तुझ्या स्मरणांचे झाड

Submitted by वैवकु रीटर्न्स on 31 May, 2017 - 07:58

आयुष्याच्या जंगलातले पान पान तर सुकले आहे
पण माझ्या हृदयात तुझ्या स्मरणांचे झाड डवरले आहे

ज्याला त्याला येथे माझ्या असण्याचा तिटकारा आहे
मी भलताच नकोसा होतो हे आत्ताच समजले आहे

एक भयानक वेडा रात्री आरोळ्या देताना दिसला
"मी आकाश ढवळले आहे मी आकाश ढवळले आहे"

येता जाता ढासळणारा आकांक्षांचा डोलारा मी
माझा पाया म्हणून कोणी हे काळीज निवडले आहे?

ज्या वाटेने चालत चालत तुझ्यापास येण्याची इच्छा..
तीच आडवी आली आहे मन मागेच सरकले आहे

(अपूर्ण)

~वैवकु

Group content visibility: 
Use group defaults

ज्या वाटेने चालत चालत तुझ्यापास येण्याची इच्छा..
तीच आडवी आली आहे मन मागेच सरकले आहे >>> मस्त Happy

अपुर्ण का ???

हॅलो वैवकु....! गझला अजूनही पाडणे सुरुच आहे का ? लिहित राहा.
'तुझ्यापास' शब्दानेच ओळखलं मी, आपले वैवकू परतले आहेत.

गझल वाचतांना अजिबात मजा आली नाही. पुढील रचनेसाठी शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

आवडले काही शेर शेवटचे दोन विशेषतः.
पण आता लागण चांगली झाली म्हणुन खोडवं काढायला जाऊ नका जमिनीत.