आरंभम- भाग १

Submitted by अज्ञातवासी on 4 June, 2017 - 04:59

"व्यंकतरमन्ना गोविंदा!!"
"अरे काय कोलाहल माजवलाय नुसता. मूर्ख कुठले. तो देव अशाने कान बंद करून घेईल. आणि त्यांना काय मूर्ख म्हणतोय, स्वतःकडे बघ." मी मनाशीच म्हणालो.
"जगात सगळे लोक वेगवेगळे का बनवले?"
" ...कारण या जगात सर्व रंग असावेत म्हणून. कुणी चांगला, कुणी वाईट, कुणी हुशार, कुणी अडाणी, कुणी दयाळू तर कुणी खूप कठोर...."
"...मग सगळ्यांचीच अशी अपेक्षा का की मी माझ्या वडिलांसारखं असावं? असतील ते जगातील सर्वात चांगले व्यक्ती, पण ज्या व्यक्तीला मी कधी बघितलही नाही म्हणून मी फक्त हुबेहूब त्यांच्यासारखा दिसतो म्हणून त्यांच्यासारख वागावं?"
लोक म्हणतात ते जास्त विचार करत नसत!!!!
आता तीही म्हणते, जर तू तुझ्या वडिलांचा एकही गुण घेतला असता तर मी तुझा आदर केला असता, पण मला आनंद होतो की ते आज इथे नाहीत तुझे चाळे बघायला....
म्हणजे ते सर्वात चांगले आणि मी सर्वात वाईट...
कोणता चांगला माणूस आपल्या पत्नीला सोडून पंचवीस वर्षांपूर्वी गायब होतो? तेव्हा तर माझा जन्मही नव्हता झाला...
काहीच थांगपत्ता नाही.
आणि आता ती म्हणते, मी कायमची तुझी होईल, फक्त तुझ्या वडिल काय होते हे शोध...
"ओ तुम्ही निघा इथून..."
....अरे बाबा नाही थांबायचं मला पण ती बाई भेटल्याशिवाय माझं काम पूर्ण होणार नाही माझ्या बापाच्या आयुष्यातल्या कुणालाही माहीत नसलेल्या गोष्टी तिलाच माहीत आहेत!
...तीन दिवसांपासून बसून आहे मी! जवळ पैसे भरपूर पण खर्च करावेसे वाटत नाही. ऑडी घेऊन फिरतोय, आणि मंदिरात जेवतोय!
हे काय होतंय?
की मी माझ्या बापासारखा बनतोय...
आज मी पण केला त्या बाईला भेटल्याशिवाय जायचंच नाही.
पण काय होतंय मला?
का हा व्यंकतरामन्ना मला खेचतोय?
नाही बिलकुल नाही....
अरे आपली ऑडी सोडून या मंदिरात झोपायचं
नाही...
बिलकुल नाही...
मी निराशेने उठलो आणि त्या बाईच्या कंपाउंडच्या बाहेर असलेल्या गेटच्याही बाहेर असलेल्या रस्त्यावरून चालू लागलो.
एव्हाना संध्याकाळ झाली होती आणि मी मंदिराजवळ पोहोचलो.
माझ्या ऑडिवर ती मुले खेळत होती.
आज न जाणे त्यांना काही बोलावसं वाटलं नाही.
"....व्यंकतरामन्ना चल आज तुझीही इच्छा पूर्ण करूयात"
आणि मी सरळ त्या मंदिराच्या कोपऱ्यात अंग टाकून दिलं..
गोविंदा!
गोविंदा!
हे सत्य आहे की स्वप्न?
ही बाई कोण...?
किती सुंदर आहे ही?
पण वयस्कर वाटतेय...
आणि यावेळी ही मंदिरात काय करतेय?
हीच माझ्याकडे खरंच लक्ष नाही...
की हीच जगाकडेच लक्ष नाही...?
त्या धीरगंभीर आवाजाने माझी झोप उडाली...
व्यंकतरामन्ना!!!
आणि नकळत माझ्याही तोंडातून उच्चारल गेलं,
गोविंदा!!
तिने चमकून माझ्याकडे बघितले!
प्रेम माया आदर आणि अविश्वास या तिन्ही भावना तिच्या डोळ्यात होत्या!
आणि मीही आता तिला पूर्णपणे ओळखलं होतं!
इथे आल्यापासून पहिल्यांदाच मी तिला नीट बघितलं होत....
"महाश्वेता उदयवाडा चेत्तीयार..."

Group content visibility: 
Public - accessible to all site users