मराठी मालिका आणि दिग्दर्शनाची बोम्बाबोम्ब

Submitted by रमेश भिडे on 22 April, 2017 - 02:08

गेले काही दिवस झी मराठी वरच्या मालिका पाहताना प्रचण्ड मानसिक त्रास होतो ... कारण नसताना घेतलेले क्लोज-अप्स , पात्रांच्या संवादातले अनावश्यक पॉझेस , कथासूत्रातला कर्मदरिद्रीपणा आणि पात्रांचे स्वभाव अतिशय बटबटीत पणे रंगवणे यासारख्य असंख्य बिनडोक चुकानी भरलेल्या या सीरियल पाहण्यात समस्त महिला वर्गाच्या सन्ध्याकाळी बर्बाद होत आहेत याचे खरोखर वैशम्य वाटते

अगदी चान्गल्या गाजलेल्या कादम्बर्‍यान्वर आधारित मालिका केल्या तरी दिग्दर्शक आणि एडिटर्स त्या कथेची / संकल्पनेची माती करतात असा अनुभव आहे... बापजन्मात कधी हे लोक हॉलीवुड च्या लेव्हल्स च्या सीरियल बनवू शकतील का? असा प्रश्न पडतो.

अमेरिकन टीव्ही वरच्या डेली सोप सीरियल्स चे प्रमाण कमी करून तिथे वीकली सीरिज दाखवण्याचा ट्रेन्ड वाढल्यामुळे तिकडे गुणवत्तेत सकारात्मक बदल झाला आहे ... आपल्याकडे देखील तो ट्रेन्ड सुरु व्हायला हवा आहे . पूर्वी दूरदर्शन च्या जमान्यात वीकली सीरिज असल्यामुळे दर्जा उत्तम होता.....

साभार--- आमचे परममित्र झपाटलेला फिलॉसोफर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवांतरः (वरच्या प्रतिसादात सरसकट हा शब्द आला म्हणून आठवले)

"सरसकट" ह्या शब्दाविषयी मला विषेश प्रेम आहे. कोणत्याही चर्चेतल्या कोणत्याही मुद्द्याला टिचकन बेदखल करण्याचे अपरिमित सामर्थ्य हा एका पाचाक्षरी मंत्रात आहे. रामबाणच जणू! Happy

मला वाटत स्वताच्या terms and condition वर काम करणारा एखादा मनस्वी (किंवा अगदी तद्दन व्यावसायिक) सोलो कलाकार आणि एका युनिटचा भाग बनून त्या कल्चरशी मिळतेजुळते घेउन टीमवर्क करणारे टीव्ही कलाकार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत..... टीममध्ये काम करताना बऱ्याच गोष्टी (त्या टीमचा भाग बनणे/ न बनणे हा निर्णय सोडून) आपल्या हातात नसतात!
आणि परत प्रश्न उपलब्ध पर्यायांचा आहे.... मुख्यत्वे अभिनयाच्या बाबतीत वय/इमेज/काम करण्याचा झपाटा/शाररीक क्षमता/संधी अश्या बऱ्याच गोष्टी असतात..... बऱ्याचदा लोकांना नाव/चेहरा माहीत होण नवोदित कलाकारांसाठी जास्त महत्वाचे असते.... त्याच्या बळावर मग पुढची कामे मिळवता येतात.... आपल्या निकषांवर काम करायची लेव्हल गाठायला तडजोडीच्या रस्त्याने जावे लागते... आणि जिथे मागणीपेक्षा पुरवठा कैक पटीने जास्त आहे अश्या क्षेत्रात तर बिग बॅनरची संधी दर्जाचे कारण देउन सहसा कोणी नाकारत नाही!
सध्या वेबसिरीजनी या लोकांसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध करुन दिलाय आणि तिथे बरेच लोक आपल्या मनाप्रमाणें काम करुनही लोकांपर्यंत पोहोचतायत (TV इतका रीच नाहीये अजुन वेबसिरीजचा पण न जाणो उद्या हे TV ला पण मागे टाकेल)

असो..... कलाकार त्यांच्यासमोर उपलब्ध असणाऱ्या पर्यायांचा विचार करुन कामे करतायत.... आपण आपल्या समोर असलेल्या पर्यायांचा विचार करुन करमणूक करुन घेउया!

माझ्या नवर्याची बायको- बहुधा शनायाच्या पुरुष चाहत्यांमुळे असेल. >>>>
हे काही प्रमाणात खर आहे.. !!

>>>>>>>>
सिरीअसली ??????????
आता तर मला खरंच पुरुषांमध्ये धरू नका Happy

>>>>> गवैय्या कमीप्रतीचा सूर का लाऊ शकत नाही हे कळले नाही? <<<<
सारेगमचे सप्तकातील कोणताही सूर लावताना जर तो "योग्य" लागला, तरच गाणे उमटते, पट्ट्या बदलीत, सूर वरखाली करीत कोणताही 'शिकलेला" गायक म्हणूच शकत नाही. तसे केलेन, तर त्याचेच गाणे बिघडेल. जाऊदे... ताल सूर पट्टी कळते मला, पण संगितामधिल भाषा मलाही येत नाही, तुला समजावुन सांगायला. तर असोच.

बाकी या झी वाल्यांना #अ‍ॅक्टर चांगले मिळतात हं, दिग्दर्शनाची बोंब असेल, पण बिचारे बहुतेक सर्व अ‍ॅक्टर्/अ‍ॅक्ट्रेसेस मन लावुन "दिलय" ते काम /भुमिका करताना आढळतात. (असे माझे मत)

शनाया चांगलीच दिसते ! (हे मत मी लिंबीसमोरही मांडले आहे.. Proud किंबहुना, शनाया काढली, तर त्या मालिकेत "बघणेबल/देखणेबल " असा काहीच दम उरणार नाही [हे माझे मत])

मराठीतली एकही serial बघण्याच्या लायकीची वाटत नाही.Made In India म्हणाल तर भाभीजी घर पे है ही एकमेव मालिका मला आवडते.
हॉलिवुड serial हा शब्द वापरणं चुकीचं आहे . त्यापेक्षा इंग्रजी serials म्हणायला हवं. Sherlock, Doctor Who वगैरे अतिदर्जेदार serials England च्या आहेत.
तंत्रज्ञानाबद्दल माझं म्हणणं नाही, मुद्दा आहे कथेचा. आपल्या मालिकांमधून सशक्त कथानक हरवले आहे. channels वर serial निवडीची प्रक्रिया कशी असते हे जवळून बघितलं आहे. आपल्याकडेपण क्षमता आहे पण नवीन काही करणाऱ्या लोकांना वाव मिळत नाही हे सत्य आहे. सगळ्या मालिका channel वाल्यांच्या ओळखीच्या लोकांना मिळतात आणि त्या लोकांना कौटुंबिक शिवाय काही सूचूच शकत नाही. आणि माझं मत आहे की त्यांनी नवीन काही बनवायला पण नको नाहीतर अशोक मालिकेसारखं (इतिहासाचा विपर्यास) नाहीतर चंद्रकांता सारखं होतं. (चांगली कथा असूनही बकवास casting, direction & animation)

@प्राजक्ता,
तुम्ही लिहिलेला खालील प्रतिसाद अतिशय वैयक्तिक पातळीवरचा प्रतिसाद आहे. तुमच्याकडून ही अपेक्षा नक्कीच नव्हती. इतरांची लेवल काढण्याची तुमची गरज असेल तर मायबोलीवर तुमच्या सारख्या लेवलची माणसे नसली तरी चालेल.

गवैय्या कमीप्रतीचा सूर का लाऊ शकत नाही हे कळले नाही?>> तेव्हढ कळण्याची तुझी लेवल नाही आणि हे मान्य करण्याची कुवतही नाही , आपल्याला सगळ्यातल सगळच कळत हा आव आणू बदाबदा पोस्टी लिहल्या तरी तुझी झेप काय आहे ते इथे सगळ्याना माहित आहे.
Submitted by प्राजक्ता on 26 April, 2017 - 09:59

वेमा ग्रेट.
काही आयडी फक्त ऋन्मेषनी काय लिहिलंय् ते वाचुन त्याच्यावर टीका करायलाच धाग्यावर येतात असं वाटतं.

वेमा जी आपका इशारा सर आंखोपर

परन्तु ॠन्मेष् भौ बी लयीच विचित्र लिवुन र्‍हायले जी

जुन्या सीरियल चा ग्रेटनेस कशात होता हे समजून यायला तुम्ही आधी कुठल्या जुन्या सीरियल मनापासून पाहिल्या आहेत ते तरी सान्गा ॠन्म्याभौ?

उगाच उचलली जीभ लावली ताळ्याला?

शतकोत्तरी धाग्याबद्दल दणकून हबिणन्दण

बर्‍याच पोक्त अन सुज्ञ लोकानी मराठी सीरियल्स च्या सध्याच्या दुरावस्थेविषयी वास्तव आणि रोखठोक मत मान्डले आहे त्यान्चे ही आभार्स

ऋन्मेषचा फोकस फक्त पैशावर अवलंबून असलेल्या तांत्रिक झगमगाटावर आहे, जुन्या-नव्यातल्या फरकाबद्दल जेव्हा तो म्हणतोय तेव्हा तितकंच त्याला म्हणायचं आहे असे दिसले.

बापरे वेमा - इतका हार्ष इशारा, तो ही इतक्या साठी???
हा कुठल्या ट्रोल सदस्याने दिल्यासारखा इशारा वेमा यांच्याकडून यावा याबद्दल सखेद आश्चर्य वाटत आहे.

मला इतक्यात माझा माबो अवतार संपवायचा नाहीये म्हणून मी थोडक्यात गप्प बसतो.

आशूचॅम्प तुम्ही इतक्यात माबो वर ऍक्टिव्ह नव्हता का?

>>>>>>>
"बाकी तुम्हाला कास्ट आणि स्पेसिज हे सामाजिक आणि जेनेटिक वर्गीकरणाचे अत्यंत वेगवेगळे प्रकार आहेत हे माहित असण्याचे काहीत कारण नाही.
तेवढा तुमचा आय क्यू असेलसे मला वाटत नाही."
>>>>>>>
या प्रतिसादाला वेमांनी ज्या शब्दात वॉर्निंग दिलीये अगदी तशीच वॉर्निंग
>>>>>
तेव्हढ कळण्याची तुझी लेवल नाही आणि हे मान्य करण्याची कुवतही नाही , आपल्याला सगळ्यातल सगळच कळत हा आव आणू बदाबदा पोस्टी लिहल्या तरी तुझी झेप काय आहे ते इथे सगळ्याना माहित आहे.>>>>
या प्रतिसादाला दिलीये,
अडमीन अजिबात उजवे डावे करत नाहीत Happy

नाही मला वरच्या प्रकारची काहीच कल्पना नाही.
त्यांनी डावे उजवे करूच नये, पण भाजप चा वाचाळवीरांना इशारा मोदी त्यांच्या भाषेत देत नाहीत ना.
त्याच प्रमाणे आम्हालाही वेमा त्यांच्या पदाचा डेकोरम सांभाळून जरब देतील असे वाटले होते, हा त्यांचा अवतार मला तरी धक्कादायक वाटला.

बरंच आहे.
उठसुट एखाद्याला, जो कधीही कुणालाही पर्सनली, वाईट वाटेल असं लिहित नाही, त्याला वाट्टेल तसं हिणवणं, त्याची अक्कल , लायकी काढणं, त्याच्या प्रतिसादावरुन (आंतजालावर खरंच प्रतिसादावरुन खरा माणुस कळतो?) त्याच्या अकलेची, राहणीमानाची,स्टॅन्डर्डची खिल्ली उडवणं, टाकुन बोलणं, बाकी सगळ्या जगाची अक्कल आपल्यालाच आहे असं समजुन त्या माणसाच्या प्रत्येक प्रतिसादावर कमेंट करणं, हे बंद होणं मुशिल आहे खरं तर. कारण अश्या मान्सिकतेचे बरेच लोक आहेत इथे. पण कमी झालं तरी बरं होईल.

१३ वर्शाच्या मायबोली आणि आतरजालिय वावरात ज्या विचारप्रवाहाशी आपल पटणार नाही तिथे श्यक्यतो इग्नोर करायच , लक्ष घालायच नाही, वाद घालायला जायच नाहि , मुद्दा पटवत बसायच नाही हा मी स्व्तःला घालुन घेतलेला नियम... त्यामुळे माझ्या प्रतिक्रिया पण तितक्याच सयमित असतात, इतक्या टोकाला जाउन प्रतिसाद देण्याची बहुधा पहिलीच वेळ. कसा कोण जाणे पण माझा तोल सुटला खरा!
वेमा आणि रुन्मेष ! झाल्याप्रकाराबद्दल दिलगीर आहे.

सस्मित! इतराच माहित नाही पण मी कुठलेही हेवेदावे मनात धरुन कूणालाही टारगेट करुन प्रतिसाद देत नाही.

थोडा ताण हलका करण्यासाठी.. आता रुन्म्या म्हणे, टाईप जोक्स यायला हवेत !

उदा.

शिक्षक : अर्लि बर्ड कॅचेस द वर्म
रुन्म्या : बट व्हॉट डज द वर्म गेट, फॉर गेटींग अप सो अर्ली ?

--

रुन्म्या : सहप्रवाश्यास.. का हो, पायलटला हार्ट अटॅक आला तर ?
सहप्रवासी : घाबरू नकोस, को पायलट असतो !
रुन्म्या : पण दोघांना एकदम आला तर ?

सस्मित - मीही सुरुवातीला खेळीमेळीच्या वातावरणात होतो, पण नंतर सगळ्या ठिकाणी डोक्याची आईने अकबरी व्हायला लागली आणि वैताग आला. मी तर त्याने काढलेल्या कुठल्याही धाग्यावर जाऊन लिहणे बंद केले आहे, पण सगळीच कडे तो असतो त्याला काय करू.
दुर्लक्ष करा बरोबर आहे पण कधी कधी नाही होत शक्य.

आता आपण धाग्याच्या मूळ विषयाकडे वळायची वेळ झालीये Happy कृपया "मराठी मालिका आणि दिग्दर्शनाची बोम्बाबोम्ब" या विषयावरचे प्रतिसाद द्यावेत.

सुमारे ३० वर्षांपूर्वी मुंबई दूरदर्शनवर 'गोट्या' नावाची मालिका सुरू झाली आणि त्या काळातली लहान मुलंच नव्हे तर मोठी माणसंही एका वेगळ्याच विश्वात दंग होऊन गेली. तो आ ठवणींचा हिंदोळा होता. खरं तर ती मालिका सुरू झाली, त्या काळातल्या लहान मुलांना, त्या मालिकेतलं विश्व हे पूर्णपणे अनोखं होतं. अगदी अस्सल मराठमोळं असूनही! त्याला कारणच वेगळं होतं.
टीव्हीच्या असंख्य मालिका घराघरांत जाऊन पोहोचल्यानंतर त्या मुलांचं भावविश्व बदलून गेलं होतं आणि त्यामुळेच त्यांना १९४०-५०च्या दशकातल्या त्या मराठमोळ्या वातावरणात काहीच सुचेनासं झालं होतं. पण त्या मुलांच्या आई-वडलांनाच नव्हे तर आजी-आजोबांनाही मात्र ती मालिका पाहावीशी वाटत राहिली याचं प्रमुख कारण म्हणजे टीव्हीचा जन्म होण्यापूर्वीचं ते विश्व त्यांचं होतं आणि तितक्याच अस्सलपणे ते लेखनातून उतरलं होतं. ते यश १९४०च्या दशकातले प्रख्यात बालसाहित्यकार ना. धों. ताम्हनकर यांचं होतं.
त्या म्हणजे १९४०च्या दशकात टीव्ही सोडाच रेडिओही दुर्मिळ असतानाच्या काळात माणसं आपला वेळ हा वाचनातच घालवत असणार, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. तरुण-तरुणींसाठी आणि प्रौढांसाठीही त्या काळात विविध प्रकारचं वाङ्मय सहजतेनं उपलब्ध होत असतानाच्या त्या काळात लहान मुलांसाठी फारसं काही वाचायला उपलब्ध नसे. ती गरज भा. ल. तथा काका पालवणकर यांनी 'खेळगडी' नावाचं मासिक सुरू करून मोठ्या प्रमाणात भरून काढली.
प्रामुख्यानं शाळकरी मुलांसाठी असलेलं ते मासिक अल्पावधीतच लोकप्रिय होऊन गेलं आणि त्याच मासिकातून 'गोट्या' नियमितपणे वाचकांच्या भेटीला येऊ लागला. ताम्हनकरांनी गोट्याची व्यक्तिरेखा इतक्या अकृत्रिम शैलीत साकार केली होती की बघता बघता तो तुमच्या आमच्या घरातलाच एक होऊन गेला. खरं तर तो कोणाच्याच घरातला नसतो.
एकुलती एक मुलगी असलेल्या एका कुटुंबाला हा मुलगा अवमानित जिणं जगत असताना सापडतो आणि ते दादा-वहिनी गोट्याला घरी आणण्याचा निर्णय घेतात. सुमाला तर भाऊ मिळतोच पण त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम मुलामुलींना आपल्या हक्काचा असा एक सवंगडी खेळायला मिळतो.
गोट्या हा चतूर तर असतोच, त्याचबरोबर विनयशीलही. नाना प्रकारचे खेळ आणि बौद्धिक करामती त्याला अवगत असतात. त्यामुळेच तो केवळ दादा-वहिनी आणि सुमा यांचं त्रिकोणी कुटुंब चौकोनी करून सोडतो, असं नाही तर तुमच्या आमच्या घरातही आनंदाचं निधान घेऊन येतो.
ताम्हनकरांचा या लेखनामागचा हेतू अगदी स्पष्ट आहे. पुढे या मालिकेचे पुस्तक रूपानं तीन भागांत प्रकाशन झाले, तेव्हा दुसर्‍या भागाच्या प्रस्तावनेत त्यांनी तो उघड केला आहे. ‘बालजनांशी हसून खेळून त्यांच्या मनोविकासाला मदत करणारा एखादा सवंगडी त्यांना मिळवून द्यावा, ही मनातली इच्छा गोट्याच्या रूपाने मूर्त स्वरूपास गेली...’ असे त्यांनी लिहिले आहे. काय करतो हा गोट्या नेमकं? तो शाळेत एक हुषार विद्यार्थी म्हणून गणला तर जात असतोच पण त्याचवेळी तो गुरूजनांना अडचणीत आणणार्‍या, शिक्षकवर्गाला त्रास देणार्‍या विद्यार्थ्यांची खोडकी जिरवण्याचं कामही मोठ्या कौशल्यानं करत असतो. हे करताना तो लहानपणी शाळेत मुलं ज्या युक्त्या-प्रयुक्त्या, योजतात, त्याच योजत जातो. प्रसंगी तो दांगडधिंगाही घालतो पण ते सारं करतानाचा त्याचा हेतू स्पष्ट असतो. त्याचवेळी तो घरातल्या सुमावर मनापासून माया करत असतो.
सुमा आणि तिच्या मैत्रिणींची कोणी छेड काढत असेल, तर तो त्या मवाल्यांना चांगलाच इंगाही दाखवतो. दिवाळीत तो आकाशकंदिल तर करणारच पण त्याचवेळी सुट्टीत काही थोडंफार काम करून मिळणारा अल्पस्वल्प मोबदला हा गरीब विद्यार्थ्यांच्या कामी लावणार!’ मग असा हा सत्शील गोट्या तुमच्या आमच्या मनावर गारूड घालून न जाता तरच नवल...
आज गोट्या तुमच्या आमच्या भेटीला आला, त्यास जवळपास सात दशकं लोटली आहेत. तरीही गेल्या पिढीबरोबरच आजच्या सुजाण विद्यार्थीवर्गालाही तो हवाहवासा वाटतो, यापेक्षा ताम्हनकरांच्या लेखनाचं आणखी यश ते काय सांगायचं?
या मालिकेतील गोट्याचे काम करणारा जॉय घाणेकर आज अमेरिकेत सेटल असून एका मल्टिनॅशनल कंपनीत उच्चपदस्थ आहे ...
चला तर मग आता झुलूया या आठवणीन्च्या हिंदोळ्यावर॔ ...
पहा संपूर्ण *गोट्या* मालिका यूट्यूब वर

https://www.youtube.com/watch?v=hnEN-PVMGyg&list=PL95VKZqaZGF5tC2ToMJXCD...

गोट्या नाव ऐकलेय थोरामोठ्यांकडून.
फुरसतीने बघायला हवे. आवडेल की नाही ते वेगळे झाले. पण ज्ञानात भर म्हणून...

मी मध्यंतरी गोट्या चे तीनही भाग विकत आणले (परत). खूप मजा येते, पुन्हा वाचायला. ताम्हनकरांची गोट्या सारखीच 'चिंगी' आणि 'खडकावरला अंकूर' ही पण दोन पुस्तकं होती. त्यापैकी, 'चिंगी' वाचलं होतं.

टायटल साँग गोट्याचं खूप आवडायचं. आम्ही शाळेत असताना ही मालिका, फास्टर फेणे हीपण मालिका एन्जाँय केली होती खूप.

Pages