आमच्या घरचा बाप्पा

Submitted by संयोजक on 21 August, 2017 - 21:05

aamacha-ganapati-2017.jpg

आला रे आला बाप्पा आला
दुःख विसरा मनी सुख हे भरा ||

येतोय भेटाया बाप्पा माझा
जल्लोष करा तयारी करा
स्वागत होऊ दे जंगी जरा
प्रसन्न झालाय माहोल सारा ||

कारण आलाय बाप्पा माझा
समई लावा रोषणाई करा
आरतीची वेळ झाली घाई करा ||

वाजत गाजत ,थाटामाटाने गणराजाचे आगमन झालेले आहे. घरच्यांनी मोठ्या हौसेने सजवलेल्या मखरात मूर्ती विराजमान आहेत. निरांजनाच्या , समईच्या प्रकाशात बाप्पांचा चेहरा आणखीन उजळून , झळाळून निघालाय. या देखण्या मूर्तीची , मखराची, तुम्ही केलेल्या सजावटीची, रोषणाईची प्रकाशचित्रे आणि माहिती इथे द्या.

त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१७' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.


श्री. नरेंद्र कुलकर्णी यांनी केरवा तालात बांधलेली ही रचना 'गराज बँड' ह्या सॉफ्टवेअरमधे तयार केलेली आहे. ह्यात गिटार, ट्रम्पेट, व्हायब्रोफोन आणि स्ट्रिंग्स (व्हायोलिन वर्गातील वाद्ये) ह्यांचा वापर केलेला आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या नातवाने शाळेत स्पर्धेत बनविलेली मूर्ती ३ ऱ्याक्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे.
ह्याच मूर्तीची घरी स्थापना केलीहोती

वा सर्वच बाप्पा सुरेख.

अश्विनी नाही दिसत. क्रोमवर जाऊन बघते. आय इ मधे कधी कधी नाही दिसत.

अश्विनी नाही दिसत मला, मी क्रोमवरुन पण जाऊन आले आणि मोझिला फायरफॉक्स वरुन पण मायबोली सुरु करुन बघितलं. पण नाही दिसत मला. काय माहीती काय कारण ते.

सगळ्यांचेच गणपती सुरेख!
संपदा, मूर्ती खूप आवडली.
प्राजक्ता, डेकोरेशन छान. चमच्यांची आयडिया भारी!

21151314_1341634382613651_1541562640615557386_n.jpg

गणपतीला WELCOME माझ्या ९ वर्षांच्या मुलीने केलंय ब्लॅक बोर्डवर

आणि फुलपाखरं दोघी बहिणींनी (लहानगी ७ वर्षे ) रंगवून दिली आहेत. (खारीचा वाटा दोघींचा)

IMG-20170826-WA0002.jpg

सर्व फोटो सुंदर !
बाप्पा तर सुंदर असणारच.
चैतन्य, खूप सुंदर मूर्ती. (आम्हालाही शिकवा. Happy )

Pages