जागो मोहन प्यारे- झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 7 August, 2017 - 10:54

या चर्वितचर्वण करायला... Wink
साधक बाधक सगळ्या चर्चा इथे करू!

जागो मोहन प्यारे ही मालिका १४ ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार रात्री १०३०वा असेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार, योकु --- हे प्रतिक्रिया / सूचना यांचे संकलन झी मराठीचा खास उपक्रम आहे का मायबोलीच्या सहकार्याने?
कार्यक्रमाची लोकप्रियता / दर्जा / वाढणा-घटणारा टीपीआर इ ची कारणे समजून घेण्यासाठी?
नेहमी झी मराठीची मालिका आली की धागा येतो. बाकी वाहिन्यांसाठी त्यामानाने कमी दिसले.

नॉय. इथे सगळ्या सिरिअल्स चे अपडेट्स सिरिअल टिव्ही वर न पाहाता मिळतात... म्हणून धागा. बाकी वाहिन्यांचे काढता येतीलच की.

मला मोख्खन असे ऐकू येते.
एका गांजलेल्या नवर्‍याची (जो सासू आणि बायकोची सतत बोलणी खातो) त्याची तारणहार दिसतेय ही 'परी' (?)

हिंदी मालिकेची नक्कल आहे का. बघितल्यासारखी किंवा वाचल्यासारखी वाटतेय.>> इंग्रजी मालिका होत्या 2-3 याच theme वर.. I dream of Jeannie; Bewitched etc
Bewitched मध्ये बायकोच परी असते.. 'शरारत' नावाने हिंदी भ्रष्ट version सुद्धा येऊन गेलंय Bewitched चं..
जामोप्या ' आय ड्रीम ऑफ Jeannie' सारखी वाटतेय

परी ???
Witch असते ती>>
हां तेच.. witch ला मराठीत काय म्हणावं लक्षात आलं नाही..

ते मोहन मला "मोफत" असे ऐकु येते, किती ते लाडाने बोलायचे >>> अरे आमच्याकडे आम्हा सर्वांनाच ते मु$$$क्का........... मुक्का असे एकु येते

अरेच्चा मी ही अॅड ऐकलीय बहुतेक. मी मौका का काहीतरी ऐकलं होतं.
यात श्रुती मराठे अतुल परचुरेच्या मांडीवर बसून वारा घालते असं काही आहे का?? साबा वैतागलेल्या असतात ही अॅड बघून. Lol

यात श्रुती मराठे अतुल परचुरेच्या मांडीवर बसून वारा घालते असं काही आहे का?? >>> हो, मी पण अ‍ॅडच बघितलेय, खुप हसु येतं ते पाहुन

दक्षिणा.. Happy
मी तेच म्हणणार होते! किती ब्रॉड !!! चेहेरा गोड आहे पण बाकी अबब............................!!!

कैच्या काय आडवा बांधा आहे तिचा. >>>> राधा बावरी मध्ये बघितले होते तीला पहिल्यांदा तेव्हा मलाही हेच वाटले होते

अति बोअर आहे मालिका...... सगळेच फार लाऊड.
आणि ती जाडजूड श्रुती मराठे..... गुढघ्यांपर्यंतचे गच्च नऊवार नेसून फिरते...!! किती बेकार दिसतं.....शिवाय पाठ मोरे सीन्स ही घेतलेत............

कोणी मला ती श्रुती मराठे "मोहsssन" अशी हाक मारते त्याची रिंगटोन देऊ शकेल का प्लीज? एका मोहन नावाच्या परिचित व्यक्तीला हवी आहे. Happy

किती वाजता लागते ही सिरीयल...माझ्या २ वर्षाच्या मुलीला जाम आवडतेय ती परी...ती पण चुटकी वाजवून मोक्कन असंच म्हणते

रात्री १०: ३० वाजता लागते ही सिरीयल. श्रुतीचा चेहेरा गोड असल्याने तिला बाकी सारे मुआफ असावे. मोहनच्या सासुचे काम करणारी कोण आहे?

Pages