'गुलज़ार'

Submitted by सत्यजित... on 21 August, 2017 - 08:35

सूर श्वासांच्या लयीवर स्वार झाला पाहिजे
काळजाच्या 'कोपऱ्यावर',वार झाला पाहिजे!

दुःखसुद्धा एवढे तालात आले पाहिजे
की सुखांचा,'उंबरा' तय्यार झाला पाहिजे!

जाणिवांची ओल इतकी खोल रुजली पाहिजे
जीवनाचा बाग हिरवागार झाला पाहिजे!

कागदावरच्या फुलांना रंग दे,मधु-गंध दे
शब्द-शब्दाचा तुझ्या 'गुलज़ार' झाला पाहिजे!

शाल श्रीफळ अन् फुलांनी फार झाले आजवर
चंद्र-सूर्यांनी तुझा सत्कार झाला पाहिजे!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा! सत्यजितजी.. आवडली गझल.
>>> शाल श्रीफळ अन् फुलांनी फार झाले आजवर
चंद्र-सूर्यांनी तुझा सत्कार झाला पाहिजे..>>> +१११११

पद्मजी,राहुल,अक्षय,कावेरीजी,सायलीजी,तनिष्काजी आपणा सर्वांचे खूप-खूप धन्यवाद!

गुलजार!!!सिर्फ नामही काफी है,असं हे व्यक्तिमत्व!
या माणसाने एवढं भरभरुन दिलंय जगाला! इतकी तपं लिहित असतानाही या लेखणीला शब्द,कल्पना,प्रतिमा...कशाची चणचण भासलीच नाही कधी!जाणिवांची जाग आणि आग किती प्रगल्भ असेल या माणसाची!

छान लिहिलय सत्यजितजी
या माणसाने एवढं भरभरुन दिलंय जगाला! इतकी तपं लिहित असतानाही या लेखणीला शब्द,कल्पना,प्रतिमा...कशाची चणचण भासलीच नाही कधी!जाणिवांची जाग आणि आग किती प्रगल्भ असेल या माणसाची! >>>> अगदी सहमत