शब्द

Submitted by कायानीव on 2 August, 2017 - 00:49

ते जगीं भासे, असे जे आपल्याची अंतरी
दर्शनी जे भूत आहे, मानसीं भासे 'परी'

शब्द आहे खड्ग मित्रा, पारखोनी सांड रे
धार याची दोन बाजू ,गोष्ट ही आहे खरी

शब्द जे काही विषारी, साखरीं पेरून दे
ऐकता ते शब्द, वाटो ऐकणाऱ्या शायरी

अर्थ मी लावून शब्दा, मज हवा तो पाहतो
मालकी येथे मनाची, शब्द करतो चाकरी

शब्द माझे स्वामी असता, नित्य राही मी मुका
शब्द व्हावे दास आता, श्वास व्हावा वैखरी

शर्यती हा भाग आता, आपल्या जगण्यातला
जिंकता सोडू नको तू, आपली पण पायरी

©मनीष पटवर्धन
मो. ९८२२३२५५८१

Group content visibility: 
Use group defaults