सचिनवर सिनेमा येणार हे कळल्यापासूनच तो फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायचा हे नक्की होतच . त्यामुळे आज सकाळीच गँगला घेऊन थिएटरला पोचलो . सचिनचा सिनेमा म्हटल्यावर बघण आलच , पण तो कसा असेल याची प्रचंड उत्सुकता अन टेन्शन ही होतच , पण चित्रपटाने सचिन प्रमाणेच अपेक्षा पूर्ण केल्या.
हा खरतर रूढार्थाने सिनेमा नाही , खरे तर डॉक्युमेट्रीच्या आसपास जाणारा . फार कमी प्रसंग तेही मुख्यतः लहानपणीचे इतरानी एनॅक्ट केले आहेत. अन्यथा जुन्या क्लिपिंग्ज अन सचिन अन इतरांच्या मुलाखतीवर सिनेमा पुढे जातो . पण तुम्हाला अगदी पहिल्या क्षणापासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो , हसवतो , नॉस्टेल्जिक करतो अन बर्याच ठिकाणी रडवतोही .
आपल्याकडे माणसाला देवत्व देण्याची एक अतिशय वाईट पद्ध्त आहे , सचिनला ही ते चुकल नाही . पण त्यामुळे होत काय , की त्याने केलेले सगळे कष्ट मातीमोल होतात , एकदा "he is Gifted" म्हटल की त्याने नेटमध्ये घालवलेले कित्येक तास , त्याची मेहनत , त्याच्यावरचा ताण हे सगळ शून्य होत. चित्रपट नेमक हेच दाखवतो , त्याची मेहनत , त्याचा त्याग , त्याचबरोबर सचिन हा शेवटी माणूस च आहे हेही . त्याच्या यशात वाटा असलेले त्याचे कुटुंबीय , गुरू , मित्र या सगळ्याबद्द्ल सांगत असतानाही सिनेमा आपली गती राखतो.
चित्रपटात त्याच्या लहानपणापासून रिटायरमेंट पर्यंत ऑलमोस्ट सगळ्या महत्वाच्या घटना दाखवल्या आहेत . क्रिकेट खेळायची सुरूवात , कांबळीबरोबरची भागीदारी , पाकिस्तानचा पहिला दौरा , डेझर्ट स्टोर्म , सारे वर्ल्ड कप्स सगळ काही ..
मुख्य म्हणजे सचिनच्या आयुष्यातले वाईट प्रसंग दाखवायलाही सिनेमा पुढे मागे पाहत नाही , मग ते मॅचफिक्सिंग असो की "Endulkar" (धोनी त्याबाबतीत अगदीच गुडी गुडी होता) . त्याला झालेला त्रास , त्यावेळी त्याला त्याच्या कुटुंबियानी विशेषतः अंजलीने दिलेली साथ , अगदी छान चित्रित केलाय .
सगळ्यात शेवटी स्मरणात राहतो तो तेंडुलकरचा नम्रपणा . त्याने असंख्य रेकॉर्ड बनवले , पण सगळा भारत तुम्हाला जवळजवळ देव मानत असताना पाय जमिनीवर ठेवणे ही माझ्यामते सचिनची सर्वात महत्वाची अचिव्हमेंट आहे .
अर्थात वर म्हटल्याप्रमाणे काहीसा डॉक्युमेट्रीच्या आसपास जाणारा असल्याने कमर्शियल , गाणी वगैरे अशी अपेक्षा ठेवून जाणार्या लोकाना हा बोअर वाटू शकतो हे मान्यच आहे , पण एक सच्चा क्रिकेट फॅन (सचिन फॅन नाही) पाणावलेले डोळे घेऊन बाहेर येईल हे नक्की .
आणि काय लिहू , फक्त इतकच ...
सचिन ..... सचिन !!! सचिन ...... सचिन !!! सचिन .... सचिन !!!
हेवाचून आधी मनात विचार आला
हेवाचून आधी मनात विचार आला याचा सिनेमा टॅक्स फ्री का केला. हे का उगाचचे लाड..
मग लक्षात आले "भारतरत्न" सचिन तेंडुलकरचा सिनेमा आहे Happy
तसे नव्हे . इस्पिरेशनल एज्युकेशनल मुव्ही म्हणून जास्तीत जास्त मुलांनी पहावा म्हणून. सरकार उत्पन्नाच्या बाबतीत आता फार अडचणीत असल्याने समर्थनीय कारण असल्याशिवाय टॅक्स फ्री करत नाही .( शिवाय सचिन काँग्रेसवाला आहे
)
शिवाय केरळ आणि इतर दोन राज्यानी तो आधीच करमुक्त केला होता.
पायरेटेड मिळाला तर विचार करीन
पायरेटेड मिळाला तर विचार करीन. उत्सुकता पण नाही.
ज्या माणसाने आयुष्यात एवढा
ज्या माणसाने आयुष्यात एवढा आनंद दिला , त्याच्यासाठी २ तास /२०० रू जास्त नसावेत अस मला वाटत। >>>>अगदी मनातील बोललास
ज्या माणसाने आयुष्यात एवढा
ज्या माणसाने आयुष्यात एवढा आनंद दिला , त्याच्यासाठी २ तास /२०० रू जास्त नसावेत अस मला वाटत। >>>>अगदी मनातील बोललास
पायरेटेड मिळाला तर विचार करीन
पायरेटेड मिळाला तर विचार करीन. उत्सुकता पण नाही.
>>>>
दोन्ही वाक्यात हलकासा विरोधाभास आहे
दोन्ही वाक्ये तृतीय दर्जाची
दोन्ही वाक्ये तृतीय दर्जाची आहेत
मी पाहिला. टोटल जॉयराईड आहे
मी पाहिला. टोटल जॉयराईड आहे फॅन्ससाठी. मस्ट सी! त्याच्या वडलांबरोबरच्या आणि कुटुंबाबरोबरच्या आठवणी हृद्य आहेत. तसेच इतरांनी त्याच्याबद्दल सांगितलेल्या किश्श्यांतून त्याच्या क्रिकेटिंग जिनीयसचे नवीन पैलू समोर येतात. कोहली वगैरे सुंदर बोलले आहेत.
पायरेटेड मिळाला तर विचार करीन
पायरेटेड मिळाला तर विचार करीन. उत्सुकता पण नाही. >> आपल्या मताचा आदर आहेच , पण मोबाईलवर /छोट्या स्क्रीनवर दुसर काहीतरी करत पहायचा सिनेमा नाही हा . एक अनुभव आहे , तो तसाच घेतला तर भिडेल
नितांतसुंदर झालाय हा चित्रपट.
नितांतसुंदर झालाय हा चित्रपट. हर्षा भोगले एके ठिकाणी म्हणतो की त्याच्या कारकीर्दीची लांबी पाहता भारतातील अनेक महत्त्वाच्या राजकीय सामाजिक घटना आणि सचिनची वाटचाल यांचा समांतर आलेख काढता येऊ शकेल.
सचिनची लोकांच्या मनात असलेली देवासमान प्रतिमा पाहता हा चित्रपट केवळ स्तुतीपट होऊ शकला असता पण दिगदर्शक जेम्स अरस्किनला विशेष धन्यवाद द्यायला हवेत. त्याने केलेली बांधणी इतकी पक्की आहे की क्षणभरही नजर हटत नाही.
सचिनपत्नी अंजली हिचे बोलणे आजपर्यंत फारसे कुठे ऐकले नव्हते. स्वतः एम डी असूनही तिने प्रेमापोटी करियर थांबवण्याचा अपूर्व निर्णय घेतला. तिचे विविध विचार अनेक ठिकाणी व्यक्त झालेत ज्यातून सचिनचे व्यक्तित्व आणखी झळाळते. उत्तम संस्कार करणारे कुटुंबीय आणि पुढे समर्थ साथ देणारी अंजली लाभणे ही नक्कीच दैवी देणगी आहे सचिनसाठी.
मी हा चित्रपट पाहताना हरवून गेलो यात नवल नाही, त्याची हरेक इनिंग बघत मोठे झालेल्या पिढीचा मी! पण सचिनला प्रत्यक्ष खेळताना न बघताही त्याचा फॅन असलेला मुलगा आणि क्रिकेटबद्दल पूर्ण अनास्था असणारी पत्नी हे तितकेच समरस होऊन बघत होते आणि काहीतरी सुंदर बघितल्याचं समाधान घेऊन आम्ही परत आलो, यामुळे मला जास्त आनंद वाटला.
छान लिहलेय.......
छान लिहलेय.......
छान लिहिलंय. नक्की बघणार.
छान लिहिलंय. नक्की बघणार.
तुम्हाला बघायचा तर बघा. मी
तुम्हाला बघायचा तर बघा. मी कुठे रोखलेय तुम्हाला ?
मला काय वाटतं ते मी म्हटलेय. ते तृतीय दर्जाचे आहे कि आणखी कसे, तुम्हाला काय करायचे ? आता तर नाहीच बघणार.
अजि म्या ब्रह्म पुन्हा एकदा
अजि म्या ब्रह्म पुन्हा एकदा पाहिले... परत एकदा आयुष्य सुरुवातीपासून बघितले. सचिनच्या खेळा सोबत मोठे झालेले माझ्यासारखे बरेच असतील. किमान ३ - ४ पिढ्यांनी त्याची अनुभवली आहे. १७-१८ वर्षाच्या कोहलीची भाषा बघा आणि १८-१९ वर्षाच्या सचिन ची भाषा बघा. अर्थात कोहलीच्या तोंडी असलेली भाषा ही तेंडूलकरने भारतीय क्रिकेटला बनवलेल्या महासत्तेमुळेच आहे. सुनिल गावस्कर यांनी खेळपट्टीवर ठाम पणे उभे राहायला शिकवले. सचिन ने उभे राहून जोरदार लढायला शिकवले. सौरभ ने एक सचिन लढतोय तर सगळ्यांना त्याच्याकडे बघून लढायला शिकवले. धोनी ने अरे ला कारे म्हणायला शिकवले. तर कोहली ने अरे ला .. "नुसते का रे नाही तर सोबत " MC,BC,चू.,ह. इ. जगातील सगळ्याच भाषेतील गुजगोष्टी करत लढायला शिकवले आहे. आता बघुया हे कुठ पर्यंत जाते
या माहीतीपटात नुसती सचिनची खेळी नाही तर इतरांच्या पण खेळींचा महत्त्वपुर्ण उल्लेख केला. जे इतर कुठल्याही चित्रपटात केले नाही.
गजोधार +११
गजोधार +११
छान लिहलय. भारतात दोन प्रकारचे लोक आहेत पाहिले सचिनवेडे आणि दुसरे वेडे. हा मूवी सचिनवेड्यासाठी कम्प्लिल्ट पॅकेज आहे. सचिनच्या ह्या २२ यार्डातल्या २४ वर्षाच्या प्रवासाला सलाम.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
तिकडे सैनिक देशासाठी शहीद
तिकडे सैनिक देशासाठी शहीद होताहेत आणि तुम्ही सिनेमा बघताय ?
तिकडे सैनिक देशासाठी शहीद
तिकडे सैनिक देशासाठी शहीद होताहेत आणि तुम्ही सिनेमा बघताय ?>>
प्रॉब्लेम सचिन आहे का ?? असेल तर नका बघू सिनेमा. भारतीय जवान सीमेवर जे करतात ते ग्रेटच आहे पण त्याचा आणि सिनेमाचा काय संबंध. सिनेमा नाही बघितला तर शत्रू हल्ला करणार नाहीये का ?? तस असेल तर सांगा म्हणजे सगळे काळजी घेतील.
पायरेटेड कॉपी आली सुद्धा, आज
पायरेटेड कॉपी आली सुद्धा, आज ट्रेनमध्ये दोन-तीन जणींना पाहीला हा मुवी बघताना
काल पाहिला.
काल पाहिला.
सुंदर बनवलाय सिनेमा. आवडला. म्हणजे सचिनचा आहे म्हणुन आवडणार्च होता असं नाही तर खरंच सिनेमा छान बनवलाय.
बघताना डोळे पाणावले नाहीत तर काही चुकार अश्रु आलेच बाहेर. मुलगी माझ्याकडे बघुन हसत होती.
सिनेमा बघुन जाणवलं की कितीक आले आणि गेले पण प्यार तो हमने इसीसे किया है
हॅट्स ऑफ टू सचिन. त्याच्या कष्टांना, मेहनतीला, एक चांगला म्हणुन तो जसा आहे त्याला सलाम.
म्हणजे देशासाथी जवान शहीद होत
म्हणजे देशासाथी जवान शहीद होत असताना करता येण्यासारखे हे काम आहे तर. धन्यवाद. एव्हढीच शंका होती.
दुर्लक्ष करा मंडळी.
दुर्लक्ष करा मंडळी.
सिनेमा आणि सचिन बद्दल बोला.
बघितला...आवडला...
बघितला...आवडला...
परत एकदा सचिन च्या बॅटींग च्या जोरावर आपण कित्येक मॅचेस जिंकताना पाहिल्या...
परत एकदा भारताने पाक ला कसलं भारी हरवलं ते पाहिलं...
परत एकदा २०११ चा वर्ल्ड कप उंचावलेला पाहिला आणि थिएटर मद्धेच जल्लोष केला जणु काही फायनल लाईव्ह चालु होती....
परत एकदा सचिन चं रीटायरमेंट स्पीच पाहिलं आणि परत एकदा रडले...
परत एकदा "सचिन आता मैदानावर खेळताना दिसणार नाही" ही कटू जाणीव झाली....
या सिनेमाने पुनःप्रत्ययाचा आनंद दिला आणि दुखःसुद्धा...
सचिन...सचिन !!!
सचिन...सचिन !!!
सचिन...सचिन !!!
दुर्लक्ष करा मंडळी. >>>
दुर्लक्ष करा मंडळी. >>>
+१
सगळ्या प्रतिक्रिया वाचून पाहून यावासा वाटतोय
Aaj pahila. Sundar aahe.
Aaj pahila. Sundar aahe. Prachand aavdala!
८०-९०ची पिढी जास्त भाग्यवान
८०-९०ची पिढी जास्त भाग्यवान आहे. ज्यांनी तुल्यबळ लढती अनुभवल्या आहे. आजकाल अशा लढती क्वचित पाहायला मिळतात.
सचिन विरुध्द वॉर्न, सचिन मॅग्रा, सचिन ब्रेट ली, ग्रॅह्म स्मिथ झहीर खान, जवागल श्रीनाथचा इनस्विंग, अझर- लक्ष्मण-कुलिनन मनगटाची नजाकत, गिलख्रिस्ट-गिब्स-मॅथ्यु हेडन-सेहवाग-आफ्रीदी-जयसुर्या-कालूविथर्ना यांची सलामीची महाप्रचंड स्फोटक फलंदाजी (तेव्हा तर २०-२० सारखी बुडाला आग लागल्यासारखी फलंदाजी करायची सवय सुध्दा लागली नव्हती), अक्रम-वकार - शेन बाँड-डेरेन गॉफ यांचे पायाचा अंगठा चेपवणारे यॉकर्स, तर वॉल्श-अॅम्ब्रोज-अॅलन डोनाल्ड- यांची खाली वाकायला लावणारे बाउंसर्स, मॅक्ग्रा-शॉन पॉलक- चामिंडा-हीथ स्ट्रीक-फ्लेमिंग यांची अचुकता, शोएब अख्तर-ब्रेट ली- डेन स्टेन-मखाया एन्तिनी यांचा वार्याशी स्पर्धा करणारा वेग, सकलेन- मुस्ताक अहमद- स्वान- वॉर्न-मुरलीधरन- व्हिक्टोरी-हरभजन यांच्यासारखे ऑलटाईम ग्रेटेस्ट स्पिनर जे काचेच्या खेळपट्टीवर सुध्दा चेंडू वळवतील., इजाज अहमद- मार्क बाउचर-अरविंद डिसल्वा-मायकल बेव्हन - कर्ल हुपर सारखे जे टिकले की मॅच तुमच्या हातून गेलीच समजा असे जगातील ऑलटाईम सर्वोकृष्ट फिनिशर
द्रविड-इंझमाम-पाँटींग- लारा- कॅलिस- अर्जुन रणतुंगा-मायकल हसी-स्टीव वॉ- अँडी फ्लॉवर सारखे खेळाडू फक्त खेळपट्टीवर उभे राहिले तरी चेंडू स्वतःहून धावा काढायला लागतो.
८०-९०सारखे खेळाडू आताच्या काळात नाही. आता नुसत्या ताकदीचा वापर होतो. साकलेन-वॉर्न-मुरलीधरन या तिघांना आजही कुठल्या एका कसोटी-वनडे मधे समाविष्ट केल्यास समोरच्या संघाला दणकेबाज विजय मिळवून देतील. फिरकीला साथ देणार्या खेळपट्टीवर हे तिघे आजच्या तारखेच्या सगळ्या संघातील सर्वोकृष्ट फलदांजाचा समाविष्ट असलेल्या संघाला (यात कोहली-डिव्हिलिअर्स-स्मिथ-रुट यांचा सुध्दा समाविष्ट असेल) अवघ्या ३ दिवसात दोनदा ऑलआऊट करतील.
आज एक सुनिल नरेन आणि अश्विन सोडल्यास एकही फिरकी गोलंदाज नाही जो स्वतः काही करामती करून विकेट काढेल. बाकीचे स्पिनर्स हे अॅव्हरेज असुन सुध्दा त्यांना आजच्या फलंदाजाना फिरकी खेळण्याचे तंत्र माहीत नसल्याने ते स्वतःहून विकेट देतात.
कोहली-स्मिथ-रुट यांना वरील दिग्गजांचा सामना करावा लागला नाही. हे त्यांचे कमनशिब म्हणावे लागेल. ब्रेट-अख्तर यांच्या तुफानांचा सामना करावा लागला नाही. मॅग्रा-पोलक यांची अचुकता अनुभवली नाही. अॅम्ब्रोज-वॉल्श-डोनाल्ड यांचा कानाजवळून सणसणीत जाणार्या बाउंसरचा स्वाद घेतला नाही. यांनी आजचे बॉलर स्टार्क-मुझ्झफिझुर-भुवनेश्वर-कमिन्स-रबाडा यांच्यासारख्यावर हुकूमत गाजवली आहे.
द्रविड-कलिनन-डिसल्वा-स्टिव वॉ-इंझमाम- लारा - पॉटींग निव्वळ हे ७ फलंदाज आजच्या सगळ्या उत्कृष्ट गोलंदाजांसमोर ५ ही दिवस फलंदाजी करतील. तरी २-३ विकेट पेक्षा जास्त विकेट जाणार नाहीत.
आजच्या क्रिकेटला कमी लेखण्याचा प्रयत्न नाही. पण आजचे क्रिकेट हे फलंदाजीप्राधान्य झाले आहे. गार्ड्स हेल्मेट बॅट क्षेत्ररक्षणाचे नियम बरेच फलंदाजांच्या बाजूने आहे. कंम्पुटरच्या मदतीने स्टॅटर्जी एक्स्पर्ट्स आले आहे. आयपीएल-बीग बॅश सारख्या स्पर्धेमुळे एकमेकांचे गुणदोष ओळखून येतात.
येस... आम्ही सर्वोकृष्ट क्रिकेट युग याची देही पाहिले आहे.
गजोधर,
गजोधर,
असे काही नसते, ते फक्तं हाईंड्साईट मध्ये तसे वाटते. पहिल्या पेक्षा जास्तं क्रिकेट खेळले जाते हे मान्य.
ब्रॅडमन वगैरे नंतर सोबर्स , रिचर्डस आले.... गावस्कर बॉर्डर आले... सचिन लारा पाँटिंग आले.... आता कोहली, स्मिथ, रूट आले....ईतकेच... नावं बदलली क्लास आहेच. ग्रेट कोणे दोन चार वर्षात होत नाही. त्यांच्या एकूण योगदान नंतर त्यांना ग्रेट म्हणतात.
आजचे फिल्डिंग आणि अफलातून कॅचेस बघतांना गावसकर, अब्बास,बॉर्डर्,सोबर्स ह्यांना नक्कीच जास्तं घाम गाळावा लागला असता.
ते टो क्रशींग यॉर्कर्स लीलया खेळणारे लोक आहेत आता. आजचे दुसरा, तिसरा, कॅरम बॉल, नकल बॉल, बॅक ऑफ द हँड वगैरे खेळताना ते ग्रेट हे चाचपडले असते ह्यात शंका नाही.
पुन्हा आजचे काँपिटिशन, स्ट्रेस, पब्लिकच्या भावना, मिडिया ह्यांची पूर्व नसलेली सर्कस सांभाळून परफॉर्म करणं सोपी गोष्टं नाहीए.
मुद्दा अशी तुलना अयोग्य आहे. सगळे आपापल्या काळानुरूप ग्रेट आहेत.
अफलातून अशक्य कॅचेस र्होड्स
अफलातून अशक्य कॅचेस र्होड्स सोलनकर स्लेटर यांनी सुध्दा घेतले आहे.
मी तुलना करत नाही. आजच्या फलंदाजांची फिरकी खेळण्याचे तंत्र गायब झाले आहे. हे सांगतोय. नॅथन लॉयन -यासीर सारख्यांना तर गावस्कर सोबर्स- रिचर्डस इ. लोक लिलया खेळतील. पण आजचे फलंदाज त्यावर अजुन माहीर होण्याऐवजी चाचपडत खेळत आहे.
टोक्रशिंग यॉकर्स यांना आजचे लोक सीमापार पाठवत आहे. म्हणतात मग यात माहीर झाले पण फिरकीचे काय ?
आजचे दुसरा, तिसरा, कॅरम बॉल, नकल बॉल, बॅक ऑफ द हँड>> हे तेव्हाही होते. दुसरा हा साकलेन ने काढलेला आहे. नकल बॉल हा फ्लेमिंग वापरत होता टाकल्यावर एकाच जागी काही मिलीसेकंद थांबायचा. (खर तर तो बॉल उलट्या दिशेने फिरवायचा) कॅरम बॉलच्या जागी टॉपस्पिन होता जो पडल्यावर अचानक उसळी मारतो, बॅक ऑफ द हँड म्हणजे स्लॉ बॉल.
फक्त नाव बदलली आहेत बाकी काही नाही.
आजची फिल्डींग मउसुत कृत्रिमपणे उगवलेल्या गवतावर करायला छान वाटते. त्यामुळे सुर मारून चेंडू अडवणे अजिबात धोकादायक वाटत नाही. पण तेव्हा ग्राउंड वर असा सुर मारणे म्हणजे स्वतःला खिसणीवर नारळ खिसण्यासारखे सोलून घेणे होते.
तुलना नाही आहे. पण तेव्हा बॅट्समन सुध्दा दिग्गज होते तर बॉलर तितकेच दिग्गज होते. समसमान पातळीवर क्रिकेट वाटत होते.
गजोधर यांच्याशी काही अंशी
गजोधर यांच्याशी काही अंशी सहमत , अक्रम , वकार , शोएब (+ रझ्झाक अन सकलेन ) यांच्या विरूध्द रन्स बनवणे अन आजच्या पाकिस्तान बॉलिंग विरूध्द रन्स बनवणे यात अंतर आहेच . पण टाईम चेंजेस
अप्रतिम परीक्षण !
अप्रतिम परीक्षण !
आणि सुंदर चित्रपट. मला क्रिकेटमधील तांत्रिक बाबी फार काही कळत नाहीत व मी सचिन फॅनही विशेष नाही. पण मलाही आवडला. अजिबात बोअर झालं नाही. खूप आवडला. जमल्यास मराठीच बघा! होम व्हिडियोज खूप क्यूट आहेत. पोरांना सचिन मराठीत दटावतो वगैरे अगदी आपल्यासारखाच.
त्याच्या रिटायरमेंट सोहळ्याचा भाग सर्वात इमोशनल झालाय. चाहत्यांची 'देव चालला माझा...' ही भावना आणि वातावरणात 'चालला नामाचा गजर'.. सचिन सचिन चा मंत्रघोष..जबरदस्त परिणामकारक चित्रण आहे. Documentary अशी छान बनवून थिएटर रिलीज करणं हे नवीन आहे. सचिनच्या २०० नॉट आऊट या निर्मिती संस्थेने आता आणखी वेगवेगळ्या फिल्म्स, डॉक्युमेंटरीज बनवाव्यात व इथेही एक नंबर बनावं.
मराठी वर्जन पाहिले. अतिशय
मराठी वर्जन पाहिले. अतिशय उत्तम. सचिनचा जीवनपट उलगडायला वास्तवदर्शी आणि माहितीपटाचा निवडलेला फॉर्म योग्य आहे असे वाटले.
प्रेक्षक हळू हळू गुंतत जाऊन शेवटी पूर्णपणे समरस होतो असा माझा अनुभव. भावनिक पातळीवर गुंतत जाणे अपरीहार्यपणे होते.
येणार्या पिढ्यांसाठी हा सिनेमा एक अनमोल ठेवा ठरू शकेल असा अंदाज आहे.
Pages