विचारशील ना गं?..

Submitted by दिपक लोखंडे on 9 June, 2017 - 16:39

वेड्या मना... आजकाल माझ्या ताब्यात नाहिस तु..
आधि वाटलं..
अरे.. हि तर बेईमानी झाली ना?
याला थांबवायला हवं..

पण हळूहळू आता सवय झाले..
दिवसा स्वप्ने पाहायची,
तुला डोळे भरुन बघायची..

पण कधी कधी वाटतं..
हे असं किती दिवस चालनार?
किती दिवस तुला लांबुनच पाहनार?
तु जवळ आलीस कि खाली बघनार..

तुला खुप काही सांगु वाटतं गं..
पण तु समोर आलीस ना, हृदयाचे ठोके वाढतात माझ्या..
जनु ते मला हेच सांगु पाहतात..
कि आपल्या एका चुकीने हिची मैत्री सुध्दा गमावु शकते...

असतात गं अशी काही लोकं..
जी एखाद्यावर जिवापाड प्रेम करुनही,
त्या प्रेमाला कधि व्यक्त करत नाहीत..

आता तु विचारशील..
का?..
त्यांच्यात हिम्मत नसेल बहुतेक, पुढाकार घेण्याची...

हो तु असं म्हणू शकतीस..
पण मला असं वाटतं.. कि या लोकांच प्रेम तुम्हा मुलिनी ओळखायला हवं..
कारण यांना कशाचीही आशा नसते..
ते फक्त प्रेम करतात..
अगदी शेवटच्या श्वासा पर्यंत...

आता तु विचारशील, तुला हे सगळं कसं माहित?..

कारण मिही यातलाच आहे..
मिही वाट पाहतोय..
तु एक दिवस येशील, आनि विचरशिल..
दिप्या लग्न करनार का माझ्याशी??

विचारशील ना गं.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users
All Partners-10usd 300x250