मन माझे सैराट... ( भाग २ )..

Submitted by दिपक ०५ on 21 May, 2017 - 13:22

(5:30p.m. कॉफी शॉप मध्ये सागर रोहन ची वाट बघत असतो.. थोडया वेळाने रोहनला फोन लावण्यासाठी आपला मोबाईल घेणार तोच समोरच्या दारातून रोहन येत असताना दिसतो..)
दोघांची नज़रानजर होते. दोघेही एकमेकाला अगदी छोटीशी वेलकम स्माईल देतात. रोहन सागरच्या समोरील खुर्ची ओढून बसतो..
दोन मिनटांसाठी सर्वत्र शांतता पसरते. दोघेही एकमेकाकडे बघतात पण दोघांनाही वाटत की सुरुवात कशी करावी..
शेवटी त्या शांततेला तोडत रोहन बोलतो -
सागर, मला वाटतय आपण आता आपल्या विषयाकडे वळू शकतो.. -रोहन.
विषय?.. -सागर.
सागर, तु मला प्राची आणि तुझ्या बद्दल काही सांगणार होतास. आणि त्यासाठीच मि इथे आलोय. गेली 15 मिनटं तु गप्प बसून आहेस.. जर तूला तुझं पर्सनल मॅटर शेअर करायचं नसेल तर इट्स फाइन.. आय मस्ट लिव देन.. -रोहन.

सॉरी रोहन, पण अॅक्च्यूली आय निड यूअर हेल्प.. -सागर.

हे बघ सागर गेला 1 महिना तू सूट्टीवर आहेस.. आणि त्यात तूझा फोन बंद होता. आणि आज अचानक ऑफीसला आलास.
दिक्षीत सर खूप अपसेट आहेत.. आणि जो पर्यंत तू तुझा प्रॉब्लेम नाही सांगणार.. हाऊ कॅन एनीवन हेल्प यू सागर??.. -रोहन..

रोहन मागिल तीन चार महिन्यापासून प्राची आणि माझ्यात वाद वाडत चाललाय, अधि कसबसं समजावून चालवलं होत पण आता पाणी डोक्यावरून चाललय. मला ह्यातून बाहेर पडायचय
रोहन.. -सागर..

अरे पण असं झालं तरी काय?. आणि आता वेगळ होताय, तीन वर्ष रिलेशन मध्ये राहिल्या नंतर?.. अरे लग्नाचा विचार होता ना तूझा.. -रोहन..

होता.. पण तीच खरं रुप कळण्या अधि!.. -सागर..

खरं रुप??. -रोहन..

.....
( क्रशम)...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकतर भाग फार लहान आहेत
दुसरं सारखं सारखं काय त्याच झाडावर म्हणावंस वाटतंय... म्हणजे कथा तसुभरही पुढे सरकली नाहीये
तिसरं कथा वर्तमानकाळात लिहिलित तर जास्त इफेक्टिव्ह वाटेल.. म्हणजे रोहनला तो दिसतो ऐवजी रोहनला तो दिसला etc

आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद रीया...
व पूढचा भाग आपल्याला आवडेल याची पक्की खात्री...

धन्यवाद सर!..
आपल्या पाठिंब्याची गरज आहे..
पूढील भाग लवकरच...

.....
( क्रशम)...
>>

???

क्रशमः म्हणजे? लग्न होत्म की फक्त क्रश? क्रश होता हे दाखवण्यासाठी क्रमशः ऐवजी क्रशमः लिहील आहे का? Uhoh

बाकी छानच. आणखी भाग पटापट येऊदे

धन्यवाद!..
प्रतिसाद देत रहा..
लिहायला प्रोत्साहन मिळेल...