नका होऊ नव्या पानांमुळे बेभान वृक्षांनो

Submitted by बेफ़िकीर on 18 May, 2017 - 10:32

नका होऊ नव्या पानांमुळे बेभान वृक्षांनो
पुन्हा घालूच आम्ही मानवी थैमान वृक्षांनो

पुन्हा दिसणार नाही ती पुण्याची शान वृक्षांनो
कधी जे रान होते, आज रेगिस्तान वृक्षांनो

मुलायम हायवे झालेत तुमच्या पार्थिवांवरती
तरी करता कडेने महिरपी नादान वृक्षांनो

फुले पाने फळे छाया वगैरे ठीक आहे पण
करा केव्हातरी वृत्तीच तुमची दान वृक्षांनो

मुलांना सूरपारंब्या, मुलींना देत जा झोके
तुम्ही निपजू नका केव्हाच नि:संतान वृक्षांनो

स्वतःला धड उभे ना राहता येते तरी फुलते
अश्या वेलीमुळे होता तुम्ही सज्ञान वृक्षांनो

तिला ह्या सावलीतच मागणी मी घातली होती
कुण्या जन्मात करणारात कन्यादान वृक्षांनो

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

udemy_home_300x250.png

नका लिहीणे सोडु सर्जनशील मायबोलीच्या लेखकानो
पुन्हा पुन्हा घालूच बेभान प्रतिसादाचे थैमान लेखकानो

वाह बेफिकिर. Whatsapp वर फिरवा. अनेक निसर्गप्रेमी संस्थांना आवडण्यासारखे व बागांमधे वगैरेवर झळकु शकेल अशी रचना. आवडली.

छान आहे. सगळी समजली नाही, पण जेवढी समजली तेवढी आवडली..

मुलायम हायवे झालेत तुमच्या पार्थिवांवरती
तरी करता कडेने महिरपी नादान वृक्षांनो >> हे आवडले.

तुमच्या रचना आणि अभिव्यक्ती छानच असतात.

नका होऊ नव्या पानांमुळे बेभान वृक्षांनो
पुन्हा घालूच आम्ही मानवी थैमान वृक्षांनो...... अप्रतिमच !!

करा केव्हातरी वृत्तीच तुमची दान वृक्षांनो ..... सुरेख !!

वाह् ! ओळन् ओळ वाचताना बेफीजींनाच वाचतो आहे,असे वारंवार अधोरेखित करणारी गझल!
विरळा रदीफ,शानदार गझल! त्यातही,
>>>स्वतःला धड उभे ना राहता येते तरी फुलते
अश्या वेलीमुळे होता तुम्ही सज्ञान वृक्षांनो>>>ज ब र द स्त!
शिवाय,
>>>करा केव्हातरी वृत्तीच तुमची दान वृक्षांनो>>>अतिशय मनस्वी मिसरा!

छान