ही गझल !!

Submitted by प्रकाशसाळवी on 22 June, 2017 - 12:17

ही गझल !!
---------
किती वाटते हो शिकावी ही गझल
नाही सोपी एव्हढी मराठी ही गझल
**
प्रथम लागतो पट्टीचा कवी तो
तयास थोडी समजेल ही गझल
**
तुझ्या त्या ईशा-यास कोणते नांव देऊ ?
बाजूस उभे रहाण्या तुझ्या थरथरते ही गझल
**
बाद्शहाच होता तो या गझलांचा
सुरेश भटांना च पावली ही गझल
**
रदीफ, काफीया, परिभाषा गझलेची
वृत्त अलामत यमकांनी नटते ही गझल
**
तोंड वेंगाडून कशी हासते ही गझल
घ्या जाणत्यांनो सांभाळून ही गझल
**
प्रकाश साळवी
१६-०४-२०१७
०९१५८२ ५६०५४

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users