गप्पा with ‘नटसम्राट’

Submitted by BMM2017 on 25 May, 2017 - 22:38
ठिकाण/पत्ता: 
ग्रँड रॅपिड्स

Nana_Flyer_Reveal.png
७ रंगांचं इंद्रधनुष्य निर्माण करायची किमया ज्या निसर्गाने केली, त्याच निसर्गाने एक अजब, अचाट असा अष्टपैलू नट तयार केला, ‘नाना पाटेकर’ नावाचा! ‘प्रहार’ चा सणकी नाना, ‘वजूद’ चा कवी नाना, ‘Welcome’ चा विनोदी नाना, ‘अब तक छप्पन’ चा थंड रक्ताचा नाना, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ साकारणारा नाना.. “ही सगळी रूपं एकच माणूस इतक्या समर्थपणे कशी घेऊ शकतो?” असा प्रश्न प्रत्येकाला पडावा, अशी दैदिप्यमान कारकीर्द असलेला हा मराठमोळा माणूस! ‘नटसम्राट’ येतोय आणि तो नाना करतोय म्हटल्यावर.. “छ्या! नानाची ती personality च नाही. त्याला नाही जमणार..” म्हणणाऱ्या सगळ्यांच्या डोळ्यांतून खळकन् पाणी काढण्याची किमया केली ती ह्या नाना नावाच्या ‘नटसम्राटाने’!

‘नट’ म्हणून नाना जितका कमाल आहे, तितकाच तो एक अस्सल माणूस आहे. वरवर रागीट वाटणाऱ्या नानाचा एखादा लेख वाचला की त्याच्या संवेदनशील मनाचं दर्शन घडतं. तेव्हा नाना, वरून टणक पण आतून मऊ खोबरं असलेल्या नारळासारखा वाटतो. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी नाना जेव्हा झटतो, मोठी देणगी देऊ करतो, कष्ट उपसतो, तेव्हा मात्र त्या व्यक्तिमत्वासमोर हात जोडावेसे वाटतात. अहो, एखाद्या हिऱ्याला किती पैलू असावेत..!!

हाच आपला नाना आपल्या BMM च्या अधिवेशनाला येतोय! तुमच्या-आमच्याशी, आपल्या सगळ्यांशी गप्पा मारायला येतोय!! नाना नावाच्या अजब रसायनाला ‘याची देही याची डोळा’ बघायचं असेल आणि त्याच्यातल्या वक्त्याला, नटाला, तत्वज्ञाला ‘याची देही याची कानी’ ऐकायचं असेल, तर या.. आम्हांला सामील व्हा, BMM 2017 मध्ये!

माहितीचा स्रोत: 
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, July 7, 2017 - 22:32 to रविवार, July 9, 2017 - 22:32
Group content visibility: 
Use group defaults