भाऊचे अफलातून परीक्षण "हरिभाऊ भेटला शीलाला"

Submitted by सखा on 6 August, 2017 - 08:20

मी: काय भाऊ सिनेमा पहिला म्हणे?
भाऊ: अज्जीबात बोलू नका तुम्ही
मी: का बरं?
भाऊ: लै राग यायलाय मला
मी: अरे सिनेमा पाहून राग?
भाऊ: हो
मी: का बरं?
भाऊ: अहो मला कळलाच नाही ना सिनेमा
मी: का?
भाऊ: लैच अवघड गणित
मी: असं? कुठला पहिला?
भाऊ: हरिभाऊ भेटला शीलाला
मी: अब्बा!
भाऊ: हौ
मी: काये स्टोरी?
भाऊ: एक बाई असते ती लाल पिवळे स्कर्ट घालून एकच शब्द म्हणते
मी: कुठला
भाऊ: रिंग
मी: आं?
भाऊ: हो.. कानात रिंग रिंग व्हायलंय माझ्या
मी: बरं अजून
भाऊ: हरिभाऊ आणि शिला नकाशा सांगल तसा रिंग रिंग करत युरोपात फिरतेत.
मी: सिनेमातून काही संदेश?
भाऊ: दोन संदेश येक यूरोपात गॅस नावाचा भारतीय सबसिडी चोट्टा हाये
मी: आणि दुसरा?
भाऊ: पंजाबी गायकाचा आवाज एव्हढा उंच पट्टीतील का?
मी: का?
भाऊ: कारण आपुन जसे तानपुरा लावून गाणे म्हणतो तसे पंजाबात बॅकग्राऊंडला ट्रेक्टॉर लावून गाणे म्हणतात.
मी: ट्रेक्टॉर?
भाऊ: येस ....
मी: बापरे हे तर फारच भारी झालं
भाऊ: तेच म्हणतो मी .. पहाडी आवाज पाहिजे असन तर ट्रेक्टॉर विकत घ्या!
मी: दिगदर्शकाला काही संदेश
भाऊ: एकतर ट्रेक्टॉरच नाव सांगा आन नसल जमत तर रिफन्ड दिल्यास उत्तम!
Jab-Harry-Met-Sejal2.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast