इतिहासातले कटाप्पा

Submitted by आशुचँप on 16 May, 2017 - 04:30

......स्पॉयलर अलर्ट.........

ज्यांनी चित्रपट पाहिला नाही, त्यांनी वाचू नये, गौप्यस्फोट होण्याची शक्यता

बाहुबली चांगला का वाईट, भव्यदिव्य का नाही वगैरे विषयांवर भरपूर धागे निघाले आहेत. त्यात भर घालायाची इच्छा नाही. पण त्या चित्रपटाच्या निमित्ताने काही विचार डोक्यात आले ते मांडण्याचा प्रयत्न.

या चित्रपटात सर्वात डोक्यात जाणारी व्यक्तिरेखा कुठली असेल तर ती कटप्पाची. भलेही राजामौलीने त्याला खूप शूर, इमानदार, प्रेमळ वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केलेला असला तरी प्रत्यक्षात तो एक अत्यंत निर्बुद्ध असा सेवक होता. खरेतर सिंहासनाचा गुलामच.

मान खाली घालून उभे राहयाचे आणि जी काही आज्ञा येईल तिचे बिनबोभाट पालन करायचे हेच काम. मग कितीही चुकीची, अन्यायाची असेल तरी. बरं हे एखाद्या क्षुल्लक माणसाने केले असते तरी समजू शकले असते पण हा राज्याचा जवळजवळ अनधिकृत सेनापतीच. राजकुमारांना अंगावर खेळवले आहे. आपल्या या निर्बुद्ध वागण्यामुळे राज्याचे किती नुकसान होते आहे हे कळत नसेल.

राजमाता भावनेच्या भरात आदेश देते, तो हा बिनबोभाट पाळतो. तिला असे म्हणत नाही, की हे चूक आहे. जर हा आदेश पाळायचा असेल तर पहिले मला ठार करा. तुम्हाला तो नको असेल तर आम्ही सगळे इथून निघून जातो, कुंतल देश किंवा अजून कुठे. पण नाहीच, हा नंदीबैल मान डोलावतो आणि एक सुखी संसार आपल्या हाताने उध्वस्त करतो. एक संसार नाही, बल्लालदेव क्रूर आहे, प्रजेवर अन्याय करणार आहे हे माहीती असून देखील तो हे कृत्य करतो. देवसेनेला बंदी घालून उघड्यावर ठेवताता तर त्यबद्दल बोलत नाही. बरे पहिल्या पार्टमध्ये तो रानरेड्याच्या हातून आपणहून मारला जातोय क्रूर राजा तेही नाही. गुलामी इतकी मुरलेली अंगात की सेवा करत रहायची, कितीही क्रूर असला तरी. आणि याच मानसिकतेमुळे इतिहासात अनेक कटाप्पा तयार झाले आणि त्यांच्या मानसिक गुलामगिरीमुळे बाकीच्यांना अत्याचार सोसावे लागले आहेत.

पटदिशी डोळ्यासमोर येणारा कटाप्पा म्हणजे मिर्झाराजे जयसिंग. शहाजहान आजारी पडल्यानंतर औरंगजेब आणि दारा शिकोह यांच्यात सत्तास्पर्धा सुरु झाली. दोन्ही राजपुत्र त्यावेळी यथातथाच होते आणि राजपुतांच्या हाती सामर्थ्य होते. आता ते ज्यांच्या बाजूने जाणार तोच राजपुत्र जिंकणार हे उघड होते. अशा वेळी मिर्झा राजेंनी थोडा-फार दयाळू, एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दाराची निवड न करता क्रूर, धर्मपिसाट औरंगजेबाची निवड केली हे अनाकलीनय आहे. खुद्द शिवाजी राजेंनी नंतर एका पत्रात याचा उल्लेख केला आहे. बरं, पुूढेही जेव्हा औरंगजेबाने हिंदु लोकांवर अत्याचार सुरु केले तेव्हाही हा कटाप्पा मान खाली घालून दरबारात उभाच.

वर राजाची मर्जी व्हावी म्हणून शिवाजीराजांना पराभूत करण्याच्या कामगिरीवर निघाला. शंभर टक्के मानसिक गुलामगिरी.

तोच प्रकार १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात. आख्खे उत्तर पेटले असताना आणि गोऱ्यांना मारण्यासााठी शिपाई जीवाचे रान करत असताना केवळ कटाप्पाच्या सहाय्याने इंग्रज टिकून राहीले, तो कटाप्पा होता शिख पलटणी. या शिखांनी आपली स्वामीनिष्ठा इंग्रजांच्या पायी इतक्या पराकोटीची वाहीली होती की आपल्याच बांधवांचे राजरोस मुडदे पाडले. इतकेच नाही, गावेच्या गावे जाळली, गाणी म्हणत लोकांना फासावर चढवले. त्यावेळी ही शिख पलटण इंग्रजांच्या बाजूने उभी नसती तर त्यांना भारतात राहणे अशक्य झाले असते. त्यांच्या या स्वाभिमानशून्य गुलामगिरीने देशाचे फार मोठे नुकसान केले.

नंतर मग जेव्हा त्यांना जाग आली आणि स्वांतत्र्यासाठी लढा पुकारला हे सगळे नंतरचे. पण जेव्हा आवश्यक होते तेव्हा हा कटाप्पा बाहुबलीलाच मारून मोकळा झाला होता.

अजून एक लांबचे पण जगाच्या इतिहासावर परिणाम करणारे उदाहरण म्हणजे डेझर्ट फॉक्स रोमेल.

चर्चीलने देखील ज्याचे गुणगान केले आहे अशा रोमेलकडे सुरुवातीला पश्चिम आघाडीचे नेतृत्व होते. तो जर्मन जनतेच्या गळ्यातला ताईत होता. पण आपली स्वामीनिष्ठा त्याने हिटलरच्या पायाशी वाहलेली होती. हिटलरचे अनेक निर्णय अचाट चुकीचे आहेत हे दिसत असूनही त्याने ते विनातक्रार पाळले. सैन्याचे अधिपत्य हातात असतानाच जर त्याने उठाव केला असता तर कदाचित दुसऱ्या महायुद्धाचे चित्रच पालटले असते.

नंतर त्याने हिटलरला मारायच्या कटात गुप्तपणे सहभाग घेतला होता आणि याची कुणकुण हिटलरला लागताच त्याने गुप्तपणे त्याला विषप्राशन करण्याचा मार्ग दिला. आपल्याला हिटलर जाहीररित्या मारण्याचे धाडस करू शकत नाही हे माहीती असूनही रोमेल आत्महत्येच्या मार्गाने गेला.

योग्य वेळीच त्याने हिटलरचा काटा काढायला मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी केली असती तर लाखो निष्पाप जीव वाचले असते.

अजूनही आहेत, पण सध्या इतकेच पुरे.

त.टी. - चित्रपटाला काय इतके सिरीयसली घ्यायचे असे कुणी म्हणू नका. चित्रपटाला सिरियसली घेतले नाहीये, अशा पद्धतीच्या वृत्तीबद्दल हे भाष्य आहे. कटाप्पा केवळ निमित्तमात्र आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो मी ज्या लॉजिक ने मिर्झाराजे जयसिंग धरले त्याच लॉजिक ने संस्थानिक, तत्कालीन राजे वगैरे म्हंटलो. मला वाटते योग्य बाजूकडे आपली शक्ती वापरायची संधी असताना चुकीच्या बाजूला समर्थन देणारे सगळेच यात येतील.

हो पण ज्यात फारसा स्वार्थ नाही, पण केवळ स्वामी भक्ती म्हणून कर्तव्य करत राहणे जे कटप्पा करतो.
सामान्य सैनिकाला कुणी वालीच नसतो, ते राजा, सेनापती, अधिकारी सांगतील तो शत्रू मानून त्यावर तुटून पडतात.
एक सैनिकाच्या समर्थनाने फारसा फरक पडत नाही पण ज्यांच्या हातात काही अधिकार आहेत, जे काही अंशी किंग मेकर आहेत त्यांनी केवळ स्वामी भक्ती अंधळेपणे राबवली तर किती नुकसान होऊ शकत हे कटप्पा दाखवतो.

विचार करा ओरंगजेबा ऐवजी दारा शिकोह बादशहा झाला असता तर भारतातली परिस्थिती काय असती. असे नाहीये की त्याने अगदी सगळ्यांना स्वतंत्र केले असते पण तो एक चांगला राजा होता असे अनेकांनी लिहून ठेवले आहे.

<<पण ज्यांच्या हातात काही अधिकार आहेत, जे काही अंशी किंग मेकर आहेत त्यांनी केवळ स्वामी भक्ती अंधळेपणे राबवली तर किती नुकसान होऊ शकत हे कटप्पा दाखवतो.>>

हेच तर राजसत्तेचे कौशल्य असते. एरवी धनानंदाला राक्षस मिळाला नसता! Happy

वाह सुरेख उदाहरण
अमात्य राक्षस

छान छान, अगदीच विसरून गेलेलो, शंभर टक्के कटप्पा

"how would you like it to be proved?" - its your accusation. you can prove it with evidence or facts, whatever suits you.

"सचिनभक्तांशी वाद घालणे सोडून दिले आहे." - Sounds good! मी तर नानाकळांशी पहिल्या कॉमेंट वरच सहमत झालो होतो आणी आहे.

It's Not accusation. That's what I can say.

Lot of things happen behind the curtains. You won't know it until you are part of the system.

भय

राजसत्तेविरुद्ध, प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध (भले ती किती ही अनैतिक आणि चुकीची बाजू असो) गेलो आणि अयशस्वी ठरलो काही कारणाने तर आपलं, आपल्या कुटुंबीयांचं, आपल्या सैनिकांचं बरं वाईट हे विधिलिखित च.

आणि या दोन विचारांच्या द्वंद्वामध्ये, योग्य वागावं की सोपा मार्ग पत्करावा यात त्या वेळी योग्य ते वागावं या भावनेचा पराभव.

"समोर घडतंय ते चुकीचे आहे, दूरगामी परिणाम करणारे आहे हे समजत असून सुद्धा जेव्हा आपण गप्प बसतो तेव्हा आपण सगळेच कटप्पा असतो"

या वागण्याला सुद्धा कसले तरी भय हे एकच कारण असू शकते

जे भयावर मात करून योग्य मार्ग निवडतात ते एक तर हुतात्मा तरी होतात किंवा यशस्वी झाले तर स्वतः च राजे बनतात. सर्वोत्तम उदाहरण श्री छत्रपती शिवाजी महाराज !!!

"Lot of things happen behind the curtains. You won't know it until you are part of the system." - आता तुम्ही माझ्याशी सहमत होताय नानाकळा. Wink वर्तुळ पूर्ण झालं. मी तुमच्याशी सहमत झालो, आणी तुम्ही माझ्याशी. Happy

"एक तर त्यात फार मोठे मोठे गुन्हेगार गुंतले होते, ज्यामुळे धोका खूप मोठा होता (बॉब वूल्मर चं उदाहरण आहेच). दुसरं म्हणजे बाहेरून बघताना एखादा आरोप करणं वेगळं आणी आत राहून पुरावा सादर करणं वेगळं. ईतक्या उघड उघड गोष्टी चालत नसाव्या. जेव्हा मित्र कोण आणी शत्रू कोण हे कळत नाही तेव्हा कुणावर, किती आणी कसा विश्वास टाकायचा हे सुद्धा कळत नाही. आणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण हे गृहीत धरतो की आपल्यापर्यंत आलं नाही म्हणजे त्याने काहीच केलं नसणार. हे गूहीतक कदाचित तितकसं बरोबर नसेल सुद्धा."

It's Not accusation. That's what I can say.
Lot of things happen behind the curtains. You won't know it until you are part of the system. >>> कटाप्पाने पण सेम हेच केलं की .

हेच तर राजसत्तेचे कौशल्य असते.
>>>>
+ 786
या कटप्पा लोकांमध्ये स्वत:मध्ये काही नेतृत्वगुण नसतात. ज्याकडे असतात त्याकडून हे वापरले जातात. जो योग्य प्रकारे वापरेल तो सरस ठरतो.

हा अमात्य राक्षस कोण आहे? याची काय स्टोरी आहे

कटाप्पा हा कितीही प्रभावी मानला तरी राजसत्तेचा राजाच्या खालच्या पायरीवरचा होता. जे लोक राजाच्या वरच्या पायरीवर (एक्का?) असतील त्यांचे काय?

१९९५ मध्ये प्रथम शिवसेना + भाजप युतीची सत्ता आली तेव्हा सुधीर जोशी मुख्यमंत्री होणार होते. ऐनवेळी कोणती चक्रे फिरली ते कळले नाही आणि गणपती दूध पितो, मी काही ऐकले नाही ही जगप्रसिद्ध विधाने करणारे त्यांचे मामा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि सुधीर जोशी (बहुदा) शिक्षणमंत्री झाले.

शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांनी त्यावेळी ठामपणे पाठिंबा देत सुधीर जोशींनाच मुख्यमंत्री केले असते तर निश्चितच सकारात्मक बदl jhaaला असता.

भीष्म, काही प्रमाणात द्रोणाचार्य हे प्राचीन कालातलं सर्वात चपखल उदाहरण !
भारताच्या राजकीय इतिहासातली उदाहरणं द्यायची तर कल्याणसिंग आणि अर्थातच मनमोहन सिंग!

भारताच्या राजकीय इतिहासातली उदाहरणं द्यायची तर कल्याणसिंग आणि अर्थातच मनमोहन सिंग!>> यांच्या बरोबर अटल बिहारी वाजयेपींचे सुध्दा नाव जोडा.

पोखरण फक्त ते सत्तेवर होते म्हणून घडू शकले हेसुद्धा वाजपेयी नाव जोडण्यापूर्वी विचारात घ्यावे लागेल असे वाटते. बाकी मला काही राजकारण कळत नाही आणि कुठल्याही पक्षात इंट्रेस्ट नाही.

पण पोखरण तर इंदिरा गांधी सत्तेवर असतांना घडले ना?

ओके ओके........... तुम्ही पोखरण २ म्हणत आहात काय?

Karna hee katappach >>>>>>. ?? कसा.?? ज्याने त्याला मान दिला त्याचा सन्मान केला तो त्यालाच पाठिंबा करणार. स्वतः कुंतीपुत्र आहे हे त्याला फार उशिरा सांगितले गेले.

इंदिराजी - अमेरिकेच्या 7व्या आरमारास न घाबरता जिंकलेले पूर्व पकिस्तान युद्ध
वाजपेयी - अमेरिकेच्या दबावाला झुगारुन केलेली पोखरण अणुचाचणी
मनमोहनसिंग - थोर अर्थतज्ञ, प्रचंड विद्वत्ता आणि राजकारणी असुनसुद्धा पूर्ण जन्टलमन
बस्स Happy तिघांबद्दल एवढेच मनात लक्षात ठेवलय

मला वाटते, आपण कटप्पा ची व्याख्या चुकीची करत आहोत,

चित्रपटात कटप्पा केवळ शपथेने राजसिंहासनाशी बांधला गेला होता.
आणि ती शपथ पाळणे/न पाळणे यातून त्याला काहीही वैयक्तिक /त्याच्या गटासाठी फायदा नव्हता,
आणि त्यांनी सांगितलेले लॉजिक वापरले तर तो महेंद्र BB च्या बाजूने त्या शपथेमुळेच उभा राहिला, न कि त्याची सद्सद विवेकबुद्धी जागृत झाली म्हणून.

वर सांगितलेली प्रत्येक व्यक्ती वाजपेयी, मनमोहन किंवा अजून कोणी त्यांच्या " गप्प राहणे" या गोष्टींमुळे कुठे तरी फायद्यात राहणार होती, त्यामुळे ते तितकेसे योग्य उदाहरण ठरत नाही,

दुसरे उदाहरण द्यायचे झाले तर, मला नक्की आठवत नाहीये कृपया चुकत असें तर सांगा,
राजगड वर हवालदार हुद्द्यावर असणारे कुणीतरी, त्यांना महाराजांनी सांगितले होते काय वाट्टेल ते झाले तरी गड सोडून जायचे नाही, म्हणून त्यांसाजे वंशज आजची गडावर राहतात , असे काहीतरी गोनीदांच्या पुस्तकात वाचल्याचे आठवते
(खरे खोटे, गोनिदा, ते हवालदार आणि कदाचित महाराज जाणे)

कर्ण पेक्षा देवव्रत (भीष्म)हेच सर्वात संयुक्तिक वाटते. बाकी कृप आणि द्रोण आचार्य सुद्धा त्या खालोखाल नम्बरात आहेतच. कर्ण मात्र दुर्योधन किंवा राजसत्तेच्या कृतज्ञतेपेक्षा द्रौपदीचा हव्यास आणि प्रखर अर्जुन द्वेष ह्यामुळे विरोधी पार्टीत असावा

कर्णाला द्रौपदीचा हव्यास? शब्द चुकलाय का. तिने त्याचा पाण ऊतारा केलेला, याला सूड घ्यायचा होता असे म्हणून शकतो.

"द्रौपडी loved करणा अँड अल्वेस रेपेंटेड... हेच ते रहस्य जे तिने लपवलेले असते..' - द पॅलेस ऑफ इल्युजन्स नावाच्या कादंबरीचा प्लॉट आहे हा.

तुम्ही परत क्रोमच्या नादी लागलेले दिसताय.

नका नका असे मोहात पडू

नका असा कटप्पा होऊन शुद्ध मजकुराचा बाहुबली करू नका

बाहुबलीच्या निमित्ताने आलेल्या विविध बाफ पैकी हां सर्वात आवडला आणि अश्या सुंदर कल्पक निरीक्षणशक्ति बद्दल धागा कर्त्याचे सर्वप्रथम अभिनंदन !>>> +१११
अगदि खरं

Pages