माझा मुलगा ६ महिन्याचा झाला तेव्हापासून तो ८ महिन्यांचा होईपर्यंत मी आदर्श माता होते. कारण मी जे देईन ते तो बकाबका खायचा. नाचणी, अंडे, चिकन सूप, भाज्यांचे सूप, कुस्करलेली भाकरी, दही, फळं काही नाही म्हणून नाही. पण ८ महिन्यांचा झाला आणि त्याला जीभ फुटली. त्यानंतर त्यानी जे काय खाण्याचे नखरे सुरु केले ते कमाल होते. तरीसुद्धा १-२ या वयात त्याला थोडीतरी समज होती. २ वर्षांचा झाल्यापासून थयथयाट करणे हे एक नवीन अस्त्र त्याच्या हाती लागले आहे. त्यामुळे कुठलीही अप्रिय सवय लावताना आमच्या घरात प्रचंड दंगा होतो. आधी तो तीन बाजूंनी असायचा. मी, माझा नवरा आणि मुलगा तिघेही एकमेकांवर चिडायचो. पण हल्ली आम्ही त्याच्याकडे त्याच्या या दंग्यात दुर्लक्ष करायला शिकलोय.
कुणी कितीही "मुलांच्या कलानी" घ्या असं सांगितलं तरी काही बाबतीत थोडी शिस्त या वयातही लावावीच लागते. जेवणाच्या बाबतीत आम्ही काही नियम केले आहेत ते मी इथे देते. या धाग्यावर सगळ्या अनुभवी आई बाबांनी आपापल्या मुलांना चौरस आहार घेण्याकडे कसे नेऊन ठेवले त्याच्या युक्त्या लिहाव्यात ही विनंती. कारण आमच्यासारखे मायबोलीकर नित्य अशा युक्त्यांच्या शोधात असतात.
आम्ही केलेले नियम
१. जेवताना कुठलेही करमणुकीचे साधन/खेळणे वापरायचे नाही.
एकदोनदा त्याचा दंगा बंद व्हावा म्हणून मी त्याला यूट्यूबवर गाणी लावून दिली. पण त्यानंतर त्याला काही दिवस तशी सवय लागली. आणि मग आपण काय जेवतो आहोत याकडे त्याचे लक्ष नसायचे. त्या ऐवजी आता जेवताना मी त्याला त्याच्या जेवणाबद्दलच काहीतरी गंमत करून सांगते. आणि तटाकडे लक्ष द्यायला लावते. हे आता गेल्या २-३ महिन्यात नीट जमले आहे.
२. नो बेकरी
मध्यंतरी विक्रमला वेगवेगळी बिस्किटे खायचा फारच नाद लागला होता. त्यामुळे त्याच्या जेवणावर परिणाम व्हायचा. यासाठी आम्ही दोघांनी घरी बिस्किटे आणणे किंवा, आपण ती खाणे, पण त्याला न देणे हे बंद केले. तसे केल्यापासून त्याचे बिस्कीटवेड बरेच कमी झाले आहे. आजी आजोबांकडे गेला की ते त्याला काय हवं ते देतात. पण म्हणतातच ना, व्हॉट हॅपन्स अॅट ग्रॅनीस, स्टेज अॅट ग्रॅनीस! बिस्किटांबरोबर ब्रेड, बाहेरचे केक सुद्धा पूर्ण बंद केले. मी आठवड्यातून एकदा घरी केक बनवते.
३. मधल्या भुकेला सिझनल फळे आणि केळी
कुठेही बाहेर फिरायला वगैरे गेलो की आम्हाला फळांचा खूप आधार वाटतो. मधल्या भुकेला आंबा, संत्रे, केळी दिल्याने चिप्स, बिस्किटे वगैरे टाळले जाते. पण यातही मुलं हट्ट करतातच. त्यामुळे ६० % जरी यश मिळाले तरी आम्ही खूप मानतो.
४. भाज्यांचे पराठे
वेगवेगळ्या भाज्या घालून केलेले पराठे हल्ली नियमितपणे घरी केले जातात. त्यामुळे ताशा भाज्या तो खातो.
फक्त, पोळी-भाजी-भात-आमटी असा सगळा आहार घेताना भाजी नको म्हणतो. मग मी भाजी भातात कमी कॉन्सन्ट्रेशननी कालवून देते. हे कॉन्सन्ट्रेशन जरी जास्त झाले तरी लगेच ड्रॉवर उघडल्यासारखा घास साभार परत येतो!
मुलांना अशा भाज्या फसवून कधीपर्यंत द्याव्या लागतात? आणि त्या त्यांनी खाव्यात म्हणून काही गमती जमती कुणी केल्या आहेत का?
भाज्या घालून करायच्या रेसिपीज सुद्धा चालतील कारण कुठल्याही रूपात भाजी गेली तरी तिच्या चवीशी मैत्री होतच असते.
Aga saee, anek tas dudh na
Aga saee, anek tas dudh na pita unch stoolavar basnari saee tu ch na? Tuzya blog var vachlay
Take it lightly.
छान प्रतिसाद आले आहेत ह्या
छान प्रतिसाद आले आहेत ह्या धाग्यावर एकेक.
पराग, माझ्या माहेरीही सेम टू सेम ! आणि एखाद्याला आवडत नाही म्हणून दुसरी भाजी अजिबात केली जाणार नाही. >>> ह्याला 'पंक्तीप्रपंच' करणे ( प्रत्येकासाठी वेगळे ) असा खास शब्द होता.
मला ही पद्धत अतिशय योग्य वाटते
Aga saee, anek tas dudh na
Aga saee, anek tas dudh na pita unch stoolavar basnari saee tu ch na? Tuzya blog var vachlay Lol
Take it lightly.
हा हा हा.
नताशा, माझ्या दूध न आवडण्याची उकल झाली आहे. माझ्या मुलांनी पण ८ व्या महिन्यापासून दूध प्यायचे सोडून दिले. पण आम्हाला आमच्या डॉक्टरनी अश्या दूध सोडून देणाऱ्या मुलांना (उंच स्टुलावर बसवून) सक्ती करायची नसते असे ठणकावून सांगितले. आणि आश्चर्य म्हणजे तो २ पूर्ण झाल्यावर पुन्हा आपणहून दूध पिऊ लागला.
बरं झालं मी माझ्या लहानपणीचा ब्लॉगच लिहून ठेवलाय. आता परत जाऊन वाचते!
>>>> हे वय २ वरुन १२ आणि २०
>>>> हे वय २ वरुन १२ आणि २० वर गेलं कि आईच खरं फ्र्स्ट्रेशन काय असतं ते कळेल. टीन एजर मुलं जेवायची वेळ झाली कि आपल्या आखोंके तारे, दुलारे अगदी असह्य होतात. म्हणजे चाइल्डलेस शेजारीण किती लकी इथपर्यंत वाटतं. <<<<
अगदी अगदी....
>>>.आणि एखाद्याला आवडत नाही म्हणून दुसरी भाजी अजिबात केली जाणार नाही. >>> ह्याला 'पंक्तीप्रपंच' करणे ( प्रत्येकासाठी वेगळे ) असा खास शब्द होता. <<<<<
यावरुन आठवले, माझा एक मित्र आहे, तो लहानपणची आठवण सांगतो त्याप्रमाणे, त्याचे बाबा मिलिटरी खात्यात नोकरीस, घरातही तशीच शिस्त, एखाद्याने एखादी भाजी आवडत नाही म्हणून ठणाणा केलाच, तर पुढला आख्खा आठवडाभर फक्त ती अन तीच भाजी आणली जायची.... दुसरे काहीही नाही तोंडीलावायला.... मग बस लेका उपाशी नाहीतर तसाच, एक दिवस उपाशी राहिल, दोन दिवस, तिसरे दिवशी मुकाट पानात पडेल ते गिळायला सुरुवात.....
अर्थात तेव्हांचे शेजारीपाजारी/नातेवाईक्/आज्जीआजोबा वगैरे कुणी या नियमांच्या मध्यात पडुन, पोराला उपाशी रहातोय, तर वेगळे पदरा आडून वगैरे पुरवायचे नाहीत. हल्ली असे कुणी काहि करु शकेल की नाहि शंकाच आहे.
वर कुणी म्हणल्याप्रमाणेच, कालच रविवारी २ वर्षांच्या नातीला आख्खी मंडई फिरवुन ताडपत्रीची पिशवी भर भाजी घेऊन आलो. मिरची सोडून बाकीच्या भाज्या तिला हाताळायला (खेळायला?) देखिल दिल्या... ! घेऊदेकी त्यांचे गंध/वास/स्पर्श....
पण मी म्हणते, इतकी डोकेफोड
पण मी म्हणते, इतकी डोकेफोड आणि आटापिटा कशाला करायचा? इतर फॉर्म्स मध्ये भाजी पोटात जातेय, जंक फूड कमी केलं आहे किंवा बंद केलं आहे ( माझ्या मते सगळ्यात महत्वाचे काम हेच आहे), फळं खातोय हे ठीक आहे की. आपण म्हणतो त्याच स्वरूपात भाजी कोशिंबीर खाल्ली पाहिजे हा अट्टाहास नाही केला तरी सध्या चालेल की! त्याला नको असेल तर न ऑफर करता आपण खावं. एक ना एक दिवस बरोब्बर चव घेऊन बघतात मुलं. व्यवस्थित पोषण घटक शरीरात जाताहेत ना एवढं बघायचं, फूड सप्लिमेंट्स न देता ...
Fussy-eating toddlers 'not
Fussy-eating toddlers 'not the fault of parents' - http://www.bbc.co.uk/news/health-37642587

१. नावं बदलून द्यायचं.
१. नावं बदलून द्यायचं. कुठल्याही सपाट वस्तुला पॅन केक म्हणता येतं आणि नॉन सपाट ला बॉल्स. नाचणीच्या भाकरीला रेड पीटा, शिंगाड्याच्या शिर्याला चॉकलेट शिरा इ. मनात येईल ते बोलत सुटावं.
) बाकरवडी, फरसाण, चिवडा अवश्य द्यावं. याने बॉन्डिंग तयार होउन उद्या भाज्या खाताना पण ती जवळ येतील अशी वाट बघत बसावे. येतात ती.
२. जे आवडतं त्याच्या बरोबर खायला द्यायचं. इडली केचप इज जस्ट पर्फेक्ट डिश. भाजीवर कोथिंबिरी ऐवजी कधी एम एन एम पेरुन दिल्या तरी हरकत नाही. एक सुपर बारक्या एम एम मिळतात. योगर्ट एम एम आता मला पण आवडायला लागलंय.
३. आपण स्वत: कोणाला न विचारता खायला बसायचं. मुंगळे चिकटावे तशी पोरं येतात. त्यांना आपण खातोय ते (म्हण्जे जंकच असणार
४. खाताना बारक्या पोरांना बांधुन ठेवावं. (थांबा. चाईल्ड अब्युजला कॉल लावु नका. हाय चेअर, खुर्चीला बांधता येणारी बुस्टर यात.) त्याच्या पुढ्च्या प्लेटवर त्याला आवडणारे फिंगर फुड, काकडी टमेटोचे काप, चिरिओज, उकडलेल्या भाज्या ठेवाव्या. त्या हातात घेउन स्वत:च्या स्वतः खायला तोंड उघडलं की आपला भरवणारा चमचा, त्याचा हात तोंडात जायच्या आधी, त्याच्या तोंडात जायला हवा. याने हाताने चमचा ढकलणे हे हर्डल पार होते. चव आवडणार असेल तर आवडते/ समजते. या पहिल्या घास वेळेला टीव्ही/ कार्टुन अवश्य लावावे. अर्थात साभार परत येणार असेल तर याने फरक पडणार नाही.
५. आपली चिडचिड होणार असेल तर टीव्ही लाउन लंच/ डीनर बिंधास करावे. वेळ हाताशी असेल तेव्हा मात्र नीट जेवण.
६. प्रचंड भूक लागल्यावरची वेळ ही बोनस वेळ असते. तेव्हा काय देउ ते खातात मुलं. याचा वापर जपुन करावा, एक्सप्लॉईट करु नये.
७. हे नको, ते नको असं आपण स्वत: करु नये. त्यांच्या समोर बोलु तर अजिबातच नये. तसं करत असलो तर पोराचे लाड पुरवावेच.
८. डे केअर मध्ये उकडलेल्या भाज्या आणि पांढरा भात मिळतो. सो रात्री पांढरा भात मागितला तर द्यावा. तूप मीठ मेतकूट तरी घे करुन त्यांना पिडू नये.
९. फार पर्याय ठेवुच नये. आपल्याला पण करयला नको. आपल्या आळसात पोरं शिकली तर त्या सारखं सुख नाही.
१०. डबा संपला नाही, तर घरी आल्यावर तो खायला लावाला.
११. तिखट आवडत नसेल तर मात्र जेवण वेगळं काढावं अशा मताचा मी आहे. उगा तिखट खायला लावणे हा अत्याचार आहे.
१२. जेवण जेवला नाही, तर ठराविक वेळ झाला की प्लेट उचलावी. रात्री भुक लागली ते दूध द्यावे. अगेन बी वेरी केअरफुल. याची ही सवय लागु शकते. भरवलं की खात असेल तर भरवावे.
१३. मला स्वत्:ला दुधात साय आली तर अजुन ओकांबा येतो. पोराकडुन टेक्स्चर्ड फूडची फार अपेक्षा ठेवुच शकत नाही.
१४. फळभाज्याचे गोल फिरवून नूड्ल बनवणारं यंत्र माईट हेल्प टाईम्स.
आजच मुलाला अॅन्युअल चेकअपला
आजच मुलाला अॅन्युअल चेकअपला वेवुन आणले. डॉ. ने त्याला, भाज्या ,फळे, व्हिडिओ गेम्स सगळ्यावर लेक्चर दिले. सोनाराने कान टोचलेले बरे असतात. डॉ. चे जास्तं पटते मुलांना.
@ वरदा
@ वरदा
तेच योग्य वाटते आहे. पण काल मी आजूबाजूच्यांकडून त्याचं खोटं खोटं कौतुक करून घेतलं भाज्या खाणारा मुलगा म्हणून आणि त्यांनी खरंच २-३ घास भाजी पोळी खाल्ली फायनली.
पण हल्ली ताटात आमरस पण असतो, सो भाजीला बरीच कॉम्पिटिशन आहे.
@ अमितव
हाहा! खूप हसले.
मला नेहमी कॅल्विन आणि हॉब्स मधला स्पायडर पाय आठवतो. आई कॅल्विनला कुठलीतरी भाजी स्पायडर पाय अश्या नावानी खपवते. आणि तो लगेच गट्टम करतो.
मी नाचणी चॉकलेट म्हणून खापवायचा प्रयत्न केला आहे. पण समहाऊ आपले आई बाबा आपल्याला फसवतायत हे त्यांना आधीच कळतं. चेहरा ओळखता येतो मुलांना.
मला फक्त आपण एकटेच नाही आहोत ही भावना सुद्धा पुरे आहे आत्ता. आणि या प्रतिसादांमधून ती मिळाली. सो आता मी पोराला जास्त इरिटेट करणार नाही.
खोटं कौतुक करवून घ्यायची गरज
खोटं कौतुक करवून घ्यायची गरज असते का खरंच? फक्त दोनतीन घासांसाठी? आमरस वगैरे असताना कशाला हवीये भाजी? खाउदेत की सीझनमधे आमरस, मग भाजी असेलच परत पुढचे दहा महिने.
गैरसमज करून घेऊ नकोस, पण मला तो भाजी खाणे हा तुमच्यातला (त्याचा आणि तुझा) इगो इश्यू झाल्यासारखा वाटतो आहे. दोन महिने अजिबात भाजीचं नाव काढू नकोस त्याच्यासमोर. तुम्ही चवीने जेवत राहा. तो आपसूक काही महिन्यांनी खायला लागेल.
It's no big deal सई!
It's no big deal सई! मुलांच्या अशा फेजा
येत असतात फार लक्ष द्यायचं नाही! मोठी झाली की आपोआप बरच बर जेवतात!
अमितव लय भारी पोस्ट.. हाहाहा
अमितव लय भारी पोस्ट.. हाहाहा
"मोठी झाली की आपोआप बरच बर
"मोठी झाली की आपोआप बरच बर जेवतात!"
किती मोठी झाली की? मोठ्याहूनही खूप मोठी झालेली तरीही नीट न जेवणारी काही मुलं माहीत आहेत. आणि मी त्यातला एक आहे
मी चपाताली भाजीचा फक्त वास लावून खातो अशी माझी ओळख होती. अनेक भाज्यांत माझ्यासाठी बटाटे घातले जायचे आणि मी भाजीतले फक्त बटाटे वेचून खायचो.
आता जेव्हा मी स्वतःच स्वैपाक करतोय, तेव्हाच मी बर्याच भाज्या खायला लागलोय. तरीपण फ्लॉवर आणि मटार बिग नो नो आहेत.
सई, बाकी काहीही करा पण "हा भाज्या खात नाही" असं सारखं सारखं ऐकवू नका. त्यामुळे आपण भाज्या खायच्या नाहीत हे रिइन्फोर्स होतं की काय असं वाटतं. तुम्ही त्याच्या बरोबर उलट करताय, तर मुलांच्या डोक्यात रिव्हर्स चाइल्ड सायकॉलॉजी चालतच नसेल ना हे बघा. कारण ते खोटं कौतुक आहे हे क़ळायला वेळ लागणार नाही.
अनेक भाज्यांत माझ्यासाठी
अनेक भाज्यांत माझ्यासाठी बटाटे घातले जायचे आणि मी भाजीतले फक्त बटाटे वेचून खायचो.>> त्याने तुमच्या तब्बेतीची फार मोठी हानी झाली आहे का? किंवा तुमच्या वाढीत या खाण्याच्या सवयींचा अडथळा आला/जाणवला का? मला खरंचच जाणून घेण्यात रस आहे.. कारण सगळं खायचीप्यायची सवय लागली पाहिजे, जंक फूड नको (हे हजार टक्के मान्य) हे सगळं आदर्शपणे चांगलं आहे. पण त्याचा किती बाऊ करायचा? असा मला नेहेमी आजूबाजूच्या आया बघून प्रश्न पडतो. समजा नाही चार भाज्या खाल्ल्या पोराने तर आकाश कोसळणार आहे का? त्याच्या पोटात इतर मार्गाने/पदार्थातून पोषक घटक गेले तर चालेल की (दूध, अंडी, मासे, चिकन, फळे, इ..)
याच्यावरून आठवलं, आयुर्वेदातल्या एका जुन्या संहितेत (नेमका संदर्भ आठवत नाहीये, विचारून इथे लिहेन) असे लिहिले आहे की निरोगी कोण? तर जो मांस खातो आणि भाज्या/पालेभाज्या खात नाही तो.. तेव्हा निरोगीपणाच्या व्याख्याही देशकाळसंस्कृतीनुसार थोड्याफार बदलत असणारच..
@ वरदा
@ वरदा
मी तरी बाऊ करते आहे असे मला वाटत नाही. बाकीचे पाच सहा ताटातले पदार्थ मुलगा खातो पण भाजी खात नाही एवढाच इश्यू आहे. त्याचा माझ्या इगोशी संबंध असता तर अशी उघड उघड पोस्ट मी लिहिलीच नसती. मला बाकी पालक काय काय युक्त्या करतात ते जाणून घ्यायचे होते. आणि अशा अडचणी बाकीच्यांना आल्या असतील आणि तेव्हा त्यांनी काय केले हे जाणून आपण योग्य मार्गावर आहोत अशी भावना येते.
तेवढाच हेतू होता.
पालक म्हणून सगळ्यांच्याच थोड्या थोड्या चुका होतात. पण इतर अनुभवी लोकांकडून ऐकलं की वेगळे वेगळे मार्ग सापडतात.
काही मर्यादा ठेवल्या तर पालक बनण्याचा कुठलाच सर्वोत्कृष्ट मार्ग नाही. सगळेच धडपडत असतात. पण शेवटी आपण आपल्या पर्सनॅलिटीप्रमाणे मार्ग निवडतो. त्यालाही काही इलाज नाही.
@ भरत
मी त्याला कधीही शेम करत नाही. भाज्या न खाणारा मुलगा म्हणून. आणि तितकी वाईट वेळ येणारच नाही. (त्याच्या वागण्याची नाही, माझ्या वागण्याची). पण फक्त जेवताना त्याला बाकीचे काय खातायत ते मजेत पॉईंट करून दाखवते. की बघ बाबा काय खातोय? आजी काय खातेय? असे. जे तो लक्षात ठेवतो.
आमच्याकडे अगदी आठ-नउ
आमच्याकडे अगदी आठ-नउ महिन्यांच्या बाळाला भात भरवतानासुद्धा रोजच्या सगळ्यांसाठी केलेल्या भाजीतली एक फोड, आख्खी ठेवून शिवाय चमचाभर पालेभाजी अगदी मूळ रंगरुपासकट थोडी थोडी लागेल तशी कुस्करून देण्याची पद्धत होती. त्या पद्धतीचा फारच उपयोग झाला. अगदी शेपू, कारले ह्या भाज्यासुद्धा वगळल्या नाहीत. आता माझी मुलगी पानात पडेल ते आवडीने खाते. कधीच पराठे, कटलेट्स वगैरे करून लपवून छपवून भाज्या द्यायची वेळ आली नाही. पिझ्झा खाताना ती बरोबर वाटीभर कोशिंबीर व एखादे फळ घेऊन खाते.
त्याला दंड-भेद वापरून सेटल केले.
पुढे टीन एज मधे आपल्याला काहीच नावड नाही व इतर नावडवाल्या मुलांचे कसे लाड होतात हे पाहून, स्टाईल म्हणून ती नखरे करायला लागली
अजून एक उपाय म्हणजे - मुलांना कडकडून भूक लागू द्यावी म्हणजे मग आवडी नावडी कमी होतात. भूक लागायच्या आधीच खायला दिले की नखरे करतात.
अमितव भारी पोस्ट!
अमितव भारी पोस्ट!
वरदा,
वरदा,
तब्बेतीची हानी झाली की नाही हे सांगता येणार नाही. मी बराच काळ अंडरवेट होतो. पण यात माझ्या धड न जेवण्याचा आणि अनुवंशिकतेचा भाग किती हा मुद्दा आहे. मी इतरांपेक्षा जास्त वेळा आजारी पडत होतो आणि शाळा कॉलेज बुडवत होतो असे आठवत नाही. शक्ती कमी असेल. पण स्टॅमिना कमी नव्हता. मैदानी खेळांची आवड कमी असली तरी जेव्हा खेळत असे तेव्हा इतरांच्या आधी दमायला झालंय किंवा जे खेळ आवडतात ते नीट खेळता येत नाही असं झालेलं नाही. मोठेपणीही माझ्याबरोबरच्या अधिक हेल्दी लोकांपेक्षा माझा काम करण्याचा किंवा इव्हन चालण्याचा स्टॅमिना अधिक होता.
तुम्ही माशांबद्दल लिहिलंय, तर आमच्याकडे मांस-मासे खाल्ले जात असूनही मी (आणि माझी बहीण) मात्र ते खात नव्हतो. मी अजूनही खात नाही. फॉर नो रिझन. अंडी खात असे.
उसळीही.
याचा त्रास फक्त पुढे बाहेर एकट्याने राहायला लागले तेव्हा झाला. कारण तिथे उसळी नसत आणि ज्या भाज्या मिळत त्या गिळणंही कठीण होई. त्यामुळे ते चपातीला वास लावून खाणं आणखी वाढलं. म्हणजे माझ्या बरोबर मुंबईहून आलेल्या लोकांनाही त्या भाज्या आवडत असे नाही. पण ते निदान त्या संपवू शकत.
मोठेपणी एक मोठं आजारपण आलं पण त्याचा आहाराशी संबंध असल्याचं वाचलेलं नाही.
इथ अनेकांनी लिहिलंय की मुलांचे भाज्यांबाबत (अति) लाड करू नयेत, त्यावरून मला आता प्रश्न पडला की माझ्यावर अशी सक्ती लहानपणी का नाही झाली? म्हणजे आईने प्रयत्न केले असतीलच. पण नाही झालं. आणि तिने ते ताणलं नसेल. फक्त मी भाज्या खात नाही, असं ती म्हणत असे. पण त्या काळात बालमानसशास्त्राचा उदय झाला नव्हता
पण हे लाड किंवा स्वातंत्र्य जेवणाच्या बाबतीतच नव्हे तर सगळ्यांच बाबतीत होतं. आणि त्याचे वाईट परिणाम काय असतील माहीत नाही, पण चांगले परिणाम भापूर आहेत.
असो. लेखाचा फोकस लहान मुलांवरून माझ्यावर येण्याच्या आत आवरतो.
असो. लेखाचा फोकस लहान
असो. लेखाचा फोकस लहान मुलांवरून माझ्यावर येण्याच्या आत आवरतो.>>>
धन्यवाद, भरत.
धन्यवाद, भरत.
सई, बाऊ करणे हा शब्दप्रयोग तुला उद्देशून नव्हता. या धाग्याच्या निमित्ताने मी आसपास मला दिसणार्या परिस्थितीवर केलेली ती एक सरसकट कमेन्ट होती. पालक बनण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग नाही याबद्दल असंख्य वेळा अनुमोदन!
मी खायच्याप्यायच्या बाबतीत अगदी टिपिकल शिस्तीत वाढले. जी भाजी होईल तीच खायची वगैरे. पण मला लहानपणापासून काही भाज्या आवडत नाहीत त्या अजूनही नाहीच खाऊ शकत.
अर्थात! मोठं झाल्यावर
अर्थात! मोठं झाल्यावर मिळणाऱ्या निर्णय स्वातंत्र्यात मी १२-१३ वर्षांची असल्यापासूनच पडवळ, दोडका आणि पापडी या भाज्या बाद करायचा हे ठरवलं होतं.
जरा अवांतर होईल, पण माझं लग्न झालं तेव्हा माझ्या सासरचे लोक (सासूबाईंसकट) ७:३० च्या आत उठत नाहीत हा माझ्यासाठी न पचवता येणारा धक्का होता. आणि नवरा फक्त अमुक अमुक एवढ्याच भाज्या खातो अशी यादी मला देण्यात आली! हा दुसरा धक्का!!
पण ऑन द फ्लिप साईड, काही महिन्यांनी आई बाबांकडे राहायला गेल्यावर त्यांचं ते सकाळी ५ ला उठून चहा, व्यायाम करणं मला अतिरेकी वाटू लागलं. मला ५:३० ते ७:३० च्या शांततेची इतकी सवय झाली होती की ती आई बाबांबरोबर सुद्धा शेअर करावीशी वाटेना.
आता ३ वर्षांनी नीट बघितलं की दोन्ही घरातील संस्कारांची स्टेडी-स्टेट आली आहे.
असो. लेखाचा फोकस लहान मुलांवरून माझ्यावर येण्याच्या आत आवरतो.>>> हा हा!!
भाजीतली एक फोड, आख्खी ठेवून
भाजीतली एक फोड, आख्खी ठेवून शिवाय चमचाभर पालेभाजी अगदी मूळ रंगरुपासकट थोडी थोडी लागेल तशी कुस्करून देण्याची पद्धत होती. त्या पद्धतीचा फारच उपयोग झाला. >>>> ही पद्धत अवलंबून सुद्धा अत्यंत पिकी इटर झालेलं पोर माझ्या रोजच्या पहाण्यात होतं. प्रत्येक आईचं प्रत्येक मुल वेगळं असतं. त्यामुळे एकाच्या पोराला चाललेली पद्धत दुसर्याला चालेलच असं काही नाही.
भरत., तुमच्या दोन्ही सविस्तर पोस्टींबद्दल फार फार धन्यवाद. अनेकदा आदर्श पोरांबद्दलचे/आयांबद्दलचे किस्से ऐकण्यात्/बोलण्यात येतात तेव्हा बर्याच पालकांना- आया विशेषतः- आपलंच काही चुकत असेल असं वाटून अपराधी वाटतं किंवा आपल्या पोराचं कसं होणार, आता तो अशक्त निपजणार इ.इ याचं भयंकर टेन्शन येताना बघितलं आहे. मी पण या फेजमधून गेले आहे. सुदैवानं मला 'पोराला फार पिडू नकोस, थोडा मोठा झाला की खायला लागेल हळुहळु. सध्या जे आवडीनं खातोय ते खाउ दे.' अशी कानौघाडणी करणारी माबोकरीण भेटली. तेव्हापासून मी 'थंड रख के ' आहे
पण मला लहानपणापासून काही भाज्या आवडत नाहीत त्या अजूनही नाहीच खाऊ शकत. >>> अगदी अगदी.
आमरसाबद्दल सुद्धा अनुमोदन. एखाद्या भाजीत असतील ती पोषणमुल्ये १-२ वाट्या आमरसातून कमी-अधिक प्रमाणात मिळतीलच की. आवडीनं आमरस खातोय ही खरं तर सेलिब्रेट करायची गोष्ट आहे
एकुणात ही सगळी उठाठेव आपण खातो ते सगळं पोरांनी तशाच स्वरुपात खाल्ल पाहिजे असं इथे कुणीतरी लिहिलं त्याला पण अनुमोदन.
मला काही अनुभव नाहीये फारसा
मला काही अनुभव नाहीये फारसा पण जरा जेवण/खाणं या गोष्टींबद्दल फार चर्चा होणाऱ्या घरातल्या मुलांची नाटकं जास्त असतात असे माझ्या पाहण्यात आले आहे. जेवण, पदार्थ, अन्न या गोष्टी incidental आहेत. आयुष्यात इतर महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यावर चर्चा करता येते हे जर बिंबवले तर कदाचित कमी होतील नाटकं.
जेवण/खाणं या गोष्टींबद्दल फार
जेवण/खाणं या गोष्टींबद्दल फार चर्चा होणाऱ्या घरातल्या मुलांची नाटकं जास्त असतात असे माझ्या पाहण्यात आले आहे >>> हे फारच जनरलायझेशन झालं टण्या.
रविवार दि. ३० एप्रिल रोजी
रविवार दि. ३० एप्रिल रोजी बहिःशाल शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ आय़ोजित करीत आहे एक समुपदेशन.
वय वर्षे ३ ते १२ या वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी समुपदेशन.
'योग्य आहाराच्या सवयी कशा घडवाव्यात?'
यामध्ये बालआहारतज्ज्ञ स्वाती चंद्रशेखर, डॉ. नितीन कोचर, आणि बालमानसतज्ज्ञ डॉ. मीनल साने-जोशी मार्गदर्शन करतील.
स्थळ- हेल्थ सेंटर बिल्डिंग, तळमजला, (मुख्य प्रवेशद्वाराजवळील उजवीकडची पहिली इमारत) विद्यानगरी, सांताक्रूझ पूर्व
वेळ स. ११ ते दु.३.
प्रवेश शुल्क- रु. १००
(मुलांना बरोबर घेऊन येण्यास हरकत नाही. मार्गदर्शक तज्ज्ञ या मुलांशीही संवाद साधतील. शिवाय पेटकीपिंग हा छंद असलेले श्री सुबोध गोरे आपल्या काही पेटमित्रांसोबत मुलांशी गप्पा मारतील. मुलांसाठी जेवणाची सोय होऊ शकेल. पण डबा आणण्यास हरकत नाही.)
नावे नोंदण्यासाठी २६५३०२६६,९८२१७८६४९० या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी ११ ते संध्याकाळी ५ दरम्यानच संपर्क साधावा.
(मुग्धा कर्णिक यांच्या फेसबुक वॉलवरून)
तज्ज्ञ पण यात लक्ष घालताहेत म्हणजे भलताच मोठा प्रश्न असणार.
हो, भरत. हा सध्या खूप मोठा
हो, भरत. हा सध्या खूप मोठा प्रश्न आहेच. इथे आपण भाज्या पोळीशी खात नाही वगैरे चर्चा करतो आहोत. पण मुळात अनेक आईबाप मुलांना सतत विकतचे, प्रिझर्वेटिव्ज असलेले जंक फूड गणले जाणारे पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स, शीतपेये, वैद्यकीय सल्ल्याशिवाय एनर्जी/सप्लिमेन्टरी पेये असं खूप मोठ्या प्रमाणावर सर्रास देतात. बाहेरच्या पदार्थांमधे काही ठराविक चवी/स्वाद, अतिरिक्त साखर, मैदा इ. असल्याने मुलांना त्याची सवय लागते आणि मग रोजचं घरचं अन्न नकोसं असतं. या सगळ्याने सध्या बालमधुमेही, ओबेसिटी वगैरे प्रकार खूप मोठ्याप्रमाणावर आसपास दिसतात. आमची मुलं खातच नाहीत म्हणून मग हे द्यावं लागतं असं प्रतिपादन खूपसे पालक करतात हे मी माझ्या काही सोशल सर्कल्समधे, आसपास/शेजारी अनेकदा बघितलं आहे.
छान धागा सई. पण हा धागा फक्त
छान धागा सई. पण हा धागा फक्त मायबोली सदस्यत्व असेल तरच दिसतो. असं का?
कारण 'मुलांचे संगोपन' ओपन
कारण 'मुलांचे संगोपन' ओपन नाही. कदचित त्यावर महत्त्वाची माहिती असते, सिरियस चर्चा होते. कॅज्युअल रीडरनी सभासद व्हावं म्हणुन केलं असेल.
जेवण, पदार्थ, अन्न या गोष्टी
जेवण, पदार्थ, अन्न या गोष्टी incidental आहेत. आयुष्यात इतर महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यावर चर्चा करता येते हे जर बिंबवले तर कदाचित कमी होतील नाटकं. >>
माझ्या ( लिमिटेड, वैयक्तीक सर्कल मधल्या) पाहण्यात जे आई वडील, आजी आजोबा सुद्धा अॅकॅडेमिक् , सायंटीफिक रीसर्च, मेडिफिल फील्ड मधे आहेत त्यांची मुलं जास्त पिकी इटर आहेत . हायस्कूल, कॉलेजच्या वयातली मुलं मुली एखाद दोन भाज्या, एखाद्याच प्रकारच्ण वरण खाणार. एरवी दूध भात किंवा तुप साखर पोळी . या घरांमधून घरातले अॅडल्ट्स जेवण, पदार्थ, अन्न या गोष्टी incidental आहेत हे पूर्णपणे अंगी बाणवलेले आहेत.
जिथे आया, इतर मंडळी चवी ढवी कडे लक्ष देणारी आहेत , वेगवेगळे पदार्थ हौसेने करणारी, खाणारी आहेत तिथे मुलं एव्हेंचुअली बहुतांश भाज्या आणि इतर प्रकार खायला शिकतात .
माझी मुलं २-४ वर्षेपर्यंत खाण्या पिण्याचे फार नखरे करत. अगदी पिझ्झा, पास्ता देखील खात नसत. तमाम बर्थडे पार्ट्यांना जाताना आम्ही त्यांचे जेवण खाण घेउन जात असू.
आता ( १२ -१४) जवळपास सर्व भाज्या, फळे, सॅलड, डाळींचे प्रकार, उसळी व्यवस्थित खातात.
आता विचार केला तर आम्ही केलेले दोनच उपाय लक्षात येतात.
१. घरात असतील त्यांनी सर्वांनी एकत्र जेवणे. आधी मुलांना भरवून मग नंतर आपण असा प्रकार बंद केला
२.नातेवाईंकाचे सल्ले, इतर मुलांशी तुलना या कडे संपूर्ण दुर्लक्ष
फारच जिव्हाळ्याच्या विषयावर
फारच जिव्हाळ्याच्या विषयावर धागा काढल्याबद्दल धन्यवाद सई!
बर्याच टीप्स मिळत आहेत.
Pages