एक अधिक एक..

Submitted by अत्रुप्त आत्मा on 5 July, 2017 - 09:59

एक अधिक एक=दोन!
डायल केल्यावर लागलाच्च पाहिजे फोन!
नेटवर्क बिझी असू शकतं.
रेंज नसू शकते.
कदाचित स्वीच अॉफ असू शकतो
समोरच्याचा फोन!
या वास्तविक शक्यता ग्रुहीत धरणार कोण? .. छे! छे! लागलाच्च पाहिजे फोन.
कारण,एक अधिक एक=दोन!

गणितात आयुष्य पहायचं.
पण आयुष्याचं गणित शिकायचं नाही!
पहिल्या एक आणी दुसय्रा एकच्या किं~मती मधली तफावत..मूल्यांचं वेगळेपण?
त्यांचं मूळ १ असणं,नसणं?
त्यांची भूक तहान तर अमान्य, अस्विकार्यच!
कारण एक अधिक एक=दोन!
यापेक्षा वेगळी जीवननिष्ठा कोण???
ह्हूं!!! लागलाच्च पाहिजे फोन!
कारण,एक अधिक एक=दोन!

एक अधिक एक=पाच!
एक अधिक एक=दहा! कधी कधी मायनस दहा देखील!
अशी उत्तरं सुद्धा असू शकतात,
याच उत्तरांच्या गणितात.
मानवी आयुष्य असच असतं..याच गणितात.. शांत पहुडलेलं!
पण नाही...
एक अधिक एक=दोन!
डायल केल्यावर लागलाच्च पाहिजे फोन!

शब्दांचे शुद्ध-लेखन.. त्यातले व्याकरण.
भाषिक अर्थप्राप्तीचा खटाटोपच सारा हा.
पण अर्थप्रचितीसाठी पुन्हा लागतं ते बोलीभाषेचंच गणित.
वरिल नियमांच्याही आधीचं!
त्याचं काय?????
पण नाही.
एक अधिक एक=दोन!
डायल केल्यावर लागलाच्च पाहिजे फोन!
==================

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults