Submitted by फारएण्ड on 4 August, 2017 - 10:51
ऐलान-ए-जंग या अजरामर चित्रपटाबद्दल आपली मते येथे लिहा. हा रिव्यू क्राउडसोर्सिंग सारखा लिहू. म्हणजे सर्वांना त्यात लिहीता येइल. गेल्या २-३ दिवसांत इतर बाफ वर अनेकांनी तुकड्या तुकड्यांत या चित्रपटातील सीन्स बद्दल लिहीले आहे. त्यांनी ते इथे परत लिहा, आणि इतरांनाही त्यात भर घालता यावे म्हणून असा बाफ उघडत आहे.
इतर चित्रपटांबद्दल स्वतंत्र बाफ आहेत तेव्हा त्याबद्दल इथे लिहून हे डायल्यूट करू नका 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अशक्य दंगा चाल्लाय इथे! पायस
काला नाग, अर्जुन ठाकूर, देवळातला नाग, ती कॅसेट वगैरेंचे योग्य त्या जागी फोटो द्यायचेत की रे. रेफरन्स असला समोर की गोष्टी कशा सोप्या होतात.
पायस, अमेय, एक दिवस इथे आलो
पायस, अमेय, एक दिवस इथे आलो नाही तर तुम्ही दोन पाने पुढे गेलात! पण ते नंबर्स दिले आहे ते चांगले केलेत. Critique-friendly.
१६.१ >>> चंदनपूर चा एक नकाशा बनवायला हवा. कदाचित एक हत्ती व सात डोळे बांधलेले लोक कथेसारखा तो आपल्या प्रत्येकाला वेगळा दिसत असेल. कारण दर्याखोर्या आहेत, वाळवंटही आहे, मंदिर आहे, बार्सही आहेत. त्या काळी ते दुबई ई. ठिकाणी वाळवंटात ऑल टेरेन व्हेइकल्स च्या राइड्स असतात तसे काही असते तर पुनीत मंदिरापर्यंत लौकर पोहोचला असता.
१६.२ >>> यस. त्या ऑडिशन मधे जो सर्वात आचरटपणे रोल करेल त्याला सत्तार मेढा चा रोल, व दुसर्याला उत्तेजनार्थ बक्षिस म्हणून त्या अगम्य चौकीवर "क्षणकालचा ऑस्ट्रेलियन व अनंतकाळचा बॉलीवूड युरोपियन व्हिलन" बॉब क्रिस्टो बरोबर उभे राहायचे (व "बॉब सरांकडून मला खूप शिकायला मिळाले" छाप मुलाखतींची सोय) अशी ऑडिशनची जाहिरात होती
१६.३ >>> अरुण बक्षीला 'मेल्यावर सुद्धा ओठांवर देशभक्तीपर शब्द आहेत' असे सांगणारा हायकू सुचतो >>>
मग यमक न जुळणारी आणखी एक ओळ वाढवून त्याचे दोन शेर करण्याचा प्रयत्न संतापाचा कडेलोट करणारा ठरतो व तो त्याचा कोथळा बाहेर काढतो >>> हेच सिद्ध होते की काला नाग, देशभक्ती एकवेळ सहन करेल. त्याच्याशी गद्दारी एकवेळ सहन करेल. पण मुक्तछंदाचा त्याला तिटकारा आहे.
म्हणजे ५०० कोटी पर क्वार्टर >>> हो सेटवर त्यावेळेस "यांच्या राज्यात क्वार्टर्स लै महाग आहेत" अशी कुजबूज झाल्याचे ऐकिवात आहे. मग स.अ. ने काला नाग चा आविर्भाव एक मिनीट बाजूला ठेवून करूण नजरेने "त्या क्वार्टर्स वेगळ्या" असे त्या लोकांना समजावल्याचे 'मेकिंग ऑफ..." मधे दिसेल. 'चला हवा येउ द्या' मधे ऐलान-ए-जंगची टीम बोलावतील तेव्हा भाउ कदम ला हा क्वार्टर चा जोक करण्यासाठी मोकळा ठेवू असेही एकमत झाले.
तूर्तास पिक्चर बघताना मी
या गाडीवाल्या सीनला अन्नू
या गाडीवाल्या सीनला अन्नू कपूर काहीतरी बासरी वगैरे वाजवतो आहे.
>>
कारण मागे बासरीचे पहाडी धून मुजिक आहे. वरचा आमचा प्रतिसाद वाचा!
परत वाचून आले. धर्मेंद्रच्या
भयंकर लिहिता तुम्ही सगळे.
चला हवा येउ द्या' मधे ऐलान-ए
चला हवा येउ द्या' मधे ऐलान-ए-जंगची टीम बोलावतील >>
चला हवा येऊ द्या वाल्यांचा एक हुकमी जोक तर या सिनेमातूनच सुचला असणार. जेव्हा बॉब क्रिस्टो हँगओव्हर झाल्यासारखा चेहरा असलेल्या धर्मेंद्राला "अर्जुन टाकून?" असे विचारतो, बस चला हवा येऊ द्या वाले तिथेच सोल्ड!
२०) काला नाग मूळचा कोल्हापुरचा होता काय?
काला नाग ब्रेस्टफेड असल्याने 'माँ का दूध पिया हैं तो सामने आ' या आव्हानाला ओ देऊन तो हेलिकॉप्टरने आपल्या समोर येतो. मग दोन क्रीडाप्रेमींमधला संवाद आपल्याला ऐकायला मिळतो. आता या वयात क्रिकेट, गुली दंडा, फुटबॉल खेळू शकत नसल्याने त्याच्याकडे अर्जुन ठाकूर हा एकच खेळ शिल्लक असतो. यावर धरमपाजी त्याला आपण नेमके हेच खेळ खेळणार असल्याचे सांगतात. या खेळांमध्ये शारिरिक कष्ट बरेच असल्याने तहानही बरीच लागते. हा विचार करून स.अ. पाजींना त्यांची तहान त्यांच्या मित्रांच्या रक्ताने भागवणार असल्याचे सांगतो. इथे एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित झाला आहे. ८३ चा विश्वचषक जिंकेपर्यंत हॉकी हा आपला सर्वात महत्त्वाचा खेळ होता. पण ८९ सालामध्ये काला नागच्या खिजगणतीतही हॉकी नाही. इथे क्रिकेटची वाढती लोकप्रियता आणि हॉकीची झालेली घसरण अत्यंत हुशारीने विशद केली आहे.
असो, काला नागकडे हेलिकॉप्टर्स चिकार असल्याने तो धर्मूवर हेलिकॉप्टर्स सोडतो. इथे धरमपाजींच्या बझूकाच्या शक्तीचा अंदाज नसल्याने हा प्लॅन सपशेल फसतो आणि पाजी एअरगनने पाखरे मारावीत तशी हेलिकॉप्टर्स नष्ट करतात. आता स.अ.ची टरकते. त्याला नाईलाजाने जमिनीवर यावेच लागते पण तेवढ्यातही तो अंबूबाला संदेश देऊन सुटकेची तजवीज करून ठेवतो (लाईक अ जेनुईन टेस्ट प्लेआ,ही हॅज प्लॅन्ड हिज इनिंग्ज वेल. धिस इज नॉट सिंपल स्टुफ, धिस इज काला नाग स्टुफ). उतरताना लपवलेला मास्क बघून आपल्याला कळते की धूर सोडून बेशुद्ध करायची जुनी टेकनिक उपयोगात येणार आहे.
काहीशा ऑफबीट र्हिदममध्ये साताठ वाक्ये अशीच निसटतात. मग काला नाग ठकुरायन संबंधित धमकी देतो. याने उखडलेला धर्मेंद्र त्रिशूळाचा सोट्यासारखा वापर करून स.अ. ला जखमी करतो. इथे जयाप्रदा "और मार उसे" करून रेकते त्यामुळे ही फाईट इंटेन्स वाटते अन्यथा धर्मेंद्राच्या अॅक्शनमध्ये पिलो फाईटचाही जोर नाहीये. मग एकदाचे ते गॅस बॉम्ब फुटतात आणि हे सगळे बेशुद्ध होतात. इथे पाजी या ब्रिलियंट स्ट्रॅटेजीला मन भरून नाव ठेवतात - कायरता का सबूत म्हणे! आयला, म्हणजे याने फुकट मार खाणं अपेक्षित आहे काय? चित्रपटांमधला हा सर्वात मोठा अन्याय आहे - हिरोने काही चाल खेळली तर क्या जबरा पांसा फेंका है आणि व्हिलनने काही चाल खेळली तर कायरता का सबूत!
२१) दारा सिंगचे व्यर्थ बलिदान - फूड डिपार्टमेंटचा सुटकेचा निश्वास
धर्मेंद्राला विक्रम गोखलेने अटक केल्याची बातमी पेप्रात छापून येते. ते वाचून फायद्याची डील हातची गेलेल्या सीईओच्या थाटात ठकुरायन शेलक्या शब्दांत विक्रम गोखलेची निंदा करते. ती भीमा अर्थात दारा सिंगला अर्जुनची मदत करायला जायला सांगते. इथेही दारा सिंग एक लांबलचक डायलॉग मारतो ज्याचे सार "ओके" इतकेच असते. दारा सिंग स्वतःची पुतणी/भाची वाटत असलेल्या सुषमा सेठला जेव्हा माँ म्हणतो तेव्हा मात्र अनिल शर्माला डोळे(के) तपासून घ्यायची नितांत गरज आहे हे कन्फर्म होते. दारा सिंग स्पष्ट उच्चारांचा प्रवक्ता असल्याने आशीर्वाद मधली श ची वेलांटी दुसरी आहे हे तो उच्चार लांबवून सांगतो.
दारा सिंग जाताच अजित वच्छानी दारू पित येतो (आजपण चांदी का जूताचा प्रसाद मिळाला असेल काय?). हा दारू पित आलाय म्हणजे कोणीतरी मरणार हे फिक्स होते (आठवा शंकर ठाकूर). इथे फायनली त्याच्या बाटलीचा क्लोज अप आहे. अजित वच्छानी ब्लॅक लेबल पिताना दाखवला आहे थोडक्यात काला नागचे फ्रिंज बेनिफिट्स मजबूत आहेत. बॉलिवूड माँच्या परंपरेला जागून ठकुरायन 'मेरा बेटा' छाप धमक्या देते आणि त्याच्याही आधी भीमा तुला सोडणार नाही असे सांगते (आधी पकडू तर दे असा क्लासिक रिटॉर्ट करण्याची संधी वाया जाते. कमिशनर पण मरणार हे नक्की!). मग सुरेंद्र पाल तिला 'बुला लो अपने भीम और हनुमान को' म्हणतो - रेफरन्स मॅजिक अॅट इट्स बेस्ट. तिच्या बेंबीच्या देठापासून मारलेल्या हाका काही दारा सिंगला ऐकू जात नाहीत पण ज्याक्षणी सुरेंद्र पालची माणसे गोळीबार करतात त्याक्षणी तो मागे फिरतो. घोडा हे वाहन जीपपेक्षा अधिक वेगवान असल्याने काही क्षणातच तो सुरेंद्र पालला गाठतो. एक जीप नष्ट केल्यावर त्याला कोण अवदसा आठवते म्हणून तो फास फेकून जीपच्या स्टेपनीला अडकवतो आणि तिच्यामागे फरफटत जायला लागतो. या मूर्खपणावर एक एक्स्ट्रा क्लासिक हसताना दाखवला आहे.
जसा घोडा जीपपेक्षा वेगवान आहे, तसे दारा सिंगच्या पायाचा टॉर्कही जीपपेक्षा जास्त आहे. त्यामुळे तो एका दगडाला पाय रेटून जीप थांबवतो. सुरेंद्र पालला झुरळ झटकल्यासारखे बाजूला करून मग तो कमिशनरला बदडायला सुरुवात करतो. इतक्यात विकराल उर्फ देवकुमार एक तलवार घेऊन येतो. दारा सिंग व ठकुरायन जीपच्या मागे लपतात. आता नेमकी मशीनगन त्याने दूरवर फेकलेली असते. अशा वेळी दारा सिंगचा घोडा तिथे पोचतो. बॉलिवूडची जनावरे चतुर असलीच पाहिजे या नियमानुसार क्षणार्धात त्याला सगळी परिस्थिती कळून चुकते व तो टापेने मशीनगन दारा सिंगकडे फेकतो. मग दारा सिंग लगेच देवकुमार, कमिशनर आणि सुरेंद्र पाल वगळता सर्वांना ठार करतो. देवकुमार त्याच्या पाठीमागून येऊन तलवारीने त्याला जखमी करतो. मग दारा सिंग देवकुमारच्याच तलवारीने देवकुमारला भोसकतो. मग कमिशनर पाठीमागून गोळ्यांचा वर्षाव करतो (ज्यातल्या एक किंवा दोन दारा सिंगला लागतात). दारा सिंग त्याला तलवार फेकून मारतो. लहान मुले खरचटल्यावर जेवढी विव्हळतात, तेवढे विव्हळून कमिशनर मरतो. मग दारा सिंग ठकुरायनला घोड्यावर बसवून अस्तास जाणार्या सूर्याच्या दिशेने जातो तर मागून सुरेंद्र पाल त्यांना बघत आहे अशा फ्रेमवर सीन संपतो. इथे कमाल सिंबॉलिझम आहे.
अ) सूर्यासारखा दारा सिंग अस्तास जात आहे.
ब) सुरेंद्र पाल मेला नाही तसेच अजून वीस-पंचवीस सिनेमांचा सिनेमा बाकी आहे म्हणजे त्याच्या तावडीत ठकुरायन सापडणार. जसा सायंकालचा संधीप्रकाश तितकासा उपयोगाचा नसतो तसेच दारा सिंगचा पराक्रमही ठकुरायनला उपयोगी पडत नाही हेच इथे सूचित करण्यात आले आहे.
इकडे काला नाग आरशात आपल्या जखमा न्याहळत आहे. तो रागाच्या भरात आरसा फोडतो. क्लायमॅक्स आता जवळ आणि अटळ आहे.
सिनिक्स हिंदी सिनेमावर
सिनिक्स हिंदी सिनेमावर पाश्चिमात्य प्रभावांचा आरोप करतात पण या सिनेमात वरच्या मजल्यावरून खालच्याशी बोलावे अशा सहजतेने स.अ. हेलिकॅप्टरमधून आणि पाजी जमिनीवरून भांडतात ते पाहून पुढे हॅरी पॉटरमध्ये वापरल्या गेलेल्या 'सोनोरस' संकल्पनेचा उगम इथेच झाला असे सुचवावेसे वाटते.
तुम्ही दुष्मनाला मारण्याचा ऐलान ए जंग केलाय, समोर दुष्मन आहे, तुमच्या हाती सिंगल शॉट किल प्रोबॅबिलिटीवाली लॉन्चर आहे, तुम्ही काय कराल? दुष्मनाला सगळ्यात आधी माराल की चेल्या चमच्यांना ? दुष्मनाला?? श्या....मग तुम्ही धर्मेंद्र नाही
सगळेच
सगळेच
लय भारी जबरदस्त कमेंटस
लय भारी जबरदस्त कमेंटस
फा, हा धागा काढून आम्हा
फा, हा धागा काढून आम्हा सामान्य माबोकरांना धन्य केलयस! संस्थान आपलं आभारी आहे.
ब्रेस्टफेड असल्याने 'माँ का
ब्रेस्टफेड असल्याने 'माँ का दूध पिया हैं तो सामने आ' या आव्हानाला ओ देऊन तो हेलिकॉप्टरने आपल्या समोर येतो.>>
फूड डिपार्टमेंटचा सुटकेचा निश्वास>>
ओके फायनल स्ट्रेच
ओके फायनल स्ट्रेच
२३) हैवानियत का खेल: अल्टिमेट एडिशन
सुरेंद्र पालने चंदनपुरवर कब्जा केल्याचे स्पष्ट होते. हे बघून काला नाग त्याच्यावर खूप खुश होतो. मग काला नाग विक्रम गोखलेला थोडा वेळ डिवचतो की त्याच्या खेळण्याला (पक्षी अर्जुन ठाकूर) तो कधीच गिरफ्तार करू शकला नसता इ. इ. इथे विक्रम गोखलेवर बंदूक रोखून असलेल्या माणसाची पोज बघण्यासारखी. अर्जुन ठाकूररुपी खेळणे एवढे भारी असल्याने सगळे कामधंदे सोडून काला नाग खेळत बसलेला असतो (त्याचा धंदा डुबण्यामागचे मुख्य कारण). आता काला नाग इतका वेळ खेळत होता त्याच्यापेक्षाही जबरदस्त खेळ दाखवणार असल्याचे सांगतो. हे ऐकून प्रेक्षक श्वास रोखून बसतो.
सरकारच्या मटेरिअलवर भरवसा नसल्याने स.अ.ने धरमपाजींना सीआरएफच्या साखळदंडांनी विक्रम गोखलेच्या तुरुंगात बांधून ठेवलेले असते. मऊ पडलेल्या काकडीसारखे दंड असलेल्या धर्मेंद्राकडे स.अ.च्या मते हत्तीचे बळ असते. काला नाग सांगतो की हे पोलिस स्टेशन त्याच्या ताब्यात आहे (नो रिअॅक्शन फ्रॉम पाजी), चंदनपुर त्याच्या ताब्यात आहे (नो रिअॅक्शन), शामगढ त्याच्या ताब्यात आहे (नो रिअॅक्शन) आणि त्याचे साथी व जयाप्रदा सुद्धा त्याच्या ताब्यात आहे - पाजी स्क्रीम्स! कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट मे बी?
स.अ. मग दारा सिंगचे काय झाले ते सांगतो - वो भीमा जिसके जैसा वीर पुरुष इस धरती पर पैदा ही नही हुआ - खास काही नाही, तो काही ठकुरायनला वाचवू शकत नाही आणि मरतो. त्याची लाश धरमपाजींच्या डोळ्यातून ग्लिसरीनचे अश्रू बाहेर काढते. मग स.अ. ला काय वाटते कोणास ठाऊक तो धर्मेंद्रासाठी खास कापून आणलेले ठकुरायनचे नरम नरम हात दाखवतो - पाजी स्क्रीम्स लाऊडर! भाजीच्या पिशवीत अननुभवी कारट्याने टॉमेटो सर्वात खाली ठेवले की घरी येईपर्यंत कसे पिचतात तसे ते हातही पिचलेले आहेत. विशेष म्हणजे ठकुरायनच्या उजव्या हाताची करंगळी ही पाच बोटांमध्ये सर्वात मोठी आहे आणि तर्जनी सर्वात छोटी. तसेच तिच्या बोटांना चार ते पाच पेरे आहेत - ती एलियन आहे काय?
इथे तो इन्फेमस फ्लॅशबॅक आहे जिथे ठकुरायन धर्मूला भरवते. या विषयी आधीच्या पानांवार पुरेसे चर्वण झालेले आहे. स.अ. त्याला पाचशे कोटी रुपये (या क्वार्टरचे पेमेंट) आणि हत्यारे घेऊन त्याच रेत के टीलेवर यायला सांगतो जिथे शंकर ठाकूरला मारलेले असते. गंजसमध्ये अमिताभला तरी ती मगर शोधता आली होती. पण इथे वार्यासोबत जागा बदलणार्या त्याच रेत के टीलेला धरमपाजी आणि त्याही आधी स.अ. कसा काय शोधतो हे अनाकलनीय आहे.
अजून उचकावायला स.अ. त्याच्या साठी एक तलवार मागे सोडतो - म्हणे हिनेच ठकुरायनचे हात कापले - आणि म्हणतो की जर पैसे घेऊन येणार नसशील तर यानेच आत्महत्या कर आणि तो निघून जातो. इथे धर्मेंद्राच्या तोंडून अनवधानाने 'ओ तेरी माँ ...' असे निघते पण मग त्याला आठवते की या सिनेमात आपण राजस्थानी आहोत पंजाबी नाही आणि तो स्वतःला सावरतो.
जस्ट टू कंप्लीट अल्टिमेटनेस - स.अ. विक्रम गोखलेला सांगतो की जर त्याने सरकारपर्यंत बातमी पोहोचवली तर तो चंदनपुरचे गावकरी आणि पूर्ण पोलिस फोर्सला मारून टाकेल. तसेच जर पुढच्या चोवीस तासात त्याने अर्जुन ठाकूरला इथून जाऊ दिले तर तो विक्रम गोखलेच्या बायका-पोरांना मारून टाकेल. अर्थातच विक्रम गोखले साठी किंमत(फर्ज) > किंमत(जान) असल्यामुळे तो कानूनला दांवपे लगाकर धर्मूला मुक्त करतो आणि स.अ.च्या मागे सोडतो.
२४) क्लायमॅक्स
टळटळीत उन्हात उभे राहून स.अ. ला स्टँडअप करायची हौस येते. मग तो थोट्या ठकुरायनचे नामकरण टॉटी असे करतो. (गो वॉच इट, शतका शतकातून एकदाच अशी डायलॉग डिलीव्हरी होते - https://youtu.be/SV5TwjUoFoc?t=2h21m6s) घटकाभर जुन्या आठवणीत तो रमतो आणि मग "तेरा वो बुजदिल लौंडा, टॉटी आं, बारा बज गये अभी तक नही आया" असा व्हॅलिड प्रश्न विचारतो - गुरु ठाकूरने वाजले की बाराची प्रेरणा इथून घेतली असेल काय?
एक किरकोळ डायलॉग मारून उगाचच ठकुरायन १५ सेकंद खाते. मग धर्मेंद्र तो टीला शोधून, आपण होम्स आणि पॉयरोला मागे टाकले असल्याची ग्वाही देतो. आधी किरकोळ वल्गना काला नाग ऐकून घेतो पण "माँ का पैदा हैं तो आ"ला मात्र त्याला राहवत नाही. स.अ. पाजींना धमकावण्याचा प्रयत्न करतो पण पाजी वीरश्रीपूर्ण डायलॉग मारून प्रत्युत्तर देतात. मग माँ की सीख आपल्याला बघायला मिळते.
कैक वर्षांपूर्वी काला नागच्या डोळ्यात धूळ फेकून ठकुरायन पळालेली असते. हे पाजींच्या स्मरणात असते. थोडक्यात उडती रेत ही काला नागची कमजोरी असल्याचे पाजी हेरतात आणि मोठ्ठाले फॅन्स आणून ते स्नायपिंग करावी तशी धूळ नेमकी सीआरएफ्च्या दिशेने उडवतात. पाजींची नजर व नेमबाजी किती अचूक आहे याचे आणखी एक प्रात्यक्षिक बघायला मिळते. या गोंधळातही ते नेमके जयाप्रदा आणि गँगकडे संरक्षक गॉगल्स फेकतात. यानंतर घमासान मारामारी होते. इतकी की एक दोन फ्रेम्स मध्ये अंबूबा सीआरएफच्या लोकांना गोळ्या घालतो तर धर्मेंद्राने फेकलेले बॉम्ब निसटणार्या चंदनपुरकरांना लागतात. बॉम्ब संपल्यावर धर्मेंद्र बझूका काढतो व गिटार धरल्यासारखी पकडून इकडे तिकडे जाळ काढतो.
सुरेंद्र पालचे काहीतरी करायला हवे म्हणून जयाप्रदाला दिग्दर्शक नेमका त्याच्याकडे पाठ करून उभी करतो. हिरवीणीला वाचवण्यासाठी गुरबचन सिंग (याचे नाव धरमसिंग असे शेवटी शेवटी कळते) बलिदान देतो. धर्मेंद्राच्या गँगमधल्या ज्याचे ज्याचे नाव कळले तो मेला - आणि लोक म्हणतात नाम में क्या रखा है? जयाप्रदाला तो गेल्याचे फार काही दु:ख झालेले दिसत नाही. उलट ती त्याला धक्का देऊन "पड मेल्या" केल्यासारखे पाडते. मग निवांतपणे तिच्यासाठी थांबून उभा असलेल्या सुरेंद्र पालला गोळ्या घालते. एकंदरीत सिनेमाभर जयाप्रदासाठी अनेक लोक वाट बघत उभीच असतात.
शेवटी काला नाग एकटा राहतो. धर्मेंद्र त्याला "छिपकली के अंडे" अशी उपाधी बहाल करतो. वर त्याला मलाही चाली खेळता येतात असे सांगून डिवचतो (पहा व्हिलनवरील अन्याय (२०) ). मग पाजी त्याला आव्हान देतात "सामने आ जाये तो तू अपने बाप को भी डस लेता है ना. ले सामने तेरा बाप खडा है. आ डस ले मुझे". मतितार्थ असा की पूर्ण करता येणार नाहीत अशी आश्वासने दिली की शेवटी फजितवाडा होतो. मग पाजी स.अ.ला सावकाश तीन मिनिटे शिव्या देत बडवतात. माँ का बदला घेणे मस्ट असल्याने ते स.अ.च्या तलवारीने त्याचे हात कापतात. परफेक्शन हवे म्हणून त्याला 'टॉटे टॉटे' म्हणूनही चिडवतात.
अखेर काला नागला भोसकून गिधाडांसाठी वाळवंटात सोडले जाते. एक अखेरचे रुपक - सहसा कोणी मेले की आजूबाजूचे लोक आपली टोपी काढून हातात घेतात. इथे जयाप्रदा टोपी डोक्यावर चढवते. काला नागचे समाजातले स्टॅटस जाता जाता दिग्दर्शक स्पष्ट करतो. कानून की इज्जत करत असल्याने अर्जुन ठाकूर व त्याचे साथीदार स्वतःला पोलिसांच्या हवाली करतात असे आपल्याला निवेदक सांगतो व फॅमिली साँगवर सिनेमा संपतो.
तात्पर्यः बिझिनेस सोडून नस्ते खेळ खेळत बसणार्या बिझिनेसमॅनची मॅनेजमेंट कितीही फ्लॉलेस असली तरी त्याची कंपनी डुबतेच.
शेवटच्या हाणामारी आधी धरमपाजी
शेवटच्या हाणामारी आधी धरमपाजी रिमोटने पंखे बंद करून रिमोटचे या सिनेमातील महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखीत करतात
आणि स.अ.ला बडवताना बझुकाचा काठी नाहीतर शिमटीसारखा वापर करतात तसा कोणीच केला नसेल
तसेच शेवटी जंगच्या फ्युटिलिटीबद्दल धरमपाजींचा मोनोलॉग हा केव्हडा मोठा शांतिसंदेश आहे
पायस जबराट! कालच हा पिक्चर
पायस
जबराट! कालच हा पिक्चर पाहून पूर्ण झाला (एकदाचा) त्यामुळे प्रत्येक बारकावा व्यवस्थित कळला.
विशेष म्हणजे ठकुरायनच्या उजव्या हाताची करंगळी ही पाच बोटांमध्ये सर्वात मोठी आहे आणि तर्जनी सर्वात छोटी. तसेच तिच्या बोटांना चार ते पाच पेरे आहेत - ती एलियन आहे काय? >>> अगदी अगदी
टवणे सर, अख्ख्या पोस्ट साठी +१. बझुकाचा काठीसारखा वापर पाहून ड्वाले पानावले
बिझिनेस सोडून नस्ते खेळ खेळत
बिझिनेस सोडून नस्ते खेळ खेळत बसणार्या बिझिनेसमॅनची मॅनेजमेंट कितीही फ्लॉलेस असली तरी त्याची कंपनी डुबतेच. >>>
सुषमा सेठ - "वो आयेगा" म्हणताना इतके रिटेक्स झाले की. दिग्दर्शकाने टोपी जमिनीवर आपटून "यापेक्षा बोअर पद्धतीने हा संवाद कोणी म्हणूच शकत नाही" असे सांगितले. ते राकेश रोशन ने बघितले आणि लगेच राखीला फोन केला. ती म्हंटली की बोअरपणात मी कोणापेक्षा कमी नाही. त्याने लगेच तो "मेरे करण अर्जुन आयेंगे" सीन शूट केला, व रेस्ट इज हिस्टरी.
संवादांमधे "आज आया है ऊंट पहाड के नीचे" असा संवाद होता. दिग्दर्शकाने आणले चार पाच उण्ट. मग कोणीतरी सांगितले की ती उपमा आहे. मग त्या उंटांचे काय करायचे? तर ते काय आणले आहे झाकून ते ओढायला वापरले. पण मूळ सीन मधे धरम ने ओढायचे असे ठरले होते. त्यामुळे उंट ते ओढत असताना आणखी पुन्हा उंटांपुढे उभा राहून धरम ते सगळे ओढतो. उंटांच्या चेहर्यावरचे भाव बघा. शोलेतल्या टाकी सीन मधे अमिताभ ज्या निर्विकार पणे चहा पितो तसे ते निर्विकारपणे रवंथ करत आहेत.
स.अ. ने एक ते वाळू प्रतिबंधक गॉगल वापरले असते तर क्लायमॅक्स किती वेगळा झाला असता. वाचला असता तर कोरिफो च्या वार्षिक सभेमधे लोकांनी धारेवर धरला असता. एकतर पैसे गेले. लाशे नाहीतच.
त्याला मारताना धरमपाजी उर्दू व शुद्ध हिंदी मधे इतक्या सफाईने फेर्या मारतात की ते एकआड एक वर्ष अलिगढ मुस्लिम व बनारस हिंदू विद्यापीठात शिकत होते असे वाटेल.
भर वाळवंटात, काही पावर सोर्स
भर वाळवंटात, काही पावर सोर्स नसताना ,ते अतिप्रचंड पंखे चालले कशाच्या जोरावर ते काही कळत नाही,
गॉगल टाकताना धर्मेंद्र एक गठ्ठा गॉगल फेकतो, पण तिकडे रिसिव्ह करताना प्रत्येकाच्या हातात एक असा डिलिव्हरी होतो,
ऐन बॉम्बा बोंबीत धर्मेंद्र धुराआड दिसेनासा होतो, तेव्हा सुषमा सेठ काळजीयुक्त चेहऱ्याने पाहते, इतक्यात धर्मेंद्र ट्रक मागून बाहेर येतो आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात,.....
ऐन धुमश्चक्रीत आई चे काळीज दाखवायला दिग्दर्शक विसरला नाही
धर्मेंद्र माणशी एक या प्रमाणात बझुक शॉट्स वापरतो,
शेवटी नागोबा एकटा उरला आहे, आता बझुका छडी सारखे वापरायचे आहे हे आठवून त्याच्या आजू बाजूला बझुक डागून रांगोळी काढतो
भर वाळवंटात, काही पावर सोर्स
भर वाळवंटात, काही पावर सोर्स नसताना ,ते अतिप्रचंड पंखे चालले कशाच्या जोरावर ते काही कळत नाही,
>>
एव्हडा शिणुमा बघून तुम्ही काहीच शिकला नाहीत. ते पंखे रिमोटच्या बळावर चालतात. रिमोत इज ऑल पावरफूल हा संदेश आहे त्यातून.
ऐन धुमश्चक्रीत आई चे काळीज
ऐन धुमश्चक्रीत आई चे काळीज दाखवायला दिग्दर्शक विसरला नाही >>>
हो तो सीन आठवला.
या क्लायमॅक्स मधे बझूका आल्यावर ते वेस्टेरॉस च्या लढाई मधे एकदम वरून ड्रॅगन्स आल्यावर होते तसे होते
आता एक युद्धातील डावपेचांबद्दल हार्वर्ड मधे शिकवावा असा प्रसंगः बरीच बझूकाबाजी झाल्यावर स.अ., सु.से व धरमपाजी हे तिघेच उभे दिसतात. बाकीचे आडवे.बॉलीवूड नेहमी पाहणार्यांना हे नक्की कळेल की जयाप्रदातरी मेलेली नसावी. कारण ती मेली तर तिला इतके दुर्लक्षित करणार नाहीत. म्हणजे सगळे मेले नाहीत. किमान थोडे जिवंत आहेत.
आता फक्त आपल्या बाजूचे जिवंत आहेत की थोडे कोरिफो चे ही, याची खातरजमा न करता धरम सगळा फोकस स.अ वर करतो. यापुढे अजून मी पाहिले नाही. पण अचानक कोणीतरी उपटून बाजी उलटवत नसेल यापुढे, तर धरम ला हे कसे कळले की १. जयाप्रदा जिवंत आहे २. बाकीचे कोणी उपद्रवी जिवंत नाहीत
एव्हडा शिणुमा बघून तुम्ही
एव्हडा शिणुमा बघून तुम्ही काहीच शिकला नाहीत. ते पंखे रिमोटच्या बळावर चालतात. रिमोत इज ऑल पावरफूल हा संदेश आहे त्यातून. >> +१ शक्तिमानमधल्या डॉक्टर जेकॉलने नंतर हेच सांगितले आहे - आधी छडीसारखा रिमोट नाचवायचा आणि नंतर "पाऽऽऽवऽऽर"!!
अचानक कोणीतरी उपटून बाजी उलटवत नसेल यापुढे, तर धरम ला हे कसे कळले की १. जयाप्रदा जिवंत आहे २. बाकीचे कोणी उपद्रवी जिवंत नाहीत >>
पण एक फ्रेमभर दिसते की जयाप्रदा. (२) चं उत्तर मात्र जेव्हा ठकुरायन एकट्या काला नागच्या डोळ्यात धूळ उडवून त्याच्या संबंध गँगच्या तावडीतून धर्मेंद्रासकट कशी काय निसटते या प्रश्नाच्या उत्तराशी संलग्न आहे.
पाचव्यांदा
पाचव्यांदा
तुम्ही सगळे भयंकर आहात
अजून बघणं होत नाहीये .
अजून बघणं होत नाहीये .
एखाद्या दिवशी निवांतपणे , एका खिडकीत तुनळी आणि एका खिडकीत माबोली असा विचार आहे .
दी एन्ड!!! जबरदस्त पायस. मजा
दी एन्ड!!! जबरदस्त पायस. मजा आली खुपच.
"एक संवाद"
"एक संवाद"
स्थळ: बर्टी वूस्टरची बेडरूम
घटना: नुकताच ऐलान ए जंग (आणि माबो संयुक्त रिव्ह्यू) बघून/वाचून झालाय
------------------------------------------------
बर्टी वूस्टर : (लॅपटॉप बंद करत) " वा वा जीव्ह्ज, आईने मुठीने धुरळा उडवला, मुलाने रिमोटवाला फॅन आणला अपग्रेड म्हणून. चकधूम धिंगचॉक रचला पाया टिंगडांग झालासे कळस....अशी काहीतरी म्हणच आहे ना?"
जीव्ह्ज: "ओ मालक घरी बोलला म्हणून ठीक बाहेर कुणी ऐकलं तर तुमचं डिंगडांग करतील संस्कृतीरक्षक. ज्ञानदेवें रचिला पाया तुका झालासे कळस, अशी म्हण हाय ती".
"असं काय, ते जाऊदे पण काळ्या नागाने अर्जुन ठाकूरला बंदी केले तेव्हा मी जरा चिंतेतच होतो. पण सरकारी तुरुंगातल्या साखळ्यानी कामगिरी फत्ते बजावली. बेष्ट. चांगला पिक्चर रेकमेंड केलास, लय भारी"
"ठाणे मेंटल होममध्ये वीकेंड इंटरटेन्मेंटला सलग चार महिने टॉपच्या पोझिशनला हुता असं मला अंकल चार्लीनी सांगितलेलं, तवाच मला तुमची आटवन आलेली मालक. अंकल चार्लीचे मालक सध्या तितं हैत टेम्परवारी".
"काय! बरं, बरं, पण आठवण झाली हे विशेष. व्हॉट अ मूव्ही! ड्रोन्स क्लबमध्ये स्पेशल शो करवणार मी आता याचा, पोरं खूष होतील एकदम."
"सगळ्यात काय आवडलं मालक?"
"अवघड आहे रे सांगणं, फ्रेम फ्रेम नवीन शिकवून गेली. ते... कशाने तरी कुणाला तरी काय तरी येते...असं सुभाषित आहे ना, त्याचा वस्तुपाठ आहे हा सिनेमा."
"प्रवासाने मनुजा चातुर्य येते? पण त्याचा हितं काय संबंध?"
"अरे असं काय करतोस? पुनीत इस्सार कोब्रा फोर्स अड्ड्यापर्यंत प्रवास करतो, नंतर वाळवंटात येतो, धर्मेंद्र घोड्यावरून सतत इकडे तिकडे जातो, ज्याप्रदा लहानपणी गावी असते ती चंदनपुरला जाते, देव कुमार, सुरेंद्र पाल तर गरुड हनुमंतासारखे इकडे तिकडे बागडत असतात, सगळा पिक्चर प्रवासामुळे घडतो मिष्टर. इट्स अ ट्रॅव्हल मूव्ही, आय टेल यू!"
"फॅटी लेग ऑफ माय मॅटर्नल ग्रँडपा! काहीही हां मालक. ट्रॅव्हल मूव्ही कसली कप्पाळ, फालतू कमर्शियल टिनपाट हाय हे."
"नो नो जीव्ह्ज, इट्स फुल ऑफ दॅट बंगाली मिठाई जी दुसऱ्या घासानंतर खडूच्या भुकटीसारखी लागते"
"संदेश? आता यात काय संदेश दिसला तुमच्या दिव्यदृष्टीला मालक??"
"अरे म्हणजे काय? मॅनेजमेंट, रिलेशनशिप, सायंटिफिक अप्रोच किती काय शिकण्यासारखं! दिग्दर्शकाची कमाल आहे."
"कर्म माझं, बरं पिच्चर संपलाय आता. संध्याकाळी फ्लोरेन्स माडम येणार हाय. मागच्या आठवड्यात तिनं वाचायला दिलेलं पुस्तक संपिवलासा का न्हाई? आधीच ती माझ्याकडं अमित शहानं राहुल गांधीला बघीतल्यावणी बघती, त्यात माझ्यामुळं टाईमपास झाला कळलं तर नरसोबा वाडीला धरमशाळेत राह्यला पाटवंल मला"
"बाप रे, विसरलोच की, अरे बाबा काय डेंजर पुस्तक आहे हे. साहित्य आणि सौंदर्य म्हणे! हूं, यात ना कुठल्या साहित्याचे वर्णन ना सौंदर्याचे. पटत नाही तुला? थांब या प्रस्तावनेच्या ओळी बघ....
'मी क्ष अनुभवतो हे अहंकेंद्री विवक्षित विधान आहे....असे विधान अहंच्या आत्मचरित्राचा भाग असते....त्याचे सत्य अहंपुरतेच मर्यादित असते....अशीच खाजगी सत्यता सौंदर्यवाचक विधानांतही असते... अनेक कारणांच्या आधारे सौंदर्यवाचक विधाने करता येतात मात्र तर्कवाचक विधानांना अनुभवावाचून पर्याय नाही....'
आता बोल! अरे काय हे? च्यामारी मराठीच लिहिले आहे ना म्हणून मी दोनदा पुस्तक उलटे तर धरले नाही चेक केले, ती धर्मुची बझुकाची काठी घेऊन पुस्तक दुकाने फोडावीत वाटलेलं चार ओळींतच, आणि पूर्ण पुस्तक कसं वाचू?"
"हाहाहा, होय मालक ह्यो लेखक जरा डेंजर अवघड हाय खरा. पण त्यांचं 'कलेची फलश्रुती' बद्दलचं मत मला एकदम पटतं. सांगीन पुढं कधी नीट. बरं हा च्या घ्या, फ्रेश व्हा आणि पुस्तक हातात घ्यून बसा ती बया यील तवा, मी आता आमच्या गॅनिमिड क्लबात जातो, तुमचे मागचे तीन चार कारनामे आमच्या मालक-कीर्द खतावणीत लिहायचे राह्यलेत. बॅकलॉग ठेवलेला वाईट"
"थँक्स वन्स अगेन रे, पाथब्रेकिंग पिक्चर बघितला तुझ्यामुळे. बघतो कसं काय होतंय फ्लोरेन्सबरोबर, तू जा. बाय!"
अमेय
अमेय

चकधूम धिंगचॉक रचला पाया टिंगडांग झालासे कळस >>> ही म्हण जहबहरीही आहे
जीव्स : आणी साहेब, तुम्ही
जीव्स : आणी साहेब, तुम्ही मायबोली गटग ला घालून जाण्यासाठी तो "दुनियादारी" मधल्या स्वप्नील जोशी सारखा लांब कॉलर चा शर्ट व निळा स्वेटर आणला होता ना ?
बर्टी : ( शंकेखोर मुद्रेने) काय झालं त्यांचं ?
जीव्स : त्यांना इस्त्री करताना ते थोडे जळाले. पण बोहारिणीशी घासाघीस करून त्या बदल्यात सूप प्यायचा चमचा मिळवला.
अमेय अरे तू जीव्हज ला
अमेय
अरे तू जीव्हज ला ग्रामीण आणि ग्राम्य करून टाकलास एकदम. एरव्ही तो बर्टीला भाषा शिकवेल असा बोलतो 
अमेय
अमेय
हा धागा आणि प्रतिसाद जहबरी
हा धागा आणि प्रतिसाद जहबरी आहेत!
अमेय, पायस, फा जियो!
Saglyana danadvat ahe amcha..
Saglyana danadvat ahe amcha....afat ahat sagle .....
Pages