नामकरण.. (एक प्रेमकथा - भाग १ )

Submitted by दिपक लोखंडे on 10 June, 2017 - 07:39

गुरुवार १२ डिसेंबर, सकाळी ९:३० वा..
.....................................................

अहो ऐकलत का?..
तुम्ही लवकर अटपुन घ्या, आपल्याला डॉक्टरकडे जायचे आहे...

कशाला गं? तब्बेत बरी आहे ना?..

अरे देवा!... या माणसाच्या लक्षात एक गोष्ट राहात नाही..
विसरला का तुम्ही?
आज डॉक्टरनी बोलावलय चेकअप साठी..

अरे हो आलं लक्षात.. चल तु तयार हो लवकर मी गाडी बाहेर काढतो..
..........................................................

- २० मिनिटानंतर...

(गाडीमध्ये सागर व त्याची बायको..)

सागर.. तुम्हाला काही विचारु का?

काय गं, यात परवानगी कसली घ्यायची.. विचार की...

तुम्ही लग्नानंतर माझं नाव का ओ चेंज केलत?

का म्हणजे? तुला नाही का अवडत?.

अहो तसं नई.. रागाला कशाला येताय?
मज्जा म्हणून विचारलं मी.
कविता नाव मस्तच आहे..
अनि तसं ही 'शांती' पेक्षातर खूपच बरं आहे..

हाहाहा.. तुझ्या वडलांच्या डोक्यात काय आलं असेल गं, तुझं नाव ठेवताना?.. 'शांती' हाहाहा...

अहो यात हसण्यासारखं काही नाही आ.. माझ्या आज्जीचं नावं पण शांतीच होतं..

अगं तेच तर, 'शांती' हे नाव ऐकलं की.. आपोआप डोळ्यासमोर एका अज्जीबाईंच चित्र निर्माण होत..
हे तर काहीच नाही..
सुरुवातीला तर, मला माझ्या मित्रांना सांगाव लागायचं. की 'शांती' माझ्या बायकोचं नावं आहे अज्जीच नाही...

हां उडवा खिल्ली माझी.. तसं ही माझ्यावर कुठं प्रेम आहे तुमचं..

अगं असं काय बोलतेस, थोडी गम्मत केली तुझी..
चलं क्लिनिक आलं बघ..
हळु उतर आता.. आणि डॉक्टरला चांगल चेक करायला सांग. आपल्या बाळाला कसलाही त्रास होता कामा नये..
.....................................................................

- १ तासानंतर...
( स्थळ - नवजीवन हॉस्पिटल..)

सिस्टर, मि. सागर देशमुख यांना आत बोलवा..

ओके मॅम..

(- सिस्टर वेटिंग रुम मधे..)

मि. सागर देशमुख?

हो..

तुम्हाला डॉक्टर सुमित्रा यांनी बोलवयं..
माझ्यासोबत चला..
....................................................

Group content visibility: 
Public - accessible to all site users
All Partners-10usd 300x250

<<<दिपकभाऊ तुम्ही लिहता भारी पण लय अपूर्ण सोडता राव आधीचे पूर्ण करून पुढे गेला तर आनंद आहे . पु. ले. शु.>>>

हाहा, बरोबर आहे भाऊ.. मीही तोच विचार करतोय. आणि लवकरच सगळे लेख पुर्ण करेन याची खात्री देतो...

प्रतिसाद देण्यासाठी धन्यवाद.. अक्षय भाऊ..

काय पण बोला..., तुमच्या कथेच्या सुरवातामधेच दम असते...!!

सुंदर प्रतिसाद देण्यासाठी धन्यवाद सर!