मराठी मालिका आणि दिग्दर्शनाची बोम्बाबोम्ब

Submitted by रमेश भिडे on 22 April, 2017 - 02:08

गेले काही दिवस झी मराठी वरच्या मालिका पाहताना प्रचण्ड मानसिक त्रास होतो ... कारण नसताना घेतलेले क्लोज-अप्स , पात्रांच्या संवादातले अनावश्यक पॉझेस , कथासूत्रातला कर्मदरिद्रीपणा आणि पात्रांचे स्वभाव अतिशय बटबटीत पणे रंगवणे यासारख्य असंख्य बिनडोक चुकानी भरलेल्या या सीरियल पाहण्यात समस्त महिला वर्गाच्या सन्ध्याकाळी बर्बाद होत आहेत याचे खरोखर वैशम्य वाटते

अगदी चान्गल्या गाजलेल्या कादम्बर्‍यान्वर आधारित मालिका केल्या तरी दिग्दर्शक आणि एडिटर्स त्या कथेची / संकल्पनेची माती करतात असा अनुभव आहे... बापजन्मात कधी हे लोक हॉलीवुड च्या लेव्हल्स च्या सीरियल बनवू शकतील का? असा प्रश्न पडतो.

अमेरिकन टीव्ही वरच्या डेली सोप सीरियल्स चे प्रमाण कमी करून तिथे वीकली सीरिज दाखवण्याचा ट्रेन्ड वाढल्यामुळे तिकडे गुणवत्तेत सकारात्मक बदल झाला आहे ... आपल्याकडे देखील तो ट्रेन्ड सुरु व्हायला हवा आहे . पूर्वी दूरदर्शन च्या जमान्यात वीकली सीरिज असल्यामुळे दर्जा उत्तम होता.....

साभार--- आमचे परममित्र झपाटलेला फिलॉसोफर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एक फरक जाणवला म्हणजे अमेरिकेत प्राइम टाइम ला 'डेली सोप' सहसा नसतात. सप्टेंबर ते मे या काळात प्राइम टाइमला दर आठवड्याला नवीन एपिसोड असलेल्या वीकली सिरीयल्स असतात. त्यांचे १३/२६ असे भाग अ‍ॅप्रूव्ह केले जातात. सगळी स्क्रिप्ट आधी तयार असते का कल्पना नाही. नसावी.

रात्री ८ वाजताचा स्लॉट सर्वात प्राइम समजला जात असे/अजूनही आहे बहुधा. सर्वात लोकप्रिय मालिका त्या वेळेस असते.

बिनडोक चुकानी भरलेल्या या सीरियल पाहण्यात समस्त महिला वर्गाच्या सन्ध्याकाळी बर्बाद होत आहेत याचे खरोखर वैशम्य वाटते>>
महिला वर्गाच्या संध्याकाळी बरबाद होतात आणि एकुण 32 रिप्लाय पैकी जवळपास 21 रिप्लाय पुरूष आय डींचे.. ते पण हिरीरीने.. धागाकर्ता धरून 22..
गंमतच आहे बाई..

मधुगंधा कुलकर्णी आणि नानकळा यांचे म्हणणे १०० % मान्य. मुद्दा इतकाच आहे की या रद्दड सिरीयल पाडणाऱ्यांनी - आम्ही कलाकार -
आमची सर्जनशीलता ( मला शंका आहे की या सिरीयलवाल्या लोकांपैकी किती जण या शब्दाचा अर्थ नीट सांगू शकतील) वगैरे वगैरे "माज" जरा कृपया बाजूलाच ठेवावा. आणि जसे काही लोक बँकेत, कंपन्यांत आणि विविध ठिकाणी काम करतात तसेच हे so called कलाकारसुद्धा हे लोकांनी लक्षात घेऊन , त्यांना बघून अजि म्या ब्रह्म पाहिले वगैरे समजू नये.

नानाकळा... हा हा Happy

विनोदाचा भाग सोडला तर, मुख्य मुद्दा हा आहे कि.. कथासुत्र एका लॉजीकल मांडणीने प्रस्तुत करणे...
इथे मी तर आजुन बाकिचे मुद्दे उपस्थीत केलेले नाहित..जसे विविध विषय हाताळणे ... इ..इ..

ह्यंचे विषय काय ..

१) किचन मधली कट कारस्थान : जाऊ - नणंद. सासु - सुन, जाऊबाई या मधील कट कारस्थान...
२) पांचट प्रेम प्रकरण : मेव्हुणीचा भाउजी वर डोळा ( खुलता कळी खुलेना), बायको समोर दुसरी ला घरात आणुन ठेवणे ( माझ्य नवर्‍याची बायको)
३) आती तिथे माती : आती शोषीक पणा ( त्या राधिका ने अलका कुबल चे सगळे रेकॉर्ड्स मोडले), अती भोळसरपणा वा बावळटपणा ( राणा) इ.इ.

ऐतिहासीक मालीका बद्दल बोलायलाच नको....

मुद्दा इतकाच आहे की या रद्दड सिरीयल पाडणाऱ्यांनी - आम्ही कलाकार - आमची सर्जनशीलता ( मला शंका आहे की या सिरीयलवाल्या लोकांपैकी किती जण या शब्दाचा अर्थ नीट सांगू शकतील) वगैरे वगैरे "माज" जरा कृपया बाजूलाच ठेवावा. आणि जसे काही लोक बँकेत, कंपन्यांत आणि विविध ठिकाणी काम करतात तसेच हे so called कलाकारसुद्धा हे लोकांनी लक्षात घेऊन , त्यांना बघून अजि म्या ब्रह्म पाहिले वगैरे समजू नये.
Submitted by वाट्टेल ते >>>>>>>>>

अगदी सहमत... +११११११११

बेकार आहे हे समजतय आणि चांगलं सहज उपलब्ध आहे तर मुव्ह ऑन का नाही होत?
नवीन Submitted by अमितव on 25 April
>>>>
चांगलं कुठे उपलब्ध आहे.. दुसर्‍या भाषेत? ते तर आहेच आणि ते पाहिल हि जात..
पण आपल्या मराठी मध्ये सुध्दा चांगल कॉन्टेन्ट असेलल काहितरी असाव अस वाटत एवढच.....

अमितव, माझ्यापरिने उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.

मराठी मालिकांवरच इतकी टिका होण्याचे कारण वरच्या माझ्या एका प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे आहे. घरात एकच टीवी आहे. तोच सगळ्यांना बघायचा आहे. सर्वांच्या आवडीनिवडीला रुचतील असे कार्यक्रम वेगवेगळ्या चॅनेलवर सुरु असतात. मग त्यातल्या त्यात सगळे बसून बघू शकतील असा कार्यक्रम निवडला जातो. यात खेळ, इंग्रजी चित्रपट, मुझिकविडिओ, डिस्कवरी, कार्टून्स वगैरे घरच्या इतर सदस्यांना बघायचेच अशी जबरदस्ती फार वेळ होऊ शकत नाही, त्यापेक्षा हे मराठी चाल्लंय ना ते बरंय म्हणून सोडून देतात.

माझं निरि़क्षण असं की डिस्कवरी, वगैरे नॉन-फिक्शन कार्यक्रम रोज बघण्यात मजा नसते, खरंतर त्यांच्याकडेही रोज पुरेल इतका ऐवज रोज नवीन मिळत नसतो. चित्रपटही तुम्ही सलग तीन चार महिने बघाल तर तेच तेच सर्व चॅनेलवर असतात. नाविन्यपूर्ण, नविन कन्टेन्ट असं फार कमी असतं. (त्याचं कारणही असं की मुळात चित्रपट, डिस्कवरी, स्पोर्ट्स हे रोज रतीब घालून बघायचे कार्यक्रम नव्हेत, आठवड्यातून महिन्यातून एकदा ठिक आहे.)

आता हे समिकरण जोडा. अ (एकच टीवी) + ब (सगळ्यांना बघता येईल असे) + क (नविन कन्टेन्ट) = मराठी/हिंदी मालिका किंवा रीअ‍ॅलिटी शोज.
समोर असंच कायम वाढलं जात असेल तर टिका तर होणारच. की बुवा आम्हाला आता पर्याय नाही, बघावे हेच लागतंय, मग किमान दर्जा द्या ना भो.... आता समस्या इतकीच आहे की दर्जा मागणारं पब्लिक अल्पसंख्यांक आहे. व अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करायची धंद्यात पद्धत नसल्याने अरण्यरुदन करण्यापलिकडे टिकाकारांना उपाय नाही.

मधुगंधा कुलकर्णीचा माज काही मला पटला नाही. धंदा आहे हे मान्य पण मग अ‍ॅटीट्युड चीही गरज नाही. 'वाट्टेल ते' यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी इतर कामगारांसारखेच स्वतःला समजावे. "आम्ही असु लाडके" वगैरे लाड हे जेन्युइन कलाकारांचे असावेत. वर्षानुवर्षे मालिकांसाठी लिहिणारे, काम करणारे सगळे कलाकार हे फक्त कामगार आहेत हे तर स्पष्ट आहे. त्यांना इतकं डोक्यावर घ्यायची गरज नाही. कारण जिथे रिप्लेसमेंट होऊ शकते त्या ठिकाणी कोणाला डोक्यावर घ्यायची गरज नसते. मधुगंधा कुलकर्णीचे मॅनेजमेंटशी फाटले तर मॅनेजमेंट दुसरी लेखिका आणून उभी करतील, आणि प्रेक्षकांना शष्प कळणार नाही. असे जर असेल तर तो कलाकार हा कलाकार म्हणवला जात नसतो, तो कारागीर फक्त. दॅट्स इट.

लेखक मंडळींचं स्पष्टीकरण अजिबात पटलं नाही. मुळात मालिका सुरू करताना एक स्टोरीलाइन पक्की नसते. त्यात टीआरपी बघून चॅनेलच्या सांगण्याप्रमाणे बदल बिदल करतात. मग तुम्ही 'कलाकृती' सादर करता असा आव आणू नका.

नानाकळांशी शंभर टक्के सहमत.

तसेच ह्या मराठी/हिंदी मालिका गॉसिपचा कमर्शियल अवतार आहे. ९० टक्के बायकांना (आणि पुरुषांनाही बरं) गॉसिप आवडतं करायला. हेच हेरुन मालिकावाले रतिब घालतात.

गम्मत अशी आहे कि उत्तम दर्जाच्या मालिका सर्वांनी पूर्वी पाहिल्या आहेत. त्यामुळे हि अपेक्षाच चुकीची आहे हे म्हणणे पटणारे नाही. खरंतर आता तर जाहिरातींमुळे भरपूर पैसा उपलब्ध असल्याने त्या बाबतीतल्या तडजोडीलाही आता जागा उरली नाही.
मुळात मालिका या कलाप्रकारात मोडत असल्याने त्याला कलात्मक दर्जा असणे आवश्यक आहे हे मानण्याची इच्छाशक्ती लोप पावली आहे. ही इच्छा असेल तर पुढचा मार्ग सोपा आहे.

एकुण 32 रिप्लाय पैकी जवळपास 21 रिप्लाय पुरूष आय डींचे.. ते पण हिरीरीने.. 
>>>>>>
मला तुम्ही पुरुषांमध्ये धरू नका. माझा त्यावर आक्षेप आहे. मी मालिकांची बाजूच घेतली आहे.

बरेचदा मी सुद्धा एखादी मालिका बघायला घेतो आणि बघतच राहतो. आपण सारेच बघतो. आणि मग नंतर जाणवते की फार काही हाती लागले नाही आणि मग ती चीडचिड ईथे काढतो.

मला एक कळत नाही, घरात एकच टीव्ही आहे आणि बायकांच्या मर्जीने ती मालिका लागते. पण म्हणून ती बघितलीच पाहिजे असे गरजेचे नाही ना. टीव्ही सोडून ईतर मनोरंजन नाही का. हातात मोबाईल आहे, माबोवर येता म्हणजे त्यात नेटही असेल, किंबहुना ईतरही छंद आहेत जगात, तुम्हाला टीवीलाच का चिकटायचे असते? कुठल्या मालिकेत काय चालते यावर कुठेतरी आगपाखड करता यावी म्हणून बघता का? आणि तसाही त्याचा फायदा होत असेल तर अगदीच वेस्ट नक्कीच नाहीत.

मुळात मला हे कळत नाही की आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीत रिमोट बायकांच्या हातात कसा??.. याचाच अर्थ पुरुषांचीच याला सहमती असावी.. बायका आपल्या डोक्यावर बसून कानामागे भुनभुण करण्यापेक्षा टीव्हीसमोर शाण्त बसलेल्या त्यांना परवडत असणार..

तरी आता खरे खरे सांगा...
किती घरात आयपीएलची मॅच लागल्यावर चॅनेल चेंज होऊ लागलाय?

बरं ईथे कोणी बजेटचा विचार केला आहे का?
हिंदी चित्रपट शंभर करोडचा पल्ला गाठतात म्हणून पन्नास करोड त्याल लाऊ शकतात. मराठी चित्रपटांना ते जमत नाही कारण त्यांचा प्रेक्षकवर्गच मुळात तोकडा.
हेच ईंग्लिश आणि मराठी मालिकांची तुलना करताना कोणी विचारात घेत आहे का?
तुम्हाला हातावर वाटाणे ठेवत अव्वल दर्जाचे काम हवे आहे .. त्या टाटा स्कायमध्ये मराठी चॅनेल फुकटात येतात. किंवा अत्यल्प किंमतीत तुम्ही बघता. आणि ईंग्लिशसाठी जास्तीचे पैसे मोजतात.. तरी तेलाच्या किंमतीत तूपाची अपेक्षा ठेवता..

सगळ्यात वाईट म्हणजे प्रचंड मोठ्ठ्या आवाजात बॅक ग्राऊंड म्युझिक... अर्थात काय बोललाय हे प्रेक्षकांना ऐकु येउ नये! म्हणजे डायलॉग ची क्वालीटी आपसूक झाकली जाते हेच दिग्दर्शकाचे कसब वाखाणण्याजोगे!
आजही दूरदर्शनच्या मालिका पहातो त्यात अजिबात ढँग ढॅण्ग संगीत नसते! सगळ्यात प्रचंड आवाज झी चा असतो... कित्येकदा कळत नाही पात्र काय बोलले नक्की! लई भारी डायरेक्शन!

बरेचदा मी सुद्धा एखादी मालिका बघायला घेतो आणि बघतच राहतो. आपण सारेच बघतो. आणि मग नंतर जाणवते की फार काही हाती लागले नाही आणि मग ती चीडचिड ईथे काढतो.

>>> सब फसाद कि जड यहां है बरखुरदार! Happy तुम्ही बघायला लागला की बघत राहता. बिगबॉसचे उदाहरण त्यासाठीच होते. फ्रस्ट्रेशन हे पाहावे लागते म्हणून नाही तर पाहल्यानंतर हाती काही लागत नाही म्हणुन आहे, रसिकाला समृद्ध करण्याचा कलेचा जो विशेष गुण आहे तो इथे मिसिंग असतो. वेळ निघून जाते, आपण रिकामे राहतो, चिडचिड म्हणून होते. अगदी बातम्या बघून सुद्धा हेच वाटेल.

पण समोर लागलंय म्हणून बघत राहणे हे प्रेक्षकाची स्वयंजागृती किती आहे ह्यावर अवलंबून असते. ९० टक्के लोक जागृत नसतात (म्हणून तर ते टीवी लावून बसतात, नाहीतर दुसरी कामे केली असती, दुसरे मनोरंजन केले असते)

पूर्वी टीवी नव्हता तेव्हा लोक कोणत्या प्रकारचे मनोरंजन करायचे ते आठवा. किर्तन, भजन, गप्पागोष्टी, गॉसिप, खेळ, वाद्य वाजवणे, गाणी म्हणणे, काहीतरी कला जोपासणे व्हायचे. आजकाल हे हरवत चालले आहे. ते जीवन समृद्ध करणारं होतं,

टीवीसमोर फक्त वन-वे पॅसिव फीडींग होतं, जाहिराती+मार्केटींग सुप्तपणे काम करत राहते, प्रेक्षक अजाणतेपणी ग्राहक बनत राहतात.

(आमच्या घरी ४०" सोनी ब्राविया होता, विकून टाकला, परत दुसरा घेतला नाही. घेणार नाही. घेतला तरी कोणतीही डिश-चॅनेल वगैरे पुरवणारी सर्विस घेणार नाही. मुलांना कार्टून्स ची भयंकर अ‍ॅडिक्शन झाली होती. आता मुले अजून थोडी मोठी झाल्यावर सिनेमा वगैरे पाहण्यासाठी मोठी स्क्रिन घेइन, दोन तीन वर्षांनी.)

ऋन्मेष, दर्जाचा आणि बजेटचा संबंध असतोच असे नाही.
तुलनेसाठी पुली आणि बाहुबली बघावा. असंख्य अलियन अब्डक्शन, स्पेशल स्पिसीज आउटब्रेक वगैरे विषयांवर निघणारे हॉलिवुडी जिलेब्या बघाव्यात...

मालिकांना पैसे मिळत नाहीत म्हणून दर्जा नाही असे म्हणू नये. उलट माझ्य निरिक्षणानुसार पैसा मिळाला की मालिकेच्या कथानकात पाणी ओतायला सुरुवात होते, सर्वात पहिले उदाहरण "नीरजा गुलेरी की अजिमोशान पेशकश, चंद्रकांता", चार दिवस सासुचे, वगैरे वगैरे....

एक दिड वर्षापूर्वी लोकसत्ता मध्ये या विषयावर एक लेख आला होता. प्रत्येक मालिकेचा एक creative director असतो जो त्या वाहीनीचा माणूस असतो. हा माणूस TRP पाहून कथानक कधी आणि कसं पुढे सरकणार हे ठरवतो आणि त्या प्रमाणे लेखक/ दिग्दर्शक काम करतात. आता यात कलाकरांना किती say असतो माहित नाही. लेखक/ दिग्दर्शक daily/weekly basis वर काम करतात. TRP घसरला की चांगल्या दिग्दर्शकाला पाचारण करतात.
गेली एक दिड वर्षे मी एक हिंदी मालिका (आणि काही इतर हिंदी मालिका अधूनमधून) पाहत आहे. ती मालिका पहाण्याचं एकमेव कारण की मला पहायचं आहे किती मुर्खपणा दाखवणार आहेत. मराठी मालिका खुप बऱ्या आहेत असं माझं मत आहे.

मराठी प्रेक्षक आणि कलाविश्व या दोन्ही गटांना स्कित्झोफ्रेनिआ झाला आहे असे वाटते. त्याशिवाय वेगवेगळे. उत्तम आणि प्रयोगशील सिनेमे काढणारे आणि बघणारे लोक त्याचवेळी इतके भयानक टेलिव्हिजन शोज कसे तयार करतात आणि बघतात?

ऋन्मेष, दर्जाचा आणि बजेटचा संबंध असतोच असे नाही.
>>>>>

समजा मी आणि तुम्ही एक कलाकार आहोत. माझ्या कलाकृती सामान्य असतात, तुमच्या उच्च दर्जाच्या असतात. आपण एके ठिकाणी आपल्या त्या कलाकृती विकतो. तुम्हाला आणि मला एकच भाव मिळत असेल तर तुम्ही दोन्हीपैकी एक गोष्ट नक्की करणार - एक तर तिथे आपली कलाकृती विकाल जिथे तिला ईथल्यापेक्षा जास्त किंमत मिळतेय, किंवा तुम्हीही जास्त मन न लावता, मेहनत न घेता ढिसाळच कलाकृती बनवाल. आणि त्या माझ्यापेक्षा कमी वेळात बनवून जास्त पैसा कमवाल. मात्र जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा लगेच तिथे सटकाल जिथे तुम्हाला जास्त स्कोप आहे..

ऋन्मेऽऽष ... .तोच तर मुद्दा वर बर्‍याच जणांनी मांडला आहे..

गेला बाजार, घाऊक प्रमाणात जर तुम्ही ( म्हणजे कोणीही) कलाकृती पाट्या टाकल्या प्रमाणे बनवत असाल... तर उगाज उच्च दर्जाचे कलाकार म्हणुन मिरवुनये अस काहिसा मुद्दा होता ना...?

कला प्रकार हा सॄजनशिलतेशी संबधीत आहे.. म्हणुनच तर कलाकाराला समाजात मान असतो.
जर सॄजनशिलता बाजुला सारुन, घाऊक प्रमाणात कलाकृती बनवल्या तर येणार्‍या प्रतिक्रिया पण तश्याच असनार..

बजेट आणि क्वालिटीचा काय संबध ( Unless script ची ति मागणी नसेल तर).
उ.दा.
- ब्योमकेश बक्शी.
- तलाश
- सुरभी

मराठी प्रेक्षक आणि कलाविश्व या दोन्ही गटांना स्कित्झोफ्रेनिआ झाला आहे असे वाटते. त्याशिवाय वेगवेगळे. उत्तम आणि प्रयोगशील सिनेमे काढणारे आणि बघणारे लोक त्याचवेळी इतके भयानक टेलिव्हिजन शोज कसे तयार करतात आणि बघतात?
Submitted by आगाऊ
*+१०००

मला तुम्ही पुरुषांमध्ये धरू नका. ?? ? Happy

तर उगाज उच्च दर्जाचे कलाकार म्हणुन मिरवुनये अस काहिसा मुद्दा होता ना...?
>>>>>>
हा मुद्दा कुठून आला, मोबाईलवर पटपट वरखाली स्क्रॉल करण्यात काही मिसले वाटते
नक्की कोणते कलाकार स्वतःला उच्च दर्जाचे म्हणवताहेत, मालिकावीर का?
आणि समजा मी वर म्हटल्याप्रमाणे एखादा उच्च दर्जाचा कलाकार अंगात पोटेंशिअल असूनही पैसे कमी मिळत असल्याने त्याबदल्यात त्याच किंमतीचे काम देत असेल तर ... तर त्याने स्वतःला उच्च दर्जाचे समजणे सोडून द्यावे का जे तो प्रत्यक्षात आहे.
बाकी दर्जा नक्की काय कोण कसा ठरवते हा न थांबणार्‍या वादाचा विषय होईल, पण लोकप्रियता तर आकड्यात मोजता येते, कलाकारांची असो वा कार्यक्रमाची. जर एखादा लोकप्रिय कलाकार जर आपली लोकप्रियता मिरवत असेल तर तो देखील त्याचा हक्कच आहे.

हुमायुन नेचरचा एक प्रॉब्लेम आहे की आपल्यामते दर्जा नसलेल्या गोष्टी जेव्हा लोकप्रिय होतात तेव्हा आपल्याला ते रुचत नाही Happy

अवांतर - आणि हो, मला खरेच पुरुषांमध्ये धरू नका. माझी मानसिकता महिलांसारखी आहे अशी माझी गर्लफ्रेंड म्हणते Happy

हुमायुन..!!! तो हुमायुन बादशा ?

(मी थोड्यावेळा अगोदर वाचल तेव्हा त्या बादशाच्या स्वभावाचा काहीतरी संदर्भ इथे दिलेला आहे कि काय अस वाटल Happy )

Pages