लागते ठेच छोट्याशा दगडांनीच मित्रा

Submitted by निखिल झिंगाडे on 17 August, 2017 - 01:36

नको मागु संकटात मदत कुणाचीच मित्रा
पुढे चाल ना तू ठाम पावलांनीच मित्रा

रक्तही थिजलेलेे चिघळलेल्या या जखमा
पहा कसा केला वार आप्तांनीच मित्रा

सुधार ना तू तुझ्या चुका या छोट्या छोट्या
लागते ठेच छोट्याशा दगडांनीच मित्रा

नजरेत स्वतःच्याच कायम रहा चांगला
चुका काढल्या देवांच्याही लोकांनीच मित्रा

नको जगुस आता कधीही मिठासारखे तू
वापरलय चवीपुरते तुला मित्रांनीच मित्रा

नको ढासळू देऊस तूच कधी स्वतःला
विटा ढासळलेल्या नेल्या सर्वांनीच मित्रा

Group content visibility: 
Use group defaults

फारच छान Happy

नजरेत स्वतःच्याच कायम रहा चांगला
चुका काढल्या देवांच्याही लोकांनीच मित्रा >>> मस्त

जरेत स्वतःच्याच कायम रहा चांगलाचुका काढल्या देवांच्याही लोकांनीच मित्रा >>>> खुप सुंदर निखिलजी छान

रक्तही थिजलेलेे चिघळलेल्या या जखमा
पहा कसा केला वार आप्तांनीच मित्रा

जरेत स्वतःच्याच कायम रहा चांगलाचुका काढल्या देवांच्याही लोकांनीच मित्रा >>>>

मस्त आवडले

शक्यतो कविता गझलांच्या वाटेला जाणं होत नाही. पण आत्ताच तुमची एक गझल सहजच वाचली ती आवडली म्हणून ही सुद्धा वाचली. ही पण आवडली.

पुलेशु Happy

Hi can you please tell me how to post here .I have account but I don't find the option to post