हायकू

Submitted by कविता क्षीरसागर on 27 June, 2017 - 13:42

हायकू ..

हायकू मूळ जपानी काव्यप्रकार .. ५,७,५ अशी अक्षर संख्या .. एकूण तीन ओळींची अर्थपूर्ण अल्पाक्षरी कविता .. कोणत्याही दोन ओळीत यमक असावे .. निसर्ग व मानवी मनाची सांगड, निसर्गातील एखादा क्षण टिपणे , ही वैशिष्ट्ये .. काव्यप्रकार छोटा पण अर्थ मोठा .. दिसायला सोपा पण करायला अवघड असा हा हायकू ...

मी माझे काही हायकू इथे देत आहे .. तुम्हीही या धाग्यावर तुमचे हायकू शेअर केलेत तर छानच वाटेल ..

१.
झटकू कशी ?
कोळीष्टके मनात -
गुंतले त्यात ...

२.
शिस्त लावली
मी दुःखालाही नेक
येती एकेक ..

३.
आत बाहेर
दाटलाय पाऊस
- नको जाऊस ....

४.
कसली चोरी ... ?
पहावी प्रत्येकाने
स्वप्ने बिलोरी ...

५.
टोचले काटे ....
आता नकोसा वाटे
हा मोगराही ...

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users