खोटा 'सिक्का'?

Submitted by यक्ष on 18 August, 2017 - 23:34

आज वास्साप वर एक मेसेज आला 'खराब मिस्त्री' व 'खोटा सिक्का' बद्दल.! मेसेज तेवढा महत्वाचा नाही पण ते विचारांचे मोहोळ हुलवून जातात. तात्पुरती 'अनावस्था' वा 'अनागोंदी' माजवून जातात! एक सामान्य व्यक्ती व गुंतवणूकदार म्हणून मला बरेच प्रश्न पडतात..

भारतीय कंपन्या सुमारे २००० पासून 'संक्रमणावस्थेत' आहेत. बरेच प्रयोग झालेत, चालू आहेत, अविरत होतील.
व्यवस्थापन बदल हेही काही कंपन्यांच्या बाबतीत महत्त्वाचे बदल. पण ह्या प्रयोगाच्या बाबतीत भारतीय कंपन्या ह्या विदेशी कंपन्यांच्या (गूगल, आय. बी. एम. वगैरे) तुलनेत मागे पडतायत का?

एवढ्या मोठ्ठ्या कंपन्यांचे मालक नवीन प्रशासन आणतांन्ना नवीन नेत्रुत्वाला त्यांच्याच तालावर चालण्याचा अट्टाहास करतायत आणी त्यामुळे अशा घटना घडतायत की नवीन नेत्रुत्व अपेक्षांना कमी पडतेय की व्यक्तिंची निवड चुकीची ठरतीय हा सगळा संभ्रमच आहे. बरे ह्यात नुकसान सगळ्यांचेच. कुणाचाच फायदा नाही असे वाटते.

ह्यात बर्याच वेळेस नवीन नेत्रुत्व 'जुन्या' विचारांन्ना, परंपरांन्ना, पद्ध्तींन्ना विरोध करणे म्हणजे एक 'क्रांती' घडवतोय अशा भावनेने बहकून जातात व 'व्यक्तिसापेक्ष' विरोध जाणुनबुजून करतात की ज्यामुळे त्यांन्ना 'वाहवा' मिळावी व एक 'मोठेपण' एक 'वलय' प्राप्त व्हावे असे वागतात असे प्रकर्षाने वाटते. कदाचीत हा विरोध बरोबरही असू शकतो कारण विरोधाशिवाय बदल होणे अवघड.

की अश्या नव्या नेत्रुत्वांमुळे आपले महत्त्व कमी होते ह्या जाणिवेने जुने नेत्रुत्व आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी असे पाउल उचलतात?
प्रश्नांची उत्तरे मिळणे तसे अवघडच कारण कुठल्याही कंपन्यांचे 'सत्य' त्यांच्या 'बँलन्स शीट' प्रमणेच एक गौडबंगालच राहील आणी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तींन्ना कधीच कळणार नाही!

ह्या 'जुन्या' - 'नव्या' चा संघर्ष असाच अखंड, अव्याहत चालू राहील. नाही कां?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चर्चा करता येईलच, पण सुरवातीलाच सिक्का यांना तुम्ही लावलेलं विशेषण खटकतंय.. ते बदलता येईल का ?

क्षमा करा. मी ते विशेषण लावलं नाहीय. तसे व्हाट्सअँप वर आलेय जे की मलाही खटकलेय. मलाही ते पटलेले नाहीय.
आपल्याकडे आजकाल तशी प्रथा रुढ होत चाललीय कुणालाही एकदम गुन्हेगार ठरवण्याची जी की भयंकर आहे.

ह्या 'जुन्या' - 'नव्या' चा संघर्ष असाच अखंड, अव्याहत चालू राहील. नाही कां? >>>>
जुन्या पिढीकडून नव्याकडे जबाबदार्यांचं हस्तांतरण होत असताना हा जो नव्या-जुन्या चा संघर्ष होत असतो, तो माझ्या मते अटळ किंवा सहजपणे न टाळता येणारा आहे. बदललेले संदर्भ, जुन्या नव्यांमधील जनरेशन गैप आणि त्यामुळे बदललेल्या भिन्न विचारपद्धति हे घटक कारण असावेत.
हा संघर्ष फक्त कॉर्पोरेट क्षेत्रापुरता मर्यादित दिसत नाही. घर, कुटूंब, राजकारण, शिक्षणक्षेत्र सगळीकडेच दिसत असतो.
ज्यांनी सुरूवातीला उद्योग-व्यवसाय उभारला, घडवला त्यांची हुकमत गाजविण्याची मानसिकता तयार झालेली असते आणि जबाबदार्या आपल्या उत्तराधिकार्यांकडे हस्तांतरित करत असताना त्यांच्या काही किमान अपेक्षा असतात आणि वादाची ठिणगी यामुळेच पडते.

धन्यवाद!

छान लेख वाचण्यात आला. पण जसे 'खोटा सिक्का' म्हणणे चुकिचे तसेच मुर्तींन्ना एकदम आरोपिच्या पिंजर्‍यात बसवणेही पूर्णपणे पटले नाही. कारण शेवटी काही काळ गेल्यानंतरच थोडेफार उमजेल कोण सही आणी कोण गलत ते. सगळेच 'रांगडे' आणी उधळपट्टी करणारे यशस्वी ठरतील असे म्हणणे धार्ष्ट्याचे ठरेल. जर पुढे कंपनीची प्रगती खालावली असती तरी मूळ मालकच चूक असा प्रवाद झाला असता.

'प्रगतीसाठी मूर्तिभंजनास पर्याय नाही हे वाक्य जापनीज, फोर्ड वगैरे सारख्या कंपन्याच्या दृष्टि़कोणातून चुकिचे वाटते; नाही कां?.

शेवटी कालाय तस्मै नमः

NRN चा नेमका रोल स्पष्ट होत नाही.. प्रत्येकाची कार्य पद्धती वेगळी असु शकते आणि त्या पदावरच्या व्यक्तीला स्वातंत्र्य हे हवेच, सिक्का यांनी बरेच बदल घडवून आणले ज्यांचे परिणाम दिसून येत होते. जर कोणी पगार जास्त घेतला तर तो तेवढा मागण्याची आणि त्याला साजेसे काम करायची धमक ही असावीच लागते, अफरातफर करून पैसे न मिळवता जर पगार वाढ्वून मिळवले तर काय चुकलं? NRN यांचा विरोध याच साठी वाटला.... बाकी मुद्दे ही आडून पाडून हाच संशय व्यक्त करतात...

>> ‘मूर्ती’पूजा आणि ‘मूर्ती’भंजन, आजच्या लोकसत्ता मधील संपादकीय... जरूर वाचा

अग्रलेख एकांगी म्हणून न पटणारा आहे. सिक्का आधी प्रोडक्ट कंपनीत होते. इन्फी सर्विस कंपनी आहे. प्रोडक्ट कंपनी आणि सर्विस कंपनी यांच्या कार्यपद्धती आणि कार्यसंस्कृती मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अर्थातच इन्फोसिसने प्रोडक्ट कंपनी सारखे काम करावे अशा पद्धतीने सिक्का ती चालवायचा प्रयत्न करत होते. अग्रलेखात जे लिहिले आहे "कार्यपद्धतीत बदल झेपला नाही" वगैरे ते फारच अपरिपक्व विश्लेषण झाले. व्हाल्वोचा ड्रायवर एसटी चालवायला बसला आणि व्होल्वोच्या पद्धतीने चालवूपाहत असेल तर शेजारी बसलेल्या जुन्या म्हाताऱ्या एसटी ड्रायव्हरला त्याचे ड्रायविंग रुचणार नाहीच. एसटी हि एसटी आहे ती एसटीसारखीच चालवायला हवी. याशिवाय, एका कंपनीच्या अधिग्रहण व्यवहारात सुद्धा सिक्का यांनी पारदर्शकता ठेवली नसल्याचा गंभीर आरोप आहे. सध्या आयटी कंपन्यांवर मंदीची संक्रांत आहे. अशा वेळी नारायण मूर्ती कर्मचाऱ्यांची पगारवाढ न रोखता संचालक मंडळ आणि उच्चश्रेणीतील अधिकारी यांची पगारवाढ रोखत. पण सिक्का यांनी तसे न करता संचालक मंडळाला भरपूर फायदे करून देऊन त्यांना खुश ठेवले व त्यामुळे कर्मचाऱ्याना ते पगारवाढ देऊ शकले नाहीत असाही एक आरोप त्यांच्यावर आहे. एकंदर त्यांच्या कार्यपद्धती बाबत (जरी ती वेगळी असली तरी) ते मूर्ती यांना समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. याचे पर्यवसान राजीनाम्यात झाले. हे जसे सिक्का यांचे अपयश तसे ते मूर्ती यांचेसुद्धा अपयश आहे. (Disclaimer: हि सारी मते प्रतिक्रिया लेखकाच्या स्वत:च्या विश्लेषणावर आधारित असून सदर लेखक कोणत्याही प्रकारे इन्फोसिस, मूर्ती अथवा सिक्का यांच्याशी संबंधित नाही Happy )

>>प्रोडक्ट कंपनी आणि सर्विस कंपनी यांच्या कार्यपद्धती आणि कार्यसंस्कृती मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अर्थातच इन्फोसिसने प्रोडक्ट कंपनी सारखे काम करावे अशा पद्धतीने सिक्का ती चालवायचा प्रयत्न करत होते. <<
फरक अजिबत नाहि, दोन्हि युनिट्स एक्मेकांना कॉम्प्लिमेंट करतात. आणि सध्यातर कोणी स्वतःला प्रॉड्क्ट कंपनी, सर्विस कंपनी वगैरे असं डिस्टिंग्विश करुन घेत नाहि. दे आर कंसिडर्ड अ‍ॅज सोलुशन कंपनीज, उदा. आयबीएम, ओरॅकल, एसएपी, डिलॉयट, अ‍ॅक्सेंचर इ...

सिक्का आणि मूर्ति आपापल्या बाजुने चुक आणि बरोबर आहेत. सिक्काला एसएपी मधुन आणला ते इन्फिचं ट्रांस्फॉर्मेशन करायला. तीन वर्षांत बदल दिसुन येणं आवश्यक होतं; मूर्तिंना अपेक्षित बदल दिसला नसेल आणि सिक्काचा पगार, पर्फॉर्मंस मध्ये मेळ न दिसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करणं साहजिक आहे. काहि सीइओज (मार्क हर्ड) कंपनी ट्रांस्फॉर्मेशन मध्ये एक्स्पर्ट अस्तात, इन्फीला त्यातल्या एकाची गरज आहे. इट सीम्स, सिक्का इज नॉट कट आउट फॉर दॅट रोल...

सिक्का आधी प्रोडक्ट कंपनीत होते. इन्फी सर्विस कंपनी आहे. प्रोडक्ट कंपनी आणि सर्विस कंपनी यांच्या कार्यपद्धती आणि कार्यसंस्कृती मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. >>

मला इन्फी च्या घटनेतील डीटेल्स बद्दल काहीच माहिती नाही. अजून वाचलेले नाही. पण ही एक गोष्ट अगदी सहज पटण्यासारखी आहे. खूप प्रचंड फरक असतो, कामाच्या पद्धतीत, एम्प्लॉयी डेव्हलपमेण्ट मधे व इतर हजार बाबतीत. सिक्का यांना हे माहीत नसेल असे नाही, पण एका कंपनीत व एका पद्धतीच्या कामात यशस्वी झालेला दुसर्‍या पूर्ण वेगळ्या कामात तितकाच यशस्वी झाला असे फार क्वचित होते. त्यात निदान ते एसएपी ची सर्विसेस डिविजन चालवत असते, तर जरा तरी चान्सेस होते. पण प्रॉडक्ट्/सीटीओ माणूस सर्विस कंपनीत गेला हेच आधी आश्चर्य होते.

लोकसत्ताच्या अग्रलेखाचा वर उल्लेख आला आहे. तद्दन भिकार अग्रलेख आहे तो. मूर्तींसारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिविषयी अनेक आक्षेपार्ह शब्दांची उधळण केली आहे. प्रत्यक्षात कुठलेही तांत्रिक तपशील न देता उगाच उपमा अलंकाराच्या भाषेत पूर्ण लेख गोलमाल वाटावा असा लिहिलाय. इन्फोसिसची समस्या जाणून घेण्यास उत्सुक असणार्‍यांच्या तर काडीच्याही उपयोगाचा हा अग्रलेख नाही.

Infy che share prices vadhale na! Sikka chya karykalat. What seems to be the problem? Ego battle!

अग्रलेख जहाल असला तरी पूर्ण चुकीचा आहे असे म्हणवत नाही. फार काही बोलू शकणार नाही. सिक्कांनी उत्तम काम केले हे शेअर प्राइसेस व गेल्या ३-४ तिमाह्यातल्या रिझल्ट्सवरून दिसते आहे. विप्रो, टीसीएस, एचसीएल व अगदी कॉग्निझंट यांच्या तुलतेन इन्फोसिसचे ऑटोमेशन, ए/आय क्शेत्रातले प्रोडक्ट्स पुढे आहेत, या नवीन क्षेत्रात केलेली प्रगतीदेखील सिक्कांच्या विजन मुळे आहे

>> फरक अजिबत नाहि, दोन्हि युनिट्स एक्मेकांना कॉम्प्लिमेंट करतात.
जास्तीकरून कंपन्यामध्ये दोन्हीही युनिट नसतात. आणि असतीलच (उदाहरणार्थ आयबीएम) तर त्यांच्यात मी सांगितलेला फरक असतोच. इन्फोसिसचे banking प्रोडक्ट आहे. पण म्हणून तिला प्रोडक्ट कंपनी म्हणता येत नाही. They are more focused and branded themselves as service company. ओरॅकल, एसएपी या प्रोडक्ट कंपन्या आहेत. डिलॉयट, अ‍ॅक्सेंचर सर्विस मध्ये आहेत. दोन्हीत वर्ककल्चर डिफरन्स असतो कारण दोन्हीमध्ये लागणारी कौशल्ये (core skills) पूर्णपणे वेगळी आहेत. प्रदीर्घ लिहिता येईल यावर पण नंतर केंव्हातरी.

@फारएण्ड : तंतोतंत सहमत.

सिक्कांनी इन्फि ला सर्विस कंपनी च्या टिपिकल मानसिकतेतून बाहेर येऊन वेगळा द्रुष्टिकोन कसा आणता येईल हे पाहिले. हे खरंच फार छान पद्ध्तीने घडवून आणले. इन्फि चे स्वतः चे वेगवेगळे प्रोडक्ट असावीत यासाठी प्रयत्न चालू केले. कर्मचार्यान्नां प्रोत्साहन मिळावे यासाठी देखील योजना आखल्या. हे सर्व कधीच sufficient आणि संपणारे नसते.. त्या सगळ्याचे फलित लगेच दिसून पास्/नापास हे ठरवता येत नसते, हा एक खूप long-term vision चा भाग असतो. तरीही कंपनी ट्रॅक वर आहे की नाही हे कंपनी च्या पर्फोर्मन्स वरून दिसतेच की.

थोडक्यात, People leave managers not company हे थोडं फार सिक्का यांना ही लागू होतय असं वाटलं .

सिक्का यांनी काम चांगले केले, शेअर होल्डर्स ना भरपूर रिटर्न्स दिले, असे असेल तर त्यांना सोडावे का लागले? मेजर शेअरहोल्डर्स नी होउ कसे दिले? इन्फी च्या बोर्डावर त्यांनी प्रेशर टाकले असेलच.

लोकसत्ताचा अग्रलेख अचाट आहे. मध्यमवर्गीयांबद्दल एक उगाच पिंक टाकायची जुनी सवय अजून तशीच आहे. बाकी इन्फीबद्दल एकतर त्यांना खूप जवळची अंतर्गत माहिती आहे ज्यावरून त्यांनी ते मुद्दे लिहीलेले आहेत, किंवा टोटल लखू रिसबुडगिरी आहे.

http://blogs.economictimes.indiatimes.com/et-commentary/mr-murthy-when-y...
हे एका जुन्या बोर्ड मेंबरने (व सध्या इन्फी बीपीओच्या बोर्डावर असलेल्या डायरेक्टरने) लिहिलेले खुले पत्र आहे. >>

लिंक शेअर केल्याबद्दल धन्यवाद....फारच मुद्देसुद आणि थेट लिहिलेय....
मी आधी लिहिल्याप्रमाणे, कित्येकांना अजुन NRN चा नेमका रोल स्पष्ट होत नाही, किती तो दुराग्रह!

केवळ मूर्ती चूक कि सिक्का हे पाहणे म्हणजे आधर्वट सत्य पाहणे असा मला वाटतं ... basically आता IT चे विश्वास पार बदलले आहे आणि त्यात रोज नवनवीन स्थितंतर होता आहेत ... म्हणून कोणीच ठामपणे सांगू शकतं नाही कि काय चालेल आणि काय नाही ...
हीच परिस्थिती बदलली तर हेच सिक्के चालतील आणि त्यांना कोणीही खरे खोटे म्हणू शकणार नाही ...

<<<तुमच्या मते काय फरक असतो तो जाणुन घ्यायला आवडेल. ..>>>

तेच तर त्यांनी लिहीले आहे.
दोन्हीत वर्ककल्चर डिफरन्स असतो कारण दोन्हीमध्ये लागणारी कौशल्ये (core skills) पूर्णपणे वेगळी आहेत.

आता प्रॉडक्ट कंपनीची कोअर स्किल्स काय नि सर्व्हिस कंपनीची कोअर स्किल्स काय हे स्पष्टपणे उलगडून सांगायला पाहिजे काय?
कठीण आहे.

>>दोन्हीत वर्ककल्चर डिफरन्स असतो कारण दोन्हीमध्ये लागणारी कौशल्ये (core skills) पूर्णपणे वेगळी आहेत. आता प्रॉडक्ट कंपनीची कोअर स्किल्स काय नि सर्व्हिस कंपनीची कोअर स्किल्स काय हे स्पष्टपणे उलगडून सांगायला पाहिजे काय?
कठीण आहे.<<

नन्द्या४३ - हो खरोखरच कठीण आहे; दोन्हि प्रकारच्या कंपन्यांमध्ये इतकी वर्षं, वेग्वेगळ्या लेवलवर काम करुनहि मला अजुन कुठली अशी "कोर स्किल्स" वेगळी आहेत याचा पत्ता लागलेला नाहि; उलट ओवर्लॅपिंग स्किल्स आढळलेली आहेत. तुम्ही वयाने मोठे आहात, अनुभवानेहि असाल या आशेवर स्पष्टपणे उलगडा करण्याची विनंती करतो...

आणि हो, नेहेमीप्रमाणे तुमचा प्रतिसाद दिशाहिन होउ नये म्हणुन एक गोष्ट क्लियर करतो. प्रॉडक्ट कंपन्या (टुल्स, अ‍ॅप्लिकेशन्स) आणि सर्विस कंपन्या (अ‍ॅप्लिकेशन्स, कंसल्टिंग) यांचं ऑपरेटिंग मॉडेल, मार्केट बेस/पेनिट्रेशन, टेक्नॉलॉजी फुट्प्रिंट/लँड्स्केप याचा कंपनी कल्चरशी संबंध नाहि. एखाद्या स्टार्टपचं क्लचरहि "बनिया" असु शकतं आणि बिलियन डॉलर कंपनीचं "आंत्रप्रुनेरियल"...

<<<प्रॉडक्ट कंपन्या (टुल्स, अ‍ॅप्लिकेशन्स) आणि सर्विस कंपन्या (अ‍ॅप्लिकेशन्स, कंसल्टिंग) यांचं ऑपरेटिंग मॉडेल, मार्केट बेस/पेनिट्रेशन, टेक्नॉलॉजी फुट्प्रिंट/लँड्स्केप याचा कंपनी कल्चरशी संबंध नाहि. एखाद्या स्टार्टपचं क्लचरहि "बनिया" असु शकतं आणि बिलियन डॉलर कंपनीचं "आंत्रप्रुनेरियल"...>>>
बरोबर आहे.

<<<तुम्ही वयाने मोठे आहात, अनुभवानेहि असाल या आशेवर स्पष्टपणे उलगडा करण्याची विनंती करतो...>>>
धन्यवाद. एकेकाळी मी नोकरी करत होतो हेहि मी पूर्णपणे विसरलो आहे. आमच्या वेळी बझ वर्ड्स वेगळे होते.

आमच्या कंपनीचे कल्चर म्हणजे जिथे बॉडी पाहिजे तिथे तू. जमवून घेतलेस तर रहा नाहीतर जा दुसरीकडे कुठेतरी.

अश्यातून जगलो वाचलो, काय त्यांना माझ्यात कोअर स्किल्स दिसली देव जाणे, १६ वर्षे धम्माल.

>> तुमच्या मते काय फरक असतो तो जाणुन घ्यायला आवडेल.

प्रोडक्ट कंपनीत जास्तीकरून तांत्रिक कौशल्य (core technical skills) आणि सर्विस कंपन्यांमध्ये जास्तीकरून अतांत्रिक कौशल्य (soft skills) ची जास्त आवश्यकता असते असा माझा अनुभव आहे.

सर्विस कंपन्यांकडे बऱ्याच प्रमाणात मेंटेनन्सचे प्रोजेक्ट्स असतात. तिथे क्लायंटशी कम्युनिकेशन करणे, प्रेझेन्टेशन, त्याला इम्प्रेस करणे, नॉलेज ट्रान्स्फर करून घेणे या सगळ्या गोष्टीना जास्त महत्व असते. कामाच्या बाबतीत अनेकदा फार खोलातले तांत्रिक ज्ञान लागत नाही. क्लायंटला अनेकदा अचानक एखादा महत्वाचा फेरफार लगेचच करून हवा असतो. तेंव्हा हातातले काम सोडून पटकन ते करून द्यावे लागते. हे सुद्धा एक स्कीलच आहे. नवीन प्रोजेक्ट नवीन ठिकाण नवीन क्लायंट नवीन टीम. म्हणजे अॅडॉप्टीबीलीटीचा कस लागतो. याव्यतिरिक्त ऑफिसला ड्रेस कोड मध्ये येणे, रोजचीरोज टाईमशीट भरणे (कारण त्यावर क्लायंटला बिलिंग लावले जाते), ट्रेनिंगज अटेंड करणे, आपला ले ऑफ होऊ नये म्हणून सतत बिलेबल प्रोजेक्ट वर राहू याची काळजी घेणे इत्यादी गोष्टीना सर्विस कंपन्यांमध्ये खूप महत्व असते. सकाळी नऊला येणे आणि संध्याकाळी सहाला घरी जाणे असा (जनरली) नित्यक्रम असतो.

याउलट प्रोडक्ट कंपनीत. निवड होतानाच तांत्रिक कौशल्य तपासणारे कमीत कमी तीन ते चार इंटरव्ह्यूज होतात. ज्याला फार इम्प्रेसिव्ह बोलता येत नाही पण अचाट तांत्रिक ज्ञान व कौशल्य आहे अशी व्यक्ती सुद्धा मोठ्या पदावर असते. (माझ्या म्हणण्याचा उद्देश, प्रोडक्ट कंपनीत तांत्रिक कौशल्याला जास्त महत्व). कोणत्या क्लायंटला इम्प्रेस वगैरे करायचे नसल्याने ड्रेस कोड महत्वाचा नसतो (अनेक प्रोडक्ट कंपन्यांत बर्म्युडा घालून ऑफिसला यायला सुद्धा परवानगी आहे). प्रोडक्ट कंपनीतले आयुष्य डिजाईन अप्रोच, प्रोडक्ट परफोर्मन्स, कोड रिव्ह्यूज, रिलायेबिलीटी, पेटंटेबल टेक्नोलॉजी इत्यादी गोष्टींभोवती फिरत राहते. कधी आला आणि कधी गेला याची टाईमशिट भरण्यापेक्षा प्रोडक्ट मध्ये "व्ह्याल्यू अॅडीशन" किती केले याला महत्व राहते.

या सर्व गोष्टींचा अर्थातच वर्ककल्चर वर परिमाण होतोच. किंबहुना वर्ककल्चर असे असावे हे याच गोष्टी अप्रत्यक्षपणे ठरवतात. दोन्ही प्रकारच्या कंपनीमध्ये काम करण्याच्या माझ्या दीर्घ अनुभवात मला हा फरक प्रकर्षाने जाणवला.

>> वेग्वेगळ्या लेवलवर काम करुनहि मला अजुन कुठली अशी "कोर स्किल्स" वेगळी आहेत याचा पत्ता लागलेला नाहि; उलट ओवर्लॅपिंग स्किल्स आढळलेली आहेत.

मला हे डिटेल जाणून घ्यायला आवडेल.

>प्रोडक्ट कंपनी आणि सर्विस कंपनी यांच्या कार्यपद्धती आणि कार्यसंस्कृती मध्ये जमीन आसमानचा फरक आहे.
>प्रोडक्ट कंपनीत जास्तीकरून तांत्रिक कौशल्य (core technical skills) आणि सर्विस कंपन्यांमध्ये जास्तीकरून अतांत्रिक कौशल्य (soft skills) ची जास्त आवश्यकता असते असा माझा अनुभव आहे.

हे तुमच्या आमच्यासाठी ठीक असेल. किंवा छोट्या कंपनीतल्या CEO साठी असेल. पण ज्या पातळीवर Infosys सारख्या CEO ला काम करावे लागते त्या पातळीवर (मला वाटते) हे इथे रिलेवंट नाही. त्याचे मुख्य काम कंपनीत इतर लिडर्स कडून काम करून घेणे आणि त्याना तयार करणे.
मी एका Fortune 500 सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होतो त्याचा CEO पेप्सी मधून आला होता. त्याच कंपनीच्या एक यशस्वी CEO ला प्रॉडक्ट आणि सर्विस मधला फरक कितपत माहिती असेल यात शंका आहे. कारण तो पूर्वी फुटबॉलचा कोच होता आणि तरीही कंपनी चांगली चालवू शकला. विप्रो ही फार पूर्वी तेल , इतर गोष्टी विकणारी प्रॉडक्ट कंपनी होती ती सर्वीस कंपनी झाली. आयबीमचा लू गर्स्नर अमेरिकन एक्स्प्रेस या सर्विस कंपनीतून आयबीम सारख्या प्रॉडक्ट कंपनीत येउन कायापालट करू शकला.
इन्फोसीसला मुद्दामच सर्वीस कंपनीकडून प्रोडक्ट कंपनीकडे जायचे असल्यानेही मुद्दाम सिक्का यांना निवडले असेल.

>> हे तुमच्या आमच्यासाठी ठीक असेल. किंवा छोट्या कंपनीतल्या CEO साठी असेल. पण ज्या पातळीवर Infosys सारख्या CEO ला काम करावे लागते त्या पातळीवर (मला वाटते) हे इथे रिलेवंट नाही.

मायक्रोसॉफ्ट, गुगल, याहू, सिमॅंटेक, ओरॅकल आदी दिग्गज प्रोडक्ट कंपन्यांचे संस्थापक/CEO तांत्रिक कौशल्य असणारे होते (अथवा आहेत). सर्विस कंपन्यांच्या बाबत मात्र तसे नाही (जसे कि विप्रो कि जे मुळचे तेलाचे व्यायसायिक आहेत). माझा मुद्दा तोच आहे.

Pages