झब्बू क्रमांक २ विद्या दे बुद्धी दे हे गजानना

Submitted by संयोजक on 21 August, 2017 - 20:46

विषय - शाळा /कॉलेज/ युनिव्हर्सिटी

गणपती म्हणजे बुद्धीची देवता, आणि ही बुद्धी मिळवण्याची जागा म्हणजे 'शाळा'! प्रत्येकाच्या आयुष्यातलं महत्वाचं स्मरणतीर्थ.. शाळा / कॉलेजाबद्दल आपुलकी नसेल किंवा आठवणी नसतील अशी व्यक्ती सापडणं विरळाच! कोणाला शाळेने विद्या दिली तर कोणाला 'विद्या'! कोणाला शक्ती दिली तर कोणाला 'शक्ती' वगैरे वगैरे!!!
लहानपणी बागुलबुवा वाटणारी शाळा- कॉलेजे आत्ता आपल्या आयुष्यातल्या सोनेरी आठवणीं ची प्रकाशचित्रे..
तर मंडळी, मायबोली गणेशोत्सव२०१७ घेऊन येतोय दुसरा झब्बू - विद्या दे, बुद्धी दे हे गजानना अर्थात शाळा कॉलेज ची प्रकाशचित्रे

नियम नेहमीचेच, तरी एकदा वाचून घ्या -

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635

2017 Zabbu Shala.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

zabu University.jpg

टेम्पल युनिव्हर्सिटी , फिलाडेल्फिया. फॉक्स स्कूल ऑफ बिझनेस चा पदवीदान समारंभ. भारताचे माजी एच आर डी मिनिस्टर पल्लम राजू हे मुख्य पाहुणे होते. याच वेळेस त्यांना ऑनररी डॉक्टरेट दिली होती.

बर्‍याच मायबोलीकरांची पुढची पिढी गेल्या एक दोन वर्षात कॉलेजात गेली आहे. काहींची कॉलेजच्या उंबरठ्यावर आहेत . कॅम्पस व्हिजिट, ओरिएण्टेशन, किंवा कॉलेजला सोडायला जातानाचे फोटो टाका पाहू .

शाळा / कॉलेजच्या ग्रॅजुएशनचे सुद्धा टाका

प्रीस्कूल चे ग्रॅजुएशन!! Happy
goddard.jpg

पहिल्या लॅटिनो सुप्रिम कोर्ट जस्टिस सोनिया सोतो मायोर यांचे आल्मा मॅटर . जस्टिस एलिना केगन आणि फॉर्मर फर्स्ट लेडी मिशेल ओबामा
पण इथे शिकलेल्या _/\__

अहाहा मैत्रेयी.... मस्तं आठवण करून दिली प्रिन्स्टनची.
एक दोन आठवड्यातून एकदा तरी हँग आऊट असायचाच त्या कँपस मध्ये.

माझ्या जपानमधल्या हितोत्सुबाशी नॅशनल युनिव्हर्सिटीचे कुनिताची कॅम्पस.
HK.jpg

IMG-20170109-WA0007.jpg

ही माझी साधीसुधी शाळा ( श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी या गावातले माझे हायस्कूल). शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला तेव्हा काढलेला हा फोटो.

IMG-20161210-WA0003.jpg

स्कूल ची कॉन्सर्ट - दरवर्षी कानीकपाळी ओरडून करून घेतलेल्या रोजच्या प्रॅक्टिसेस आणि उरीपोटी वाहून नेलेल्या इन्स्ट्रुमेन्ट ची हौस फिटणारा इव्हेन्ट! Happy
scool concert.png

काँसर्ट करता स्पेशल घेतलेले पांढरे शर्ट / ब्लाउझ, काळ्या पँंट्स आणि फॉर्मल शूज, काय क्युट दिसतात मुलं. पण क्युट म्हणायची सोय नसते. मॉ...म! असं ओरडून म्हणून आय रोल मिळतो लगेच.