ती नजर वाघिनीची ....!!

Submitted by satish_choudhari on 30 May, 2017 - 05:53

ती नजर वाघिनीची ....!!

ती दिसली अशी अचानक काळीज जाळून गेली
ती नजर वाघिनीची पुन्हा नजर लाऊन गेली

पाहताच तिला जणू मागे युगे परत गेली
डोळ्यासमोरुन वेळ पुन्हा मागे चालत गेली

विसरून गेलो थोड़ावेळ की नाही ती आपली
आठवनींचा झूला ती पुन्हा झुलवून गेली

विझलेल्या राखेख़ाली पुन्हा विस्तव जाळून गेली
जुनाट पुस्तकातले जणू मोरपीस आठवून गेली

काय बोलावे तिच्याशी काहीच कळले नाही
वेळच तशी होती की वेळेला ही कळले नाही

तिच्या त्या नजरेत हरवलेल जग होत की
हरलेल प्रेम माझ तिची नजर सांगून गेली

ती दिसली अशी अचानक काळीज जाळुन गेली
ती नजर वाघिनीची पुन्हा नजर लाऊन गेली ..

- सतीश चौधरी

Group content visibility: 
Public - accessible to all site users