एक विचित्र अनुभव

Submitted by बेफ़िकीर on 25 August, 2017 - 09:46

आठ दहा दिवसांपूर्वी मी व वडील माझ्या गाडीतून कोल्हापूरहून पुण्याला यायला निघालो. सकाळी सहाच्या सुमारास आम्ही निघालो आणि हायवेला लागून एक दहा पंधरा किलोमीटर झाले तेव्हा एक विचित्र प्रकार घडला. माझ्या वाहनाचा वेग साधारण ९० ते १०० किमी प्रतीतास असेल. अचानक डिव्हायडरवर पलीकडच्या रस्त्यावरून एक अजस्त्र काळकुट्टं डुक्कर धावत आले आणि आपण ओलांडतो आहोत तो एक रस्ता आहे हेच न बघता तसेच तीरासारखे धावत रस्ता ओलांडू लागले. माझ्या गाडीची आणि त्याची धडक बसणार हे नक्की आहे हे कळल्यावर मला आणखी एक गोष्ट कळली की मला आता काहीही करणे शक्य नाही.

पूर्ण वेगातच माझ्या गाडीची त्या डुकराला धडक बसली. खरे तर डुकराचीच माझ्या गाडीला धडक बसली. तो इम्पॅक्ट इतका भयंकर होता की धडामकन् आवाज झाला आणि गाडी दहा वीस फुटांवर जाऊन थांबलीही! मी गाडी हळूहळू साईडला घेतली आणि मागे वळून पाहिले तर ते डुक्कर उताणे पडून पाय झाडत तडफडत होते. क्षणभर मला फार वाईट वाटले की त्याला खूप लागले असेल. पण मला हे नक्की माहीत होते की डुक्कर, बैल असे प्राणी जेव्हा वाहनाला धडकतात तेव्हा वाहनाचीही मोडतोड होते. मी वळून पाहिले तर केवळ दोन क्षण उताणे पडून ते डुक्कर तडफडले आणि पुढच्याच क्षणी उठून काही झालेच नाही अश्या थाटात पुन्हा धावत सुटले. मी मात्र हबकलो. तीन, चार सेकंदात ते डुक्कर इतके अगाध सावरलेले पाहून मी वडिलांना म्हणालो की नक्की गाडीची मोडतोड झालेली असणार!

म्हणून मी बाहेर येऊन गाडीचा पुढचा भाग पाहिला तर त्याच्यावर काळ्या रंगाची इतकी घाण लागलेली होती की मला ते दृश्य बघवतही नव्हते आणि खरंच काही झाले आहे का हे दिसतही नव्हते.

शेवटी मी गाडीत वैतागून बसलो आणि गाडी आधीच्याच वेगाने नेऊ लागलो. काहीच प्रॉब्लेम वाटत नव्हता. मधेच एक कडकड आवाज येऊ लागला म्हणून पाहिले तर काय वाजत होते ते समजतच नव्हते.

पुढच्या टोलनाक्यावर नेहमीच उभ्या असणार्‍या पोलिसांनी गाडी अडवली. म्हणाले तुमची नंबर प्लेट दिसत नाही. मी त्यांना डुक्कर धडकल्याचे सांगितल्यावर त्यांनी हसत हसत मला सोडून दिले.

मग भुईंजपाशी एक गाडी धुणारा मिळाला. तिथे गाडी आधी धुवून घेतली आणि पाहिले तर गाडीला काहीही झालेले नव्हते.

तसाच पुण्याला आलो. आता आवाजही येत नव्हता. त्यानंतर आठ दिवस गाडी नाही नाही त्या गावांना, अत्यंत खराब रस्त्यांवरून घेऊन गेलो. पण गाडी परफेक्ट परफॉर्मन्स देत होती. दोन दिवसांपूर्वी मात्र अचानक एसी काम करेनासा झाला. एसीशिवाय गाडी चालवणे अशक्य असल्याने पहिला मेकॅनिक गाठला. तो म्हणाला रु. १४५० मध्ये गॅस भरून देतो कारण गॅस लीक असणार. मलाही तेच वाटले प्ण क्रॉसचेक म्हणून नेटवर पाहिले तर रु. १२५० मध्येही गॅस भरणारे काही मेकॅनिक दिसले. त्यातल्या एकाला फोन केला तर तो येऊन गाडी घेऊन गेला. त्याने वीस मिनिटांनी फोन करून सांगितले की आत पूर्ण मोडतोड झालेली असून कंडेन्सर, रेडिएटर आणि एक बार असे सगळे बदलावे लागेल. चौदा हजार खर्च येईल. त्याला मी गाडी परत आणायला सांगितली. त्याने गाडी आणून पार्किंगमध्ये लावून दिली. मग मी परत पहिल्या मेकॅनिककडे गाडी नेली. त्याने चेक करण्यासाठी गाडी खोलली तर खरोखरच आतमध्ये सगळी मोडतोड झालेली होती. पण त्याने फक्त कंडेन्सर व एक बार बदलला व रु. ८३०० मध्ये माझे काम झाले.

डुकराच्या धडकेचा परिणाम बाहेरून काहीही दिसत नव्हता कारण जिथे ते डुक्कर धडकले होते तिथे फायबर होते. मेटल असते तर ते डॅमेज झाल्याचे दिसले तरी असते.

अश्या प्रकारे एका डुकराची धडक मला भलतीच महागात पडली.

===========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<अहो, असे लिहिले की दोन चार अनुमोदन देणारे प्रतिसाद मिळवता येतात. जे त्यांना हवे असतात, बाकी काही नाही.
इतरत्र त्यांचे स्वतःचे प्रतिसाद कायम निरर्थक, अनावश्यक आणि खोडसाळ असतात हे ते सोयीस्कर पणे विसरून जातात. चालायचेच कोणी सद्गुणांचा पुतळा थोडी असतो>
प्रतिसाददात्याचं बॅशिंग का काय म्हणतात ते हेच असावं.

वाचकांनी केवळ मूळ लेखनावरच प्रतिसाद द्यावा, प्रतिसादांवर नव्हे, असा नियम मायबोलीवर आणायची चळवळ सध्या बासनात गुंडाळली आहे काय?

बेफिकीर, अवांतराबद्दल क्षमस्व. खरंच विचित्र अनुभव.

Exactly my point.
राहुल ह्यांचा प्रतिसाद लेखावर नाहीये. तो लेखावर प्रतिसाद देणार्याचे अनावश्यक बॅशिंग आहे.
मी त्यांच्या लेखावर आलेल्या प्रतिसादबद्दल काही बोललेले नाही.

अवांतर लिहून माफी मागण्या पेक्षा अवांतर न लिहिणे बरेच सोपे आहे. इगो कंट्रोल करता आला पाहिजे. प्रयत्न केला तर जमू शकेल तुम्हाला.

बेफि, नशिबाने तुम्हाला व वडिलांना काहीही झाले नाही...तुमच्या पूर्वीच्या अपघाताची आठवण झाली...

लाज वाटली पाहिजे जे प्राण्यांची अशी बोंम्ब लाउन हत्या करतात आणि वर त्याचे समर्थन किंवा टिंगल करतात.
निषेध ।

Chan
Halli kathe peksha pratisad chan vatatat vachayala

Pages