कधीकधी आपल्या आयुष्यात अश्या काही घटना घडतात की जगात देव आहे यावर एखाद्या अट्टल नास्तिकालाही विश्वास ठेवावा लागतो.
असाच आजचा एक दिवस उजाडला.. सकाळचाच ताजा ताजा किस्सा!
ट्रेनचा पास नेमका केव्हा संपतो हे माझ्या कधीच लक्षात राहत नाही. ते लक्षात राहण्यासाठी नवीन पास घेण्याच्या दिवसाचा अलार्म लावून ठेवायचा असे मी दरवेळी ठरवतो. आणि ते देखील विसरतो. आजचा दिवसही काही त्याला अपवाद नव्हता. ऑफिसचा पहिला वार सोमवार आणि आदल्या रात्रीची गटारीची पार्टी, असा डबल हॅंगओवर उतरलेला नव्हता. डोळे आणि डोके, दोन्ही अर्धवट मिटलेल्या अवस्थेत स्टेशनला पोहोचलो. समोरून ट्रेन आली. मुंबईकर असण्याच्या लौकिकाला जागत नेमक्या वेळी पोहोचलो याचा अभिमान वाटला. पावसाळा सुरू झाला की मी एक ट्रेन आधीचीच पकडतो. कारण या दिवसांत मुंबई लोकल देखील आपल्या लौकिकाला जागत एक दिवसाआड पाचदहा मिनिटे उशीरा येत असते. आज मात्र वेळेवर आली. मी माझा डब्बा बघून चढणार तसे शेजारच्या डब्यातून एक टिसी एका भुरट्या ईसमाची कॉलर पकडून खाली उतरत होता. ते बघून माझे अर्धवट मिटलेले डोळे खाडकन उघडले. कारण आपला पास संपलाय हे मला आठवले. मी या दाराने चढलो आणि त्या दाराने उतरलो. सरळ जिना गाठला आणि ब्रिज ओलांडून तिकिटाच्या लाईनीत जाऊन उभा राहिलो. मनोमन देवाचे आभार मानले, रस्त्यात कोणीही काळा कोट भेटला नाही. म्हणजे बोलायलाच काळा कोट, बाकी हल्ली हे लोकं कुठल्याही रंगाचे झाकडुम माकडुम कपडे घालून फिल्डींग लावून उभे असतात.
असो, तर मोजून सातच जण रांगेत होते. पण चारच मिनिटात ट्रेन येणार होती. सातापैकी तिघांच्या हातात जुना पास दिसत होता. म्हणजे वेळखाऊ प्रकरण होते. आता तिकीटखिडकीवरच्या व्यक्तीचा कामाचा वेग काय किती असणार होता यावर माझा लेटमार्क होणार की नाही हे अवलंबून होते. रांगेच्या थोडेसे बाहेर येत हत्तीने सोंड काढावी तसे पुढच्या बाजुला मुंडी वळवून पाहिले तर आतमध्ये एक बाप्या बसलेला दिसला. निम्मे अवसान तिथेच गळून पडले. माझ्या आजवरच्या अनुभवानुसार तिकीटखिडकीवर बाई असली की तिचा हात झरझर चालतो, पण पुरुष असला की मेल्यांची फार टंगळमंगळ असते. त्यात त्याचीही कालची गटारी उतरली नसेल तर झाली माझी डोंबिवली. मला पुढचीच्या पुढची ट्रेन मिळतेय की नाही याचीही आता चिंता वाटू लागली.
पुढच्या दोन मिनिटात रांग केवळ दोनच पावले पुढे सरकली आणि प्रत्येक सेकंदागणिक वाढता रिक्वायर्ड रनरेट पाहता माझी चुळबूळ वाढू लागली. काळ-काम-वेगाचे गणित क्षणाक्षणाला गंडत होते, पण अचानक से बंद तकदीर का दरवाजा खुल गया तसे चमत्कार झाला आणि शेजारची बंद खिडकी उघडत तिथे एक अप्सरा अवतरली. एका चेंडूत सात धावा हव्या असताना नो बॉलवर फ्री हिट.. मी दोनच पावलात ती खिडकी गाठली. पण हातातले पास-पैसे आत सरकावणार ईतक्यात एका जाडजूड केसाळ राकट हाताने माझा हात मागे सारत तिथे आपला हात घुसवला. मी काही बोलणार तोपर्यंत आतल्या बाईने त्याच्या हात हातातील पास स्विकारून झाला होता. मी चरफडत मागेच थांबलो. कुठल्याही क्षणाला माझी ट्रेन येणार होती आणि अजून माझा पास काढायचा बाकी होता. एक नजर समोरच्या खिडकी आणि बाईवर, एक नजर प्लॅटफॉर्म आणि ट्रेनवर, तर एक नजर ईंडिकेटर आणि घड्याळावर. टिक टिक काटे टाईमबॉम्बसारखे डोक्यात वाजत होते, तोच माझ्या मागची मुलगी मोठ्याने ओरडली......., शिऽऽऽट !!
तिचा आवाज कानावर पडायच्या एक मिलिसेकंद आधी अगदी तसाच एक आवाज कानावर आदळला होता.. शिट !!! पुढे पाहिले तर हसू आवरले नाही. खरे तर हसू, किळस, सहानुभूती अश्या बरेच भावना एकाचवेळी मनात दाटून आल्या. पण मुद्दामच मी त्यातले हसू चेहर्यावर आणले. त्या माणसाचा चेहरा अगदी सेल्फी काढण्यासारखा झाला होता. पुढे आलेल्या केसांच्या झुलपांना ओझरता स्पर्श करत, कपाळावर शिंतोडे उडवत, चष्याची काच बरबटवत, नाकाच्या शेंड्याचे चुंबन घेत एक पातळ तार हनुवटीपर्यंत येऊन लटकली होती. गुटूर गुटूर कबुतराने आपले काम केले होते. आणि अजूनही ते तिथेच वरच्या दांडीवर निवांत बसून होते. काय ती हिंमत!
थोड्यावेळापूर्वी मला त्या रांगेत घुसलेल्या माणसाशी हुज्जत घालायची हिंमत झाली नव्हती. किंबहुना त्याचा काही उपयोगही होणार नव्हता, झाल्यास माझाच आणखी वेळ फुकट जाणार होता. आणि हे त्याला देखील माहीत असल्याने परीस्थितीचा फायदा उचलत तो मध्ये घुसला होता. पण वरून आणखी कोणीतरी बघत होता. म्हणूनच तो जो सर्वात वर बसला आहे त्याने कबूतराचे रूप धारण करत वरूनच त्याला धडा शिकवला. अगदी असेच मनात आले.
त्याच वेळी दुसरा विचार मनात आला तो असा, जर तो माणूस रांगेत घुसला नसता तर त्या जागी मी उभा असतो आणि माझी शिकार झाली असती. ईथून तिथून कसाही विचार करता देव माझ्याच मदतीला धावून आला होता.
बस्स याच उपकाराची जाणीव म्हणून मी आयुष्यात पहिल्यांदाच श्रावण पाळायचा निर्णय घेतला आहे. कितपत जमते हे महिन्याभरात समजेलच. पण जर खरेच तो वर बसला असेल तर तोच हिंमत देईल आणि तोच तारून नेईल
(सत्यकथन)
- ऋन्मेष
धन्य आहात _/\_.
धन्य आहात _/\_.
आता ही नवी सोमवारची कथा
आता ही नवी सोमवारची कथा म्हणावी काय?
आणखी काही अडचणींवर आणखी काही वारकथा येणार!
आरे व्वा!!!
आरे व्वा!!!

एका नास्तिकाचा आस्तिक होणं हे रूपांतरण मायबोली प्रत्यक्ष पहाणार तर... धन्य ती मायबोली धन्य आमचे ऋ अन् धन्य तो श्रावण... बोलो ओम नम: शिवाय.....
रुमणेश ने सरावन पाळला आणि
रुमणेश ने सरावन पाळला आणि मटणाचा धंदाच बसला !
सरावन वरनं आठवलं. सारावणा भवन
सरावन वरनं आठवलं. सारावणा भवन आहे का मुंबईत?
बसू दे धंदा.. महिन्याभरासाठीच
बसू दे धंदा.. महिन्याभरासाठीच बसेल ना.. लहान वासरांना आणि कोंबड्याबकरीच्या पिल्लांना अनाथ करत वर्षभर आपल्या बायकापोरांची पोटे भरली जातातच ना.. महिनाभर ही सहन करता येऊ नये. आणि बसला धंदा तर घरीच का बसावे. महिन्याभरासाठी एखाद्या मंदिराबाहेर हारफुले नाही का विकता येणार. ज्याला आपला उदरनिर्वाह करायचा आहे तो कसाही करतो, मला हेच जमते आणि मी हेच करणार असे हट्ट या जगात चालत नाहीत.
राहुल,
राहुल,
एखादा नास्तिकच कट्टर आस्तिक होऊ शकतो कारण तो जन्मजात आंधळेपणाने देवावर विश्वास न ठेवता अनुभव घेऊन, चाखून पडताळून मगच आपला विश्वास देवाला अर्पण करतो... असे मागे मी कुठेतरी वाचलेले.
कदाचित हे चबूतर माझ्या आयुष्यात तोच विश्वास द्यायला आले असेल..
अरे व्वा!
अरे व्वा!

माझा तर गैरसमज्च झालेला..म्हटल हा लेख वाचनार च नाहि,काहिबाहि उअदाहरण देउन देव कसा नाहि हे अस लिहिल असेल...
पण हा तर चमत्कारच झाला...
देव पहायचा नसतो...तो अनुभवायचा असतो... मी तर रोज अनुभवते.
ऋन्मेश आता विश्वास ठेव ताय हे तर छानच आहे..पण आंधळा विश्वास नको..हे हि लक्षात असु द्या....
एखादा नास्तिकच कट्टर आस्तिक
एखादा नास्तिकच कट्टर आस्तिक होऊ शकतो कारण तो जन्मजात आंधळेपणाने देवावर विश्वास न ठेवता अनुभव घेऊन, चाखून पडताळून मगच आपला विश्वास देवाला अर्पण करतो... असे मागे मी कुठेतरी वाचलेले.>>> +१११
तुम्ही नवेनवे आस्तिक झाले
तुम्ही नवेनवे आस्तिक झाले आहात त्यामुळे तुमची ओळखण्यात चूक झालीये. देव कबुतराच्या नाही तर त्या आडदांड प्रवाशाच्या रुपात आला होता.
भारी!!!
भारी!!!
देव कबुतराच्या नाही तर त्या
देव कबुतराच्या नाही तर त्या आडदांड प्रवाशाच्या रुपात आला होता.
>>>>>
हे ही शक्यंय. मी लेखात दुसरा विचारही मांडला आहेच.
हे ही शक्यंय. मी लेखात दुसरा
हे ही शक्यंय. मी लेखात दुसरा विचारही मांडला आहेच.
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 25 July, 2017 - 13:49
.... हे ही शक्य आहे मी दुसरा लेख लिहितो, असे वाचले मी.
भारी साक्षात्कार!!
भारी साक्षात्कार!!
रेल्वे तिकिटाच्या रांगेतला हा पहिलाच!
मागच्या आठवड्यात एक गम्मत म्हणून सुरेशप्रभु यांना ट्विटरवरून एक तक्रार आणि एक चांगली गोष्ट ऐकवली होती. काल मला उत्तर आले thanks for appreciation.
सोमवारची कथा पाठवायची का?
मी दुसरा लेख लिहितो, असे
मी दुसरा लेख लिहितो, असे वाचले मी.
>>>>
नशीब दुसरया आयडीने लिहितो असे नाही वाचले आपण
सोमवारची कथा पाठवायची का?
सोमवारची कथा पाठवायची का?
>>>>
कुठली? ही?
कोणाला? साक्षात प्रभूंना?
नशीब दुसरया आयडीने लिहितो असे
नशीब दुसरया आयडीने लिहितो असे नाही वाचले आपण >>>>>>
....मग तर आज गोंधळ झाला असता..
मग तर आज गोंधळ झाला असता..
मग तर आज गोंधळ झाला असता..
>>>>
हा हा.. वरचे वाक्य लिहिताना माझ्याही मनात हेच आलेले. पण तुझ्यातील कवितेचा किडा हा आपल्यातील व्यवच्छेदक फरक आहे
रा=ऋ?
रा=ऋ?
तुझ्यातील कवितेचा किडा हा
तुझ्यातील कवितेचा किडा हा आपल्यातील व्यवच्छेदक फरक आहे >>>
हो नक्कीच...
अजूनही खुप फरक आहेत..
अर्थातच! जगातल्या कुठल्याही
अर्थातच! जगातल्या कुठल्याही दोन बिंदूंमध्ये फरक असतोच. हाच ईश्वराचा महिमा आहे. जेव्हा लक्षात येतो तेव्हा आपण ड्यू आयडी वगैरे बाष्कळ गप्पांपासून दूर त्या महान परमेश्वराच्या गुणगाणात तल्लीन होतो.
केवळ कबूतर शिटल्यामुळे
गटारीला जास्तंच खाल्य्यमुळे हॅंगोवर होऊन वेळीअवेळी एक कबूतर शिटल्यामुळे मायबोलीवर दोन धागे आणि ६० प्रतिसाद ऊगवल्यामुळे आमचा देवावरंचा ऊरला सुरला भरवसा ही ऊडाला आता.


'दिव्या गीर्वाणभारती' अशी संस्कृत जाऊन 'थापा जीर्वाणभारती' अशी 'मायबोली' अद्धुनिक देवांची भाषा झाली असे वाटते.
आता देवाने खाली येवून कितीही 'तुमचा माझ्यावर भरोसा नाय काय' विचारले तरी आम्ही 'नाही नाही आणि मुळीच नाही' असे ठणकाऊन सांगणार.
फक्तं तेवढे विचारायला आम्हाला वरती बोलावले नाही म्हणजे मिळवली.
(No subject)
ईतक्या छोट्या गोश्टीत देव
ईतक्या छोट्या गोश्टीत देव शोधलात तर आत्ता पर्यन्त नास्तिक राहिलात ह्याचे आश्चर्य आहे... की नेहमी प्रमाणे लेख पाडायला फुसका विषय शोधला आहे?
गटारीला जास्तंच खाल्य्यमुळे
गटारीला जास्तंच खाल्य्यमुळे हॅंगोवर होऊन
>>>>>>
गटारीला खाणारयाचे तोंड दिसते पण पिणारयांची पोटं दिसत नाहीत.
आपल्याकडे मांसाहार करणे पाप समजले जाते पण दारू पिणे तितके वाईट समजले जात नाही.
हे आपल्याला उद्देशून नाही, पण आपली पोस्ट वाचून सहज आठवले..
ईतक्या छोट्या गोश्टीत देव
ईतक्या छोट्या गोश्टीत देव शोधलात तर...
>>>>>
जे देव मानतात त्यांच्या आयुष्यात काय मोठ्या गोष्टी घडतात हे जाणून घ्यायला आवडेल..
कबूतराने मला हाक मारली ए ऋनम्या बाजूला हो आणि मग शिटला असा चमत्कार अपेक्षित होता का..
देव छोट्या छोट्या गोष्टीतच दिसतो, एखाद्या घटनेकडे बघायची नजर बदलणे गरजेचे असते. माझी आज बदलली ईतकेच
>>एखाद्या घटनेकडे बघायची नजर
>>एखाद्या घटनेकडे बघायची नजर बदलणे गरजेचे असते<<
तुझा काहि भरोसा नाहि रे बाबा, कबुतर तुझ्यावर शीटलं असतं तरी तुझी नजर बदलली असती आणि "आता लॉटरी काढतो" या नांवाचा धागा काढला असतास...
दारू पिणे वाईट नाहीय... दारू
दारू पिणे वाईट नाहीय... दारू अति पीने वाईट..
आपले देव पण मदीरापान करायचे की
कबुतर तुझ्यावर शीटलं असतं तरी
कबुतर तुझ्यावर शीटलं असतं तरी तुझी नजर बदलली असती आणि "आता लॉटरी काढतो"
>>>>>>
हा काय नवीन प्रकार आहे? कबोतर शिटले तर पैसा येतो का? अंधश्रद्धा???
मी इथे श्रद्धेच्या गप्पा मारतोय आणि तुम्ही अंधश्रद्धेला मध्ये आणत आहात
दारू पिणे वाईट नाहीय... दारू
दारू पिणे वाईट नाहीय... दारू अति पीने वाईट..
>>>>>
हे फार गंडलेले तोकडे समर्थन नेहमी दारूबाबत येते..
अति केलेली कुठचीही गोष्ट वाईटच..
पण अति चहा पिणे आणि अति दारू पिणे यात काहीच फरक नाही का?
आणि थोडीशी चहा पिणे आणि थोडी दारू पिणे हे एक समान आहे का?
असो, ईथे दारूची चर्चा अवांतर होईल, विषय श्रावणातल्या कबूतराचा आहे..
Pages