लहान मुलांचे उपद्व्याप

Submitted by भुत्याभाउ on 9 May, 2017 - 10:23

कधी काही लहान मुले असे काही बोलून जातात कि आपल्याला चारचौघात अगदी मेल्याहून मेल्या सारखे होते ... असा काही प्रकार तुमच्या बाबत झाला आहे का... असेल तर सांगा ...

मी माझाच लहापणीचा किस्सा सांगतो जो सांगून माझी आई माझा आज पण उद्धार करते Happy

मी दुसरी तिसरी असतानाची गोष्ट ... आई बरोबर कोणाकडे तरी जेवायला गेलो होतो ... माझे वय आणि अंगकाठी पाहून काकू मला अगदीच थोडी थोडी भाजी वाढत होत्या, आणि मला तर भरपूर भाजी लागते जेवायला .. तेव्हा सारखी सारखी भाजी मागावी लागत होती, शेवटी मी कंटाळून त्या काकूंना म्हणालो कि काकू आमच्या कडे सत्यनारायणाचा प्रसादपण या पेक्षा जास्त देतात ... सगळ्या पंगती समोर ...

झालं घरी येऊन आईनं आणि बाबानी माझी वेगवेगळी उत्तर पूजा मांडली हे वेगळे सांगायला नको

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

माझ्या पाच वर्षाच्या मुलीला पाहुण्याकडे गेल्यावर निघताना आम्ही सु सु करून घे म्हणून सान्गत होतो.

शेवटी माझी मुलगी वैतागून म्हणाली मला सु सु होत नाहीये माझे युरीनरी ब्लॅडर अजून भरलेल नाहीये.

थोडा वेगळा आहे
आमच्या शेजारि एक लहान मुलगि होती साधारण ४-५ वर्षाचि नेहमि आमच्याच घरात असायचि आमच्या घ्ररातिल सर्वांची लाडकि होती. तिच्या घरची परिस्थिति गरिब होती.
शाळेत एका डान्स स्पर्धेत भाग घेतलेला. डान्स उत्तम झाला. मी तिला विचारलं फोटो आणले नाहित का? त्यावर तिने निरागसपणे सांगितल."मंम्मि म्हणालि आता पैसे (२०रु) नाहियेत नंतर आणु" हे सांगताना तिचा चेहरा हि खुप रडवेला झालेला
खुप वाइट वाटलेल.

शाळेत एका डान्स स्पर्धेत भाग घेतलेला. डान्स उत्तम झाला. मी तिला विचारलं फोटो आणले नाहित का? त्यावर तिने निरागसपणे सांगितल."मंम्मि म्हणालि आता पैसे (२०रु) नाहियेत नंतर आणु" हे सांगताना तिचा चेहरा हि खुप रडवेला झालेला>>> पंदितजी ,वाचतानाच खूप वाईट वाटलं हो Sad डोळ्यासमोर प्रसंग उभा राहिला...
कुठे अस्ते आता ती???

अजुन एक
मी, दादा, वहिणि आनि माझा पुतन्या (व व २.५) संध्याकाळि फिरायला गेलेलो. समोरुन एक मुलगि येत होति वहिणिंनि चेष्टेत पुतन्याला सांगितलं आपण काकाला (म्हण्जे मला) अशि काकु आणुया. तर या पठ्ठ्याने ति जवळ आल्यावर तिला ए काकु म्हनुन अशि जोरदार हाक मारलि. त्याच्या तोंडावर हात ठेउन आम्हि पटकन पुढे आलो. ति मुलगि मोबाइल मधे गुंग अस्ल्यामुले तिच लक्ष गेलं नाहि आम्च्याकडॅ

माझा मावस भाऊ लहान असतानाचा किस्सा ... तो ३-४ वर्षाचा असेल ... त्याला घेऊन आम्ही गणपतीचे देखावे पाहायला गेलो होतो ... एके ठिकाणी महाभारतातला कृष्ण रथाचे चाक फेकून मारण्यासाठी उचलले आहे आणि अर्जुन त्याला पायाला धरून थांबवतो आहे असे दृश्य होते ... पुतळे जरा नीट लागले नव्हते .. माझा भाऊ एकदम जोरात ओरडला दादा अर्जुनाचा हात कृष्णाच्या धोतराच्या आत घुसलाय ... सगळी जनता जोरात हसायला लागली आणि आमची तिथून कल्टी

भुत्याभाऊ Rofl
>> तीने ऐकायला पाहिजे होतं खरतर Lol >>> +१
Proud