तुटो प्रपंचाची गोडी

Submitted by पुरंदरे शशांक on 27 April, 2017 - 22:34

तुटो प्रपंचाची गोडी । जडो विठ्ठली अावडी ।

नावडो हे धन मान । नको तृष्णा विषयपान ।

येर सारे वाव नुरो । ह्रदी विठ्ठल संचरो ।

येई येई पांंडुरंगा । घेई घेई रे वोसंगा ।

निके प्रेमाचे भातुके । देई देई रे इतुके ।

----------------------
वाव -- खोटे, व्यर्थ
वोसंगा --- मांडी
निके -- खरे, शुद्ध
भातुके -- खाऊ, खाद्यपदार्थ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, सुंदर !!

हृदयी.. असा शब्द हवाय का ?

आणि आता एक टोपण नाव घ्या बघू.. शशांक म्हणे, असे मात्रेत बसणार नाही.

वाह !!
पांडुरंग =पांडुरंग _/\_