......स्पॉयलर अलर्ट.........
ज्यांनी चित्रपट पाहिला नाही, त्यांनी वाचू नये, गौप्यस्फोट होण्याची शक्यता
बाहुबली चांगला का वाईट, भव्यदिव्य का नाही वगैरे विषयांवर भरपूर धागे निघाले आहेत. त्यात भर घालायाची इच्छा नाही. पण त्या चित्रपटाच्या निमित्ताने काही विचार डोक्यात आले ते मांडण्याचा प्रयत्न.
या चित्रपटात सर्वात डोक्यात जाणारी व्यक्तिरेखा कुठली असेल तर ती कटप्पाची. भलेही राजामौलीने त्याला खूप शूर, इमानदार, प्रेमळ वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केलेला असला तरी प्रत्यक्षात तो एक अत्यंत निर्बुद्ध असा सेवक होता. खरेतर सिंहासनाचा गुलामच.
मान खाली घालून उभे राहयाचे आणि जी काही आज्ञा येईल तिचे बिनबोभाट पालन करायचे हेच काम. मग कितीही चुकीची, अन्यायाची असेल तरी. बरं हे एखाद्या क्षुल्लक माणसाने केले असते तरी समजू शकले असते पण हा राज्याचा जवळजवळ अनधिकृत सेनापतीच. राजकुमारांना अंगावर खेळवले आहे. आपल्या या निर्बुद्ध वागण्यामुळे राज्याचे किती नुकसान होते आहे हे कळत नसेल.
राजमाता भावनेच्या भरात आदेश देते, तो हा बिनबोभाट पाळतो. तिला असे म्हणत नाही, की हे चूक आहे. जर हा आदेश पाळायचा असेल तर पहिले मला ठार करा. तुम्हाला तो नको असेल तर आम्ही सगळे इथून निघून जातो, कुंतल देश किंवा अजून कुठे. पण नाहीच, हा नंदीबैल मान डोलावतो आणि एक सुखी संसार आपल्या हाताने उध्वस्त करतो. एक संसार नाही, बल्लालदेव क्रूर आहे, प्रजेवर अन्याय करणार आहे हे माहीती असून देखील तो हे कृत्य करतो. देवसेनेला बंदी घालून उघड्यावर ठेवताता तर त्यबद्दल बोलत नाही. बरे पहिल्या पार्टमध्ये तो रानरेड्याच्या हातून आपणहून मारला जातोय क्रूर राजा तेही नाही. गुलामी इतकी मुरलेली अंगात की सेवा करत रहायची, कितीही क्रूर असला तरी. आणि याच मानसिकतेमुळे इतिहासात अनेक कटाप्पा तयार झाले आणि त्यांच्या मानसिक गुलामगिरीमुळे बाकीच्यांना अत्याचार सोसावे लागले आहेत.
पटदिशी डोळ्यासमोर येणारा कटाप्पा म्हणजे मिर्झाराजे जयसिंग. शहाजहान आजारी पडल्यानंतर औरंगजेब आणि दारा शिकोह यांच्यात सत्तास्पर्धा सुरु झाली. दोन्ही राजपुत्र त्यावेळी यथातथाच होते आणि राजपुतांच्या हाती सामर्थ्य होते. आता ते ज्यांच्या बाजूने जाणार तोच राजपुत्र जिंकणार हे उघड होते. अशा वेळी मिर्झा राजेंनी थोडा-फार दयाळू, एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दाराची निवड न करता क्रूर, धर्मपिसाट औरंगजेबाची निवड केली हे अनाकलीनय आहे. खुद्द शिवाजी राजेंनी नंतर एका पत्रात याचा उल्लेख केला आहे. बरं, पुूढेही जेव्हा औरंगजेबाने हिंदु लोकांवर अत्याचार सुरु केले तेव्हाही हा कटाप्पा मान खाली घालून दरबारात उभाच.
वर राजाची मर्जी व्हावी म्हणून शिवाजीराजांना पराभूत करण्याच्या कामगिरीवर निघाला. शंभर टक्के मानसिक गुलामगिरी.
तोच प्रकार १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात. आख्खे उत्तर पेटले असताना आणि गोऱ्यांना मारण्यासााठी शिपाई जीवाचे रान करत असताना केवळ कटाप्पाच्या सहाय्याने इंग्रज टिकून राहीले, तो कटाप्पा होता शिख पलटणी. या शिखांनी आपली स्वामीनिष्ठा इंग्रजांच्या पायी इतक्या पराकोटीची वाहीली होती की आपल्याच बांधवांचे राजरोस मुडदे पाडले. इतकेच नाही, गावेच्या गावे जाळली, गाणी म्हणत लोकांना फासावर चढवले. त्यावेळी ही शिख पलटण इंग्रजांच्या बाजूने उभी नसती तर त्यांना भारतात राहणे अशक्य झाले असते. त्यांच्या या स्वाभिमानशून्य गुलामगिरीने देशाचे फार मोठे नुकसान केले.
नंतर मग जेव्हा त्यांना जाग आली आणि स्वांतत्र्यासाठी लढा पुकारला हे सगळे नंतरचे. पण जेव्हा आवश्यक होते तेव्हा हा कटाप्पा बाहुबलीलाच मारून मोकळा झाला होता.
अजून एक लांबचे पण जगाच्या इतिहासावर परिणाम करणारे उदाहरण म्हणजे डेझर्ट फॉक्स रोमेल.
चर्चीलने देखील ज्याचे गुणगान केले आहे अशा रोमेलकडे सुरुवातीला पश्चिम आघाडीचे नेतृत्व होते. तो जर्मन जनतेच्या गळ्यातला ताईत होता. पण आपली स्वामीनिष्ठा त्याने हिटलरच्या पायाशी वाहलेली होती. हिटलरचे अनेक निर्णय अचाट चुकीचे आहेत हे दिसत असूनही त्याने ते विनातक्रार पाळले. सैन्याचे अधिपत्य हातात असतानाच जर त्याने उठाव केला असता तर कदाचित दुसऱ्या महायुद्धाचे चित्रच पालटले असते.
नंतर त्याने हिटलरला मारायच्या कटात गुप्तपणे सहभाग घेतला होता आणि याची कुणकुण हिटलरला लागताच त्याने गुप्तपणे त्याला विषप्राशन करण्याचा मार्ग दिला. आपल्याला हिटलर जाहीररित्या मारण्याचे धाडस करू शकत नाही हे माहीती असूनही रोमेल आत्महत्येच्या मार्गाने गेला.
योग्य वेळीच त्याने हिटलरचा काटा काढायला मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी केली असती तर लाखो निष्पाप जीव वाचले असते.
अजूनही आहेत, पण सध्या इतकेच पुरे.
त.टी. - चित्रपटाला काय इतके सिरीयसली घ्यायचे असे कुणी म्हणू नका. चित्रपटाला सिरियसली घेतले नाहीये, अशा पद्धतीच्या वृत्तीबद्दल हे भाष्य आहे. कटाप्पा केवळ निमित्तमात्र आहे.
द्रोपदी नक्की कसचे रेपेंट करत
द्रोपदी नक्की कसचे रेपेंट करत होती? अलवेस loved करना याचे की करनाशि शादी नही होउ शक्ल याचे ?
मिरझाराजे चे उदाहरण बरोबर वाटले नाही, औरंगजेब कपटी आहे, पुढे सत्तेवर आल्यास दाराच्या समर्थकांचे खरे नाही, त्यामुळे आपले राज्य, राजपुतांमधले आपले स्थान जाणार हा विचार करून वैयक्तिक फायद्यासाठी त्याने ही चाल खेळली॥
मिर्झा राजेंनी औरंगजेबाला मदत
मिर्झा राजेंनी औरंगजेबाला मदत केली नसती ऐनवेळी तर तो सत्तेवर आलाच नसता.
आणि दारा जास्त सुहृदपणे वागवत होता सगळ्यांना
नका असा कटप्पा होऊन शुद्ध
नका असा कटप्पा होऊन शुद्ध मजकुराचा बाहुबली करू नका
हा हा.. अशुचेम्प... जमलंय जोक
काल नाथाभौ खडसेंनी जाहीर केलं
काल नाथाभौ खडसेंनी जाहीर केलं की मी विरोधी पक्षातील नेत्यांना भेटलो कारण मला जाणून घ्यायचे होते ' कटप्पाने बाहुबलीको क्यु मारा?' . नाथाभौंच्या मनात कोण कटप्पा असेल बरे?
फार छान लेख.
फार छान लेख.
आपल्याकडील तत्वज्ञानात बरेच काही काही लिहीलेले आहे - त्यामुळे मनात गोंधळ होण्याची शक्यता फार. अक्कल असते पण काहीतरी एक निर्णय घेणे आवश्यक असते.
प्राण गेला तरी वचन पाळीन. कुणाचा प्राण? स्वतःचा की त्यापायी इतर निर्दोष, निष्पाप लोकांचा?
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियम्!
अप्रिय कुणाला? ज्याला वचन दिले आहे त्याला की स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीला?
सारासार विचार करण्यात वेळ घालवायचा की जे बरोबर वाटेल तेच खरे असा दृढनिष्चय करून आलेल्या संधीचा ताबडतोब फायदा घ्यायचा?
कदाचित पौराणिक व्यक्तींना स्वार्थ नसावा, पण ऐतिहासिक नि सध्याच्या परिस्थितीतील लोकांना स्वार्थ, भीति, वैयक्तिक प्रतिष्ठा या गोष्टींचा विचार असतोच ना? जर वचन पाळले तर स्वार्थ लाभेल, स्वतःचे प्राण वाचतील, नि लोक आपल्या वचन पाळण्याची स्तुति जगबुडी पर्यांत करत रहातील. बाकी सर्व परमेश्वराची इच्छा - तसे आपल्याच संस्कृतीत म्हंटले आहे!
कारण वचन पाळणे याला सर्वात जास्त महत्व.
अहिंसा परमो धर्मः असे सांगणारे लोकहि आपल्याच संस्कृतीत नि धर्म व न्याय यांच्या संरक्षणासाठी युद्धाय कृतनिष्चय हेहि आपल्याच गीतेत.
अहिंसा मोठी की न्याय, धर्म यांचे रक्षण मोठे? की आपले वचन? नि न्याय व धर्मरक्षण नक्की कशामुळे होईल? कुणावर न्याय? पांडवांवर? मग वचन भंग केल्याने कौरवांवर अन्याय होईल का?
तर ऐन वेळी काहीतरी निर्णय घ्यावा लागतो. अश्या वेळी वचन महत्वाचे असा पक्का विश्वास असेल तर त्या प्रमाणे करावे.
हे वचन पाळणे, सत्य, अहिंसा, दया, क्षमा इ. आपल्या संस्कृतीत उच्च समजले जाते तितके इतर संस्कृतीत नसावे.
इतर धर्मात धर्मप्रसार, सत्ता याला महत्व जास्त, त्यासाठी वचन मोडणे, खोटे बोलणे, हिंसा करणे, दया करणे हे कमी महत्वाचे.
मग वर कुणितरी लिहिल्याप्रमाणे मोठ्या व्यक्तींच्या चुका विसरून चांगल्या गोष्टी लक्षात ठेवाव्या.
कटाप्पाने वाईट काय केले या ऐवजी त्याने वचन कसे पाळले याची स्तुति करा.
मी तर जाम गोंधळलो.
कधी कधी अक्कल नसलेले लोक सुद्धा किती ठामपणे एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतात, दादागिरी करून स्वतःला हवे ते करतात, त्यांच्या दृढनिष्चयाचे मला नेहेमीच कौतुक वाटते - विशेषतः इराक युद्धात अनेक चांगले अमेरिकन मेले, अनेक निष्पाप इराकी मेले, दोन्ही देशाचे वाटोळे झाले . तरी दृढनिष्चय हेच फक्त बघायचे. किती ती डेमोक्रसी पसरवण्याची सदिच्छा!!
आयपीएलचा कटप्पा धोनी.
आयपीएलचा कटप्पा धोनी.
आता होतील शंभर!
अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा
अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव च: l - असा पूर्ण श्लोक आहे.
Pages