भारतात केशकर्तन न करुन घेणारा, केशभूषा न आवडणारा माणूस विरळाच! किंवा केसांनी तरी विरळा.
बाहेर केशकर्तनालयात केली जाणारी हजामत झटपट, सुबक असते खरी पण तितकीच आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यात वापरलेले वस्तरे, कात्र्या, कंगवे अस्वच्छ असतात. डोक्याला, मानेला इन्फेक्शन होऊ शकते.
हे सगळे टाळण्यासाठी आम्ही घरी फिस्कर्सची कात्री आणि सिंगरची दोरी वापरुन घरी हजामत करतो, तर तिला नीट आकार येत नाही.
न्हावी कुठली खास (आपल्याला न दिसणार्या दोरीची बनवलेली) टेम्प्लेट वापरतात काय? अनेक न्हाव्यांना याविषयी विचारले तर कोणीही काही सांगितले नाही. अर्थातच त्यांचे ट्रेड सिक्रेट का उघड करतील म्हणा.
तर मायबोलीकरांनो,
घरी केलेली हजामत सुबक होण्यासाठी काय करावे?
यासाठीच्या कर्तनकृती, टिप्स असतील तर सांगा.
पण नीट नसेल तर अजागळ व
पण नीट नसेल तर अजागळ व अस्वच्छ दिसते.
>>>>
डिपेण्डस! ते एक्स फॅक्टरवर अवलंबून आहे. सरसकट सर्वांनाच शोभते वा शोभत नाही असे बोलू शकत नाही. तसेच शोभली तरी असे पुरुष सर्वांनच आवडतील असेही नाही. यांचा एक टारगेट प्रेक्षक वर्ग असतो, आणि त्यांना आकर्षित करण्यातच अश्यांना ईटरेस्ट असू शकतो. अर्थात हे प्रत्येक स्टाईल बाबत लागू..
तसेच स्टाईल फॅड नुसारही फॉलो केली जाते. त्यामुळे लेटेस्ट ट्रेण्ड काय आहे हे महत्वाचे.
खरंच, मायबोली आता चिप झालेय
खरंच, मायबोली आता चिप झालेय असं वाटाया लागलंय, दर्जेदार लिखाणच गायब झालीत मायबोली वरुन
खूप उपयोगी धागा...
खूप उपयोगी धागा...
खूप तिप्स मिळाल्या
पुरूषांच्या बाबतीत दाढी करणे
पुरूषांच्या बाबतीत दाढी करणे हा शोध लागला कि केस कापण्याचा?
वस्तऱ्याचा शोध लागण्या आधी दाढी कसे करत होते?
तलवार वापरत असतील का?
धातूचा शोध लागण्या आधी दगडाच्या शस्त्राने दाढी करायचे का?
दाढीचे एकवेळ समजू शकतो पण
केस कसे कापत असतील?
ज्याचे केस कापायचेत त्याला जमिनीवर उताणा झोपवून केस डोक्याच्या वर जमिनीवर अंथरून तलवारीचा घाव घालत असतील का?
कि केसाखाली सपाट दगड ठेवून त्यावर अणकुचीदार दगडाने प्रहार करून केस कापत असतील?
कात्री शोध कधी लागला?
कि पुरूष सुद्धा केस लांब ठेवत होते? सामुराई, धरम वीर मधला प्राण आणि मार्शल आर्ट्स च्या चायनीज चित्रपटात शूर योद्धे लांब वेणी बांधतात.
आपल्या इथे पण असेच होते का?
जुन्या मायबोलीकरांनी मार्गदर्शन करावे.
अरेरे! सनई लहाने यांनी दिलेले
अरेरे! सनई लहाने यांनी दिलेले फोटो पाहिलेच नव्हते.
झिंज्या ओढणे हा प्रकार
झिंज्या ओढणे हा प्रकार पुरुषांमध्ये आपसात सुरू झाला असावा. किंवा मातृसत्ताक पद्धत होती आणि स्त्रिया पुरुषांच्या झिंज्या ओढत. त्यामुळे झिंज्याच कापून टाकण्याची प्रथा सुरू झाली असावी. अग्नीचा वापर करून जास्त चटका बसणार नाही एवढी लांबी ठेवून झिंज्या जाळुन टाकत असावेत.
यावर अधिक संशोधन व्हायला हवे.
दाढीसाठी गरम पाण्याने गालफडे
दाढीसाठी गरम पाण्याने गालफडे धुऊन साबणफेस चोपडावा. ब्लेड जास्ती टिकते.
Pages