंबित असलेली बरिच प्रकरणे मार्गी लागल्याचे गेल्या सहा महिन्यातील घडामोडी पाहून लक्षात येत आहे.

बारा वर्षे सत्तेत राहूनही त्या साध्वीला न्याय न देऊ शकणारे कॉंग्रेजी आज भाजपा सरकारवर टिका करताना पाहून, ढोंगी कॉंग्रेज लवकरात लवकर या देशातून नामषेश व्हावी असे वाटते.

भाजप्यांनो केस चालू होती २००७ ला चार्जशिट सीबीआयने दाखल केली होती. तेेव्हापासून सुनावणी चालू आहे.
जरा माहीती घेऊन भाजप्यांनी बोलावे..

लट वाजपेयींना पत्र पाठवल्यावर पत्रकाराची हत्या झाली यावरून काय ते समजून घ्यावे

मोदी जे हेलिकॉप्टर वापरतात तेच हेलिकॉप्टर अटक करून घेऊन जाताना बाबाला देण्यात आले. हे दाखवणारा फोटो फिरत आहे
यावरून भाजप्यांना रामरहीमचा किती कनवाळा होता हेच दिसून येते त्याला भ्रष्टाचारी महादंगेखोर डब्बल ढोलकी, खोटे बोलण्यात विश्वविक्रम असणार्या भाजप्यांचा राजाश्रय होता व त्यामुळेच बाबा दुष्कृत्ये बिन्धास्त करत होता

२००२ ते २०१४ अशी तब्बल बारा वर्षे सत्ता हातात असूनही कॉंग्रेज सरकारला ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावता आला नाही,

>>> प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यात सत्ताधारी सरकारला काही करता येत नाही. ओके? पण १० वर्षे त्या प्रकरणात कॉंग्रेसने कायदा आणि सुव्यवस्थेचा चोख बंदोबस्त ठेवला व पिडीत स्त्रियांना योग्य ती सुरक्षा व्यवस्था देऊन खटला न्याय्य पद्धतीने चालु दिला हे कौतुकाचेच आहे. आज जो धुमाकूळ आणि पेटवापेटवी होत आहे, ज्याची स्पष्ट आणि सरळ जबाबदारी आताच्या सरकारवर येते, त्यांनी ही परिस्थिती हाताळली अस्ती तर कौतुक त्यांचेही झालेच असते.

मात्र केंद्रात राज्यात छप्पन इण्ची (अ‍ॅक्चुअली आता टिकली म्हणावे लागेल) सरकार असून ही पुरेशी माहिती हातात असून सदर दंगेबाजीला कोणताही आळा घालता आला नाही, शेकड्याने लोक जखमी झाले, ३० च्या वर मेले, आणि कोट्यावधी रुपयांची सरकारी-नागरिक संपत्ती नुकसानीत गेली. त्याचा पूर्ण आणि संपूर्ण दोष सरकारवर व सरकारची धोरणं ठरवणार्‍या पदाधिकार्‍यांवर येतो.

डेरा, संप्रदाय, आखाडे, मौलाना वगैरेंच्या हमामात सगळेच नंगे असल्याने कॉंग्रेसच्या नावाने कितीही जुनेपुराने खडे फोडायचा प्रयत्न करा पण...... आजची स्थिती ही आजच्या नाकर्तेपणामुळे आहे. दंगे आटोक्यात आणणे शून्य मिनिटाच्या निर्णयाचे काम आहे. जर ते होत नसेल तर सत्ताधारी पक्षाला हे करायचेच नाहीये असे दिसत आहे.

कायदा व सुव्यवस्था ही सरकारची जबाबदारी असते, तेव्हा मागच्या सरकारने काय केले याचा कितीही कोळसा उगाळत बसा, आज समोर पेटत असलेले वाहन, जात असलेले जीव, होत असलेली हानी ही आज निर्णय घेऊ न शकल्याने होत असते. हे सर्वांनीच ध्यानात ठेवा. आपल्या आवडत्या पक्षाला पाठीशी घालण्यासाठी सर्व नियम, तर्क, जबाबदार्‍या, कर्तव्य इत्यादी धाब्यावर बसवायचेच असेल तर त्याला फार घाण शब्द आहे. आपल्या कुवतीप्रमाणे प्रत्येकाने इमॅजिन करुन घ्या....

ढोंगी कॉंग्रेज लवकरात लवकर या देशातून नामषेश व्हावी असे वाटते.
>>>
होत आहे , होत आहे. नारायण राने पुढच्याच आठवड्यात भाजपात मुलासह जात आहेत.

Rofl

इथे बाकी सगळं जाउ द्या, मी ज्या वाक्यासाठी माझा एक आयडी उडवून घेतला, ते वाक्य पुनः एकदा लिहितो,

>> मी कधीही स्त्री डूआयडी काढणार नाही<<

वाक्य समाप्त.

रच्याकने.
असे अनेक डेरे पंजाब्/हरयाणात आहेत, पैकी काही महाराष्ट्रातही पोहोचले आहेत.

सनव यांनी दिलेल्या लिंकेत, या बलात्कारी बाबाला भेटायला नव्हे तर इतर कुण्या डेर्‍यात राहूल गेलेले दिसतात. ऑन द अदर हँड, आपल्या आदर..णीय त्या ह्यांचा याच बाबाला भेटून नमन करण्याचा व्हिडू व्हायरल आहेच. आपले दुसरे "आरोपी" आसा"राम"जींसोबतचाही त्याच आदर..णीय महोदयांचा व्हिडू व्हायरल आहेच की Wink

यावरुनच, चायनीज फूड फेस्टिवलात गेला म्हणून त्याने राजदूताची भेट घेतली अशा वावड्या उठवणार्‍या सायबर सेलचे प्रतिनिधी = सनव, उर्फ त्यांचे मूळ आयडी, हे इथे सविनय नोंदवितो.

बाकी चालू द्या.

आ.रा.रा. तुमच्या आयडीची शंभरी भरत आली आहे. तुम्ही नव्या आय डी ची जुळवा जुळव करा. आणि माझं ऐका जरा , भाजपचे समर्थन करीत चाला. काय धोका नाय...

अशी वाक्ये लिहिल्याने आय डी उडवतात? Uhoh
<<
स्वामीजी,
"पाश्चिमात्यांत" स्त्री "दाक्षिण्य" फारच जास्त असते. आय्डि काढताना मी काय वाट्टेल ते लिहिलं तरी त्याचा आदर.. केलाच जातो. Bw

सनव,
मी रहीमचं कुठेही समर्थन केलेलं नाही.>>>>>
हो तुम्ही समर्थन केले नाहीत, पण त्याचा निषेध सुद्धा केला नाहीत, इकडे नाही, कट्ट्यावर नाही, बेफिन्चा एक समांतर धागा आहे त्यावरही नाही,
आणि या धाग्यावर पहिला प्रतिसाद काय? तर राहुल देऱ्याला भेट देऊन आला,

बाई, इकडे उच्च न्यायालय म्हणतेय की राज्य सरकारने निदर्शकांपुढे नांगी टाकली, they let the city burn .
तुम्ही आम्हाला समर्थन द्या, आम्ही तुमच्या दांडेलशाही कडे दुर्लक्ष करतो , या कॉन्ट्रॅक्ट ची प्रचिती समोर दिसत असताना, तुम्हाला 2012 मध्ये काँग्रेस ने पण डेरा सचा चे समर्थन मागितले होते याचे भांडवल करावेसे वाटते आहे तुम्हाला?

प्रसाद चे तळ्यात मळ्यात चालूच आहे,
डेरा च्या समर्थकांना नागडे करून चाबकाने फोडून कफह म्हणणारे ते, bjp MP पण त्याचा समर्थक आहे कळल्यावर इर्रेलेव्हेंट गोष्टी बोलू लागले कट्ट्यावर.

सगळ्यात पहिल्यांदा जर एक स्त्री म्हणजन काँशिअस जागृत असेल तर स्त्रियांचे लैगिक शोषण करणाऱ्या राम रहीम बाबा चा स्पष्ट शब्दात निषेध करा,
भारतीय म्हणून काँशिअस जागृत असेल तर 10 दिवसाची पूर्व सूचना मिळूनसुद्धा हिंसाचार रोखू न शकणाऱ्या खट्टर सरकार चा निषेध करा,
आणि त्यानंतर डेऱ्याला कोणी भेटी दिल्या ची मढी उकरत बसा.

थ्यान्क्स सिम्बा.... सनव तैच्या प्रतिसादात त्यांनी बाबा चे नाव केवळ रहिम इतकेच घेतले हे तुमच्यामुळे ध्यानात आले, Happy काय गंमत आहे नै,,, अगदी कोणाचे नाव लिहितांनाही इतके सिलेक्टीव आणि प्रॉपर लिहायचे म्हणजे काय दर्जा लागत असेल नाही?

ह्या धाग्यावर गुन्हेगारांचा निषेध मी पाहिलं तेव्हा मागे पडला होता. काँग्रेस समर्थक असा प्रचार करत होते की काँग्रेसचा जणू काही बाबाशी काही संबंधच नाही.
वास्तविक २००७ लाही बाबा आणि कॉग्रेस एकत्रच होते. ही दुसरी लपवली जाणारी बाजू इथे मांडणे मला नक्कीच महत्वाचे वाटते. बलात्कार प्रकरणांनंतर बाबा राम रहीमचं राजकीय , सामाजिक पुनर्वसन काँग्रेसने केलं , सपोर्ट दिला व घेतला आणि सिक्युरिटीही दिली. काँग्रेस नेत्यांशी कौटुंबिक नातेसंबंध आहेत. हे लपवून आता फक्त बीजेपीकडे बोट दाखवणं म्हणजेच या प्रकाराचं राजकारण करणे.
हे सत्य लोकांसमोर येणं महत्वाचं वाटलं.
बाकी तुम्ही लोकांनी कितीही पर्सनल हल्ले केले - स्त्रीत्व, डुआयडी, खरोखर स्त्री आहे का, आयटी सेल वरून आदेश- हे सर्व पुराव्याशिवाय- तरी फरक पडत नाही. स्त्री आयडीज इथे राजकारणावर कमी लिहितात, लिहायचं तर मनावर चिलखत हवंच. बोला काय पण.

अहो पण साक्षी सारखे व खट्टर सारखे कोणी निर्लज्जपणाचा कळस केला नाही,
भाजपा ते अजून ही करत आहे. तो अचंभित पात्र तर बिळात लपला आहे .
शिक्षा झाली मग तो आरोपी. तेव्हा त्याचे समर्थन कुठल्याही कॉंग्रेस ने केला नाही पण भाजप्यांनी केला भक्तांनी केला

अरेरे अजून किती खालची पातळी महाभ्रष्टाचारी, महादंगे करणारी,डब्बल ढोलकी, खोटे बोलण्यात विश्वविक्रमवीर भाजप गाठणार देव (खरावाला) जाणे.

हे लपवून आता फक्त बीजेपीकडे बोट दाखवणं म्हणजेच या प्रकाराचं राजकारण करणे.
>>>> तुम्ही काँग्रेसकडे बोट दाखवून तेच करत आहात, दुसरं काहीही नाही. आज दंगे झाले, आज आटोक्यात आणायचे असतात.

हे सत्य लोकांसमोर येणं महत्वाचं वाटलं.
>> तुम्हाला फक्त राजकारण करायचं आहे, बाकी काय?
-----------------
म्हणूनच म्हणतोय की आज भाजप सरकार नालायक ठरतंय तर त्यालाही कारणीभूत पन्नास वर्षांआधी मरुन गेलेले गांधी-नेहरु ठरवून काँग्रेस-बॅशिन्ग केली जाईल. मुद्दा काहीही असो, काँग्रेसबॅशिन्ग केले की गंगेत घोडे न्हाले असे झालेले दिसत आहे.

५ ते ७ दिवस पासून खट्टर कडे वेळ होता तयारीला गुप्तचर विभाग ने दंगा होईल रिपोर्ट दिलेला, केंद्राने अतिरिक्त सैन्य पाठवलेले तरी खट्टरचे नेते म्हणत हेते ही शांतीप्रिय लोक आहेत जमले तरी त्यांनी एकही झाड तोडले नाही.
शेवटी याच लोकांनी दंगा केला, वाहने पेटवली, ३०० कीमी पासून जमाव येत हेता खट्टर करत काय होता?

खट्टर आणि नायक चित्रपटातील कुछ दुकाने लुटती है तो लुटने दो, बोलणारा मुख्यमंत्री एकच आहे.

पंजाब मध्येपण खट्टरच्या चुकीमुळेच दंगा झाला
कुछ दुकाने लुटती है तो लुटने दो, बोलणारा

हा माणूस वर नमुद केल्याप्रमाणे काँग्रेसपासून मस्तवालगिरी करत आहे आणि अजुनही करतोय आणि तरी सरकारे काही करत नाहियेत..... अशी काय ताकद या माणसाकडे आहे ???? का ऐकतात त्याचे?

पंचकुला भाग माझ्यासाठी खूप खास आहे. आमच्या चंडिगढ ऑफिस पासून फक्त ५ किमी अंतरावरचा परीसर. मागे मी त्या ऑफिसमधे काम करत असताना ८ महीने पंचकुला मधेच राहीलेय. सीबीआय ऑफिसच्या परीसरातच. जे मैदान जेल बनवले होते तिथपर्यंत मी जॉगिंगला जायचे.
स्वच्छ, सुंदर, व चंडिगढला लागून असलेला हरयाणाचा भाग असल्याने रहदारीचे नियम पाळणारा परीसर. आताही एक-दोन महीन्यांतून एकदा तिकडे जाते तेव्हा पंचकुला किंवा जिरकपूर या हरयाणाच्या भागांतच राहते.

चंडीगढ ऑफिसचे काम सुरळीत पार पडावे यासाठी प्रयत्न करत असल्याने प्रत्येक गोष्टीची माहीती करून घेणे, आमच्या लोकांना पोलिस कंट्रोल रूममधे पाठवणे, त्यांना स्वतः फिरून माहीती गोळा करायला सांगणे, स्थानिक कर्मचार्यांकडून माहीती घेणे हे काम केल्यामुळे खालचे माझे स्वतःचे अनुभव व स्वतःची मते आहेत.

तीन चार दिवसांपासूनच हे डेराचे लोक पंचकुला परीसरात जमू लागले. धारा १४४ लावण्यात आली ज्यात जमावबंदी व शस्त्र बाळगण्यास बंदी असते. पण तरीही हे लोक वाढतच होते. पोलिस त्यांची शस्त्रे काढून घेत होते, कोणती शस्त्रे? हॉकी स्टीक नी बॅट. न्यायालयाने जेव्हा विचारले की १४४ लागू असताना इतके लोक कसे आले तर म्हणे जमावबंदी असे आदेशात लिहायला आम्ही विसरलो. क्लेरिकल चूक झाली. वा! बाकी त्यावर अंमल करणार्यांनाही १४४ काय असतं माहीत नव्हतं? सरकारी आदेश होते म्हणे की या उपद्रवशून्य भाबड्या लोकांना काही करू नका. हे लोक उड्डाणपुलांखाली, बागांमध्ये, सेक्युरिटी नसलेल्या सोसायट्यांच्या आवारात थांबले होते. हायवेच्या पलिकडल्या भागात रहा असे त्यांना सांगितले होते. बर्याच ठिकाणी तर त्यांची "व्यवस्था" केली जात होती. रेल्वे नी बस बंद केल्या. पण लोक चालत येतच होते.

न्यायालयाने जेव्हा सांगितले की यांना बाहेर काढा नाहीतर डीजीवर कारवाई केली जाईल तेव्हा आम्हाला वाटलं होतं की आताच दंगे होणार. पोलिस यांना हाकलवणार नी हे लोक विरोध करणार. पण नाही! पोलिसांनी चक्क काही म्हणजे काहीही केलं नाही. खट्टर म्हणाले की या लोकांनी एक झाड पण नाही तोडलं तर ते त्रासदायक कसे. त्यांनी लोकांना शांततेचे आवाहन केलं. हे लोक मात्रं म्हणत होते की बाबांनी आम्हाला जनावरांपासून माणूस बनवलय पण त्या बाबांना त्रास दिला तर परत जनावर व्हायला वेळ नाही लागणार. हा त्या बाबाच्या शिकवणीचा अपमान आहे हे देखील त्यांच्या गावी नव्हतं. काही लोक तर पूर्ण भारत जाळू म्हणत होते. आम्ही शांततेने बाबांना सपोर्ट करायला आलेले भक्त आहोत नी न्यायालय नक्की सत्याची बाजू घेऊन बाबांना सोडतील असं त्यांचं म्हणणं होतं जे सगळ्या बातम्यांत दाखवत होते पण त्यानंतरचे - जर न्यायालयाने बाबांच्या विरोधात निकाल दिला तर आमची ताकद आम्ही दाखवून देऊ असल्या वाक्यांकडे बर्याच लोकांनी काणाडोळा केला.
वॉट्सअॅप, एसेमेस, ट्विटर नी फेसबूकवर लोक कायकाय पसरवत होते म्हणून मोबाईल डेटा व एसेमेस बंद केले. पण पण पण!!! जिओ त्यानंतरही बरेच तास सुरू होतं. होय, तिथेही जय अंबानी. नेमका कोणी काय हस्तक्षेप घेतला माहीत नाही पण काही तासांनी ते ही बंद झालं. पण ब्रॉडबँड बंद करणे सरकारच्या अखत्यारीत येत नाही का? लोक ते वापरून डेटा वापरतच होते. मग सरळ वीजपुरवठा बंद केला ब्रॉडबँड बंद करायला.

सैन्य मागवलं, कमांडोज, पोलिस, सगळे होते पण हे सगळं त्या सो कॉल्ड निरूपद्रवी लोकांना केवळ पाहण्यासाठी! अटकाव करण्यासाठी नाही.
पंजाब पोलिसांनी लोकांना पंजाबात यायला दिलं नाही (४-५ किमी अंतरावरच पंजाब आहे). पण खुद्द पंजाबात त्याचे भक्त असल्याने तिथले लोक होतेच. चंडीगढ पोलिसांनी मात्र कडक बंदोबस्त केला होता. पंचकुलातून चंडिगढला यायच्या सीमा बंद केल्या व केवळ आयडी कार्ड बघूनच प्रवेश देत होते. पंजाबमधून मोहालीकडून येणाऱ्या सीमांवरही तसेच.

कोर्टापासून दीडदोन किमी अंतरावरच सर्वांना अडवून ठेवलं होतं. मेडियावालेही सगळे तिथेच. अगदी निवडक लोकच कोर्टाजवळ होते. निर्णय आल्याचं कोर्टाजवळच्या मेडियावाल्यांनी तिकडे लोकांजवळच्यांना सांगितलं. लोकांना तिथूनच कळलं नी लोक त्यांच्यावरच चिडले. मेसेंजर ऑफ गॉडच्या भक्तांनी या मेसेंजरना मारायला नी त्यांच्या गाड्या जाळायला सुरूवात केली. जवळपास सर्वच चॅनलच्या गाड्या एका लायनीत होत्या त्यांवर हल्ला केला. पोलिसांनी पत्रकारांना सांगितलं बाजूला व्हा, गाड्या सोडा नी मग त्यांनी अश्रूधूरांच्या फैरी सुरू केल्या. मग झालेला सगळा प्रकार सर्वांनी पाहीलाच!

दंगल थांबवण्याची इच्छाशक्ती अजिबात नव्हती. खट्टर शेवटपर्यंत भोळ्या भक्तांना येऊद्या असंच म्हणत होते. दंगल हवीच असं वाटतय की काय या माणसाला असं वाटत होतं. पोलिसांना केवळ उभं केलं होतं, लोकांना हाकलवायचे आदेश नव्हते, न्यायालयाने सांगून सुद्धा. आर्मी नी कमांडोनाही तेच आदेश. कसं काय? का? असं कसं करता येऊ शकतं?

नशीब बाबाला हॅलिकॉप्टरमधून रोहतकला नेलं. आता शिक्षा देण्याचं काम व्हीसीने होणार आहे किंवा न्यायालय तिकडे जाणार. पण अजून सोमवारचा दिवस वैऱ्याचा आहेच. प्रशासनाने या प्रसंगातून शिकून नीट पाऊले उचलावीत व सोमवार शांत करावा. भक्त बर्यापैकी पांगलेत पंचकुला परीसरातून नी आता सिरसा जास्त संवेदनशील बनलेय. पण किमान लाज राखावी म्हणून तरी सैन्य व पोलिसांनी कठोर निर्णय घ्यावेत. १४४ जरी नीट राबवले तरीही परिस्थिती बरीच आटोक्यात राहील.

सनव,
ह्या धाग्यावर गुन्हेगारांचा निषेध मी पाहिलं तेव्हा मागे पडला होता>>>>>
100% खोटे स्टेटमेंट, तुमच्या प्रतिसादाला पर्यंत प्रत्येक जण राम रहीम चे ढोंग, आणि हिंसाचारात राज्य सरकार ने घेतलेली बोट चेपी भुमिका या बद्दल बोलत होता . फक्त एक पोस्ट भाजपचे मंत्री नमस्कार करताना बाबतचे होते.

तुम्ही या निंद्य घटनेचा निषेध कुठेच केला नाहीत , ना कट्ट्यावर, ना बेफिन्चा समांतर धाग्यांवर, ना इकडे.
या विषयावरचे तुमचे पाहिले पोस्ट काँग्रेस ने 2 टर्म मागे काय केले हे आहे.

बलात्कार प्रकरणांनंतर बाबा राम रहीमचं राजकीय , सामाजिक पुनर्वसन काँग्रेसने केलं , सपोर्ट दिला व घेतला आणि सिक्युरिटीही दिली. काँग्रेस नेत्यांशी कौटुंबिक नातेसंबंध आहेत. हे लपवून आता फक्त बीजेपीकडे बोट दाखवणं म्हणजेच या प्रकाराचं राजकारण करणे.>>>>>>>>>>>
याच काँग्रेसने आपल्या काळात खटला नेटाने चालवला हे विसरता तुम्ही, भाजप शासित राज्य आणि देश असताना आसाराम केस / व्यापम मध्ये साक्षीदार ज्या पद्धतीत मरत आहेत आणि आरोपी सुटायची व्यवस्था होत आहे तसे या केस मध्ये झाले नाही, हे तुम्हीं सोईस्कर पणे विसरता.

स्त्रीत्व, डुआयडी, खरोखर स्त्री आहे का, आयटी सेल वरून आदेश- हे सर्व पुराव्याशिवाय- तरी फरक पडत नाही>>>>>>
यातला एकही आरोप मी केला नाही, "तुम्ही स्त्री असताना एक बलात्कारी माणसाच्या विरोधात बोलत नाही आहात" या अर्थाचे विधान तुम्हाला वैयक्तिक हल्ला वाटत असेल तर कठीण आहे.
माझा प्रतिवाद करताना कृपया मी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया द्यावी.

स्त्री आयडीज इथे राजकारणावर कमी लिहितात, लिहायचं तर मनावर चिलखत हवंच. बोला काय पण.>>>>>>>
स्वतःला victim जाहीर करून सहानुभूती मिळवायची असेल तर बेस्ट लक,

<बलात्कार प्रकरणांनंतर बाबा राम रहीमचं राजकीय , सामाजिक पुनर्वसन काँग्रेसने केलं , सपोर्ट दिला व घेतला आणि सिक्युरिटीही दिली. काँग्रेस नेत्यांशी कौटुंबिक नातेसंबंध आहेत. >

याला काहीही पुरावा दिलेला नाही. सगळा आयटीसेल कडून आलेला मालमसाला आहे. मुळात त्या बाबाला पुनर्वसनाची गरज बिरज होती का? सिक्युरिटी दिली कारण त्याच्यावर दहशतवादी हल्ला झाला होता.

"बाबाचा आणि काँग्रेसचा काहीही संबंध नाही", असं या धाग्यावर सनव यांच्या येण्यापूर्वी कोणी लिहिलंय ते दाखवा.
सध्या त्याचा भाजपच्या गळ्यात गळा आहे त्यामुळे त्याच बातम्या इथे दिसल्या. भाजपाचा एक खासदार त्याचं समर्थन करतोय. यामुळे हे अधोरेखित होतंय. पंजाब आणि हरयाणा या दोन राज्यांत हे आंदोलनाचे(?) प्रकरण वेगवेगळ्या प्रकारे हाताळले गेले हेही स्पष्ट आहे..

पुन्हा पुन्हा त्या बाबाचं नाव फक्त रहीम असं लिहून आपला बुद्धिभेदाचा पवित्रा त्यांनी उघड केलाच आहे. एकच खोटं पुन्हा पुन्हा सांगण्याचा , आपल्या कारकीर्दीत झालेल्या दुर्घटनांचं आणि आपल्या चुकांचं खापरही गांधी नेहरूंपासून कॉंग्रेसवर फोडायचा भाजपायींचा फंडा इथेही चालूच आहे.

Pages