Submitted by सत्यजित... on 9 April, 2017 - 14:37
साचला का एवढा अंधार आहे?
काजव्यांचा तेवढा आधार आहे!
जागल्या होत्या मशाली काल येथे
आज इथला सूर्यही बेजार आहे!
एकही ठिणगी कशी येथे पडेना?
कोण इथला आंधळा सरदार आहे?
फुंकतो आहे कधीचा सूर्य मीही
श्वास माझाही जरा उबदार आहे!
सारखा हिंदोळतो हा प्राण माझा
त्या सुऱ्याची चालही लयदार अाहे!
—सत्यजित
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह.....सुंदर
वाह.....सुंदर
धन्यवाद अक्षयजी!
धन्यवाद अक्षयजी!
छान!
छान!
छान...
छान...
खूपच छान !
खूपच छान !
धन्यवाद मीनलजी,राजेंद्रजी
धन्यवाद मीनलजी,राजेंद्रजी,ऋषभजी!
व्वा ! क्या बात है ?
व्वा ! क्या बात है ?
धन्यवाद अनुयाजी!
धन्यवाद अनुयाजी!
अतिशय सुंदर !
अतिशय सुंदर !