ऐलान-ए-जंगः एक धावता संयुक्त रिव्यू

Submitted by फारएण्ड on 4 August, 2017 - 10:51

ऐलान-ए-जंग या अजरामर चित्रपटाबद्दल आपली मते येथे लिहा. हा रिव्यू क्राउडसोर्सिंग सारखा लिहू. म्हणजे सर्वांना त्यात लिहीता येइल. गेल्या २-३ दिवसांत इतर बाफ वर अनेकांनी तुकड्या तुकड्यांत या चित्रपटातील सीन्स बद्दल लिहीले आहे. त्यांनी ते इथे परत लिहा, आणि इतरांनाही त्यात भर घालता यावे म्हणून असा बाफ उघडत आहे.

इतर चित्रपटांबद्दल स्वतंत्र बाफ आहेत तेव्हा त्याबद्दल इथे लिहून हे डायल्यूट करू नका Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"सिर्फ तालियाँ बजानेसे काम नहीं होगा, काम करनेसे काम होगा" >> म्हणून तर दर वाक्याला टाळ्या वाजवायची इच्छा होत असूनही रिव्ह्यू लिहितोय Proud

पुढची निरीक्षणे
१६) चंदनपुरातील साहसे : दीड तासानंतर अखेर धर्मेंद्राची ऐलान-ए-जंगची घोषणा

१६.१) भई ये चंदनपुर है कहा? - जयाप्रदा सांगते की चंदनपुराजवळच्या दर्‍याखोर्‍यात, ५० किमी त्रिज्येच्या वर्तुळात कुठे तरी सीआरएफचा अड्डा आहे. चंदनपुरच्या जवळच वाळवंटही आहे, त्यामुळे चंदनपुर हे राजस्थानच्या पूर्वी सीमेवरचे ठिकाण असावे. तरीही वाळवंट अगदीच काही जवळ तर नाही. असा विचार केल्यावर आपल्याला पुनीत इस्सार बिकानेर पर्यंत कसा गेला हे कळते. त्याने सीआरएफची एखादी गाडी घेऊन पळ काढला असावा. त्याला किरकोळ जखमा झाल्या होत्याच. इतका वेळ सीआरएफ मागावर असल्यामुळे त्यांच्यावर मलमपट्टी न करता आल्याने एवढा रक्तस्त्राव झाला हेही कळून येते. आता वाळवंटात चालणारी स्पेशल गाडी न पळवल्याने त्याला नाईलाजाने धर्मेंद्र येण्याची खात्री असलेल्या मंदिरापर्यंतचे उर्वरित अंतर पायी कापावे लागले. तरी एक प्रश्न उरतोच - जर असे असेल तर चंदनपुरला बॉर्डर कुठून आली?

१६.२) सीआरएफची चौकी - तर एका रँडम ठिकाणी सीआरएफने एक चौकी उभारली आहे. जयाप्रदाच्या मते ही एक खास चौकी असल्याने जर हिच्यावर कब्जा केला तर स.अ. स्वतः धर्मेंद्राला शोधत येईल. अत्यंत खास चौकी असल्याने हिच्या रक्षणासाठी केवळ दोन माणसे सोडली आहेत. आपल्या मनात शंका उत्पन्न होते - इज काला नाग लूजिंग हिज इन्फाईनाईट विज्डम? पण त्या दोघांपैकी एक जण बॉब क्रिस्टो असल्याचे बघून तात्पुरते शंका निरसन होते. दुसरा कोणी दाढीवाला आहे जो जोगिंदरसाठी तयार करण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न आहे (पर जोगिंदर जैसा कोई नही हे तो विसरला आहे), हा काही मला ओळखू आलेला नाही. जयाप्रदाचा डायलॉग चालू असतानाचे धर्मेंद्राच्या चेहर्‍यावरचे रहस्यमयी एक्सप्रेशन बघण्यासारखे!
चौकीवर अतिशय सहज कब्जा होतो. बेसावध प्रेक्षकाला वाटते की झालं आता ठाकूर आणि गँग स.अ. ला खलिता पाठवून टीपी करतील. पण छे! कब्जा झाल्यानंतर सुरुवातीला काही प्रेक्षणीय संवाद होतात. अर्जुन ठाकूर त्या जोडगोळीला ब्लॅक अँड व्हाईट संबोधतो तर बॉब क्रिस्टो आपली मनातली शंका बोलून दाखवतो - अर्जुन टाकून? (आज सकाळी सकाळीच?) अर्जुन ठाकूरची एक माफक अपेक्षा असते - मरण्यापूर्वी देवी माँ चे नाव घ्या. नाव घेण्याऐवजी उचकवणारे शायरीवजा डायलॉग मारल्याने धरमपाजी त्यांना बुकल बुकल बुकलतात. भेदरलेले ते दोघे एकदाचे जय महाकाली म्हणतात. याने संतोष पावून पाजी त्या दोघांना जीवनदान देतात. इथे बॉब क्रिस्टोचे एक्सप्रेशन - पयले बोलने का मॅन, अगर नाम बोलने से जान बचने वाली थी तो सौ बार जय महाकाली बोलते. यानंतर पाजी स.अ. चा प्रत्येक अड्डा तबाह करण्याची आणि ऐलान-ए-जंग केल्याची घोषणा करतात आणि एक बाँब फेकून ३-४ स्फोट करतात.

१७) फायद्यातील डील कशी करावी? - श्रीयुत काला नाग यांचे लेक्चर-डेमॉन्स्ट्रेशन
आता जरा काला नागचे काय चालले आहे ते बघूया

१७.१) सत्तार मेढा - काला नाग फायनली आपल्या लोकांची नावे उघड करतो, वेल अ‍ॅट लीस्ट काही जणांची. देवकुमारचे नाव विकराल असल्याचे उघड होते तर जोगिंदरचे सत्तार मेढा. कोणा क्लाएंटला तो आपली रिक्रुटमेंट फोर्स दाखवायला घेऊन येतो. जोगिंदरची ओळख तो रिक्रुटमेंट फोर्सचा चीफ म्हणून करून देतो. इथे जोगिंदरचे खोकल्याची उबळ आल्यासारखे हास्य बघण्याची संधी प्रेक्षकांना आहे. जोगिंदरला म्हणे रोज सत्तर माणसांना मारून खात नाही तोवर ढेकर येत नसते
व्हॉट आर यू सेईंग?
हेच की जोगिंदरला म्हणे रोज सत्तर माणसांना मारून खात नाही तोवर ढेकर येत नसते
(सेल्फ नोटः एक दुष्यंत पुरेसा आहे पायस)

१७.२) रिक्रुटमेंट (?!)
टेक ओव्हर केल्यानंतर जुन्या कर्मचार्‍यांना सामावून घेण्याला, मर्जरला स.अ. रिक्रुटमेंट म्हणत असतो. (१६.२) मध्ये आलेली शंकेची पाल पुन्हा चुकचुकते. इथे स.अ. का कोण जाणे हातात मगरीचे दात आणि सापाचे तोंड असे कॉम्बिनेशन असलेला पोलादी हात चढवतो. बॉर्डरवर पाठवलेल्या सैनिकांपैकी ज्यांना सीआरएफने पकडले त्यांना विविध आमिषे, धमकावण्या इ. वापरून सीआरएफ मध्ये सामील करायचे आणि भारताशी गद्दारी करायला लावायची अशी थोडक्यात योजना असते. ही प्रोसेस बघण्यासारखी आहे
तो या लोकांना काही ऋषिकन्येस्टाईल साडी नेसवून बांधलेले असते आणि दोन माणसे त्यांच्यावर पाण्याचे फव्वारे उडवत असतात (या पाणी उडवण्याच्या स्टाईलचे वर्णन माझ्या आवाक्याबाहेरचे आहे). त्या म्हणे ज्या लोकांनी काला नागचे म्हणणे ऐकले नाही त्यांच्या बायका-आया-बहिणी असतात. थोडक्यात धमकी - आमच्यात सामील व्हा आणि जीव वाचवा, नाहीतर मरून अंघोळीचे पाणी वाचवा.
पृथ्वीवर माणसे खूप जास्त आणि तुलनेने पाणी कमी, असा सूज्ञ विचार करून एक जण देशभक्तीपर शेर मारतो. तो शेर न आवडल्याने काला नाग त्याला एका द्रवकुंडात फेकतो. या पाणी सदृश द्रवपदार्थातून बुडबुडे येत असल्याने ते अ‍ॅसिड असल्याचे सिद्ध होते. काला नागच्या विशेष अ‍ॅसिडमध्ये कपडे, कातडी, मांस हे सर्व विद्राव्य असतात पण हाडे व रक्त नसते. त्यामुळे रक्ताळलेला सांगाडा बाहेर येतो. त्याला हुकने इतर सांगाड्याच्या दालनात ठेवले जाते आणि 'हिंदुस्तान जिंदाबाद' लिहिलेला कागद त्याच्या हातात व तोंडावर लावला जातो.
हे बघून अरुण बक्षीला 'मेल्यावर सुद्धा ओठांवर देशभक्तीपर शब्द आहेत' असे सांगणारा हायकू सुचतो. शेरोशायरी सुरु असताना मध्येच हायकू काढल्याने काला नागला अनावर होतो आणि तो पोलादी हाताने त्याला डसतो. मग यमक न जुळणारी आणखी एक ओळ वाढवून त्याचे दोन शेर करण्याचा प्रयत्न संतापाचा कडेलोट करणारा ठरतो व तो त्याचा कोथळा बाहेर काढतो - सड सड कर मरेंगे ये लोग, सड सड कर मरेंगे. जाता जाता तो दौलतचे पण आमिष देतो - मेरे आदमी दौलत खाते है, दौलत पिते है, दौलत जीते है, दौलत सोते है - इथे ट्रंपच्या वी विल विन, विन, विन अँड विनची आठवण आल्याखेरीज राहत नाही. मग पुन्हा 'नाग हूं मै नाग, काला नाग' चे पालुपद - अर्थात स्वर बदलून, रिमेंबर रागदारीची समज?, यावेळेस डसण्याच्या वस्तुंमध्ये अ‍ॅडिशन ये आजादी क्या चीज है आणि जे जे ऐकणार नाही त्यांची गझल अशीच लिहिण्याचा इशारा देतो.
क्लाएंटला हे दाखवल्यावर स.अ. सांगतो की सध्या एक एक खून एक लाखाचा झाला आहे - इट इज व्हेरी डिफिकल्ट टू किल द पीपल. इथे (१६.२) ची शंका अधिकच तीव्र होते - इतक्या ईझीत लोक मारल्यानंतरही हे अवघड काम कसे? पण तो क्लाएंट हिंदी भाषक नसल्याने त्या कविता त्याच्या डोक्यावरून गेल्या असाव्यात. तो बिचारा त्याला ५०० कोटी उद्याच देण्याचे मान्य करतो. आता थोडे गणित करूयात १४००० कोटी ७ वर्षात - म्हणजे ५०० कोटी पर क्वार्टर. थोडक्यात या क्वार्टरची इंस्टॉलमेंट त्याला दिली गेली. डील फायनल झाल्याने तात्पुरते शंका समाधान झाले तरी अत्यंत सटल रित्या काला नागची उतरण सुरू झाली आहे हे प्रेक्षकाला सुचवले गेले आहे.
इतक्यात सुरेंद्र पाल येऊन अर्जुन ठाकूरने बॉब क्रिस्टोला हरवल्याची बातमी सांगतो. स.अ. ने दखल घ्यावी इतकी काय ती महान कामगिरी नसल्याने तो जोगिंदरला काय असेल ते बघून घ्यायला सांगतो. त्यावर जोगिंदर अ‍ॅस्थमाचा अ‍ॅटॅक आल्यासारखा हसतो.

ब्रेस युवरसेल्व्हज, सत्तार मेढा इज कमिंग!

पायस, तुमचा लिहायचा स्टॅमिना जबरदस्त आहे. आता हा पिक्चर पाठ असला तरी पंचेस वाचायला मजा येतीय.
व्हॉट आर यू सेंईंग? दुष्यंत...... हाहाहा !!

जोगिंदरबद्दल काय लिहावे? त्याच्या सत्तार मेढापासून पुढे मराठमोळा टकलू हैवान इंस्पायर झाला असावा, असे समजायला वाव आहे (बादवे त्याच्या फिल्मोग्राफीतील काही नावे....बिंदीया और बंदूक, आदमखोर, प्यासा शैतान, डाकू हसीना.... अँड द हिट्स जस्ट कीप कमिंग!).

मेरे आदमी दौलत खाते है, पीते है यानंतर निसर्गक्रमाने येणारी क्रिया असेल म्हणून पहिल्यांदा बघताना मी नाक दाबून बसलेलो पण संवादलेखकाने निराशा केली.

कुणालाच फारसा माहीत नसलेला अड्डा पण त्याच्या चौक्या, रस्ते सगळे गीताला तोंडपाठ हीपण एक मौज आहे. अन्नू कपूर गीता मीलनानंतर थोडा रुसका वाटतो कारण आता पाजींशेजारची जागा बाय डिफॉल्ट गीताची झालीय.

अर्जुनच्या पहिल्या मिनी विजयाची बातमी घेऊन येताना सुरेंद्र पालच्या चेहऱ्यावर अगदी रेल्वेतील ऑक्युपाईड टॉयलेटसमोर उभे राहून श्वासनियमन करणाऱ्या गड्याचे भाव असतात.
पकडलेल्या बायकांना मंदाकिनी स्टाईल साडी नेसवून पाण्याचे फवारे मारून भिजवणे...म्हणजे अतीव टॉर्चर हे अनिल शर्माला कुठल्या तारेत असताना सुचले याची उत्सुकता आहे.

पहिला माणूस आम्लात स्वाहा झाल्यावर अरुण बक्षीला थोबाड बंद ठेवायला हरकत नव्हती, कारण स.अ.चा डेली कोटा पुरा झाल्यासारखा तो समाधानी होता पण कारण नसताना फालतू शेरो शायरी करून उकसवून ठेवतो आणि फुकट मरतो. मरतानाही वर,"मुकर्रर नही कहोगे राजा?", म्हणून चावटपणा सुरूच. व्हॉट विल अ चॅप डू?

तो या लोकांना काही ऋषिकन्येस्टाईल साडी नेसवून बांधलेले असते आणि दोन माणसे त्यांच्यावर पाण्याचे फव्वारे उडवत असतात (या पाणी उडवण्याच्या स्टाईलचे वर्णन माझ्या आवाक्याबाहेरचे आहे).
>>>

अनिल शर्मा कितीही महान असला तरी सद्गुरु कांति शाहांची उंची त्यांना अजून गाठता आलेली नाही. कांति शहा असते तर त्यांनी या प्रत्येक बांधून ठेवलेल्या ऋषिकन्येवर 'अत्याचार' करून स्वतंत्र शॉट्स दाखवले असते. त्यासाठी त्यांच्याकडे मोहन जोशी, बुल्ला, इबू हटेला* अशी स्वतंत्र फौज आहे. मात्र अनिल शर्मांनी ती उंची गाठली नसल्याने पाण्याचे फवारे उडवून अत्याचार इतपतच त्यांची झेप गेली

**श्री श्री सद्गुरु महामहीम इबु हटेला
मेरा नाम है इबु हटेला
मा मेरी चुडैल की बेटी
बाप मेरा शैतान का चेला
खायेगा केला?

वरच्या दोन्ही पोस्ट्स वाचल्या नाहीत अजून. पण जोगिंदर म्हण्टल्यावर त्याचे ते खिशातून पैसे काढण्याइतक्या सहज ती शस्त्रक्रिया करून घातलेली चिप काढून टाकतो ते आठवले :).

दुसरा कोणी दाढीवाला आहे जो जोगिंदरसाठी तयार करण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न आहे (पर जोगिंदर जैसा कोई नही हे तो विसरला आहे), >> Lol

रिक्रुटमेंट महान आहे:हहगलो:

अर्जुनच्या पहिल्या मिनी विजयाची बातमी घेऊन येताना सुरेंद्र पालच्या चेहऱ्यावर अगदी रेल्वेतील ऑक्युपाईड टॉयलेटसमोर उभे राहून श्वासनियमन करणाऱ्या गड्याचे भाव असतात.>> मेलो हसुन. Lol

मेरे आदमी दौलत खाते है, पीते है यानंतर निसर्गक्रमाने येणारी क्रिया असेल म्हणून पहिल्यांदा बघताना मी नाक दाबून बसलेलो पण संवादलेखकाने निराशा केली.<<<<<<
कशाला? ते काय टायविन लॅनिस्टर थोडीच होते?

मेलो हसून हसून, काल हा धागा बाजूला ठेऊन यतुब वर याची देही याची डोळा या मास्टरपीस चित्रपटाचा आनंद घेतला. अर्थात इथे स्टोरी आलीये तेवढाच पार्ट.
अमेय, पायस आणि फारेंड च्या कंमेन्ट वाचून त्यानुसार चित्रपट बघणे हा एक उत्तम स्ट्रेसबस्टर आहे.

तो शंकर ठाकूर चे व्यर्थ रक्षक वाला, मडक्याच्या सिन अफाट आहे. कहर म्हणजे गावकऱ्यांना हात मागे न बांधता नसतेच गळ्यात दोरी अडकवून उभे केले आहे, त्यामुळे फास बसला तरी कुठे एवढे कष्ट घ्या आणि काळा नाग चे कष्ट वाया घालवा ता विचाराने तो माणूस तसाच निवांत हात खाली सोडून शँकर ठाकूर च्या भरवश्यावर लटकत राहतो.

पायस जित्याची खोड केवळ महान -/\-
महाभारताप्रमाणेच इथेही गीता अर्जुनाला रस्ता दाखवणार असे ठरते आणि ती त्यांना सीआरएफच्या अड्ड्याकडे घेऊन जायचे मान्य करते.> Rofl

ज्याप्रदाला वळीकल्यावर आतून एक्सप्रेशन काढत धर्मु,"गीता..", असे हंबरतो ते कधी उदास असलात तर जरूर बघा. ऑल उदासी विल मेल्ट अवे.> Rofl

तर काळा नाग हस्तक अंबुबा उर्फ काथ्याचे केस याने सांगितल्यानुसार गीताच्या नाईट क्लबात पाजी अँड कं अल्पविराम घेत असते. नुसते बसण्यापेक्षा गायन वादनात वेळ घालवावा या हेतूने जयाप्रदा गायला, धरमजी ड्रम्स बडवायला आणि कं नाचायला आरंभ करते.

रंपपम रंपपम ला ला ल्ला
चिकिमिकी चिकिमिकी चिकी चिकी
(या भागाचे स्पॉन्सर चिकिवाले असतील, काय सांगावे)

हल्लो मिस्टर वंडरफुल
बोलो मॅडम ब्युटीफुल
नाचो प्यार के बंजारो
गाओ गीतों की बुलबुल.....

असे बहारदार गीत सुरू होते. मनातून फुल्ल नाचायची इच्छा असणारे पण शरीर साथ न देणारे लोक कसा हृदयद्रावक नाच करतील, तसाच धर्मेंद्र करतो, त्यातून ड्रमवर असल्याने एक पाय नाचीव रे करत खांदे घुसळणे हीच मुख्य स्टेप असल्याने त्याच्यावर कोरिओग्राफरने तसा अन्यायच केलाय. तरी तो आपणहून आउट ऑफ सिंक हात उडवणे, बॉडी (उभ्या हिशेबात) पूर्व-पश्चिम ऐवजी दक्षिण-उत्तर घुसळणे अशी व्हेरिएशन्स द्यायचा प्रयत्न करतो.

लवकरच सत्तार मेढा तिथे येऊन पोचतो पण गाण्याचे अजून एक कडवे बाकी असल्याने भल्या माणसासारखा गुपचूप उभा राहतो.

गाणे संपल्यावर पुन्हा एकदा त्या सत्तर माणसे खाण्याच्या वल्गना रिपीट होतात आणि सत्तार अर्जुन ठाकूरला समोर यायला सांगतो (अगदी बिहडों का राजा वगैरे उपाधीसह सादर निमंत्रण!) खरेतर डायलॉगबाजी आवरून नीट पाहतो तर बाकी सूट बूट घातलेल्या जंटलमन गर्दीत झाकडू माकडू हरकते करणारी सेना कुठली हे लगेच कळले असते पण तितकी फाईन प्रिंट सत्तारच्या बुद्धीबाहेर असते.
शेवटच्या कडव्यात नाच करता करता धर्मेंद्र सेनेने सत्तारसकट सर्व माणसांच्या खिशात छोट्या बारुदच्या गोळ्या टाकून ठेवल्या आहेत याचा डेमो धर्मेंद्र रिमोटद्वारे दोन दुष्मन उडवून देतो. त्याबरोबर सत्तार घाबरून शरण येतो आणि जान बक्षा व काहीही माहिती उगलवा अशी ऑफर देतो. इतक्या महत्त्वाच्या सीनमध्ये मारामारी राहिली हे संबंधितांच्या लक्षात येते आणि मग सत्तारला माफक मारले जाते. इथे एडिटरने आपले कसब दाखवले आहे. एका फ्रेममध्ये सत्तारला ठोसा मारल्यावर तो धडपडून उठतो तेव्हा त्याच्या पाठीला दोरीने बांधलेले खुर्चीचे फळकूट दिसते. साहजिक मूळ त्याला बांधून ठेवलेला एक सीन मध्ये होता हे आपल्याला कळते.

सत्तार त्याला नागाच्या मुख्य बिळाचा पत्ता नाही पण बॉर्डरवर (चंदनपुर वाली नव्हे, ही दुसरी बॉर्डर) उद्या 500 कोटी रुपये आणि हत्यारे घेऊन परदेशी माणसे येणार आहेत, ती ताब्यात घेतल्यास का.नाग आपला आपण तुम्हाला शोधत येईल असे ज्ञानामृत पाजतो.

सर्व सेना बॉर्डरवर हाजीर होते. धर्मेंद्र सत्तारला त्याचा दंड दाबून याद दिलवतो की त्याच्या दंडात ऑपरेशन करून स्फोटक गोळी घातली गेली आहे. होतकरू टेलरने रफू केल्यासारखी ती जखमही क्लोजप दाखवली जाते. सत्तार माहिती दिल्याबद्दल जान वाचव असे पुन्हा आठवून देत समोरच्या हथियार व पैसे देणाऱ्या गँगकडे जातो. चायनीज संवाद रिसर्चचे बजेट नसल्याने,"हिशी हिशिशी, मोशी मोशी", असले काही बोलणे चायनीज मानून घ्यावे लागते.

क्षणार्धात सत्तार अंडाकरी वाटीतून अंडे काढावे अशा सहजतेने रफू केलेली कातडी उसवत स्फोटक गोळी जखमेतून बाहेर काढून फेकतो आणि तो काळा नागशी गद्दारी कदापि करणार नाही, आता धर्मेंद्रची खैर नाही इत्यादी ओरडून सांगतो. पण धर्मेंद्रने याही शक्यतेचा विचार करून ठेवलेला असतो आणि दुष्मन टीम जिथे उभी आहे तिथे बारुद लावून ठेवलेले असतात (कधी? हे विचारणं व्यर्थ आहे). रिमोटने तो दणादण ते बारुद उद्ध्वस्त करतो आणि पुऱ्या गँगचा नाश करतो. या पिक्चरमध्ये विविध लोकांनी केलेला रिमोटचा उपयोग हेही वैशिष्ट्य आहे. डेड बॉड्या उचलणे, बारुद फोडणे वगैरेसाठी सगळेजण मनसोक्त रिमोट्स वापरतात. हाय टेक मामला नुसता!

कट टु का.नाग.
पैसे गेले ही बाब त्याच्या मनाला लागली आहे. इतक्यात अजित वाच्छानी तिथे येतो आणि अर्जुन ठाकूर कोण आहे याची आठवण करून देतो. पुन्हा एकदा सुषमा सेठच्या प्रतिज्ञेची उजळणी होते, शंकर ठाकूरला श्रद्धांजली दिली जाते. जिस घटनासे अजितला नागाचे तळवे चाटायची संधी मिळालेली असते आणि त्याचा चांदी का जूता अजितच्या डोक्यावर आलेला असतो ते नागला सर्व आठवते आणि तो अर्जुन ठाकूरशी मौत का खेळ सुरू झाल्याचा ऐलान करतो. देवकुमारचे पोट आणि इतर दोन हस्तक अर्जुन ठाकूरने आणखी तबाही केलीय हे सांगत येतात. सुरेंद्र पालही आंबट चेहऱ्याने धावत येतो (याला ते टॉयलेट उघडून द्या बुवा कुणी) आणि अर्जुनचे पत्र नागाच्या हाती देतो. त्याने कैदी बनवलेले लोक रिहा झाले आहेत आणि त्या ऋषिकन्या आपापल्या गावी गेल्यात असे लिवलेले असते (नो मोअर पाणी के फवारे).

अर्जुन सेनेचे ट्रेनिंग बघायला मिळते. बहुसंख्य सेना वर्दीश म्हणून उलट्या सुलट्या उड्या मारते, एका ढेंगेत चढून जाऊ अशा दगडाला दोरी बांधून रॉक क्लायंबिंग करते. जयाप्रदा व्यायाम म्हणून धर्मेंद्रला मिठ्या मारते आणि धर्मेंद्रला ट्रेनिंगची गरज नसल्याने तो ओव्हर-कम-रेनकोट घालून सुपरविजन करतो.

असे सर्व सुशेगात चालले असताना लवकरच का.नाग पलटवार करणार आहे हे त्या निरागसांच्या गावीही नसते.

अरे हे काय चालू आहे? एकाच चित्रपटाचे परीक्षण आहे कि वेगवेगळ्या? नक्की किती तासाचा सिनेमा आहे हा?
मध्येच परीक्षण वाचून बघावा वाटतो आणि मध्येच नको वाटतोय.
चित्रपट बघितल्यावरदेखील काही कळेल अशी आशा केव्हाच मावळली आहे. बाकी धागा आणि सगळे परीक्षण भयंकर हहपुवा.

अमेय जबराट Biggrin

चायनीज संवाद रिसर्चचे बजेट नसल्याने,"हिशी हिशिशी, मोशी मोशी", असले काही बोलणे चायनीज मानून घ्यावे लागते. >> रच्याकने इथे एक हुशारीने लपवलेले ईस्टर एग आहे. स.अ. आणि इतर गँग पूर्ण वेळ पाश्चिमात्य विदेशी ताकतोंसे व्यापार करताना दाखवली आहे. एकटा सत्तार पौर्वात्य विदेशी ताकत रिलेटेड माणूस आहे. आता सत्तर माणसे आणि सत्तार जरा फसलेली कोटी वाटते, जोगिंदरच्या आचरटपणामुळे ते पटकन लक्षात येत नाही. याचा उलगडा माझ्यामते तीन वर्षांनंतर आलेल्या अनिल शर्माच्याच तहलकामध्ये होतो. जेव्हा जनरल डाँग सत्तार सारखी शेंडी (अर्थात इथे बजेट वाढल्याने ती छान विंचरून तिची वेणी घातली आहे) बांधून सतार वाजवतो (आणि सत्ता गाजवतो) तेव्हा हेवन्स कम टुगेदर टू मेक सेन्स ऑफ द वर्ल्ड!

Rofl

पायस, अमेय ... अशक्य भारी लिहीताय तुम्ही!

व्हॉट आर यू सेंईंग? दुष्यंत..... >>> हा जबर्‍या होता! Lol

फ्लॅशबॅकमधल्या गाण्याचीही एक गंमत आहे. एकतर आधीच इतकी लोक तिथे असतात तर मग का. ना. गावातली माणसे म्हणून कोणाला आणतो.

आणि ती लोकंही अक्षऱश त्या गाण्यासाठी जबरदस्ती उचलून आणल्यासारखी दिसतात. एका कडव्यात शंकर ठाकूर गात गात त्यांच्या समोरून जातो तर मागचा एकही माणूस अथवा बाई त्याच्याकडे न बघता मख्खपणे समोर बघत त्याचा पोपट करतात.

राजेंद्रनाथ कॉमेडी रोलच करत असल्याने त्याला एकदम इमोसनल व्हायला जमत नाही. त्यामुळे तो लहान मुलांना पेट्रोल टाकून जाळले इतके भयानक कृत्याचे वर्स्णन करताना देखील मिशिक्ल हसतच असतो.
आणि त्याच्या मसाज पार्लरमधल्या मछलिया स्विमिंग कॉश्चुम घालून का वावरतात कोण जाणे. एकाच वेळी धर्मेंद्र जाडजूड कपड्याचा ओवरकोट, त्याचे साथीदार माफक कोट आणि मछलीया एकदम स्विमिंग कोटात.
साब मेरा धंदा जरूर कोठा है लेकिन हर देशभक्त की तरहा मै भी सीआरएफ का खात्मा होते हुए देस्खना चाहता हूं असा ड्वायलॉग देउन देशभक्ती फक्त सभ्य धंदा-नोकरीवाल्यांचीच भावना नाही हे अनिल शर्मांनी दर्शविले आहे.

त्या रीमा गाण्यात लिरिक्स तर यमकात आणि मीटरमध्ये बसत नाहीच मात्र संगीतसुद्धा मीटर/चालीत नाहिये. अध्येमध्येच टिंग टाँग डिंग्डॉम्ग अशी काहिही वाद्ये कुठेही वाजवली आहेत.राजस्थानचे अर्जुन ठाकुर गाण्यात एकदम लुधियानवी जाट बनतात
>>
ज्याप्रदाला वळीकल्यावर आतून एक्सप्रेशन काढत धर्मु,"गीता..", असे हंबरतो ते कधी उदास असलात तर जरूर बघा. ऑल उदासी विल मेल्ट अवे. >>> बर ते वळकायच्या वेळी जी अ‍ॅक्टिंग आहे ती शिट्टी वाजवल्याची अ‍ॅक्टिंग आहे. ड्रम, गिटार, आणि मग ट्रम्पेट वाजवून झाल्यावर धर्मपाजी शिट्टी वाजवत आहे म्युजिकवर

हिंदी सिनेमात मध्येच कुठे गाणी टपकतात, म्युजिक वाजते हा आरोप दूर करण्यासाठी गाण्यात मागे वाजेल तसे धरमपाजी जयाप्रदा पडद्यावर वाद्ये वाजवतात. एव्हडच नाही तर हिमालयात (एकदम राजस्थानातून थेट तिकडे बसमधून) जाताना बासरीचे सूर ऐकू येतात म्हणुन किन्नरच्या जागेवर बसलेला अन्नु कपूर हातात बासरी आडवी धरून वाजवण्याची अ‍ॅक्टिंग करतो. बॉब क्रिसोटोची चौकी उडवल्यावर सुधीरच्या हातात मेंडोलिन दिसते (हे बहुतेक सत्ते पे सत्ताच्या सेटवरून त्याने ढापून घरी नेले असणार)

त्या ऋशिकन्या अप्सरांवर पाणी मारताना ज्यांना पकडून कैदी म्हणुन ठेवले आहे ते एनडीए लष्कर एनसीसी अश्या युनिट्समधले काबील ट्रेन्ड जवान आहेत (ते मार्केटमधल्या चौकातून उचलून आणलेले दुकानात पुडी बांधणारे नोकरांसारखे दिसतात तो भाग वेगळा)

अ‍ॅसिडमध्ये फेकल्यावर माणसाचा नुसता सांगाडा उरतो इथवर ठिक आहे. त्याच्या कवटीत बोल्ट कसा काय बसतो ज्यात हूक अडकवून स.अ. रिमोट कन्ट्रोल सांगाडा ट्रेन चालवतो?

https://youtu.be/SV5TwjUoFoc?t=5482
या पॉइंटला स.अ.जेव्हा डायलॉग म्हणुन वळतो तेव्हा हातातला रिमोट त्या टिंगू पैलवानाच्या हातात देतो. उगाचच? छे, मॅनेजमेंट बाय डेलिगेशन दाखवले आहे

https://youtu.be/SV5TwjUoFoc?t=6612
तमाम हॉलीवूड वॉर मुवीज / सिरीज बघणार्‍या विदेशी औलादो, सैन्याचे ट्रेनिंग कसे द्यावे याचा वस्तुपाठ या सीनमध्ये घालून दिलेला आहे

अर्जुन ठाकुर केसरी टुर्समधून अमेरिकापण फिरून आलेत.
https://youtu.be/SV5TwjUoFoc?t=6920 इथे टोपी बघा बेहडों के राजा की

>>>
एका फ्रेममध्ये सत्तारला ठोसा मारल्यावर तो धडपडून उठतो तेव्हा त्याच्या पाठीला दोरीने बांधलेले खुर्चीचे फळकूट दिसते. साहजिक मूळ त्याला बांधून ठेवलेला एक सीन मध्ये होता हे आपल्याला कळते.
>>>

नाय तसे नाय. तो एक ठोसा लावल्यावर पुढला शॉट डायरेक्ट सत्तार मेढाला इन्टरॉगेशन रूममध्ये ठोसे हाणण्याचाच आहे. अधे मधे सीन नसावा कूठला

सिनेमा पाहिल्याशिवाय हा भन्नाट धागा वाचणे पाप, म्हणुन सिनेमा पाहूनच इथे हजेरी लावावी झालं.

जान बक्षा व काहीही माहिती उगलवा अशी ऑफर देतो>> Lol
सत्तार अंडाकरी वाटीतून अंडे काढावे अशा सहजतेने रफू केलेली कातडी उसवत स्फोटक गोळी जखमेतून बाहेर काढून फेकतो >> Lol

अरे वेलकम भाग १ भारीये की.... कितीतरी वेळा पाहिला आहे ना-अ-अ साठी.

हा एलानेजन्ग पाहिला पुनीत इ. मरेस्तोवर. कन्येला म्हटले होते की विनोदी सिनेमा पहात आहे पण कन्या निर्विकारपणे म्हणाली, 'आई हा सिनेमा विनोदी नाही, दॅट गाय जस्ट सेड 'हाय' टू अ स्नेक'. तिला हा विनोदी का ते कसे समजावू याचा सध्या विचार करत आहे.

निरीक्षणे पुढे चालू

१८) सत्तार मेढाचा अंत
अमेयने बर्‍याचशा गोष्टी कव्हर केल्या आहेत. उरलेले नोटेबल ईस्टर एग्ज असे
अ) धरमपाजींच्या मागे ब्रेकर्स लिहिलेले आहे. हे त्यांच्या बँडचे नाव असावे. एकंदरीत होणारी तोडफोड बघता ते सयुक्तिक वाटते.
ब) जोगिंदरची कलात्मक नेमबाजी - वल्गना करण्यापूर्वी गाणे संपल्यावर जोगिंदर बेछूट गोळीबार करतो. एकही गोळी कोणालाही लागत नसल्याने याने काय साध्य होणार असा आपल्याला प्रश्न पडतो. गोळ्या संपल्यावर लक्षात येते कि जोगिंदर यातून सी आर एफ लिहित होता. जनरली अशा सीन्समध्ये ७ सेगमेंट डिसप्लेस्टाईल अक्षरे असतात. जोगिंदर मात्र अत्यंत आकर्षक फाँटचा वापर करतो - डिफाईज बिलीफ!
क) खेळाडू सत्तार मेढा - काला नागच्या खर्‍या अनुयायाप्रमाणे जोगिंदरलाही खेळ खेळण्यात रस असतो. तो धरमपाजींसोबत बुद्धिबळ खेळतो (मैने तो शतरंज की एक चाल खेली थी - श्री. सत्तार मेढा मृत्युस सामोरे जाण्याच्या काही मिनिटे आधी). अर्जुन ठाकूरच्या मेंदुचे वजन सत्तार मेढाच्या मेंदुपेक्षा काही नॅनोग्रॅम जास्त असल्याने तो हा बुद्धिबळाचा खेळ जिंकतो व सत्तार मेढा मरतो.

१९) खेळाडू काला नाग २
१९.१) काला नाग का बचपन (?) - कोणाच्या खेळामध्ये कोणाचे खेळणे?
हाडाचा मॅनेजर असल्याने काला नागला एखाद दुसरा इंजिनिअर गेल्याने फारसे दु:ख होत नाही. पण एक क्वार्टरचे इनकम बुडाल्याची झळ त्याला असह्य होत आहे. अजित वच्छानी येऊन त्याला अर्जुन ठाकूर कोण आहे ते एकदाचे सांगतो. फ्लॅशबॅकमध्ये गेल्यावर त्याला आठवते की त्याने ठकुरायनला धरमपाजींसोबत खेळण्याचे वचन दिले होते. यावर तिनेही मोठा झाल्यावर धरमपाजी त्याच्या सोबत खेळतील असे वचन दिले होते. इथे नक्की खेळणे कोण बनणार या गहन प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न प्रेक्षक करत असताना काला नाग अजित वच्छानीला 'तुमने हमें हमारे बचपन की याद दिला दी' असे सांगून त्याची पाठ थोपटतो.
*प्रफुल मोड ऑन
ए प्रफुल ये बचपन क्या होता है?
बचपन हंसा! वो क्या है काला नाग का एक आदमी था - पन. पन शंकर ठाकूर को मारते वक्त काला नाग के साथ था. उस दिन शंकर ठाकूरने जब बॉम्ब फेंका तो काला नाग ने उसे ऐसे सावधान किया.
बच ... पन... बच ... पन - ओह बचपन
*प्रफुल मोड ऑफ
मूव्हिंग ऑन

१९.२) मर्जर कसे करावे?
काला नागचा संयम संपल्याने आता तो अर्जुनसोबत हैवानियत का खेल खेळणार असल्याची घोषणा करतो. इथे काला नागलाही जे जमले नाही ते मर्जर धरमपाजी करून दाखवतात. इट वॉज अ‍ॅक्चुअली व्हेरी सिंपल यु नो - लाख दुखों की एक दवा - फॅमिली साँग!!
फॅमिली साँगची पुढची कडवी म्हणता म्हणता ट्रेनिंग होते, ते पकडले गेलेले एनडीए लष्कर एनसीसी अश्या युनिट्समधले काबील ट्रेन्ड जवान धर्मेंद्राच्या सेनेत दाखल होतात. गाणे संपता संपता मध्येच धर्मेंद्राला काय वाटते कोणास ठाऊक तो एक स्लीपिंग बॅग भिरकावतो आणि ती आणायला सुधीर तिच्यामागे धावतो. इथे सुरु होतो हैवानियत का खेल!

१९.३) हैवानियत का खेल
हे सर्व चालू असताना काला नागने आपली माणसे पाठवून चंदनपुरातल्या अनेक लहान मुलांना मारून टाकलेले असते आणि त्यांची प्रेते या ट्रेनिंग चालू असलेल्या जागी आणून ठेवलेली असतात. सुधीर बॅग आणायला जातो तेव्हा त्यांच्या ते ध्यानात येते. इतका वेळ त्या जागेकडे त्यांची पाठ असल्याने सार्वकालिक अ नि अ नियमांनुसार अर्थातच त्यांना हे काही घडताना दिसलेले नसते. या गोंडस बालकांच्या केसांनाही धक्का न लागू देता, टकाटक तयार करून मारण्याचे कसब असल्याने हैवानियत का खेलची पहिली बाजी काला नाग मारतो. (ओह इट्स ऑल हॅपनिंग हिअर, काला नाग इज ऑन फायर. आय कॅन टेल या ऑल द पीपल वॉचिंग धिस ऑन यू ट्युब विल बी डान्सिंग इन देअर चेअर्स, कॉज दे हॅव नेव्हर सीन अ ग्रेटर प्लेआ दॅन काला नाग)
नफरत की फॅक्टरीमध्ये तयार झालेला किमती खिलौना, अर्थात अर्जुन ठाकूर, याच्यासाठी काला नाग एक चिठ्ठी सोडतो आणि त्याला इतर मुलांना वाचवण्यासाठी एका तासाच्या आत झिरो ब्रिजवर बोलावतो. एका तासात फ्रेश होऊन धर्मेंद्र त्या पूलावर पोहोचतो तर इथे अनेक बायका मरून पडलेल्या असतात. बरोबरच आहे, काला नागने फक्त लहान मुलांना सोडण्याचे वचन दिले होते. पत्रात काला नाग धरमपाजींना अजून शिव्या घालतो (या सर्व शिव्या स.अ.च्या आवाजात याची देही याची डोळा अनुभवण्याची गोष्ट आहे) आणि कॅम्पवर सोडलेले कैदी चेक करायला सांगतो.
कॅम्पला परतल्यावर बघतात तर संपूर्ण कॅम्प बेचिराख झालेला असतो. ते सगळे जवान मारले गेलेले असतात.

१९.४) फोरशॅडोइंग
इथे एक माईंडब्लोईंग गोष्ट नमूद केलीच पाहिजे. मडक्याचा सीन आठवा - इथे काला नाग शंकर ठाकूरला गावाला डसण्याची धमकी देतो. ती खूप स्पेसिफिक धमकी आहे. तो म्हणतो की मी आधी गावातल्या मुलांना डसेन (चंदनपुरातील मुले), मग बायकांना डसेन (ऋषिकन्या) मग पुरुषांना डसेन (ते सर्व जवान) आणि शेवटी म्हातार्‍यांना. फोरशॅडोइंग अ‍ॅट इट्स व्हेरी बेस्ट!! इथे अ‍ॅब्सोल्युटली ऑब्व्हियस म्हातारे टार्गेट्स - ठकुरायन, दारा सिंग आणि धरमपाजी स्वतः. ठकुरायन आणि धरमपाजी मरून चालणार नसल्याने हैवानियत का खेलमध्ये पुढचा नंबर दारा सिंगचा लागणार हेही अधोरेखित होते.

असो तर बॅक टू कॅम्प. बेचिराख कॅम्प बघून बसलेल्या धक्क्यातून सावरतात ना सावरतात तोच हेलिकॉप्टर्स घोंघावू लागतात. धरमपाजी, जयाप्रदा व उरलेले लोक गोंधळून आकाशात बघतात व त्यांना तेच दिलखुलास हास्य ऐकू येते. द मॅन हिमसेल्फ, काला नाग एंटर्स द फ्रे.

बाप रे! अशक्य लिहीलंय...हसून हसून पुरेवाट.
चायनीज संवाद रिसर्चचे बजेट, पकडलेल्या बायकांना मंदाकिनी स्टाईल साडी नेसवून पाण्याचे फवारे मारून भिजवणे...म्हणजे अतीव टॉर्चर हे अनिल शर्माला कुठल्या तारेत असताना सुचले याची उत्सुकता आहे....फारच मस्त!
सत्तर माणसे आणि सत्तार....?? हे काय आहे? इतकी महाभयंकर बिनडोक कोटी कुणाला सुचली? टुटू शर्माला? हा आपल्या पद्मिनी कोल्हापुरे चा नवरा ना हा? बिचारी!!!! तेव्हा काय माहिती हा असा निघेल ते!!

बघितलाच मी फाफॉ करत काल..
मधेच एक गाणे येते जयाप्रदाने काळा-+ सिल्व्हर ड्रेस घातला होता.. नंतर फ्रिल्ल्ल्ल वाला ड्रेस काय वर्णावा.. फोटो जमला तर टाकेन..
पण मजा म्हणजे.. धर्मेंद्र तर आहेच पण त्याचे मित्र पण गाण्यात तिची छेड काढत आहेत.. बरोबर बघितल ना मी.. Uhoh

Cast
Actor Character in the movie
Dharmendra :- Thakur Arjun Singh
Jaya Pradha :- Reema
Dara Singh :- Bheema
Sadashiv Amrapurkar :- Kaala Naag (CRF's Chief)
Annu Kapoor :- Arjun Singh's Man
Arun Bakshi :- Indina Soldier
Chandrashekhar :- Villager
Vikram Gokhale :- Inspector Vijay Singh
Sushma Seth :- Arjun Singh's Mother
Bob Christo :- Kaala Naag's Henchman
Praveen Kumar :- Kaala Naag's Henchman
Puneet Issar :- Raj Shekhar (CBI Officer)
Joginder Shelly :- Sattar
Dev Kumar :- Vikraal
Rajan Haksar :- Jamindaar
Suhas Joshi :- Guest Role
Rajendra Nath :- Villager
Viju Khote :- Inspector Khote
Guddi Maruti :- Villager
Surendra Pal :- Kaala Naag's Henchman
Bhushan Tiwari :- Kaala Naag's Henchman
Sudhir Pandey :- Arjun Singh's Father
Tiku Talsania :- Villager
Chand Usmani :- Villager
Gurbachchan :- Arjun Singh's Man
Lilliput :- Arjun Singh's Man
Sudhir :- Arjun Singh's Man
Ajit Vachani :- Corrupt Police Officer

Pages