आम्ही सारे नवशिके !!!!!!

Submitted by अतरंगी on 15 July, 2017 - 05:28

लोकांच्या मते एक वय असतं उत्साहाचं, उमेदीचं, काहीतरी शिकण्याचं, करून दाखवण्याचं........ त्या मताला कधीही काडीमात्र सुद्धा किंमत देऊ नये. Wink

पण कॉलेज संपलं, नोकरी लागली, लग्न संसार यात अडकलं की नवीन काहीतरी शिकण्याचा, करण्याचा उत्साह कमी होत जातो. वय, वेळ, affordability, संकोच, संसाराच्या जबाबदाऱ्या, लोकांच्या नजरा/टोमणे.... एक ना अनेक कारणं....

अरे आता या वयात कुठं जाऊ गाडी शिकायला?

अरे पण वेळ कुठंय? मुलांच्या शाळा, माझा जॉब, घराची कामं, जाणार कधी?

अरे आता या वर्षी नाही जमणार, पैशांचं shortage आहे.

हे बघ हे येडं आता या वयात चाललंय शिकायला, ये इथं दोन पेग मार तुला बसल्या बसल्या सगळं शिकवतो.

अरे आपलं वय काय? येड्यात काढतील लोकं...

लेह लडाख बाईक वर करायचं होतं यार, राहून गेलं.

सगळे म्हणतात रे आवाज बरा आहे माझा, पण आता कुठं गाण्याचा क्लास वगैरे लावत बसू, जाऊ दे मरू दे.

घरच्यांच्या नादाने नोकरीत पडलो पण मला खरं तर बिझनेसच करायचा होता

सगळे मित्र मैत्रिणींकडून, बहीण भावांकडून ऐकू येणारे नेहमीचे डायलॉग. एका ठराविक काळानंतर काही इच्छा, प्लॅन फक्त मनात राहतात, करायचे होते पण जमले नाही या कॅटेगरीत ढकलले जातात.

तरीपण या सगळ्यांवर मात करत काही जण जे राहून गेलं ते करायचा, शिकायचा प्रयत्न करतात. आयुष्याच्या एका वळणावर येऊन परत नवीन काहीतरी शिकायचा आनंद, काहीतरी मिळवल्याचं फिलिंग फारच मस्तच असते. शिवाय आपल्या कामाच्या रगाड्यातून, रोजच्या कंटाळवाण्या शेड्युल मधून एक ब्रेक मिळतो, आयुष्याचा एकसुरीपणा कमी होतो. आपल्याला हे करायचं होतं, शिकायचं होतं, राहून गेलं ही हुरहूर कमी होते, बकेट लिस्ट मधल्या एखाद्या गोष्टीवर टिक मार्क होतं Happy

बोअरिंग आणि मोनोटोनस आयुष्यावर बेस्ट उपाय म्हणजे काहीतरी नवीन करायला, शिकायला घ्या. तुम्हाला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो ती काही थोडा वेळ का होईना करा.....

तुम्हाला आता नवीन काही शिकायचे असेल, करायचे असेल, जुनेच अर्धवट राहिलेले परत सुरू करून पूर्ण करायचे असेल तर इथे लिहा, आपल्याला एकमेकांना प्रोत्साहन देता येईल Happy

तुम्ही लेटेस्ट काही केले असेल तरी इथे जरूर लिहा, बाकीच्यांना थोडी प्रेरणा मिळेल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान धागा अतरंगी.
कित्येक वर्ष चारचाकी शिकावी अशी इच्छा होती त्यामुळे गेल्या वर्षी एकदाची शिकले Happy पण चालवत नाही (रोज) हातात आली इमर्जन्सी ला तर चालवू शकते इतकी तयारी आहे.
मला व्यक्तिशः कलाकुसरीची कामे जमत नाहीत. उदा. रांगोळी, कशिदा, विणकाम वगैरे...
माझ्या आते बहिणी ने मग काही बिअर च्या बाटल्या जमवून त्यावर केलेली कलाकुसर पाहिली आणि असं वाटलं आपण पण करून पहावे. खूप ग्रेट नाही येत काही मला.. पण जनरल करते.
मन रमते, वेळ जातो.

छान धागा ! सर्व प्रतिसाद वाचायचे आहेत अजून. सावकाश वाचेन.
मागच्या आठवड्यात पोहणे शिकायला सुरुवात केली आहे...... वयाच्या ४३व्या वर्षी.

Pages