खोटा 'सिक्का'?

Submitted by यक्ष on 18 August, 2017 - 23:34

आज वास्साप वर एक मेसेज आला 'खराब मिस्त्री' व 'खोटा सिक्का' बद्दल.! मेसेज तेवढा महत्वाचा नाही पण ते विचारांचे मोहोळ हुलवून जातात. तात्पुरती 'अनावस्था' वा 'अनागोंदी' माजवून जातात! एक सामान्य व्यक्ती व गुंतवणूकदार म्हणून मला बरेच प्रश्न पडतात..

भारतीय कंपन्या सुमारे २००० पासून 'संक्रमणावस्थेत' आहेत. बरेच प्रयोग झालेत, चालू आहेत, अविरत होतील.
व्यवस्थापन बदल हेही काही कंपन्यांच्या बाबतीत महत्त्वाचे बदल. पण ह्या प्रयोगाच्या बाबतीत भारतीय कंपन्या ह्या विदेशी कंपन्यांच्या (गूगल, आय. बी. एम. वगैरे) तुलनेत मागे पडतायत का?

एवढ्या मोठ्ठ्या कंपन्यांचे मालक नवीन प्रशासन आणतांन्ना नवीन नेत्रुत्वाला त्यांच्याच तालावर चालण्याचा अट्टाहास करतायत आणी त्यामुळे अशा घटना घडतायत की नवीन नेत्रुत्व अपेक्षांना कमी पडतेय की व्यक्तिंची निवड चुकीची ठरतीय हा सगळा संभ्रमच आहे. बरे ह्यात नुकसान सगळ्यांचेच. कुणाचाच फायदा नाही असे वाटते.

ह्यात बर्याच वेळेस नवीन नेत्रुत्व 'जुन्या' विचारांन्ना, परंपरांन्ना, पद्ध्तींन्ना विरोध करणे म्हणजे एक 'क्रांती' घडवतोय अशा भावनेने बहकून जातात व 'व्यक्तिसापेक्ष' विरोध जाणुनबुजून करतात की ज्यामुळे त्यांन्ना 'वाहवा' मिळावी व एक 'मोठेपण' एक 'वलय' प्राप्त व्हावे असे वागतात असे प्रकर्षाने वाटते. कदाचीत हा विरोध बरोबरही असू शकतो कारण विरोधाशिवाय बदल होणे अवघड.

की अश्या नव्या नेत्रुत्वांमुळे आपले महत्त्व कमी होते ह्या जाणिवेने जुने नेत्रुत्व आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी असे पाउल उचलतात?
प्रश्नांची उत्तरे मिळणे तसे अवघडच कारण कुठल्याही कंपन्यांचे 'सत्य' त्यांच्या 'बँलन्स शीट' प्रमणेच एक गौडबंगालच राहील आणी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तींन्ना कधीच कळणार नाही!

ह्या 'जुन्या' - 'नव्या' चा संघर्ष असाच अखंड, अव्याहत चालू राहील. नाही कां?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>मला हे डिटेल जाणून घ्यायला आवडेल.<<

जरुर. तुम्ही वर दिलेली उदाहरणं आणि प्रॉडक्ट्/सर्विसेस कंपन्यामधली तुलना हि फक्त डेवल्प्मेंट टीम च्या दृष्टिकोनातुन केलीली आहे. प्रॉडक्ट/प्रॅक्टिस मॅनेजमेंट, मार्केटिंग, सेल्स इ. चा हि मोठा रोल असतो अशा कंपन्यांमध्ये. तरीहि, तुमचंच डेवलप्मेंट टीमचंच उदाहरण घेउन "कोर स्किल्स" बाबत खालील मुद्द्यांवर बोलुया:
१. प्रॉडक्ट कंपनीतला प्रोजेक्ट मॅनेजर आणि सर्विसेस मधला प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या कोर स्किल्स मध्ये साम्य आहे का?
२. दोन्हि कंपन्या एखादि मेथडालजी, फ्रेम्वर्क अ‍ॅडाप्ट करतात. पण ओवरॉल डेवल्प्मेंट लाइफसायकल्चा (एजायल, डेवऑप्स इ.) विचार करता दोघांत जमीन-अस्मानाचा फरक आहे का?
३. सर्विसेस कंपन्यांनी घेतलेले टृंस्फॉर्मेशनल किंवा एंड-टु-एंड डेवलप्मेंट प्रोजेक्ट्स आणि रुटीन मेंटेनंस यांना एकाच तागडीत तोलणार का?
४. प्रॉडक्ट कंपन्यांनी बनवलेला प्रॉडक्ट रोडमॅप आणि सर्विसेस कंपन्यांनी क्लायंट्स्ना दिलेली सोलुशन इंप्लिमेंटेशन स्ट्रॅटजी/रोडमॅप यात जमीन-अस्मानाचा फरक आहे का? दोन्हित टाइमलाइन, रिसोर्सेस, डिलिवरेबल्स, प्रॉडक्ट्/अ‍ॅप सन्सेट, बिझनेस्/मार्केट इंपॅक्ट, कॉस्ट/रेवेन्यु इंपॅक्ट इ. चा समावेश अस्तो कि नसतो?
५. दोन्हि कंपन्यांच्या जीटिएम स्ट्रॅटजीमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो का?
६. प्रॉडक्ट मध्ये एखादा सिवियर बग सापडला तर प्रॉडक्ट कंपन्या हातात्लं काम टाकुन तो फिक्स करतात का पुढच्या रिलीज पर्यंत थांबतात?
७. सर्विसेस कंपन्याकडे हि युटिलिटी पेटंट्स असतात याची कल्पना आहे का?
असो, लिस्ट अजुन लांब आहे पण गाभा तोच असल्याने इथे थांबतो. हे वरचे मुद्दे वाचल्यावर मी काय म्हणतो ते लक्षात येइल अशी आशा आहे.

बाकि, मी वर लिहिल्याप्रमाणे कोर स्किल्स आणि कल्चरचा काहि हि संबंध नाहि. आणि ड्रेसकोडचा मुद्दा कामाचं स्वरुप आणि स्थळ्/काळ यावर अवलंबुन आहे. तुमचा गोंधळ बहुदा क्लायंट फेसिंग आणि बॅकेंड (कोड,टेस्ट,डॉक्युमेंट) रोल्स यामुळे झालेला दिसतोय. दोन्हि (प्रोडक्ट, सर्विसेस) कंपन्यांमध्ये हि दोन्हि स्किल्स असलेली माणसं काम करतात...

>>मायक्रोसॉफ्ट, गुगल, याहू, सिमॅंटेक, ओरॅकल आदी दिग्गज प्रोडक्ट कंपन्यांचे संस्थापक/CEO तांत्रिक कौशल्य असणारे होते (अथवा आहेत). सर्विस कंपन्यांच्या बाबत मात्र तसे नाही (जसे कि विप्रो कि जे मुळचे तेलाचे व्यायसायिक आहेत). माझा मुद्दा तोच आहे.<<

असा काहि हार्ड अँड फास्ट रुल अस्तित्वात नाहि. स्टिव जॉब्स, पॉल अ‍ॅलन, लॅरी अ‍ॅलिसन यांनी कितपत कोडिंग केलेलं आहे हा संशोधनाचा विषय होउ शकतो... Happy

राज मला तुम्ही दिलेल्या यादीतल्या बर्‍याच मुद्द्यात ठळक फरक जाणवले आहेत तेसुद्धा एकाच कंपनीच्या प्रोडक्ट वि. सर्विसेस डिविजनमध्ये. मात्र माझा अनुभव २ कंपन्यांपुरता मर्यादित असल्याने मी फार ठामपणे बोलू शकणार नाही.

क्र.१ मध्ये प्रचंड फरक जाणवला.
क्र.३: मी एन्ड टू एन्ड ट्रान्स्फॉर्मेशनमध्येच जास्त काम केले आहे, रुटिन मेन्टेनन्स जवळपास नाही. तरिही प्रोडक्ट कंपनी व सर्विस कंपनीच्या विचार करणाच्या पद्धतीत फरक पाहिले.

कोअर स्किल्स तीच लागतात दोन्ही कंपन्यांच्या कर्मचार्‍यांमध्ये मात्र त्यांच्या काम करण्याच्या वा कामाला सामोरे जाण्याच्या पद्धतीत फरक असतो असे मला वाटते. -- तुमचे नेमके म्हणणे समजले नाही किंवा मला कळले नाही. स्किल्स तीच हवीत मात्र कल्चर वेगळे असते असे म्हणायचे आहे का तुम्हाला? का स्किल्स तीच असल्याने दोन्ही बाजूकडची माणसे इन्टरचेन्जेबल आहेत असे म्हणायचे आहे?

हे तुमच्या आमच्यासाठी ठीक असेल. किंवा छोट्या कंपनीतल्या CEO साठी असेल. पण ज्या पातळीवर Infosys सारख्या CEO ला काम करावे लागते त्या पातळीवर (मला वाटते) हे इथे रिलेवंट नाही.

>>> अजय, हे मान्य आहे. त्यांचा उद्देशही बरोबर होता कारण कंपनीत बदल ज्या दिशेने करायचे आहेत (सर्विस->प्रॉडक्ट) त्या क्षेत्रातला एक्स्पर्ट आणणे हे बरोबर होते. पण कंपनीतील बाकी लोकांना हा बदल रूचला नसेल. त्यात अशा बदलामधे अनेक लोकांना काढून नवीन लोक आणावे लागतात. आधीची संस्थाने बंद होतात. टॉप मॅनेजमेण्ट मधे त्यामुळे खूप विरोध होतो.

त्यात सिक्का हे जी कंपनी मुळात प्रॉडक्ट मधे होती, तसे कल्चर व त्यातले तज्ञ लोक तेथे होते - तेथे यशस्वी झाले होते. company transformation हे त्यांचे कौशल्य असेलच असे नाही. त्यात सर्विस कंपन्यांमधे मिडल मॅनेजमेण्ट वाले हे सहसा बिझिनेस वाढवण्याचे कौशल्य असलेले असतात. प्रॉडक्ट कंपनीत मिडल मॅनेजमेण्ट हे लॉन्ग टर्म व्हिजन वाले लागतात. एक कस्टमर चा एक प्रॉब्लेम त्याच्या स्पेसिफिक वातावरणात सोडवणे व असे अनेक प्रॉब्लेम्स अनेक कस्टमर्स च्या बाबतीत सोडवता येतील अशा प्रॉड्कट फीचर चा विचार करून ते बनवणे ही पूर्णपणे वेगळी कौशल्ये आहेत (यात कोणी श्रेष्ठ वगैरे अर्थाने नाही. वेगळी कौशल्ये). यातील एका कौशल्याचे लोक सहसा बदलून दुसर्‍या पद्धतीने काम करू शकत नाहीत. मग असे हजारो लोक असलेल्या कंपनीमधे बदल करताना त्यातले काही लोक ठेवून बाकीचे जावे लागणार. हे काम भयंकर सेन्सिटिव्हली करावे लागते. कदाचित ते त्यांना जमले नसेल. किंवा ज्यांची संस्थाने मोडकळीस येत होती त्यांनी मूर्ती किंवा बोर्डावर प्रेशर टाकून हे रोखले असेल.

पण मला जास्त शक्यता वाटते ती शेअरहोल्डर्सनी हे रोखल्याची. कंपनीत असा बदल होणार तो नजीकच्या भविष्यकाळातील उत्पन्नावर परिणाम न होता होईल ही शक्यता जवळजवळ नाहीच. इन्फीचे शेअरहोल्डर्स याला तयार होते का? अशा वेळेस कंपनीच्या प्लॅन वर विश्वास ठेवून काही महिने (किंवा अ‍ॅमेझॉन सारख्या कंपनीबद्दल काही वर्षे सुद्धा) पेशन्स ठेवणारे प्रमुख शेअरहोल्डर्स लागतात. ते तसे तयार नसतील तर ते बोर्डावर प्रेशर टाकून कंपनीचा बदल काय करायचा तो करा पण पुढच्या ३-६ महिन्यातील शेअर प्राइस वर परिणाम न करता - असे म्हंटले तर कंपनीचे बोर्ड काही करू शकत नाही.

अशा वेळेस कंपनीचा लॉंग टर्म प्लॅन बदलला गेला तरी शॉर्ट टर्म इन्वेस्टर्सना त्यांचा पैसा मिळत राहील, जो त्यांचा मुख्य उद्देश असतो.

हे सगळे केवळ वाचलेल्या माहितीवरून हायपॉथेसिस. माझा इन्फीशी कसलाही संबंध नाही.

अजून एक तिसरा अ‍ॅंगल म्हणजे - प्रॉडक्ट कंपन्यांनी एक मोठी सर्विस डिविजन तयार केल्याची उदाहरणे आहेत (आयबीएम, ओरॅकल ई.) पण उलटे फारसे ऐकले नाही.

>> तुमचा गोंधळ बहुदा क्लायंट फेसिंग आणि बॅकेंड (कोड,टेस्ट,डॉक्युमेंट) रोल्स यामुळे झालेला दिसतोय

माझा गोंधळ तर नक्कीच नाही. Still just to make sure that we both are on same page...

प्रोडक्ट कंपनी: ज्यांचे कर्मचारी कंपनीच्या एका अथवा काही ठराविक प्रोडक्ट्स वर काम करत असतात. कोण्या एका क्लाएंट साठी नव्हे. (उदाहरणे: मायक्रोसॉफ्ट, गुगल, याहू, ओरॅकल इत्यादी)

सर्विस कंपनी: ज्यांचे कर्मचारी एका अथवा अनेक क्लाएंट (अन्य कंपनी) साठी काम करत असतात (उदाहरणे: विप्रो, टीसीएस, इन्फोसिस इत्यादी)

>> कोर स्किल्स आणि कल्चरचा काहि हि संबंध नाहि
याच्याशी सहमत नाही. मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीमध्ये जिथे कोअर टेक्निकल स्कील असलेल्या टीम असतात तिथले आणि विप्रो सारख्या कंपनीत जिथे टेक्निकल पेक्षा सोफ्ट स्कील (प्रेझेन्टेशन वगैरे) जास्त महत्व आहे या दोन्ही सोफ्टवेअर कंपन्याच आहेत. पण दोन्हीकडे वर्क कल्चर सारखेच असेल असे आपणास वाटते का?

बाकी तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांपैकी अनेक प्रश्नांची उत्तरे नकारात्मक आहेत. जसे कि प्रॉडक्ट कंपनीतला प्रोजेक्ट मॅनेजर आणि सर्विसेस मधला प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या कोर स्किल्स मध्ये साम्य आहे का? अर्थातच साम्य नाही. उदाहरण पुन्हा तेच. गुगल मधला प्रोजेक्ट मॅनेजर आणि विप्रो मधला प्रोजेक्ट मॅनेजर. खूप फरक आहे. प्रोडक्ट कंपनीतले जवळजवळ सगळे रोल्स कोअर टेक्निकल background असलेले लोक असतात. (माझ्या वाचनानुसार बिल गेट्सनेच सर्वप्रथम हा ट्रेंड सुरु केलाय).

बाकी मार्केटिंग, सेल्स यांच्या दृष्टीने विचार करायचा तर मग सगळ्याच कंपन्या थोड्याफार फरकाने सारख्या म्हणावे लागेल. पण मी फक्त सोफ्टवेअर कंपन्यांबाबत बोलत आहे (या धाग्याच्या संदर्भात).

>> इन्फोसीसला मुद्दामच सर्वीस कंपनीकडून प्रोडक्ट कंपनीकडे जायचे असल्यानेही...
@अजय हे कुठे वाचलेत? जरी हे खरे आहे असे क्षणभर मानले तरी एक सीइओ बदलून प्रोडक्ट कंपनीचा बसवला कि होण्याइतका तो बदल सोपा नक्किच नाही. इन्फीचे दोन लाख कर्मचारी आहेत. विविध क्षेत्रातले हजारो प्रोजेक्टस त्यांच्याकडे असतील. कोणती प्रोडक्ट लाईन बनवणार ह्या सगळ्यांना घेऊन? माझ्या आकलनानुसार सिक्का यांच्या नियुक्तीमागे ते स्कॉलर आहेत (संगणक शास्त्रातली पीएचडी वगैरे) हा मुख्य निकष आहे. त्यानंतर त्यांचे "प्रोडक्ट कंपनीतले योगदान" हा भाग आहे. (संदर्भ: सिक्का नियुक्ती वेळचे मूर्ती यांचे भाषण) मूर्ती आणि त्यांची इन्फोसिस हे प्रथमपासूनच शैक्षणिक पातळीवर स्कॉलर असलेल्या उमेदवारांना त्यांच्याकडे नोकरीत प्राधान्य देण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

>>क्र.१ मध्ये प्रचंड फरक जाणवला.<<
>>गुगल मधला प्रोजेक्ट मॅनेजर आणि विप्रो मधला प्रोजेक्ट मॅनेजर. खूप फरक आहे.<<
काय फरक आहे? दोघेहि पिएमबॉक फॉलो करतात ना कि तिसरंच काहि? दोघांचा प्रोजेक्ट प्लॅन वेगळा असेल पण तो क्रिएट्/मॅनेज एखाद्या पीम टुल नेच करतात ना? दोघांचे रिसोर्सेस, स्टेकहोल्डर्स वेगळे अस्तील बट व्हेन इट कम्स टु सेटिंग्/मॅनेजिंग एक्स्पेक्टेशन्स, डु दे फॉलो डिफरंट टॅक्टिक्स? डु दे रन प्रोजेक्टस डिफरंटली?

दोघांच्या स्किल्सम्ध्ये फरक असलाच तर तो अगदि सटल आहे आणि तोहि कोर स्किल्स मध्ये नाहि, पेरिफेरल स्किल्स मध्ये आहे.

मी सुरुवातीलाच लिहिल्याप्रमाणे या कंपन्यांची सोलुशन कंपनी होण्याकडे वाटचाल सुरु झालेली आहे. काहि पुर्ण्त्वाला गेल्या आहेत तर काहिंचे प्रयत्न चालु आहेत. इन्फि दुसर्‍या गटात सध्यातरी आहे. सर्विसेस मध्ये कटथ्रोट काँपिटिशन असताना तुम्हाला दुसरीकडे हात-पाय मारावेच लागणार आहेत. शिवाय, हु डझंट वाँट स्टेडी स्ट्रीम ऑफ लायसेंस रेवेन्यु? सर्विसेस कंपनी ते सोलुशन कंपनी होण्याकरता इंडिजिनसली वा ऑरगॅनिकली प्रॉडक्ट डेवल्प करण्याची आवश्यकता नाहि; या कंपन्यांकडे अ‍ॅक्विझिशन करता भरपुर कॅश आहे...

राज या वेगाने बहुतेक तुम्ही दोन्ही कंपन्यातल्या बहुसंख्य कर्मचार्‍यांच्या हाताला अन पायाला ५-५ बोटंच आहेत ना का एकाला ६ एकाला ४ आहेत असे विचाराल बहुतेक Light 1

चांगली चर्चा.
मलाही सर्विस वर्सेस प्रॉडक्ट कंपनी च्या त्याच टायटल्स मधल्या लोकांच्या स्किल्स मध्ये काही फरक असेल असं वाटत नाही. जो काही फरक जाणवतो तो वर कोणीतरी तरी कल्चरचा मुद्दा लिहिलाय त्यामुळे असेल.
सर्विस विकणारी कंपनी असली तरी शेवटी ते सुद्धा एक प्रॉडक्टच आहे. सर्विस इंडस्ट्री मधल्या प्रोजेक्ट मॅनेजर म्हणा किंवा कोडर लोकं सुद्धा म्हणा, त्यांना शेवटी ठराविक कामाच्या ब्लॉक्स वर काम करावं लागतं. प्रोजेक्ट मॅनेजमेंट हे शेवटी प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहे. फक्त कल्चर हा एलिमेंट त्यात आलं की त्याच गोष्टी वेगळ्या भासू लागतात असं मला वाटतं. मला खात्री आहे की मायक्रोसॉफ्ट आणि अ‍ॅपल मधल्या सारखे कामाचे प्रोफाईल असलेल्यांना पुष्कळ फरक जाणवेल त्यांच्या काम करायच्या पद्धतीत. खरं हे उदाहरण चुकीचं आहे कारण त्यांच्या फूटप्रिंट्स खुप वेगळ्या झाल्यात पण बहुतेक मुद्दा पोहोचला असावा.

सक्सेस फुल product कंपन्यात पटकन निर्णय घेणे (मग जो कदाचित पूर्ण विचार करून घेतलेला नसेल) याला खूप जास्त महत्त्व असते. मग तो भले चुकला तरी डिसिजन मेकिंग करणारा कोणी लागतो. लीन्गरिंग मेला पाठवत मिटींगा केल्या तर कंपनीच्या सक्सेस वर विपरीत परिमाण होतो.
हे स्टार्टअप नाही तर product कंपन्याबद्दल एरिक श्मिथ म्हणतोय.
"The most important thing to do is to have quick decisions," Schmidt told Hoffman. "And you'll make some mistakes, but you need decision-making."
Schmidt and Google's founders, Larry Page and Sergey Brin, formalized their various teams' meeting agendas, so that every employee knew they would get a weekly chance to present a plan that Google's leadership team could choose to act on or not. Emphasis was placed on efficiency.
https://www.weforum.org/agenda/2017/06/googles-eric-schmidt-on-the-decis...
हे सर्विस कंपन्यात नसेल.

त्यात तो खाली म्हणतोय की युट्यूबचं अ‍ॅक्व्हीझिशन डिसिजन १० दिवसात झालेला.

ह्या कंपन्या नोन आहेत अमित ह्या गोष्टींकरता म्हणजे परत कलचरचा मुद्दा आलाच. सर्विस कंपन्यांमध्ये त्यांचं प्रॉडक्ट स्ट्रेट टु मार्केट जात नाही त्यामुळे आपल्याला बाहेरुन तसं वाटू शकतं पण मला वाटतं ब्रिन किंवा मस्क सारखे लोकं जर सर्विस कंपनीत असते तर त्यांनी तिथे सुद्धा अत्यंत फास्ट निर्णय घेतले असते. It's more about leadership style that permeates all over aka culture.

सर्विस मध्ये पायात पाय अडकल्याने मस्क का सर्जी कोणी असते तरी फार काही करता आले नसते मला वाटतं. कष्टंबर गोंधळ्यामामा असला तर जेफ बेझोनी किती का फास्ट डिसिजन घेईना काय फायदा?
सर्विसचा अनुभव नाही, फक्त असं होत असावं वाटलं.

>>राज या वेगाने बहुतेक तुम्ही दोन्ही कंपन्यातल्या बहुसंख्य कर्मचार्‍यांच्या हाताला अन पायाला ५-५ बोटंच आहेत ना का एकाला ६ एकाला ४ आहेत असे विचाराल बहुतेक<<
अरे मग करणार काय, नाईलाज आहे. तुम्हि लोकं छातीठोकुन सांगताय - दिज टु आर एंटायरली डिफरंट ॲनिमल्स... Proud

सर्विस मध्ये पायात पाय अडकल्याने >>>>> म्हणजे काय? Lol
सर्विस कंपनी असली म्हणजे इंटर्नली सुद्धा पायात पाय असतात असं थोडीच आहे? एक्सटर्नली म्हणजे क्लायंट वर डिपेंडन्सी असते ते बरोबर आहे पण क्लायंट घोळ घालत असतील तर त्यांची चूक नाही.
प्रश्न ते स्वतः प्रोजेक्ट्स कसे एग्जिक्युट करतात हा आहे. Are their processes and resources flexible? Do they proactively provide new solutions to clients?
क्लायंट्स च्या पायात पाय असणे is a part of their business. How efficiently they manage that and keep growing is what makes a company different.
I work with a couple of them on a regular basis. The difference in the way they handle their projects is very remarkable sometimes. Leadership and culture matters a lot.

नाही नाही. इंटर्नल राजकारण आणि येस मॅनला दूर ठेवणे, क्लिअर जवाबदार्या असणे याच्याशी काही सर्विस का product संबंध नाही.
top पर्सन असही डे टू डे इनोव्हेशन करत नसतो तर टीम बिल्ड करतो सो वरच्या अजयच्या प्रतिक्रियेशी सहमत आहेच.

@राज, तुमचे मुद्दे फारच सरसकटीकरण करणारे आहेत. सोल्युशन हि खूप generic term झाली. सगळ्या कंपन्या सोल्युशनच तर देत आहेत. त्यामुळे "सोलुशन कंपनी होण्याकडे वाटचाल" हे लक्षात आले नाही. याचे एखादे स्पेसिफिक उदाहरण देता येईल का? आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता आहात त्यानुसार इन्फोसिस आणि गुगलच काय तर बजाज अॅटो आणि गुगल सुद्धा सारख्याच आहेत म्हणावे लागेल. दोन्हीकडे पिएमबॉक फॉलो करतात, पीम टुलच वापरतात, सेटिंग्/मॅनेजिंग एक्स्पेक्टेशन्स करतात वगैरे. सर्व सहमत. पण म्हणून दोन्हीकडे वर्ककल्चर तेच असेल का? एकीकडचा मॅनेजर दुसरीकडे बसवला तर चालेल का? हार्डकोअर टेक्निकल टीमला नॉन टेक्निकल मॅनेजर देऊन चालत नाहीत हा पायंडा बिल गेट्सने पाडला आणि इतर अनेक प्रोडक्ट कंपन्यांनी त्याचे अनुकरण केले. त्याला काहीतरी कारण असेल ना?

मी चीनला गेलो नाही जपानलाही गेलो नाही. पण दोन्हीकडे माणसेच आहेत, खाण्यापिण्याच्या पद्धती तशाच आहेत, दिसायला सुद्धा जवळपास तसेच आहेत. म्हणून त्यांची विचारसरणी, संस्कृती एकच असणार असे म्हटले तर ते चूक ठरेल. प्रत्यक्ष तिथे जाऊन अनुभव घेल्याशिवाय ते कळणे कठीण आहे.

>>त्यामुळे "सोलुशन कंपनी होण्याकडे वाटचाल" हे लक्षात आले नाही. याचे एखादे स्पेसिफिक उदाहरण देता येईल का? <<

या सगळ्या प्रॉड्क्ट्/सर्विसेस देणार्‍या कंपन्यांची स्वतःची अशी पार्टनर/इकोसिस्टम असते; आपल्याकडे नसलेल्या केपबिलिटीची गॅप भरुन काढण्यासाठी आणि असलेलं स्किल ऑगमेंट करण्यासाठी. प्रोजेक्टस साठी कंपॅटिटिव बिड करताना एक कॉमन प्रपोजल (वन स्टॉप सोलुशन) दिलं जातं. या अलायंस मुळे प्रोजेक्ट मिळायला हातभार लागतो पण बर्‍याचदा त्याचा मार्जिन्स वर इफेक्ट होतो. भविष्यात हे नुकसान टाळ्ण्याकरता प्रॉ/स कंपन्या पार्टनर्स कंपन्या अ‍ॅक्वायर करतात.. कंप्लिट सोलुशन कंपनी होण्याकडे वाटचाल सुरु करतात...

आता सोलुशन म्हणजे काय?
तर सोलुशन = सॉफ्टवेर + सर्विसेस (+ हार्डवेर). यात आयबीएम, ओरॅकल, एसएपी सारख्या कंपन्या तिन्ही काँपोनंट्स बनवतात्/विकतात.
अ‍ॅक्सेंचर, डिलॉयट यांसारख्या कंपन्यांचं जवळजवळ सगळ्या वर्टिकल्स साठी आउट ऑफ द बॉक्स सोलुशन (सॉफ्टवेर्+सर्विसेस) आहे. काहि त्यांनी इंटरनली डेवलप केलेलं आहे तर काहि अ‍ॅक्विझिशन थ्रु. वन स्टॉप सोलुशन दिल्याने कंपन्यांचा कंपॅटिटिव अ‍ॅडवांटेज वाढतो आणि क्लायंट्सचा भरोसाहि...

सोलुशन हि टर्म आता समजली असेल अशी आशा करतो...

>>पण म्हणून दोन्हीकडे वर्ककल्चर तेच असेल का?<<

atuldpatil - तुम्ही परत एकदा स्किल्स आणि कल्चर मध्ये गोंधळ घालताय. ऑटो किंवा इवन कंस्ट्रक्शन कंपनीतला पिएम हि आवश्यक ते ट्रेनिंग (एस्डिएल्सी) दिल्यावर सॉफ्टवेर प्रोजेक्ट मॅनेज करु शकतो. आणि प्रॉ/स कंपन्यांच फाउंडेशनच कंप्युटर टेक्नॉलॉजी (सॉफ्टवेर एंजिनियरिंग) असल्याने ट्रांझिशन सीमलेस होतं; काहिहि फरक पडत नाहि असं माझं निरिक्षण आहे...

खूप छान चर्चा सुरु आहे, आणि त्यामुळे माहिती मधे भर ही पडत आहे..
मला एका गोष्टीच आश्चर्य वाटतय.. आता सुद्धा ही मंडळी CEO ची निवड करताना बाहेरच्या लोकांना consider करत आहेत. इतर कंपन्या प्रमाणे ईन्फी मध्येच कोणी नाहीत का जे त्याच कल्चर मघे वाढले आहेत आणि CEO म्हणून काम करू शकतात.

राज चांगली माहिती देत आहेत. पण त्यांनी देवनागरी लिपीमधे लिहीलेले english शब्द वाचताना माझी फारचं तारांबळ उडते. त्यांची posts वाचताना मला नेहमी प्रश्न पडतो की ते कठिण आणि मोठाले english शब्द देवनागरी लिपीमधे का type करतात? तुमचे विचार जर तुम्हाला english भाषेतच नीट मांडता येत असतील, मराठीत मांडणं तितकसं सोयीचं वाटतं नसेल तर सरळ english मधेच का type करत नाही?

<<< ईन्फी मध्येच कोणी नाहीत का जे त्याच कल्चर मघे वाढले आहेत आणि CEO म्हणून काम करू शकतात.>>>>
निलेकनि ५ वर्षे सी इ ओ होते. नि आता सिक्काने राजिनामा दिल्यावर दुसरा सी इ ओ सापडेपर्यंत, परत सध्या त्यांनाच नेमले आहे.
पहा - https://www.yahoo.com/finance/video/infosys-founders-stage-dramatic-coup...

@राज: "सोल्युशन" म्हणजे काय अभिप्रेत आहे ते तपशिलात स्पष्ट केलेत त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही मिक्स मोड (स/प्रो) किंवा ठराविक सेगमेंट/क्लायंट साठी ज्यांचे प्रोडक्ट्स (आणि संबंधित सर्विसेस) आहेत (जसे कि ओईल, बँकिंग इत्यादी) त्या कंपन्यांविषयी बोलत आहात कि ज्यांचा मुख्य भर सर्विस वर आहे (तुम्ही ओरॅकलचा या यादीत समावेश केलाय पण ती कोअर प्रोडक्ट कंपनी आहे. अर्थात, आयबीएम प्रमाणे त्यांची सर्विस डिव्हिजन वेगळी असेल तर माहिती नाही. माझ्या माहितीत तर नाही). अशा कंपन्यांचे इतक्या वर्षांनी सोल्युशन कंपनीत परिवर्तन होणे हे स्वाभाविक आहे.

>> परत एकदा स्किल्स आणि कल्चर मध्ये गोंधळ घालताय. ऑटो किंवा इवन कंस्ट्रक्शन कंपनीतला पिएम हि आवश्यक ते ट्रेनिंग (एस्डिएल्सी) दिल्यावर सॉफ्टवेर प्रोजेक्ट मॅनेज करु शकतो.
हे तुमचे विधान सर्विस कंपनीसाठी (ते हि सध्या फार कमी प्रमाणात) लागू आहे. इथेच तर माझा मुद्दा आहे. आणि त्याबद्दल माझा तसूभरही गोंधळ वगैरे नाही. अशा प्रकारचे मॅनेजर सर्विस कंपनीत पूर्वी (जेंव्हा सोफ्टवेअर स्कीलमधल्या अनुभवी रिसोर्सेसची खूप वानवा होती) चालत होते. अजूनही काही ठिकाणी चालतात. पण आजकाल बहुतांश कंपन्या (सर्विस सुद्धा) सोफ्टवेअर पार्श्वभूमीच्या मॅनेजरनाच प्राधान्य देतात. गुगल मायक्रोसॉफ्ट सारख्या कोअर प्रोडक्ट कंपन्यांमध्ये मध्ये तर कधीही सोफ्टवेअर प्रोजेक्ट साठी नॉन-सोफ्टवेअर किंवा नॉन-टेक्निकल मॅनेजर चालत नव्हते/नाहीत. जर चुकून एखादी अपवादात्मक केस असेल तर भाग वेगळा. तुम्ही प्रत्यक्ष या कंपन्यांमध्ये काम केले असेल तर (कोअर स्कील असणाऱ्या टीम्स आणि कामाच्या स्वरूपामुळे त्या कंपनीतले) वर्ककल्चर कसे वेगळे असते व मी काय म्हणतोय ते लक्षात येईल. (मी गुगल मायक्रोसॉफ्ट हि उदाहरणे वारंवार दिली आहेत कारण बहुसंख्य वाचकांना या कंपन्या माहित आहेत. अन्यथा अशा इतर खूप कंपन्या आहेत). असो. अजून या संदर्भातील चर्चेत भर घालण्यासारखे माझ्याकडे काही नाही.

>>मराठीत मांडणं तितकसं सोयीचं वाटतं नसेल तर सरळ english मधेच का type करत नाही?<<

आळस, हो आळस. माबोवरचा वावर आय्पॅड्/आय्फोन वरुन अस्ल्याने देवनागरी किबोर्ड वापरतो. आणि क्वचीतच लॅप्टॉप वर असल्यामुळे इंग्लिश्/मराठी टॉगल करण्याचा प्रचंड आळस...

छाने चर्चा
प्रॉडक्ट आणि सर्व्हिस च्या आमच्या कम्पन्यांच्या अनुभवात तरी फरक भरपूर आहे.(बाकी वर विचारलेल्या हाय फाय प्रशनांची उत्तरं देण्याइतका आय क्यु नाही Happy )
आमच्या (कंपनीच्या) मालकीची एक प्रॉडक्ट कंपनी आणि दुसरी 'स्वेट शॉप'/'कोडिन्ग फॅक्टरी'(ही मालकांनीच कागदावर दिलेली नावे) आहे.
प्रॉडक्ट कंपनी तून 'फॅक्टरी' मध्ये जायला पायघड्या आणि उलट्या बाजुने प्रॉडक्ट कंपनीत यायला प्रवेश बंद असा अलिखित नियम आहे.

मी_अनु - या दोन कंपन्या आहेत, की डिव्हिजन्स? प्रॉडक्ट कंपन्यांच्या सर्विस डिविजन्स असणे खूप कॉमन आहे, आणि तो वन वे स्ट्रीटही.

Pages