जगात देव आहे..! जय श्रावणी सोमवार :)

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 July, 2017 - 16:05

कधीकधी आपल्या आयुष्यात अश्या काही घटना घडतात की जगात देव आहे यावर एखाद्या अट्टल नास्तिकालाही विश्वास ठेवावा लागतो.
असाच आजचा एक दिवस उजाडला.. सकाळचाच ताजा ताजा किस्सा!

ट्रेनचा पास नेमका केव्हा संपतो हे माझ्या कधीच लक्षात राहत नाही. ते लक्षात राहण्यासाठी नवीन पास घेण्याच्या दिवसाचा अलार्म लावून ठेवायचा असे मी दरवेळी ठरवतो. आणि ते देखील विसरतो. आजचा दिवसही काही त्याला अपवाद नव्हता. ऑफिसचा पहिला वार सोमवार आणि आदल्या रात्रीची गटारीची पार्टी, असा डबल हॅंगओवर उतरलेला नव्हता. डोळे आणि डोके, दोन्ही अर्धवट मिटलेल्या अवस्थेत स्टेशनला पोहोचलो. समोरून ट्रेन आली. मुंबईकर असण्याच्या लौकिकाला जागत नेमक्या वेळी पोहोचलो याचा अभिमान वाटला. पावसाळा सुरू झाला की मी एक ट्रेन आधीचीच पकडतो. कारण या दिवसांत मुंबई लोकल देखील आपल्या लौकिकाला जागत एक दिवसाआड पाचदहा मिनिटे उशीरा येत असते. आज मात्र वेळेवर आली. मी माझा डब्बा बघून चढणार तसे शेजारच्या डब्यातून एक टिसी एका भुरट्या ईसमाची कॉलर पकडून खाली उतरत होता. ते बघून माझे अर्धवट मिटलेले डोळे खाडकन उघडले. कारण आपला पास संपलाय हे मला आठवले. मी या दाराने चढलो आणि त्या दाराने उतरलो. सरळ जिना गाठला आणि ब्रिज ओलांडून तिकिटाच्या लाईनीत जाऊन उभा राहिलो. मनोमन देवाचे आभार मानले, रस्त्यात कोणीही काळा कोट भेटला नाही. म्हणजे बोलायलाच काळा कोट, बाकी हल्ली हे लोकं कुठल्याही रंगाचे झाकडुम माकडुम कपडे घालून फिल्डींग लावून उभे असतात.

असो, तर मोजून सातच जण रांगेत होते. पण चारच मिनिटात ट्रेन येणार होती. सातापैकी तिघांच्या हातात जुना पास दिसत होता. म्हणजे वेळखाऊ प्रकरण होते. आता तिकीटखिडकीवरच्या व्यक्तीचा कामाचा वेग काय किती असणार होता यावर माझा लेटमार्क होणार की नाही हे अवलंबून होते. रांगेच्या थोडेसे बाहेर येत हत्तीने सोंड काढावी तसे पुढच्या बाजुला मुंडी वळवून पाहिले तर आतमध्ये एक बाप्या बसलेला दिसला. निम्मे अवसान तिथेच गळून पडले. माझ्या आजवरच्या अनुभवानुसार तिकीटखिडकीवर बाई असली की तिचा हात झरझर चालतो, पण पुरुष असला की मेल्यांची फार टंगळमंगळ असते. त्यात त्याचीही कालची गटारी उतरली नसेल तर झाली माझी डोंबिवली. मला पुढचीच्या पुढची ट्रेन मिळतेय की नाही याचीही आता चिंता वाटू लागली.

पुढच्या दोन मिनिटात रांग केवळ दोनच पावले पुढे सरकली आणि प्रत्येक सेकंदागणिक वाढता रिक्वायर्ड रनरेट पाहता माझी चुळबूळ वाढू लागली. काळ-काम-वेगाचे गणित क्षणाक्षणाला गंडत होते, पण अचानक से बंद तकदीर का दरवाजा खुल गया तसे चमत्कार झाला आणि शेजारची बंद खिडकी उघडत तिथे एक अप्सरा अवतरली. एका चेंडूत सात धावा हव्या असताना नो बॉलवर फ्री हिट.. मी दोनच पावलात ती खिडकी गाठली. पण हातातले पास-पैसे आत सरकावणार ईतक्यात एका जाडजूड केसाळ राकट हाताने माझा हात मागे सारत तिथे आपला हात घुसवला. मी काही बोलणार तोपर्यंत आतल्या बाईने त्याच्या हात हातातील पास स्विकारून झाला होता. मी चरफडत मागेच थांबलो. कुठल्याही क्षणाला माझी ट्रेन येणार होती आणि अजून माझा पास काढायचा बाकी होता. एक नजर समोरच्या खिडकी आणि बाईवर, एक नजर प्लॅटफॉर्म आणि ट्रेनवर, तर एक नजर ईंडिकेटर आणि घड्याळावर. टिक टिक काटे टाईमबॉम्बसारखे डोक्यात वाजत होते, तोच माझ्या मागची मुलगी मोठ्याने ओरडली......., शिऽऽऽट !!

तिचा आवाज कानावर पडायच्या एक मिलिसेकंद आधी अगदी तसाच एक आवाज कानावर आदळला होता.. शिट !!! पुढे पाहिले तर हसू आवरले नाही. खरे तर हसू, किळस, सहानुभूती अश्या बरेच भावना एकाचवेळी मनात दाटून आल्या. पण मुद्दामच मी त्यातले हसू चेहर्‍यावर आणले. त्या माणसाचा चेहरा अगदी सेल्फी काढण्यासारखा झाला होता. पुढे आलेल्या केसांच्या झुलपांना ओझरता स्पर्श करत, कपाळावर शिंतोडे उडवत, चष्याची काच बरबटवत, नाकाच्या शेंड्याचे चुंबन घेत एक पातळ तार हनुवटीपर्यंत येऊन लटकली होती. गुटूर गुटूर कबुतराने आपले काम केले होते. आणि अजूनही ते तिथेच वरच्या दांडीवर निवांत बसून होते. काय ती हिंमत!

थोड्यावेळापूर्वी मला त्या रांगेत घुसलेल्या माणसाशी हुज्जत घालायची हिंमत झाली नव्हती. किंबहुना त्याचा काही उपयोगही होणार नव्हता, झाल्यास माझाच आणखी वेळ फुकट जाणार होता. आणि हे त्याला देखील माहीत असल्याने परीस्थितीचा फायदा उचलत तो मध्ये घुसला होता. पण वरून आणखी कोणीतरी बघत होता. म्हणूनच तो जो सर्वात वर बसला आहे त्याने कबूतराचे रूप धारण करत वरूनच त्याला धडा शिकवला. अगदी असेच मनात आले.
त्याच वेळी दुसरा विचार मनात आला तो असा, जर तो माणूस रांगेत घुसला नसता तर त्या जागी मी उभा असतो आणि माझी शिकार झाली असती. ईथून तिथून कसाही विचार करता देव माझ्याच मदतीला धावून आला होता.

बस्स याच उपकाराची जाणीव म्हणून मी आयुष्यात पहिल्यांदाच श्रावण पाळायचा निर्णय घेतला आहे. कितपत जमते हे महिन्याभरात समजेलच. पण जर खरेच तो वर बसला असेल तर तोच हिंमत देईल आणि तोच तारून नेईल Happy

(सत्यकथन)
- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कबुतर जा जा जा ऽऽऽ
कबुतर जा
पहीले प्लॅटफॉर्म पे, ऋ को छोडके,
आडदांडपे शिटके आ.
कबुतर जा जा जा ऽऽऽ

दारु समर्थक कुठेही सुरु होतात. श्रद्धेचा धागा आहे याचे पण त्यांना भान रहात नाही. चहाचे समर्थक असे कुठेही 'चहा पिणे वाईट नाही, अती चहा पिणे वाईट' तोकडे समर्थन करताना दिसत नाहीत.

हा सुद्धा मोठा फरक आहे दारु आणि चहामध्ये.

{{{ मी इथे श्रद्धेच्या गप्पा मारतोय आणि तुम्ही अंधश्रद्धेला मध्ये आणत आहात }}}

दाभोळकर म्हणायचे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा असा काही फरक नसतोच. असलाच तर विश्वास आणि श्रद्धा असा फरक असतो. विश्वास हा पुराव्यावर आधारित असतो म्हणजे मी ऋन्मेषना भेटलो आणि त्यांना अस्ताव्यस्त वाढलेले केस, दाढी या अवतारात गर्ल्फ्रेंडसोबत पाहिले आणि त्यांच्या लेखनातला मजकूर खरा आहे हे मान्य केले याला म्हणतात विश्वास. याउलट माझी ऋन्मेषवर श्रद्धा आहे म्हणजे त्यांनी काहीही लिहिले तरी ते खरे असेच मी मानतो त्याकरिता मला कुठल्या पुराव्याची गरज नाही ही झाली श्रद्धा. तेव्हा पुराव्याची गरज नसलेली श्रद्धा म्हणजेच अंधविश्वास. म्हणून श्रद्धा = अंधश्रद्धा. आता मी हे जे काही लिहिलंय ते दाभोळकरांचंच मत होतं. खोटं वाटत असेल तर दाभोळकरांच्या आत्म्याला विचारुन कन्फर्म करु शकता. बाय द वे, आत्मा असतो निदान दाभोळकरांचा तरी आहे आणि त्याच्याशी संपर्क साधता येतो. खोटं वाटत असेल तर महाराष्ट्रात कधी काळी पुरोगामी विचारसरणीचं सरकार होतं तेव्हा पुण्याचे तत्कालीन पोलिस कमिशनर श्री. गुलाबराव पोळ यांनी प्लँचेट करुन दाभो़ळकरांच्या आत्म्याशी संपर्क साधला होता ही माहिती कन्फर्म करु शकता.

हे फार गंडलेले तोकडे समर्थन नेहमी दारूबाबत येते..
अति केलेली कुठचीही गोष्ट वाईटच..
पण अति चहा पिणे आणि अति दारू पिणे यात काहीच फरक नाही का?
आणि थोडीशी चहा पिणे आणि थोडी दारू पिणे हे एक समान आहे का?
असो, ईथे दारूची चर्चा अवांतर होईल, विषय श्रावणातल्या कबूतराचा आहे..
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 26 July, 2017 - 00:17

>>>
ऋ,
मला वाटते, वरील प्रतिसादात बोल्ड केलेल्या वाक्याचा अर्थ तुम्हाला ठाऊक असेलच.

श्रावणातले कबुतर जिवंत असते आणि स्वच्छंदपणे बागडत असते विधी करत असते.
इतर महिन्यातले कबुतर शिजुन ऋन्मेषच्या आतड्यात चिरनिद्रा घेत असते.

हा फरक आहे.

एक जुनी जपानी म्हण आठवली. जिचा हिंदीत साधारण अर्थ असा, जेव्हा एक नास्तिक आस्तिक बनायच्या वाटेवर चालू लागतो तेव्हा त्याच्या मार्गात खडे टाकणारे ईतर आस्तिकच असतात.
ईथल्या चर्चेला वा कोणाला उद्देशून नाही, माझी आज्जी लहानपणी बोलायची ती सहज आठवली ईतकेच.

असो, यापुढे मी कबूतर किंवा कावळा, शिजवून किंवा कच्चा, खाणार किंवा गिळणार नाही हे नक्की. धर्मराजाला स्वर्गाचा रस्ता एका कुत्र्याने दाखवला होता, मला एका कबूतराने दाखवला. कारण ते एक श्रावणी कबूतर होते..

ऋ,
मला वाटते, वरील प्रतिसादात बोल्ड केलेल्या वाक्याचा अर्थ तुम्हाला ठाऊक असेलच.
>>>>

मला मगाशी मोबाईलवरून बोल्ड केलेले वाक्य दिसतच नव्हते Happy
आता लॅप टॉप उघडला आणि दिसले. मास्तरांच्या कानावर घालायला हवे हे ..

येनीवेज, ती सुद्धा एक म्हण आहे. अति तिथे माती. पण दारूबाबत कमी तिथेही मातीच असते. असो, धागा दारूचा नाहीये, विषय निघालेला म्हणून मोह आवरला नाही ईतकेच.

__/\__

हा धागा वर आला, म्हणजे शतक नक्की Lol
ऋ, आपलं परीवर्तन झालं की नाही मग?? म्हणजे माझ्या रॉयल्टीचा धागा... Wink Lol

धाग्याचे 100 प्रतिसाद झाले की माबो काही रककम देते का?
हे मी सिरियसली विचारतोय.. मला खूप दिवसापासून हा प्रश्न आहे.

धाग्याचे 100 प्रतिसाद झाले की माबो काही रककम देते का?
>>>>
हो, पण किती ते सांगू शकत नाही. आणि काही कंडीशन्स अप्लाय आहेत, तुम्ही स्वताच दोन आयडी काढून पोस्ट टाकत राहाल आणि १०० कराल असे नाही चालत.

@ श्रावण, मी दुसर्‍या आठवड्याच्या शुक्रवारी चिकन बिर्याणीची पार्टी करून सोडला. त्यानंतर अजून दोन चिकन बिर्याणीच्या पार्ट्या झाल्या. अध्येमध्ये किती नॉनवेज खाल्ले त्याची गिणतीच नाही. देव तुमच्याकडे शाकाहारी बना अशी मागणी करत नाही हे सत्य मला उमगले

ऑफिसचा पहिला वार सोमवार आणि आदल्या रात्रीची गटारीची पार्टी, असा डबल हॅंगओवर उतरलेला नव्हता.

अट्टल दारु विरोधकांनी दारु प्यायला सुरुवात केल्याबद्दल अभिनंदन.

गटारीची पार्टी म्हणजे कोंबड्या चापायच्या असतात हो. कारण श्रावणात मांसाहार करायचा नसतो. दारू पिणारे श्रावणात सोडत असतील असे वाटत नाही. कारण ते एक व्यसन असते.

रूनमेश.. तू दारू पितोस तर त्यात चुकीचे काही नाही.
पितोस आणि विरोध करतोस ते चुकीचे आहे. खुल के जियो और पियो भाई ☺️

च्रप्स, माझ्या वाईट सवयींची मालिका आपणही वाचली असेलच. पित असतो तर ते लपवले नसते. आपले दुर्गुण आणि वाईट सवयी कधी लपवू नयेत. मी दारूला विरोध करतो ते दारू पिणार्‍यांच्या कुटुंबीयांच्या काळजीने. बरीच वाताहात होताना पाहिली आहे मी जवळच्यांमध्ये..

Pages