जग्गा जासूस - एक फ्रेश अनुभव

Submitted by धनि on 19 July, 2017 - 11:18

कालच जग्गा जासूस पाहिला. इथे आलेला रिव्ह्यू मुद्दामच वाचला नव्हता.

आता डिस्क्लेमर : मला रणबीर कपूर काही फार आवडत नाही, अरिजीत तर अजिबात आवडत नाही. प्रितम चाल ढाप्या असला तरी तो आवडतो.

असे सगळे असतानाही फक्त ट्रेलर बघून अ‍ॅडव्हान्स तिकीटं काढली होती. तिकीटं मंगळवारची होती त्यामुळे पूर्ण विकांतभर कुठले ही परिक्षणं वाचली नाहीत. चर्चा अजिबात ऐकल्या नाहीत. तसे पहाता रणबीर चे ए आय बी बरोबर पॉडकास्ट पाहिले होते. पण ते म्हणजे गावभरच्या गप्पा असतात त्यामुळे त्याचा काही उपयोग नाही. आणि पिक्चर बघायला गेलो. कुठलीही अपेक्षा न ठेवता पिक्चर बघायला जाणे चांगले असते म्हणजे कसाही असला तरी निदान काय वाटलं होतं आणि काय निघाला पिक्चर असे तरी होत नाही. पण पहिल्या १५ - २० मिनीटांमध्येच पिक्चर आवडून गेला. आणि पुढे सबंध पिक्चरभर खुप एंजॉय केले.

पिक्चर नेहमीच्या सरधोपट मारधाडपट किंवा लव्ह स्टोरी सारखा अजिबात नाहीये. त्यामुळे जर कोणी तशा अपेक्षा ठेवत असेल तर मोठाच अपेक्षाभंग होईल. पण जसा ट्रेलर मध्ये दाखवतात तशीच एका तरूण गुप्तहेराची कहाणी आहे. पहिला भाग त्याच्या सुरूवातीच्या काही केसेस दाखवण्यात जातो. तसेच आपल्याला त्याच्या लहानपणीची कहाणी सुद्धा कळते. एका माणसाने त्याचा कसा सांभाळ केला आणि मग निघून गेला ते कळते. आणि मग दुसर्‍या भागात आपण जग्गा बरोबर त्या माणसाला शोधायला निघतो. मणिपूर मधून प्रथम कलकत्त्याला आणि मग कुठेतरी अफ्रिकेत जातो. या प्रकारात तो एका आतंरराष्ट्रीय हत्यारे स्मगलींग करणार्‍या टोळीचा एक प्लॅन पण फोल ठरवतो. सगळा पिक्चर असा मस्त बघण्यासारखा झालाय. पूर्वार्धातील मणिपूर मधली हिरवळ आणि अफ्रिकेमधले रखरखीत पिवळी छटा असलेले चित्रीकरण सुंदर दिसते.

सगळ्यांची अ‍ॅक्टिंग मस्त झालेली आहे. रणबीर चक्क मला पण आवडला. रणाबीर ने एक नीट बोलता न येणारा पण खुप हुशार असणारा तरूण मस्त साकारला आहे. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव झरझर बदलतात आणि एक निरागसपणा दिसतो. सौरभ शुक्ला तर मस्त असतोच नेहमी. कत्रीना ने एक धांदरट मुलगी मस्त साकार केलीये. पण सगळ्यांत जास्ती उल्लेखनीय आहे तो म्हणजे जग्गाचा बाप झालेला सास्वत चॅटर्जी. याला आपण या आधी एक खुनी म्हणून कहानी मध्ये पाहिलेले आहे. त्याने याही पिक्चर मध्ये अगदी मस्त काम केलेले आहे. आधी स्टॅमर असलेल्या जग्गाला बोलतं करण्याकरता त्याला र्‍हाईम्स मध्ये बोलण्याची आयडीया देणे , मग त्याचा सांभाळ करणे आणि आपला क्वेर्कीनेस दाखवणे हे अगदी उत्तम जमलेले आहे त्याला. बाकी लोकांचा अभिनय पण मस्त जमलाय.

आता मेन गोष्ट संगित. तसे पहाता या पिक्चर मध्ये ६ गाणी आहेत. आणि तसे पहाता २० च्या वर आहेत. रूढ अर्थाने जी गाणी आहेत ती ६ आहेत. त्या पैकी गलती से मिस्टेक आणि उल्लू का पठ्ठा आधीच हीट झालेली आहेत. ती गाणी आणि त्यांची कोरीयोग्राफी मस्त आहेच , सब खाना खाके दारू पिके चले गये हे गाणे अगदी भन्नाट जमून आले आहे. बाकी २० म्हणजे सगळ्यांनी र्‍हाईम्स मध्ये म्हटलेले संवाद आहेत. हा हिंदी चित्रपटांकरता नविन प्रयत्न आहे. ही काही नॉर्मल गाणी नाहीत. त्यामुळे काही लोकांना विचित्र वाटू शकते. पण जर एंजॉय करत पाहिले तर मात्र अगदी मज्जा येईल. मला स्वतःला गाणी असलेले चित्रपट पहायला आवडतात. आता रिसेंटली बेबी ड्रायव्हर पाहिलेला आणि तो सुद्धा खुप आवडलेला त्यामुळे जग्गा पण खुप आवडला. एक वाईट गोष्ट म्हणजे काही ठिकाणी म्युझीक त्या डायलॉग्ज वर भारी पडते आणि मग आपल्याला डायलॉग्स ऐकू येत नाहीत. ते म्युझीक थोडे लाऊड नसते तर अजून चांगले वाटले असते.

मला असे वाटते की लहान मुलांना तर अगदी आवडून जाईल हा चित्रपट आणि मोठ्यांनाही आवडायला हरकत नाही. बाकी स्टोरी काय आहे ते लिहीत नाही कारण हा एक गुप्तहेराचा पिक्चर आहे आणि तो पडद्यावर बघूनच मज्जा येईल. एक वेगळा प्रयत्न म्हणून नक्की बघा पण बघायला जाताना सगळ्या गोष्टी एंजॉय करायचा विचार करून गेलात तर या चित्रपटातून बरेच काही हाताला लागेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हा .. येस्स हायझेनबर्ग, वरचा माझा विकेंड प्लान लिहिताना अगदी हेच मनात आलेले Happy
शेवटी काय, तर या जगात आपल्याला सर्वात चांगली ओळखून असणारी व्यक्ती आपण स्वत:च असतो. बाकीचे उगाचच सायकोलॉजिस्ट असल्याचा आव आणत असतात Wink
चला शुभरात्री Happy

शूम्पी, मी बर्फी पाहिला नव्हता त्यामुळे तुलना करू शकत नाही. पण या चित्रपटात कंटाळवाणे असे काही वाटले नाही. आणि रणबीर केवीलवाणा, गरिब बिचारा वगैरे नाहीये. त्याला फक्त नीट बोलता येत नाही, स्टॅमर करतो त्यामुळे त्याऐवजी तो यमकात (र्‍हाईम) बोलतो. आणि तोच तर मेन जासूस आहे त्यामुळे तो ज्या केसेस सॉल्व्ह करतो त्या भारी इंटरेस्टींग आहेत.

ईथला धनि यांचा रिव्ह्यु बघून बाय्को व मुलीबरोबर काल संध्याकाळी आवर्जून पाहिला केवळ रणबीर साठी.

आणि खूप काळानंतर एक सुंदर अर्थपूर्ण चित्रपट बघण्याचा आनंद मिळाला. कथा, पटकथा मस्त आहे. चित्रीकरण तर अप्रतीम. सर्वच पात्रांचा अभिनय छान. पण हा सिनेमा फक्त आणि फक्त रणबीर चा आहे. अभिनय या माणसाच्या रक्तात नव्हे तर DNA मध्ये आहे हे अनेक द्रुष्यातून जाणवत रहाते. आणि त्याचे ते स्टॅमर होण्याचे तर फारच भन्नाट जमलेले आहे... अतीशय गंभीर वा विनोदी दृष्यात एकही शब्द न उच्चारता निव्वळ त त प प वर अख्खा सीन खाणे हे एका कसलेल्या व जाणकार अभिनेत्याचे लक्षण्/पुरावा आहे.
आणि चेहेर्‍यावरील हावभाव व ईतर सर्व अक्षरशः वेड लावणारे आहे.
चित्रपट थोडा म्युझिकल आहे हे खरे असले तरी एकंदर पटकथा व काही अनपेक्षित वळणे यांनी रंजक ठरतो.
काही ठिकाणी हा म्युझिकल डोस (तुकडे व आवाज दोन्ही!) थोडा जास्ती होतो खरा पण तेव्हडे आपण दुर्लक्ष करायला हवे.

मुख्यतः सर्व कुटुंबाबरोबर एकत्रीत बघून आनंद घेता येईल ईतका छान चित्रपट आहे. बर्‍याच ठिकाणी खास अनुराग बसू टच आहे. माझ्या आठवणीत तरी (हे खास ईथल्या आकडेमोड एक्सपर्ट्स साठी!) Happy मणीपूर प्रदेशाला मध्यवर्ती ठेवून काढलेला दुसरा हिंदी चित्रपट आठवत नाही.

एक अख्खा नविन बाफ ऊघडता येईल ईतके काही लिहीण्यासारखे आहे.

पण रणबीर ईज बॅक.. हा त्याचा आजवारचा सर्वात ऊच्च चित्रपट असावा. व्यावसायिक यश किती मिळेल माहित नाही... पण एकूणात सकस व सजीव कलानिर्मिती साठी व हिंदी चित्रपट सॄष्टि साठी व रसिक प्रेक्षकांसाठी ही खूप आनंदाची बाब आहे. अशा प्रकारचे चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरायला हवे. नाहीतर पुन्हा तेच ते खान कं चे फालतू मसालापट आपल्या माथी पडत रहातील. तेव्हा हा चित्रपट चुकवू नकाच.

आणि आता सर्वात महत्वाचे:
युके मधिल एका छोट्या गावात गुरुवारी सं ५ चा शो बघायला संपूर्ण चित्रपट्गृहात आम्ही (फक्त) तीघे हजर होतो. माझ्या आयुष्यात (आकडेमोड वाले कान बंद करा!) हा प्रथमच अनुभव...! विचीत्र पण गमतीशीर अनुभव... कुठे बसू कुठे नको असं झालं होत. Happy तर चित्रपटातील गाण्यांवर मुलीने मस्तपैकी अगदी पिटात, मोकळ्या जागेत, हवे तिथे मस्त नाच करून घेतला. सुखी संसारासाठी अजून काय हवे? Happy
[आम्ही तीनच प्रेक्षक असूनही ईथल्या शिस्तप्रीय व कर्तव्यदक्ष कर्मचार्‍यांनी संपूर्ण चित्रपटाचा खेळ दाखवला म्हणून त्यांचे अनेक आभार!]

छान लिहिले आहे. चित्रपट पाहण्यात येईल.

मला रणबीर कपूर काही फार आवडत नाही, अरिजीत तर अजिबात आवडत नाही. प्रितम चाल ढाप्या असला तरी तो आवडतो. >> याला +१ Lol

बर्फी फारच आवडलेला. बरेच सीन ढापलेले आहेत हे माहित झाले तरीही अजूनही अवडतोच.

आज बघितला. सुरुवातीचे dialogues कळलेच नाहीत. नंतर नंतर मजा आली. आणखी रंजक बनू शकला असता.

पाहिला काल, आवडला.
रणबीर तर अफाट!
गाणी हल्ली चित्रपटात कमीच असलेली बरी वाटतात. पण यात एकही गाणे ऐकायला बघायला जीवावर आले नाही हे विशेष. दोन विशेष आवडली. एक ते गलतीसे मिस्टेक दोनेक वेळा ऐकल्याने माहीत होते. चित्रपटात रणबीर प्रेमात पडल्याच्या सिच्युएशनला असल्याने जास्त आवडले. ईतरवेळी उठून नाचलोही असतो, पण एकटाच गेलेलो बघायला. नंतर ते एक सब दारू पिके खाना खाके चले गये. हि लाईन आणखी काही दिवसांना डोक्यात असेल की नसेल माहीत नाही, पण कालपासून तोंडात मात्र आहे. गर्लफ्रेंडचा काल रात्री दिड वाजता फोन आला, काय रुनम्या, झाली का गटारी? ,,, मी म्हणालो, हो तर.. सब दारू पिके खाना खाके चले गये.. बस्स रामूकाका रह गये, बोलवू का Happy

चित्रपट खरेच एक वेगळा अनुभव देणारा होता, नेमके वर्णन करता येणार नाही, पण जे काही होते बघायला मजा आली. उत्तरार्धात मात्र ईंटरनॅशनल कांड दाखवायच्या नादात जरा गाडी सरकली असे वाटले. पण ठिक आहे, आफ्रिकेतील चित्रण छान वाटले. आणि मणिपूरमधील तर क्लास. त्या कारणासाठी चित्रपट थिएटरातच पाहिला याचे पैसे वसूल झाले.

कतरीनाच्या जागी कोणीतरी अभिनय करणारी असती तर दोघांमधील दृश्ये आणखी रंगतदार झाली असती. तिच्या भुमिकेला अभिनय करायला खूप वाव होता. दिसली मात्र ती नेहमीसारखीच अफाट, किंबहुना यात जरा जास्तच. त्यामुळे चालून गेले. तरी विचार करतोय, एखादी आलिया भट्ट भारी दिसली असती.

अवांतर - तो रणबीरचा बाप झालेला ईसम चला हवा येऊ द्या मधील त्या विदर्भ विदर्भ करणार्‍या कलाकारासारखा दिसतो ना? कि मलाच तसे वाटले..

शूम्पी, बर्फी मलाही कंटाळवाणा वाटला होता. पण हा तसा अजिबात वाटला नाही. 'गलती से मिस्टेक' आणि 'उलू ले' ही दोन गाणी आधी अनेक वेळा बघितली होती. माझ्या लहान मुलीने हसत, टाळ्या पिटत, बघितला.

मला पण आवडला .रणबीर छा गया एकदम ! शुक्रवारी सिनेमा पहिला . हाउसफुल्ल होता शो . पुढच्या २ रांगेतल्या लोकांना बघायला त्रास होता तर ४,५ लोक पायऱ्यांवर येऊन बसले व सिनेमा एन्जॉय करत होते . त्याची मजा वाटली . Happy
बर्फी जास्त आवडला होता पण !

Pages