http://www.maayboli.com/node/62657 पुढे चालू
**** हा भाग थोडासा लहान आहे कारण पुढील भाग मला एक सलग टाकायचा आहे.. यातच अॅडलं तर मज्जा जाईल***
अशातच तो दिवस आला...
आता त्या दिवसाबद्दल आठवून काहीच वाटत नाही पण त्या दिवशी आणि त्यानंतर महिनाभर असलेली आमची अवस्था भयंकर वाईट होती.
रोज बाबा रात्री अडीचच्या दरम्यान 'तो' ड्रॉप झाला की फोन करून कळवायचे. ते जरी कधी स्पष्ट बोलले नाहीत तरी तो फोन मी सुखरूप आहे हे सांगायलाच केलेला असायचा हे ही तितकंच खरं.
त्या दिवशी काही बाबांना फोन आला नाही. मी आणि आई एकमेकींशी एक शब्दही बोलत नव्हतो. दोघींच्या हृद्याचे ठोके ऐकु येतील इतकी ती शांतता! फार भयाण, भेसुर होती ती शांतता.! तिचा भंग करावा म्हणुन आणि काही तरी बोलायचं म्हणुन आई म्हणाली , 'मन्या, चल गॅलेरीत जाऊन बसुयात' आणि तिथेच चुकलो बहुदा आम्ही कारण इतका वेळ धरून ठेवलेला धीर बाहेर जाताच संपला होता. बाहेर जाताच नेहमी सारखी आम्ही आकाशाकडे मान वळवली आणि लक्षात आलं - आकाशात चंद्र नव्हता.
ती रात्र अमावस्येची होती...!
अक्षरश: धाय मोकलून रडायला लागलो आम्ही. जणू काही आमचे बाबा आता पुन्हा आम्हाला दिसणार नव्हते. किती वेळ एकमेकांना बिलगून रडत होतोत ते आत्ता आठवत नाही पण बेल वाजली तेंव्हा पहाटेचे ६ वाजले होते. दारात बाबा उभे होते.
समोर बाबा होते ते पण त्यांची नजर नेहमीची ओळखीची नव्हती.लाल भडक डोळे, बाबांना दारूची सवय नव्हती.डोळे इतके लाल भडक असण्याचं कारण आमच्या लक्षात येईना. "मन्या" बाबांनी हाक मारली. हा आवाज नक्कीच बाबांचा नव्हता. इतका घोगरा?
आईने मला मागे खेचलं आणि बाबा धाडकन जमिनीवर कोसळले. आईने ताबडतोब मामाला फोन केला. मामा आला.त्याने बाबांना अंगारा लावला. त्यांना उचलून बेडवर टाकायला म्हणुन त्यांच्या अंगाला हात लावला तर थंडगार शरीर..
बाबा २ दिवसांनी शुद्धीवर आले. तापाने फणफणलेले. २ दिवसांमधे बाबांचं वजन ८४ किलोचं ४५ किलो झालं होतं. कोणाशी बोलत नव्हते, काही खात नव्हते. शुन्यात नजर. २ दिवसांपुर्वी धडधाकट असलेला माणुस स्वत:च्या हाताने पाण्याचा ग्लास धरू शकत नव्हता...आम्ही सगळेच काळजीत होतो. अंगारे धुपारे सगळं चालू होतं. जो उपाय जी व्यक्ती सांगेल ते प्रत्येक उपाय आम्ही करत होतोत.साधारण ५व्या दिवशी बाबांनी सगळ्यांना त्या दिवशी जे घडलं ते सांगायला सुरुवात केली.
नेहमी प्रमाणे बाबा त्यांचा ड्रॉप करून होळकर ब्रिज क्रॉस करत होते. इतक्यात त्यांना भर रस्त्यात केस सोडून बसलेली एक बाई दिसली. बाबांची गाडी जवळ येताच तीने मान वळवून बाबांकडे पाहिलं. लाल भडक डोळे. भेसुर हसली. हसतच सुटली.
बाबांनी गाडी रिव्हर्स केली तशी चटकन उठुन त्यांच्या दिशेने चालत यायला लागली. बाबांनी गाडी मागे वळवली तशी जोरात ओरडली ' एक बेसहारा औरत को अकेला छोड के जा रहा है और खुदको मर्द कहता है. छोडुंगी नही तुझे'
पुढंचं बाबांना आठवत नव्हतं. त्यांना डायरेक्ट आठवलं ते त्यांना शुद्ध आलेली.
"झालं उजु! संपलं सगळं... काळजी घे पिल्लांची... सॉरी मी तुम्हाला या परिस्थीत ढकलं... माझ्यासोबत संपेल हे सगळं.... ऐकायला हवं होतं आपण त्या पिंगळ्याचं.... आता काय करायचं गं" बाबा जीव तोडुन बोलत होते... आई भयंकर रडत होती... मी प्रितीला जवळ घेऊन शांत बसले होते.... करणार काय होते दुसरं?
हो आणखी एक - जेंव्हा बाबांना ती बाई दिसली तेंव्हा गाडीतला टेप आपोआप बंद झाला आणि स्तोत्र बंद पडलं होतं ..
लोकं भेटायला येऊन उपाय सांगत होते, आम्ही सगळे उपाय करून थकलो होतो... पण हार कशी मानणार?
अशातच बाबांचा एक जवळचा मित्र भेटायला आला. राजूकाका पक्का नास्तिक माणुस... देव आणि भुत दोन्ही न मानणारा. सगळी घटना ऐकून तोही चक्रावला होता.
"वहिनी, तुम्ही तुमचे उपाय सुरू ठेवा पण प्लिज मला एकदा त्याला घेऊन डॉक्टर कडे जाऊ देत" तो आईला सतत विनवत होता.
त्यावेळेला आम्ही बाबांना ज्या मांत्रिकाकडे नेलं होतं त्याने कसला तरी ताविज दिला होता आणि स्पष्ट सांगितलं होतं की यांना घरा बाहेर पडू देऊ नका. या ताविजची शक्ती घराबाहेर काम करणार नाही आणि मग आपण त्यांना वाचवू शकणार नाही. त्या मांत्रिकाने हे ही सांगितलं की त्यांना एकटं सोडू नका, ती बाई किंवा ही कुठलीतरी शक्ती त्यांना केंव्हा घेऊन जाईल ते कळणारही नाही. अर्थातच आईने स्पष्ट नाही म्हणुन सांगितलं..
ती घटना घडून आता ७ दिवस झालेले. बाबांच्या हाता पायाच्या काड्या झालेल्या. वजन ४० किलोवर आलेलं. बाबा फार क्व्चित एखादा शब्द बोलायचे. तेही त्यांच्या आवाजत नाहीच. आम्ही होप्स सोडायला लागलेलो.
त्या काळात नाही नाही त्या ठिकाणी गेलो, होतं नव्हतं सगळं विकलं. बाबांवर उपाय करायचे म्हणुन. आई शाळेत जातच होती.. मी आणि प्रिती बाबांना एकटं सोडुन कुठेही जात नसूत.
एके दिवशी मला एक फोन आला. "आई शाळेत चक्कर येऊन पडलीये. तिला न्यायला ये"
माझा जीव खाली वर. बाबांना एकटं सोडायची भिती वाटत होती त्याहुनही जास्त भिती प्रितीला बाबांजवळ सोडून जायची वाटत होती. मनाचा हिय्या केला. प्रितीला घेऊन आईला आणायला निघाले. बाबांना सांगितलं काळजी घ्या.
शाळेत पोहचले तशी आई समोरून चालत आली. "तुम्ही काय करताय इथे? त्यांना एकटं का सोडलं?"
आईच्या प्रश्नांनी मी सुन्न्न झाले. तिला आलेल्या फोन बद्दल सांगितलं. अर्थातच तो कॉल फेक होता. आम्ही तिघी तडक घराकडे निघालो.
घरी पोहचलो तर घरात बाबा नव्हते. घर सताड उघडं होतं. घरात कोणीही नव्हतं.
आईने ताबडतोब सगळ्या नातेवाईकांना फोन केला.हताश होऊन मला तुफान मारणारी आणि नंतर जवळ घेऊन ढसाढसा रडणारी आई मला आजही आठवते. सगळे ओळखी पाळखीतले लोकं जमा झाले. बाबांना शोधायचा प्रयत्न करायला लागले.प्रत्येक प्रयत्न वाया जात होता.
इतक्यात फोनची रिंग वाजली
क्रमशः!
रिया खरंय, तुम्ही अनुभवलं आहे
रिया खरंय, तुम्ही अनुभवलं आहे म्हणजे तुला जास्त माहिती तुम्ही काय भोगलंत ते.
पण कटू आठवणी विसरून जा. जिंदगी बहोत बडी है, आगे देखो और आगे बढो.
बापरे रिया! नुसत वाचूनच
बापरे रिया! नुसत वाचूनच अंगावर काटा आला. तुम्ही तर ते अनुभवलं आहे. आम्हाला वाचायची उत्सुकता तर आहेच पण सगळ व्यवस्थित असावं असही वाटत आहे.. पुढचा भाग लवकर टाक.
रिया, खुप दिवसांनी लिहिते
रिया, खुप दिवसांनी लिहिते आहेस ग. तुझी लिखाणाची शैली आवडतेच. होप ही कथाच असु दे.
सामी, फटके द्यायला हवेत तुला.
सामी, फटके द्यायला हवेत तुला.. मी ज्या ग्रूपवर टाकलेलं हे सगळं (शेवटासकट) तिथे तू पण आहेस
मिसलंस का तू?
अग नाही बघितले ग !!!
अग नाही बघितले ग !!! नाहीतर अशी प्रतिक्रिया दिली असती का ग? ; -)
अय्यय्यो
अय्यय्यो
बापरे.. कल्पनेपलीकडे आहे हे
बापरे.. कल्पनेपलीकडे आहे हे सगळे.. शेवट चांगला असणार..
बापरे रिया, विश्वास बसतोय पण
बापरे रिया, विश्वास बसतोय पण जपुन लिहा. फार डिटेल्स देवु नका.
होप ही कथाच असु दे. >>>> कथा
होप ही कथाच असु दे. >>>> कथा नाहीये हे नक्की. खरंच घडलंय हे तू जशी लिहितेस त्यावरून समजते.
मी सुद्धा नास्तिक आहे, पण माझा देवावर विश्वास नसला तरी भूतांवर आहे. या घटनेत नेमके काय आहे याची उत्सुकता लागून राहीलीय... पण उद्याच टाक हा.. जास्त लांबवूनही मजा नको घालवूस.
अवांतर - आजच घरी येता येता रस्त्यात एक असाच उतरवून काढलेला नारळाला चुकून लाथ मारून आलो. अर्थात चुकूनच दगड समजून मारली, अन्यथा अन्नाला लाथाडले नसते. ते काळे काय असते (अबीर?) त्याने रंगवलेला असल्याने समजले नाही.
माझ्या मावशीचे मिस्टर लहान
माझ्या मावशीचे मिस्टर लहान होते ,घरी खायची बोंब असायची.तेव्हा कब्रस्तानमधे ठेवलेली अंडी घरी आणून खायचे.आज ७५ वर्षाचे आहेत व एकदम ठणठणीत आहेत.
बाबा २ दिवसांनी शुद्धीवर आले.
बाबा २ दिवसांनी शुद्धीवर आले. तापाने फणफणलेले. २ दिवसांमधे बाबांचं वजन ८४ किलोचं ४५ किलो झालं होतं.
बेशुद्ध बाबांना दोन दिवस घरीच ठेवले? दवाखान्यात का नाही घेउन गेलात?
दोन दिवसात जवळ जवळ ४० किलो वजन कमी झाले , दोन दिवसात ५० % वजन कोणत्याही आजारात कमी होत नाही. घरी वजन काटा ठेवलाय का? असेल तर प्रथम तो तपासून घ्या.
लिखाणशैली जबर आवडली.
Marmik, thanks for your
Marmik, thanks for your pratisad
You either read story carefully or wait till tommarow
As I said bfr, there are few things with mirch masala but story is truly true
एकादी मूवी बघतोय असे झालाय...
एकादी मूवी बघतोय असे झालाय... काय पकड आहे लेखनावर... हेट्स ऑफ
मस्त लिहील आहे. माझा वज्जिबात
मस्त लिहील आहे. माझा वज्जिबात विश्वास नाही पण लिखाण आवडले. अशीच एक घटना (खुपच छोट्या प्रमाणात १ दिवस ताप होता आणि दुसर्या दिवशी ठिक झालेली) माझ्या बहीणीच्या बाबतीत घडली होती.
जिज्ञासा +१
जिज्ञासा +१
कुणाच्या आयुष्यात घडलेल असेल तर नको रे देवा वाटतय! >>> अगदी खरंय !
पु (सुखांत )भा प्र !
कुछ तो गडबड है दया....
कुछ तो गडबड है दया....
You either read story
You either read story carefully or wait till tommarow Happy
बाबांचे व त्या हडळीचे लालभडक डोळे अती मिर्च मसाला वापरल्याने झाले असतील हे समजू शकतो, परंतू 'बेशुद्ध' व 'वजन' हे फॅक्ट असेल असं वाटलं म्हणून प्रश्न विचारले होते. तोही मिर्च मसाला असेल तर .... जाउ दे पुढच्या भागाची वाट बघतो.
मार्मिक,
मार्मिक,
बाबा बेशुद्ध होते तरीही आम्ही दवाखन्यात नेलं नाही कारण आम्ही भुत कसं उतरवायचं यत बिझी होतो
'एका' दिवसात १० किलो वजन कमी हा मिर्च मसाला असेल बहुदा पण ३-५ दिवसांमधे नक्कीच उतरलं होतं
आता पुढचा भाग लिहिते
http://www.maayboli.com/node
http://www.maayboli.com/node/62678
बापरे! वाचताना काटा आला
बापरे! वाचताना काटा आला अंगावर. किती भयंकर गेला असला पाहिजे तो काळ तुमच्यासाठी!
Pages