श्रावण

Submitted by शिवाजी उमाजी on 24 July, 2017 - 01:32

श्रावण

शब्द सरी बरसल्या
मन चिंबचिंब झाले,
श्रावण महतीने कसे
मन श्रावणमय झाले !

प्रथम, श्रावण स्वागता
व्रत नागपंचमी आले,
जाणिवेने सण व्रतांच्या
मन उल्हासित झाले !

व्दीतीय, नारळी पौर्णिमा
श्रीफळ रत्नाकरा अर्पिले,
टिकविण्या नाते जन्माचे
रक्षाबंधना भाऊराय आले !

तृतीय, मंगळागौर सणाला
नव्यानवरींनी अंगण सजले,
झिम्मा फुगडया खेळांनी
जागरण खेळता रंगले !

चतुर्थ, गोकुळी अष्टमीला
सावळे श्रीकृष्ण जन्मले,
नंतर बाळगोपाळ एकत्र
दहिहंडी साठी खेळले !

पंचम, अमावस्या पुन्हा
बैलपोळा नावाने म्हटले,
कष्टतात जे वर्षभर सारे
कृतज्ञतेने त्यांना पुजिले !

©शिवाजी सांगळे,
मो.+91 9545976589

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults